एकूण 27 परिणाम
मे 25, 2019
मुंबई - उल्हासनगर, नवी मुंबई, कल्याण-डोंबिवली, पुणे, कोल्हापूर, नाशिक, मालेगाव, परभणी व चंद्रपूर या नऊ महापालिकांमधील 15 रिक्त पदांच्या पोटनिवडणुकीसाठी 23 जूनला मतदान; तर 24 जून 2019 रोजी मतमोजणी होणार आहे, अशी माहिती राज्य निवडणूक आयुक्त ज. स. सहारिया यांनी शुक्रवारी येथे दिली. पोटनिवडणुका...
मे 04, 2019
उल्हासनगर : निवडणुकीचे काम करतेवेळी उल्हासनगर पालिकेचे कर्मचारी भगवान मगरे यांचा मृत्यू झाला होता. निवडणुकीच्या परिपत्रकानुसार मगरे यांच्या परिवाराला 15 लाख रुपये मिळावेत, असा प्रस्ताव ठाणे जिल्हाधिकारी तथा निवडणूक निर्णय अधिकारी राजेश नार्वेकर यांना पाठवण्यात आल्याची माहिती उपविभागीय तसेच सहाय्यक...
एप्रिल 28, 2019
उल्हासनगर : मागील काही दिवसांपासून राज्यातील तापमान 40 डिग्री च्या पुढे पोहचले आहे. याचाच फटका उल्हासनगरात आलेल्या निवडणूक कर्मचाऱ्याला बसला असून अति उष्माघाताने या कर्मचाऱ्याचा बुथवरच मृत्यु झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे.  भगवान मगरे (वय 54) असे मृत्यूमुखी पडलेल्या कर्मचाऱ्याचे नाव असून ते...
एप्रिल 23, 2019
उल्हासनगर : उल्हासनगर येथे आज सायंकाळी चारच्या सुमारास सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी जगतसिंग गिरासे यांच्या मार्गदर्शनाखाली उल्हासनगरातील आचारसंहिता भरारी पथकाचे नोडल अधिकारी युवराज भदाणे यांनी एका कारमधून तब्बल 71 लाख रुपयांची बेहिशेबी रोकड पकडली. भदाणे यांच्या पथकाने चार दिवसात बेहिशेबी रोकड...
एप्रिल 21, 2019
उल्हासनगर : सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी जगतसिंग गिरासे यांच्या मार्गदर्शनाखाली कमालीचे सक्रिय झालेल्या  उल्हासनगरातील आचारसंहिता भरारी पथकाने अवघ्या 17 तासांत तीन आसामींच्या वाहनांची तपासणी केली आहे. त्यांच्याकडून 15 लाख 60 हजार रुपयांच्या बेहिशोबी रोकडचा पर्दाफाश केला आहे. याप्रकरणी उल्हासनगर व...
मार्च 29, 2019
उल्हासनगर - गुन्हे अन्वेषण शाखेच्या पोलिसांनी एका इसमाला एक गावठी पिस्तुल व दोन कठ्यांसह अटक केली आहे. यापूर्वी विठ्ठलवाडी पोलिसांनी दोघांना एका कठ्यासह अटक केली आहे. उल्हासनगरात आठवडाभरात या दोन घटना घडल्याने कल्याण लोकसभा निवडणूक पिस्तुल-गावठी कठ्यांच्या रडारवर असल्याचे संकेत मिळू लागले आहेत.काल...
मार्च 13, 2019
कल्याण : सत्तेवर येण्यापूर्वी आणि सत्तेवर आल्यावर मोदी सरकारने केवळ घोषणा केली असुन समाजातील सर्व स्तरातील नागरिकांची फसवणूक केली असुन लोकसभा निवडणुकीत जनतेत जाऊन यांच्या घोषणाचा परदाफार्ष करण्याचे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांनी कार्यकर्त्यांनी केले. कल्याण...
मार्च 13, 2019
कल्याण : या लोकसभा मतदार संघातून राष्ट्रवादी पक्षाकडून अनेक वजनदार मंडळींची नावे चर्चेत होती. ठाणे महापालिकेचे नगरसेवक बाबाजी पाटील यांचेच नाव येथून आघाडीवर असल्याची जोरदार चर्चा सोमवारी सुरु होती. मात्र, आता राष्ट्रवादीमधून अन्य सहा उमेदवारही निवडणूक रिंगणात उतरण्यास इच्छुक असल्याची माहिती...
नोव्हेंबर 29, 2018
उल्हासनगर : भाजप अतिरेक करत असतानाही शिवसेना राजीनामा देण्याऐवजी त्यांना साथ देत आहे. दोन्ही पक्ष एकाच माळेतील मणी असल्याचे नागरिकांच्या लक्षात आले आहे.विशेेेष म्हणजे कल्याण डोंबिवली म्हणगपालिका व मुंबई महानगरपालिकेत शिवसेना भाजपा या दोन्ही पक्षांनी वेगवेगळी निवडणूक लढवताना एकमेकांवर ताशेरे ओढले....
नोव्हेंबर 01, 2018
उल्हासनगर  : माजी उपमहापौर व 2017 मध्ये पार पडलेल्या उल्हासनगर पालिका निवडणुकीत शिवसेनेचे उमेदवार असलेले विनोद ठाकूर यांच्या सोबत व्यावसायिक रवी पाटील, साई पक्षाचे अमर लुंड व शिवसेनेच्या काही माजी शाखा प्रमुखांनी भाजपात प्रवेश केला आहे. मागच्या कल्याण पूर्व विधानसभा निवडणुकीत गणपत गायकवाड यांचा कमी...
