एकूण 19 परिणाम
फेब्रुवारी 24, 2019
उल्हासनगर : उल्हास नदीच्या पात्रात जलपर्णीचा विळखा बसल्याने या नदीतून पाणीपुरवठा होणाऱ्या उल्हासनगरसह इतर शहरातील 45 लाख नागरिकांच्या आरोग्याला धोका निर्माण झाला आहे. याबाबत दुर्लक्ष करणाऱ्या पालिकेच्या अधिकाऱ्यांना थेट जलपर्णी देऊन पालिकेच्या खळ-खट्याक करण्याची तयारी मनसेने केली आहे. एकीकडे खेमानी...
फेब्रुवारी 12, 2019
सोलापूर - घरात व परिसरातील अस्वच्छतेमुळे राज्यात मलेरियाची साथ आली असून, जानेवारी महिन्यात 302 रुग्ण "पॉझिटिव्ह' आढळले आहेत. त्यामध्ये मुंबईतील सर्वाधिक 176, तर गडचिरोली जिल्ह्यातील 85 रुग्णांचा समावेश असल्याचे आरोग्य विभागाकडून सांगण्यात आले. राज्यात काही दिवसांपासून वातावरणात बदल होत असल्याने...
फेब्रुवारी 03, 2019
उल्हासनगर : कॅम्प क्रमांक तीनमध्ये मेमसाब या पाच मजली इमारतीच्या दुसऱ्या मजल्याचा स्लॅब पहिल्या व पहिल्या मजल्याचा स्लॅब तळमजल्यावरील खाजगी दवाखान्यावर कोसळल्याने तिघांचा जागीच मृत्यू झाला. तर सहाजण जखमी झाल्याची दुर्दैवी घटना उल्हासनगरात घडली आहे. त्यात एक वयोवृद्ध महिला आणि काकी-पुतनीचा समावेश...
जानेवारी 14, 2019
उल्हासनगर - कर वसूलीसाठी आता उल्हासनगर पालिकेने एक अजब शक्कल लढवली आहे. उल्हासनगरातील विद्यार्थ्यांकरवी त्यांच्या आई बाबांना टॅक्स भरण्याची भावनिक साद घालण्याची युक्ती पालिकेद्वारे लढवण्यात आली आहे. पालिकेच्या मालमत्ता कर विभागाने आई-बाबांच्या नावाने तयार केलेले विनंती पत्र उद्या (सोमवार)...
जानेवारी 02, 2019
उल्हासनगर : सत्तेत असलेले भाजपाचे सभागृह नेते जमनादास पुरस्वानी यांच्या नातेवाईकांच्या दोन हॉटलांवर उल्हासनगर पालिकेच्या आरोग्य विभागाने छापेमारी करून प्लॅस्टिकचा साठा जप्त केला. यात 10 हजार रुपयांचा दंड ठोठावला  आहे. विशेष प्लॅस्टिक बंदीसाठी केंद्रातील भाजपाने कंबर कसली असताना भाजपाच्याच...
डिसेंबर 24, 2018
उल्हासनगर : स्वच्छ भारत सर्व्हेक्षणासाठी उल्हासनगर पालिकेने कंबर कसली असतानाच महाराष्ट्र नवनिर्माण कामगार संघटनेने सफाईसाठी 4 किलोमीटर लांबीचा रोड दत्तक घेतला आहे.पालिकेद्वारे संघटनेला शाबासकी देण्यात आली असून काही सहकार्य हवे असल्यास ते देण्याची तयारी देखील दर्शवली आहे. 2016 पासून केंद्र...
नोव्हेंबर 03, 2018
उल्हासनगर : विद्यार्थी आणि फटाके हे आनंद साजरे करणारं नात. पण फटक्यांमुळे निर्माण होणाऱ्या प्रदूषणाला आळा घालण्यासाठी या नात्याचा त्याग करणाऱ्या उल्हासनगर पालिकेच्या शाळा क्र.28 च्या 950 विद्यार्थ्यांनी फटाके विरहित दिवाळी साजरी करण्याची शपथ घेतली. त्यांनी रॅलीद्वारे जनजागृती केली आहे. बच्चेकंपनी...
ऑक्टोबर 12, 2018
उल्हासनगर - बाहेर कडाक्याचे ऊन, अधिकारी-कर्मचारी कामात मग्न, त्यात पहिल्या मजल्यातील गॅलरीतून धुराचा लोट बाहेर पडू लागला. पालिकेत आग लागल्याची ओरड होऊ लागतात सर्वांची पळापळ सुरू झाली. अग्निशमन दल, सुरक्षा रक्षकांनी धाव घेतली. अवघ्या दिड मिनिटात पालिकेची इमारत खाली करण्यात आली. नंतर हा तर धुराच्या...
सप्टेंबर 22, 2018
उल्हासनगर : भटक्या कुत्र्यांच्या वाढत्या संख्येवर मात करण्यासाठी किंबहूना संख्या नियंत्रणात आणण्याकरिता उल्हासनगर महानगरपालिकेच्या वतीने कुत्र्यांचे निर्बीजीकरण करण्याची सुरवात सोमवार किंवा मंगळवारपासून करण्यात येणार आहे. त्यासाठी 10 पिंजरे तयार असून श्वानांना ठेवण्याची-ऑपरेशनची यंत्रणा सज्ज...
