एकूण 25 परिणाम
फेब्रुवारी 27, 2017
निवडणुका जिंकण्याची प्रबळ यंत्रणा तयार करण्यात कॉंग्रेस पक्षाला अपयश येत असल्याने पक्षाची सतत पीछेहाट होत आहे. अशा वेळी स्वतःमध्ये आमूलाग्र परिवर्तन केले नाही, तर कॉंग्रेसच्या अस्तित्वाला लागलेले ग्रहण त्याला अस्ताकडे नेऊ शकते, याचे भान पक्षश्रेष्ठींना कधी येणार? पाच राज्यांच्या विधानसभा...
फेब्रुवारी 13, 2017
संसदेच्या अर्थसंकल्पी अधिवेशनाचा पूर्वार्ध नुकताच पूर्ण झाला. आता उत्तरार्ध किंवा दुसरा भाग नऊ मार्चला सुरू होणे अपेक्षित आहे. पहिल्या भागाची समाप्ती ज्या कडवट पद्धतीने झाली, ती पाहता पुढील भाग सुरळीत चालण्याबद्दल आताच शंका व्यक्त होत आहे. राष्ट्रपतींच्या अभिभाषणावरील आभार प्रदर्शक ठरावावर...
फेब्रुवारी 12, 2017
राजधानी दिल्ली ताब्यात आल्यानंतर आणि पंजाब, गोव्यात प्रभाव पडण्याची शक्‍यता असल्याने राजकारण आणि निवडणुका म्हणजे फार्स असल्याचा दावा "आप' आणि अरविंद केजरीवाल करू शकत नाहीत. या पक्षातही दुर्गुण आहेत; पण तरीही हा पक्ष आकर्षक वाटतो.  राजकारण आणि राजकारण्यांच्या विरोधात सुमारे आठ वर्षांपूर्वी "अण्णा...
फेब्रुवारी 08, 2017
आम आदमी पक्ष (आप) हा बाहेरच्या लोकांचा पक्ष असल्याशी मतदारांना काहीही देणेघेणे नाही. जिंकला अथवा हरला, तरीही "आप' एक राष्ट्रीय शक्ती म्हणून पुढे येण्यासाठी सज्ज झाला आहे.  भारत आणि शेजारी देशांतल्या मुशाफिरीतून "भिंतीवरचे लिखाण' हे रूपक साकारते. खास करून निवडणूक प्रचाराच्या काळात तर हे ठळकपणे दिसते...
फेब्रुवारी 05, 2017
भारत आणि शेजारी देशांतल्या मुशाफिरीतून 'भिंतीवरचे लिखाण' हे रूपक साकारते. खास करून निवडणूक प्रचाराच्या काळात तर हे ठळकपणे दिसते. कान आणि डोळे सताड उघडे ठेवून शहरे, तसेच झपाट्याने नागरीकरण होत असलेल्या ग्रामीण भागातून जाताना बदलाच्या चाहूलखुणा समोर येतात. काय बदलतेय आणि काय नाही, हे भिंती-भिंतींवर...
फेब्रुवारी 04, 2017
चंडीगड/पणजी - पंजाब आणि गोवा राज्यांतील विधानसभांसाठी आज (शनिवारी) मतदान होत असून, भाजप आणि कॉंग्रेस या पारंपरिक प्रतिस्पर्ध्यांदरम्यानच मुख्य लढत असल्याचे चित्र आहे. त्याच वेळी अरविंद केजरीवाल यांचा आम आदमी पक्षही (आप) या राज्यांमधील विधानसभा निवडणुकांत पदार्पण करताना सत्ताधाऱ्यांना टक्कर देण्याचा...
फेब्रुवारी 03, 2017
चंडीगड/पणजी : पंजाब व गोवा राज्यांतील विधानसभा निवडणुकीसाठी सुरू असलेला प्रचार आज थंडावला असून, 4 फेब्रुवारीला मतदानाला सामोरे जाणाऱ्या या राज्यांत कोण बाजी मारणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.  पंजाबमधील 117 तर गोव्यातील 40 जागांसाठी मतदान प्रक्रिया पार पडणार असून, दोन्ही राज्यांत सत्तेत असलेला...
जानेवारी 30, 2017
कधी काळी निवडणुकीला लोकशाहीचा सोहळा म्हटले जात असे, परंतु गेल्या काही दशकांत मतदारांना भुलविणाऱ्या आश्‍वासनांचा तो सापळा ठरला आहे. निवडणूक ही जनतेचे सेवक म्हणवून घेणाऱ्यांना जनतेचे मालक बनविणारी प्रक्रिया ठरली आहे. देशाला, संबंधित राज्याला भेडसावणाऱ्या खऱ्या मुद्द्यावरून लक्ष हटवून वादग्रस्त...
जानेवारी 28, 2017
राहुल गांधी यांची घोषणा; केजरीवालांवरही घणाघात अमृतसर: पंजाबमध्ये कॉंग्रेसला पुन्हा सत्ता मिळाली, तर कप्तान अमरिंदरसिंग हेच आमचे मुख्यमंत्रिपदाचे उमेदवार असतील, असे कॉंग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी आज येथील सभेत बोलताना जाहीर केले. अमरिंदर हेच एकटे पंजाबचे चित्र बदलवू शकतात, राज्यातील...
जानेवारी 20, 2017
गोव्याच्या विधानसभेची निवडणूक फेब्रुवारी महिन्यात होणार असल्याची चाहूल वर्षभरापूर्वीच गोव्यातल्या राजकीय पक्षांना लागली होती. तेव्हापासूनच पक्ष आणि उमेदवार लढ्याची मोर्चेबांधणी करायला लागले. संभाव्य उमेदवार, पक्ष आणि मतदार हे सारे मतदानाचा नेमका दिवस कोणता, याचा अंदाज बांधत असतानाच ही निवडणूक 4...