सप्टेंबर 24, 2018
उल्हासनगर : ऐन महापौर पदाच्या निवडणुकीच्या तोंडावर फुटलेल्या साईपक्षाची विभागणी झाली असून एका गटाने शिवसेनेशी हातमिळवणी केली आहे. त्या अनुषंगाने शिवसेनेच्या बळावर साईच्या ज्योती बठीजा यांनी महापौर पदाचा उमेदवारी अर्ज सादर केला आहे. त्यामुळे निवडणुकीपूर्वी महापौरांच्या प्रमुख दावेदार असणाऱ्या...
सप्टेंबर 04, 2018
उल्हासनगर : भाजप-साईपक्ष-टीम ओमी कलानी यांच्यातील करारानुसार सव्वा वर्षाचा कालावधी संपुष्टात आल्याने भाजपच्या मीना आयलानी यांनी आज सायंकाळी सातच्या सुुमारास महापौरपदाचा राजीनामा आयुक्त गणेश पाटील यांच्याकडे सुपूर्द केला आहे. त्यामुुळे कलानी परिवाराची सून पंचम कलानी यांच्या महापौरांचा मार्ग मोकळा...
ऑगस्ट 28, 2018
उल्हासनगर - या महिन्याच्या 2 तारखेला पालिकेच्या शाळा नंबर 21 मध्ये पुरवल्या जाणाऱ्या पोषणआहार मधील वरणभातात उंदराची लेंडी आढळली होती. हा पोषणआहार माणसाच्या खाण्याकरिता योग्य नसल्याचा अहवाल प्राप्त झाल्यावर आज उल्हासनगर पालिका आयुक्त गणेश पाटील यांनी पालिका शाळा नंबर 21 सोबत उल्हास विद्यालय या खाजगी...
ऑगस्ट 16, 2018
उल्हासनगर- देशाची फाळणी झाल्यावर पाकिस्तानातील सिंध प्रांतातून निर्वासित म्हणून उल्हासनगरात स्थायिक झालेल्या मराठी मालवणी ,बौद्ध, गुजराती, परिठ समाजाने स्थापन केलेल्या सिंध महाराष्ट्रीय समाजाची निवडणूक पार पडली. त्यात माजी शिवसेना नगरसेवक सुभाष मनसुलकर यांच्या उल्हास विकास पॅनलने बाजी मारली आहे....
ऑगस्ट 15, 2018
मुंबई - राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या राज्यातील चौदा जिल्हाध्यक्ष-कार्याध्यक्षांच्या नियुक्‍त्या पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आमदार जयंत पाटील यांनी आज जाहीर केल्या. यासाठी पक्षांतर्गत निवडणूक घेण्यात आली होती. ठाणे शहर - आनंद परांजपे, कार्याध्यक्ष - संजय वढावकर, ठाणे ग्रामीण- जिल्हाध्यक्ष...
ऑगस्ट 13, 2018
उल्हासनगर - देशाची फाळणी झाल्यावर पाकिस्तानातील सिंध प्रांतातून निर्वासित म्हणून उल्हासनगरात आलेल्या मराठी मालवणी, बौद्ध, गुजराती, परिट समाजाने स्थापन केलेल्या सिंध महाराष्ट्रीय समाज संस्थेची निवडणूक 15 ऑगस्ट रोजी होत आहे. त्यात तीन पॅनल रिंगणात असून आजी-माजी नगरसेवक यांचा अध्यक्ष पदासाठी आमना-...
जून 11, 2018
उल्हासनगर - गेल्या चार पाच वर्षांपासून पालिकेच्या वतीने परवण्यांचे नूतनीकरण केले जात नसल्याच्या निषेधार्थ उल्हासनगरातील आर्किटेक्ट असोसिएशनने येत्या 25 जून रोजी होणाऱ्या पदवीधर मतदार संघाच्या निवडणुकीवर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतला आहे. असोसिएशनचे अध्यक्ष अमर जग्यासी यांनी ही माहिती दिली....
मार्च 15, 2018
उल्हासनगर : पुजाकौर लभाना यांचे जातप्रमाणपत्रामुळे नगरसेवकपद रद्द झाल्याने प्रभाग 17 मध्ये 6 एप्रिलला पोटनिवडणूक होत आहे. विशेष म्हणजे पुजाकौर यांची तक्रार ज्यांनी केली होती, त्या काँग्रेसच्या पराभूत उमेदवार माजी उपमहापौर जया साधवानी यांच्या चुलत बहिणीला उमेदवारी जाहिर करून राष्ट्रवादीने अनपेक्षित...
फेब्रुवारी 07, 2018
उल्हासनगर : दिग्गज उमेदवार असणाऱ्या माजी उपमहापौर जया साधवानी यांचा पराभव करून प्रभाग 17(ब)मधून निवडून आलेल्या शिक्षिका पुजाकौर लभाना यांचे नगरसेवक पद जातप्रमाणपत्रामुळे रद्द झाले आहे. त्यामुळे या प्रभागात राज्य निवडणूक आयोगाने पोटनिवडणुक जाहिर झाली आहे. त्यासाठी मतदार याद्यांची प्रक्रिया...
मे 03, 2017
उल्हासनगर - पनवेल महापालिका निवडणुकीसाठी उल्हासनगर पालिका अधिकाऱ्यांच्या ड्युट्या लावण्यात आल्याने पालिकेत शुकशुकाट आहे. अधिकारी नसल्याने काम ठप्प असून महत्त्वाच्या कामांसाठी आलेल्या नागरिकांना रिकाम्या हाताने परतावे लागत आहे. उल्हासनगरचे आयुक्त राजेंद्र निंबाळकर यांची पनवेल निवडणुकीसाठी, तर...