सप्टेंबर 20, 2018
उल्हासनगर : साथीच्या आजारावर बऱ्यापैकी नियंत्रण मिळवणारे उल्हासनगर सध्या डेंग्यूच्या तापाने फणफणले आहे. शहरात डेंग्यूच्या 26 रुग्णांची संख्या असून काल रात्री एका मुलाला डेंग्यूची लागण झाल्याने त्याला उपचारांसाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. आर्किटेक्ट अतुल देशमुख हे कॅम्प नंबर 4 मध्ये शिवसेना...
ऑगस्ट 28, 2018
उल्हासनगर - या महिन्याच्या 2 तारखेला पालिकेच्या शाळा नंबर 21 मध्ये पुरवल्या जाणाऱ्या पोषणआहार मधील वरणभातात उंदराची लेंडी आढळली होती. हा पोषणआहार माणसाच्या खाण्याकरिता योग्य नसल्याचा अहवाल प्राप्त झाल्यावर आज उल्हासनगर पालिका आयुक्त गणेश पाटील यांनी पालिका शाळा नंबर 21 सोबत उल्हास विद्यालय या खाजगी...
ऑगस्ट 03, 2018
तब्बल दोन टन प्लॅस्टिकच्या पिशव्या जप्त उल्हासनगर - सर्वत्र प्लॅस्टिकची निर्मिती आणि विक्री बंद असतानाच, रात्रीच्या वेळेस बेलाशकपणे प्लॅस्टिकचे कारखाने सुरू ठेवून पालिकेच्या डोळ्यात धूळ फेकणाऱ्या उल्हासनगरातील दोन प्लॅस्टिकच्या कारखान्यांवर पालिकेने छापेमारी केली आहे. तब्बल दोन टन प्लॅस्टिक पिशव्या...
जुलै 17, 2018
उल्हासनगर - सातत्याने पडणाऱ्या मुसळधार पावसाने गळती लागलेल्या आणि त्यामुळे लहान मुलांना दुसऱ्या वॉर्डात स्थलांतरित करण्याची वेळ आलेल्या उल्हासनगरातील मध्यवर्ती शासकीय रुग्णालयावर आज खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी शिवसेना पदाधिकऱ्यांसोबत धडक दिली. गळतीकडे कानाडोळा करणाऱ्या सार्वजनिक बांधकाम (...
जुलै 11, 2018
उल्हासनगर : जिल्हा रुग्णालयाचा दर्जा मिळालेल्या उल्हासनगरातील शासकीय रुग्णालयाला संततधार पावसामुळे गळती लागली आहे. त्यामुळे लहान मुलांचा वॉर्ड खाली करून मुलांना दुसऱ्या वार्डात स्थलांतरित करण्यात आले आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाकडे निधीच नसल्याने डागडुजी किंबहूना नूतनीकरणा अभावी  रुग्णालयाची खस्ता...
एप्रिल 01, 2018
उल्हासनगर- उल्हासनगर महानगरपालिकाचा 916 कोटी 42 लाख रुपयांचा अर्थसंकल्प मंजूर करण्यात आला आहे. त्यात खर्च उत्पन्न 916 कोटी 42 लाख,खर्च 916 कोटी 32 लाख असा 10 लाख शिलकीचा अर्थसंकल्प असल्याचे सांगण्यात आले आहे. उल्हासनगर पालिकेचे तत्कालीन आयुक्त राजेंद्र निंबाळकर, मुख्यलेखाधिकारी दादा पाटील यांनी...
मार्च 12, 2018
उल्हासनगर : ध्वनि प्रदूषणाच्या विरोधात शहराला हॉर्नमुक्त करण्यासाठी कंबर कसणारे पोलीस उपायुक्त अंकित गोयल व हिराली फाऊंडेशनचे पुरुषोत्तम खानचंदानी, सरिता खानचंदानी या दाम्पत्याने संयुक्तरित्या आयोजित केलेल्या भव्य कार्यक्रमात एकवटलेल्या उल्हासनगरकरांनी शहराला हॉर्नमुक्त करण्याची शपथ घेतली आहे....
फेब्रुवारी 09, 2018
उल्हासनगर : स्वच्छ भारत अभियानाअंतर्गत उल्हासनगरला हागणदारी मुक्ततेचे प्रमाणपत्र मिळाले आहे. ही जमेची बाजू असून त्या अनुषंगाने संपूर्ण शहराला कचरामुक्त करण्यासाठी पालिका प्रशासनाने धर्मगुरू रिंकू भाई साहेब आणि काली साई यांना स्वच्छता दूत म्हणून नेमले असून शहरात नागरिकांनी अस्वच्छता पसरविल्यास हा...
जून 26, 2017
उल्हासनगर : शनिवारी (24 तारखेच्या) रात्री कोसळलेल्या मुसळधार पावसामुळे वालधुनी नदी सह नाल्यांना पूर येताच,केमिकल माफियांनी घातक रसायन पाण्यात सोडण्यात आले आहे.त्यामुळे काल रात्रभर जीवघेण्या उग्र वासाने नागरिक भयभीत झाले असून त्यांना उलटया जुलाबाचा त्रास झाला आहे.कायद्याने वागा लोकचळवळीने उल्हासनगर...
जून 22, 2017
उल्हासनगर - बदली झालेल्या ठिकाणी हजर न राहण्याचा निर्णय उल्हासनगर महापालिकेतील 16 सफाई कर्मचाऱ्यांना यांना महाग पडला आहे. हजर राहण्याच्या आदेशाचे, नोटिसींचे उल्लंघन केल्याने आयुक्त राजेंद्र निंबाळकर यांच्या आदेशान्वये उपायुक्त जमीर लेंगरेकर यांनी हजर न राहणाऱ्या 16 कर्मचाऱ्यांना निलंबित केले आहे....