एकूण 88 परिणाम
जून 12, 2019
कणकवली - क्षुल्लक कारणातून मित्रानेच धारदार शस्त्राने वार करून तरुणाचा निर्घृण खून केल्याचा प्रकार घडला. यात अफजल सुलतान शेख (वय २७, रा. शेखवाडी) याचा मृत्यू झाला. याप्रकरणी त्याचा मित्र संशयित मुजफ्फर आदमशहा पटेल (वय ३२) याला पोलिसांनी अटक केली आहे. ही घटना हरकुळ बुद्रुक येथे सोमवारी (ता. १०)...
जून 09, 2019
कोल्हापूर - पूर्ववैमनस्यातून अंबीलकट्टी (कागल) येथे मोटारसायकलवरून आलेल्या तिघांनी चाकूने केलेल्या हल्ल्यात आज तरुण गंभीर जखमी झाला. ‘सीपीआर’मध्ये उपचारांपूर्वीच त्याचा मृत्यू झाला. सूरज नंदकुमार घाटगे (वय २८) असे त्याचे नाव आहे. सायंकाळी साडेसहाच्या सुमारास अंबीलकट्टीजवळ घडलेल्या या प्रकारामुळे...
मे 28, 2019
सर्व समाजघटकांचा विश्‍वास संपादन करणे आणि सर्वांना बरोबर घेऊन पुढे जाणे, हे उद्दिष्ट असल्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे निवेदन स्वागतार्ह आहे. आता पक्ष आणि सरकारची हीच दिशा कायम राहायला हवी. ‘स ब का साथ, सब का विकास!’ अशी घोषणा देत नरेंद्र मोदी यांनी २०१४ मध्ये इंद्रप्रस्थाचे राज्य काबीज केले...
मार्च 26, 2019
‘नया पाकिस्तान’ची वेगळी प्रतिमा जगापुढे आणण्याचा पंतप्रधान इम्रान खान आणि त्यांच्या सहकाऱ्यांचा इरादा असला, तरी त्यासाठी मूलभूत परिवर्तनाची तयारी आहे काय, हा मुख्य प्रश्‍न आहे. विचारविनिमय, चिकित्सा, संवाद यांची दारे बंद करून घेतली आणि धार्मिक कट्टरतावादालाच मुख्य प्रवाहात आणले, की सार्वजनिक जीवन...
फेब्रुवारी 03, 2019
भारताच्या एकूण जलनीतीमध्ये पाणथळ प्रदेशांच्या व्यवस्थापनाला अगदीच दुय्यम स्थान असल्याचं दिसून येतं. देशातल्या सर्वच पाणथळींना त्यांचं पूर्ववैभव मिळवून द्यायला हवं. त्यांच्या पुनर्निर्मितीसाठी या पाणथळी आरक्षित करणं हाच एकमेव सकारात्मक पर्याय आहे. मात्र, त्यादृष्टीनं अजिबात प्रयत्न होत नसल्याचं आजचं...
जानेवारी 27, 2019
पुणे : सिंहगड रस्त्यावरील फनटाइम चित्रपटगृहाशेजारी रविवारी भरदिवसा एका तरुणावर काही जणांनी धारदार शस्त्राने वार केल्याचा धक्कादायक प्रकार घडला.  या घटनेत जखमी झालेल्या तरुणास रुग्णलयात दाखल केले, मात्र त्याचा मृ्त्यू झाल्याचे पोलिसांनी सांगितले. भरवस्तीत हा प्रकार घडल्याने परिसरामध्ये तणावाचे...
डिसेंबर 31, 2018
महाड  :  शिवसेनेचे रायगड जिल्‍हा परीषदेतील माजी विरोधी पक्षनेते सुरेश कालगुडे यांच्‍या अपघाती मृत्‍यूप्रकरणी  कंटेनरचालक शिवपती पटेल याच्‍याविरोधात खुनाचा गुन्‍हा दाखल करण्‍यात आला आहे. महाड एमआयडीसी पोलीसांनी त्‍याला अटक केली आहे. सुरेश कालगुडे यांचा जेसीबी झुआरी अॅग्रो केमिकल्‍स कंपनीत भाडयाने...
