एकूण 68 परिणाम
ऑक्टोबर 16, 2019
डहाणू : दिवसेंदिवस तरुण पिढी ऑनलाईन गेमच्या आहारी जात असल्याच्या अनेक घटना समोर येत आहेत. सध्या पबजी गेमची तरुणाईत बरीच क्रेझ दिसून येत असतानाच याच गेमने डहाणूतील एका एकोणीस वर्षीय तरूणाचा बळी घेतला आहे. हेमंत झाटे (19) असे त्याचे नाव असून तो महाविद्यालयीन शिक्षण घेत होता. सध्या विद्यार्थी वर्ग हा...
ऑक्टोबर 16, 2019
मुंबई : पंजाब अँड महाराष्ट्र को-ऑपरेटिव्ह बॅंकेत (पीएमसी बॅंक) ठेवी अडकल्याचा धसका घेऊन दोन खातेदारांना जीव गमावावा लागला. फतोमल पंजाबी आणि संजय गुलाटी अशी त्यांची नावे आहेत. त्यामुळे या प्रकरणाने आता गंभीर वळण घेतले आहे. फतोमल पंजाबी याचे पीएमसी बॅंकेच्या मुलुंड शाखेत खाते होते. या गैरव्यवहाराच्या...
सप्टेंबर 24, 2019
हवालदिल झालेल्या ग्राहकांच्या डोळ्यात आसू  ; हजार रुपयेच काढता येणार  नाशिक : पंजाब-महाराष्ट्र को-ऑप. बॅंकेच्या लेखापरिक्षणात (ऑडिट) त्रुटी निदर्शनास आल्याने रिझर्व बॅंकेने (आरबीआय) बॅंकेवर निर्बंध आणले आहेत. त्यामुळे आगामी सहा महिन्यांसाठी बॅंकेच्या खातेदारांना फक्त एक हजार रुपयेच काढता येणार आहे...
ऑगस्ट 23, 2019
अलिबाग  : तालुक्‍यातील उमटे धरणावर कोट्यवधींचा खर्च करण्यात आला आहे. त्यानंतरही परिसरातील तब्बल 60 गावांना दूषित पाणीपुरवठा होत आहे. या मुद्द्यावर जिल्हा परिषदेच्या आज झालेल्या सर्वसाधारण सभेत विरोधी पक्षांतील सदस्यांनी आक्रमक पवित्रा घेतला. त्यामुळे उपाध्यक्ष आस्वाद पाटील यांनी हस्तक्षेप करून...
ऑगस्ट 21, 2019
दुबई : सेक्रेड गेम्स २ या वेब सिरीजमधील पहिल्या भागातील एका दृष्यामुळे शारजाह येथे वास्तव्यास असणा-या कुन्हाबुद्ल्ला या भारतीय तरुणाची झोप उडविली असून जगभरातून  दिवस रात्र येत असणा-या अज्ञात फोन्समुळे त्याची ही अवस्था झाली आहे. सिरीजमधील खुख्यात गुंड सुलेमान इसा याचा मोबईल क्रमांक एका दृष्यात...
जुलै 14, 2019
प्रेमभंगामुळे मी निराश झाले आहे मी २३ वर्षांची विद्यार्थिनी असून, गेली २-३ वर्षे स्पर्धा परीक्षेची तयारी करीत आहे. शिक्षणासाठी लातूर सोडून पुण्यात आले. आईवडील शेतमजूर आहेत. त्यामुळे पार्टटाइम जॉब करीत शिक्षण पूर्ण करीत आहे. दोन वर्षांपूर्वी आमच्याच गावातील मुलगा माझ्यासोबत पुण्यात शिक्षण घेत...
जुलै 05, 2019
नागपूर  : इंदिरा गांधी शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील निवासी डॉक्‍टरने गळफास लावून आत्महत्या केली. शुक्रवारी सकाळी ही घटना उघडकीस आली. आत्महत्येचे कारण स्पष्ट होऊ शकले नसले, तरी भावासोबत मोबाईलवरून बोलणे केल्यानंतर त्याने मृत्यूला कवटाळल्याचे सांगितले जाते. डॉ. मनूकुमार शशिधर वैद्य (27, रा....