जानेवारी 18, 2017
चंडीगड - सत्ताधारी बादल सरकारने पंजाबला पुरते लुटले असून आगामी विधानसभा निवडणुकीनंतर आम आदमी पक्षाचे सरकार सत्तेत आल्यास त्यांना कारवाईला सामोरे जावे लागेल, असे आश्वासन दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी पंजाबमधील जनतेला दिले. "आप'ला दूर ठेवण्यासाठी कॉंग्रेस व अकाली दलात छुपी युती झाल्याचा...
जानेवारी 14, 2017
चंडीगड : आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पंजाबमध्ये भाजपला मोठा धक्का बसला असून, लुधियानातील पक्षाचे ज्येष्ठ नेते व माजी राज्यमंत्री सतपाल गोसेन यांनी काही नेते व हजारो कार्यकर्त्यांसह आज कॉंग्रेसमध्ये प्रवेश केला आहे. भाजपसोबत शिरोमणी अकाली दल (एसएडी) व आम आदमी पक्षाचे काही संभाव्य...
जानेवारी 07, 2017
चंडीगड - पंजाबमध्ये चार फेब्रुवारीला होणाऱ्या विधानसभा निवडणुकीत आम आदमी पक्षाचे नेते अरविंद केजरीवाल यांनी आपल्याविरुद्ध निवडणूक लढवून दाखवावी, असे आवाहन पंजाब कॉंग्रेसचे अध्यक्ष कॅप्टन अमरिंदरसिंग यांनी दिले आहे. पतियाळा येथून निवडणूक रिंगणात उतरलेल्या जनरल जे. जे. सिंग यांचा पराभव करून आपण...
डिसेंबर 26, 2016
चंडिगड - पंजाब विधानसभा निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर आज शिरोमणी अकाली दल, आम आदमी पक्ष आणि भारतीय जनता पक्षाच्या अनेक नेत्यांनी कॅप्टन अमरिंदर सिंग यांच्या उपस्थितीत कॉंग्रेसमध्ये प्रवेश केला. कॉंग्रेसमध्ये सहभागी होणाऱ्यांमध्ये शिरोमणी अकाली दलाचे नेते अताम नागर आणि आमदार सिमरजित सिंग यांच्या...
डिसेंबर 22, 2016
चंदिगड : जर तुम्ही अंमली पदार्थांचे सेवन न करण्याची प्रतिज्ञा केल्यास नोकरी देण्याचे आश्‍वासन कॉंग्रेसने पंजाबमधील युवकांना दिले आहे. आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर कॉंग्रेसने ही नवी योजना जाहीर केली आहे. पंजाबमध्ये सत्ता मिळाल्यास ती राबविण्याचे कॉंग्रेसचे धोरण आहे. आतापर्यंत 12 लाख...
डिसेंबर 17, 2016
नवी दिल्ली - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी घेतलेल्या नोटाबंदीच्या निर्णयामुळे देशभरातील संघटित आणि असंघटित क्षेत्रातील 40 कोटी कामगार बाधित झाले अहेत, असा दावा आम आदमी पक्षाने केला आहे. आम आदमी पक्षाचे आमदार आदर्श शास्त्री यांनी याबाबत माहिती दिली. नोटाबंदीच्या निर्णयामुळे दिल्लीतील सरोजिनी नगर,...
डिसेंबर 12, 2016
नवी दिल्ली- आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आम आदमी पक्षाला आज मोठा धक्का बसला. पक्षाचे पंजाब प्रांताचे उपप्रमुख कर्नल सी. एम. लाखनपाल यांनी इतर तीन जणांबरोबर कॉंग्रेसमध्ये प्रवेश केला आहे. पंजाब कॉंग्रेस कमिटीचे अध्यक्ष अमरिंदर सिंग यांनी आज घेतलेल्या पत्रकार परिषदेत याबाबत माहिती दिली....
नोव्हेंबर 30, 2016
क्रिकेटच्या मैदानावर आपल्या बॅटचे तडाखे दाखवणारा नवज्योतसिंग सिद्धू आजच्या तरुणाईला ठाऊक आहे, तो तसेच फटके "कॉमेडी शो'मध्ये मारण्याबद्दल! मात्र, आता त्याच्यापेक्षाही आपण अधिक बोलबच्चन आहोत हे त्याची पत्नी नवज्योत कौरने दाखवून दिले आहे. भाजपने बहाल केलेल्या खासदारकीचा सिद्धूने राजीनामा दिला,...
नोव्हेंबर 16, 2016
नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकारने पाचशे आणि हजार रुपयांच्या नोटा बंद करण्याचा निर्णय घेतल्यानंतर आम आदमी पक्ष, कॉंग्रेस आणि अन्य काही राजकीय पक्षांनी विरोध दर्शविला आहे. मात्र भारतीय जनता पक्षाचे पोरबंदर येथील खासदार विठ्ठलभाई हंसराजभाई राडदिया यांनीच मोदींच्या...
नोव्हेंबर 13, 2016
नवी दिल्ली - पाचशे आणि हजारच्या नोटा बंद करण्याच्या निर्णयावर कॉंग्रेसने टीका केल्याच्या पार्श्‍वभूमीवर संसदेच्या हिवाळी अधिवेशनात कॉंग्रेसला उत्तर देण्यात येईल असे केंद्र सरकारने स्पष्ट केले आहे. वृत्तसंस्थेशी बोलताना केंद्रीय गृह राज्यमंत्री किरण रिजिजु म्हणाले, "लवकरच संसदेचे सत्र सुरू होणार आहे...