डिसेंबर 17, 2018
नाशिक : सातपूरच्या शिवाजीनगर परिसरात रविवारी मध्यरात्रीच्या सुमारास दुचाकीतील पेट्रोल संपल्याने तरुणाने त्याच्या मित्रांना फोन करून पेट्रोल आणण्यास सांगितले होते. मित्रांना पेट्रोल आणण्यास उशीर झाल्याच्या कारणावरून तरुणाने मित्रांना शिवीगाळ करून एकाच्या कानशिलातही लगावली. त्या रागातून मित्रांनीही...
डिसेंबर 11, 2018
माजलगाव (बीड) : साळेगाव कोथळा येथील तरुण शेतकरी कुंडलिक देवराव गवळी (वय. ३७) यांनी गळफास घेऊन आत्महत्या केली. घटना मंगळवारी (ता. ११) सकाळी उघडकीस केली. कुंडलिक गवळी यांच्याकडे बँकेचे कर्ज असल्याने ते अनेक दिवसांपासून तणावात असल्याचे त्यांच्या नातवेईकांनी सांगितले. ते रात्री त्यांच्या शेतात झोपायला...
डिसेंबर 07, 2018
गडचिरोली : विधवा शेतकरी महिलेने आपल्या शेतातील तणसाच्या ढिगात स्वत:ला जाळून घेतल्याची घटना देसाईगंज तालुक्‍यातील पोटगाव येथे गुरुवारी (ता. 6) सायंकाळी घडली. मुक्ताबाई मुकुंदा धोटे (वय 75), असे मृत महिलेचे नाव आहे. देसाईगंज पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मुक्ताबाई ही नेहमीप्रमाणे सकाळी आपल्या...
डिसेंबर 05, 2018
कणकवली - नगरपंचायतीच्या निवडणुकीतील पराभवाचे कारण पुढे करून कणकवली महाविद्यालयातील विद्यार्थांना आज मारहाण करण्यात आली. अकरावी विज्ञान शाखेत शिकत असलेल्या आंब्रड येथील जीवन राणे आणि त्याच्याच वर्गातील सहकाऱ्यांना महाविद्यालयाच्या आवारात आज सकाळी साडेअकराच्या सुमारास मारहाण झाली होती. या मारहाणीनंतर...
नोव्हेंबर 24, 2018
रिझर्व्ह बॅंकेच्या संचालक मंडळाच्या बैठकीत काही बाबतीत सरकारने माघार घेतली, तर काही बाबतीत रिझर्व्ह बॅंकेने. ही तडजोड होती की संघर्षविराम हे काळच ठरवेल. परंतु, देशाची अर्थव्यवस्था नव्या उंचीवर नेण्यासाठी या दोघांचे संबंध सलोख्याचे असणे गरजेचे आहे, हे निश्‍चित. केंद्र सरकार आणि रिझर्व्ह बॅंक...
नोव्हेंबर 04, 2018
आग्यावेताळाबद्दल तुम्ही ऐकलंय? हा भुताचा एक टाइप आहे. मुंजा, चकवा, समंध, कर्णपिशाच्च, हडळ...तसा हा आग्यावेताळ. एकदम कडक प्रकार. याचा मंत्र जपला की कुठल्याही वस्तूला क्षणार्धात आग लावता येते म्हणे. अर्थात त्याआधी आग्यावेताळाला वश करता यायला हवं. ते एकदम मस्ट आहे. आपल्या लोककथांमधलं हे एक जुनं-पुराणं...