जून 13, 2019
नागपूर : कमी टक्‍के मिळाले म्हणून दहावीच्या विद्यार्थिनीने चैताली किरण जांभूळकर (16, रा. सदर, हसन गॅरेज एरिया) हिने पेट्रोल पिऊन आत्महत्या केली. ही घटना गुरुवारी उघडकीस आली. दहावीत चैतालीला 48 टक्‍के गुण मिळाले. पेपर चांगले सोडविल्यानंतरही अपेक्षित टक्‍केवारी मिळाली नाही. चांगल्या कॉलेजला ऍडमिशन...
मार्च 04, 2019
पाली - ज्या प्रमाणे मुलांना शिक्षण देण्याची शाळा ही एक व्यवस्था आहे, त्याच प्रमाणे होमस्कूलिंग सुद्धा मुलांना शिक्षण देणारी एक व्यवस्था आहे. त्या माध्यमातून मुलांचे स्वतंत्र व्यक्तिमत्व घडते. होमस्कुलिंग संदर्भातील सर्व पैलूवर प्रकाश टाकण्याचे काम माणगाव येथील साने गुरुजी राष्ट्रिय स्मारकात झाले....
मार्च 02, 2019
कर्णबधिर तरुणांवर पुण्यात झालेल्या लाठीमारामुळे राज्यकर्ते आणि प्रशासकीय यंत्रणेमधील संवेदनशीलतेचा मुद्दा उपस्थित होत आहे. मागण्या मान्य केल्या म्हणजे संवेदनशीलतेचा मुद्दा विसरला जाईल असे नाही. कारण पोलिसांच्या लाठीमाराचे वळ शरीरापेक्षा मनावर उमटले आहेत.  कर्णबधिर तरुणांच्या मोर्चावर पुण्यात 25...
जानेवारी 23, 2019
गरीब-श्रीमंत वाढत्या दरीमुळे देशातील सामाजिक समतोल धोक्‍यात येण्याचा इशारा ‘ऑक्‍सफॅम’च्या अहवालाने दिला आहे. या इशाऱ्याची दखल गांभीर्याने घ्यावी लागेल. वि कासाच्या सध्याच्या प्रक्रियेत एक मोठा समूह त्याबाहेर फेकला जातो आहे आणि त्याला या प्रवाहात सामावून घेण्यासाठीचे प्रयत्न क्षीण ठरताहेत. संपत्तीची...
नोव्हेंबर 25, 2018
मुलांचे आई-बाबा होणं आणि त्यांचं सुजाण पालक होणं यात बराच फरक आहे, ही कल्पना आता समाजात चांगलीच स्वीकारली गेली आहे. मूल हे एक स्वतंत्र व्यक्तिमत्त्व असतं. त्यामुळे ते मोठं होत जातं तेव्हा त्याच्यावर आपल्या कल्पना लादता कामा नयेत, तर त्याच्या भावना विचारात घेत त्याच्या व्यक्तिमत्त्वाला आकार देण्याचा...
नोव्हेंबर 22, 2018
उरुळी कांचन - पुणे येथील भारती विध्यापिठात वैद्यकीय अभ्यासक्रमाच्या (एमबीबीएस) शेवटच्या वर्षात शिकणाऱ्या उरुळी कांचन (ता. हवेली) येथील बावीस वर्षीय तरुणाने राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केल्याचा प्रकार आज (गुरुवार) पहाटे उघडकीस आला आहे.  अनिकेत संजय धुमाळ (वय-२२, रा. उरुळी कांचन, ता. हवेली) हे...
नोव्हेंबर 17, 2018
कोणत्याच कामाची लाज न बाळगता काम केल्यास आपल्याला यश हमखास मिळते. फक्त त्यासाठी कष्ट करण्याची तयारी पाहिजे. पुणे-पंढरपूर मार्गावरचे धर्मपुरी हे पालखी मार्गावरचे छोटेसे पण महत्त्वाचे गाव. या गावापासून उत्तरेला 5 किलोमीटर अंतरावर शिंदेवाडी हे भाटघर धरण क्षेत्रातील समृद्ध गाव. अशा गावात रयत शिक्षण...
ऑक्टोबर 28, 2018
नागपूर- प्रेयसीने लग्नास नकार देऊन दुसऱ्याच युवकाशी साखरपुडा केल्यामुळे नैराश्‍यातून प्रियकराने गळफास घेऊन आत्महत्या केली. युवतीवरील प्रेमाचा उल्लेख युवकाने सुसाईड नोटमध्ये केला आहे. पुष्पदीप रघुनाथ ब्राम्हणे (वय 26, रा. लोखंडे लेआउट, मानकापूर) असे आत्महत्या करणाऱ्या युवकाचे नाव आहे. पुष्पदीप हा...
सप्टेंबर 13, 2018
कोल्हापूर - ‘गोकुळ’ मल्टिस्टेट करण्याचा ठराव इंग्रजीत का छापला, असा जाब राजाराम साखर कारखान्याचे माजी अध्यक्ष आणि आमदार सतेज पाटील गटाचे विश्‍वास नेजदार यांनी केला. यावर काहीजणांनी नेजदार यांच्यावर खुर्च्या भिरकावत मारहाण केली. त्यामुळे ‘गोकुळ’च्या ताराबाई पार्क येथील कार्यालयात झालेल्या करवीर...
सप्टेंबर 10, 2018
जम्मू-काश्‍मीरचा प्रश्‍न गंभीर बनत असून, संकुचित राजकीय लाभाच्या पलीकडे जाऊन तो हाताळावा लागेल. स्थानिक तरुणांमधील वाढत असलेली तुटलेपणाची भावना आणि प्रशासनातील विसंवाद यामुळे परिस्थिती दिवसेंदिवस आणखी बिकट बनते आहे.  जम्मू-काश्‍मीरची परिस्थिती दिवसेंदिवस चिंताजनक बनत असून, या प्रश्‍नाचे सर्व कंगोरे...
सप्टेंबर 09, 2018
पुणे ते सिंगापूर असा मोठा प्रवास मिलिंद, मृणालिनी प्रिंप्रीकर या दाम्पत्यानं मुलगी सईबरोबर केला. गाडीतून असा सीमेपारचा प्रवास आणि तोही कुटुंबासमवेत हे जरा विशेषच. या प्रवासात या कुटुंबाला अनेक खाचखळग्यांचा सामना करावा लागला, नवे मित्र-मैत्रिणी मिळाले आणि कडू-गोड अनुभवांची शिदोरीही मिळाली. या...
ऑगस्ट 31, 2018
परंपरेने चालत आलेले व्रत काळानुसार बदलले पाहिजे, नव्याशी सांगड घातली पाहिजे. "मावशी, येत्या रविवारी श्रावणातील शुक्रवारची सवाष्ण जेवायला घालणार आहे, पण पुरणपोळीचाच नैवैद्य दाखविला पाहिजे असे काही नाही ना? कारण मला एकटीला एवढी सवय नाही, साधाच बेत करीन म्हणते.'' सुलेखाचे काही सांगताना चुकतेय की माझी...
ऑगस्ट 29, 2018
तिसरीच्या विद्यार्थ्याचे  डोळे फोडण्याचा प्रयत्न  जळगाव ः तिसरीत शिकणाऱ्या विद्यार्थ्याच्या डोळ्यात काड्या खोचून ते फोडण्याचा प्रयत्न झाल्याचा भीषण प्रकार आज दुपारी डांभुर्णी (ता. यावल) येथे जिल्हा परिषद शाळेबाहेर उघडकीस आला. हे कृत्य केल्याच्या संशयावरून 19 वर्षीय युवकाला संतप्त जमावाने मारहाण...