ऑक्टोबर 18, 2018
स्त्रियांच्या विरोधातील भेदभावाला तिलांजली देणाऱ्या न्यायालयीन निर्णयाच्या विरोधातील केरळमधील आंदोलन म्हणजे सुधारणेकडे पाठ फिरविण्याचा प्रकार आहे. राजकीय पक्षही भावनिक प्रक्षोभाचा फायदा उठविण्याचाच विचार करीत आहेत. विजयादशमीच्या पूर्वसंध्येला सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाचे पालन करून कोणत्याही...
ऑक्टोबर 07, 2018
कोल्हापूर - दौलतनगर येथे सराईत गुंडाने चाकूचा धाक दाखवून एकाला लुटून रस्त्यावरील मोटारसायकलची तोडफोड करत धिंगाणा घालण्यास सुरवात केली. त्याला ताब्यात घेण्यासाठी गेलेल्या पोलिसांनावरही त्याने हल्ला केला. यात एक पोलिस कर्मचारी जखमी झाला. राजारामपुरी पोलिसांनी त्या गुंडाला अटक केली. चिन्या ऊर्फ संदीप...
सप्टेंबर 28, 2018
नागपूर : मेडिकलच्या कान-नाक-घसा विभागातील महिला निवासी डॉक्‍टरने सर्जिकल ब्लेडने स्वत:चाच गळा कापून घेत आत्महत्येचा प्रयत्न गुरुवारी (ता.27) केला. सकाळी साडेनऊ वाजताच्या दरम्यान ही घटना उघडकीस आली. अश्विनी राऊत (वय 26) असे डॉक्‍टरचे नाव असून, ती बीड येथील रहिवासी आहे. या घटनेमुळे मेडिकलच्या मार्ड...
सप्टेंबर 10, 2018
जम्मू-काश्‍मीरचा प्रश्‍न गंभीर बनत असून, संकुचित राजकीय लाभाच्या पलीकडे जाऊन तो हाताळावा लागेल. स्थानिक तरुणांमधील वाढत असलेली तुटलेपणाची भावना आणि प्रशासनातील विसंवाद यामुळे परिस्थिती दिवसेंदिवस आणखी बिकट बनते आहे.  जम्मू-काश्‍मीरची परिस्थिती दिवसेंदिवस चिंताजनक बनत असून, या प्रश्‍नाचे सर्व कंगोरे...
सप्टेंबर 09, 2018
सत्यपाल मलिक हे जम्मू-काश्‍मीरचे नवे राज्यपाल झाले आहेत. या राज्याला बऱ्याच वर्षांनंतर एक राजकीय नेता राज्यपाल म्हणून लाभला आहे. "भाजपचा राजभवनातला माणूस' म्हणूनही त्यांच्याकडं पाहिलं जात आहे. आता त्यांनी निगुतीनं प्रशासन हाकणं तर गरजेचं आहेच; पण त्यापलीकडं काश्‍मिरातलं राजकारण समजावून घेऊन राजकीय...
सप्टेंबर 06, 2018
स्वातंत्र्यदिनाच्या मुहूर्तावर लाल किल्ल्यावरून देशवासीयांशी संवाद साधताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘महिलांची सुरक्षा आणि प्रतिष्ठा जपण्यासाठी  प्रशिक्षण द्यायला हवे, ते खरे तर पुरुषांनाच,’ असा वास्तववादी विचार मांडला होता; पण त्याला आता दोन वर्षे उलटून गेल्यानंतर चित्र काय आहे? देशाचे जाऊ द्या...
ऑगस्ट 29, 2018
तिसरीच्या विद्यार्थ्याचे  डोळे फोडण्याचा प्रयत्न  जळगाव ः तिसरीत शिकणाऱ्या विद्यार्थ्याच्या डोळ्यात काड्या खोचून ते फोडण्याचा प्रयत्न झाल्याचा भीषण प्रकार आज दुपारी डांभुर्णी (ता. यावल) येथे जिल्हा परिषद शाळेबाहेर उघडकीस आला. हे कृत्य केल्याच्या संशयावरून 19 वर्षीय युवकाला संतप्त जमावाने मारहाण...