एकूण 1971 परिणाम
ऑक्टोबर 21, 2019
औरंगाबाद : विधानसभा निवडणुकीसाठी सकाळी ढगाळ वातावरणामुळे काहीसा निरुत्साह दिसत होता. त्यामुळे सकाळच्या सत्रात फक्त 6 टक्केच मतदान झाले. त्यानंतर काहीसा वेग घेत दुसऱ्या सत्रात अकरा वाजेपर्यंत 11.60 टक्के मतदान झाले. तीसऱ्या टप्प्यात मतदानाची गती वाढली आहे. औरंगाबाद जिल्ह्यात दुपारी एकवाजेपर्यंत 28....
ऑक्टोबर 21, 2019
Vidhan Sabha 2019 :  कोरेगाव भीमा : कोरेगाव भीमा (ता. शिरूर) येथील संवेदनशील मतदान केंद्रावर केंद्रीय राखीव दलाच्या चार जवानांसह चोख पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. सकाळीच जिल्हा पोलीस प्रमुख संदीप पाटील यांनी आपल्या पथकासह या मतदान केंद्रावर भेट देऊन बंदोबस्ताची पाहणी केली. कोरेगाव-...
ऑक्टोबर 21, 2019
बीड : बाहेरच्या मतदार संघातील रहिवाशी असलेले मतदार बीडमध्ये मतदानासाठी आल्याचा प्रकार समोर आला असून, राष्ट्रवादीचे उमेदवार संदीप क्षीरसागर यांनी यावर आक्षेप घेतला. त्यामुळे काहीवेळ गोंधळाचे वातावरण पाहायला मिळाले. पाटोदा येथील महाविद्यालयात नोकरीला असल्याचे यातील लोकांनी सांगितले....
ऑक्टोबर 21, 2019
नागपूर ः अपघातात गंभीर जखमी झाल्याने नागपुरातील भास्कर विश्‍वनाथ मिश्रा (वय 52) यांना मेंदूमृत घोषित करण्यात आले. आयुष्याच्या अंतिम क्षणी मृत्यूला कवटाळताना शरीरातील अवयवदान करून तिघांना जीवनदान दिले आहे. कायमचे सोडून जाणार असल्याचे दुःख पचवणे नातेवाइकांना कठीण होते, परंतु दुःखाचा डोंगर...
ऑक्टोबर 20, 2019
नागपूर : विदर्भातील जनता उद्या सोमवारी राज्य विधानसभेचा आपला आमदार निवडण्यासाठी मतदानाचा अधिकार बजावणार आहे. विदर्भातील 11 जिल्ह्यांमधील 62 मतदारसंघांतील निवडणूक रिंगणात असलेल्या एकूण 755 उमेदवारांचे भवितव्य उद्या मतयंत्रात बंदिस्त होईल. यातील 367 उमेदवार पश्‍चिम विदर्भातील पाच जिल्ह्यांमध्ये असून...
ऑक्टोबर 20, 2019
पुणे : विधानसभा निवडणुकीसाठी सोमवारी (ता. 21) मतदान होत असून, जिल्हा प्रशासनाकडून पूर्ण नियोजन करण्यात आले आहे. मतदारांनी मोठ्या संख्येने मतदान प्रक्रियेत सहभाग घ्यावा, यासाठी प्रशासनाकडून सर्वतोपरी प्रयत्न करण्यात आले आहेत. त्यामुळे विधानसभा निवडणुकीत मतदानाची टक्‍केवारी निश्‍चितच वाढेल, असा विश्‍...
ऑक्टोबर 20, 2019
भारतात पाकिस्तान हा विषय महत्त्वाचा मानला जातो, तसे इंग्लंडमध्ये ब्रेक्झि‍ट, पूर्व युरोपात निर्वासित आणि अमेरिकेत कोरिया हे विषय महत्त्वाचे समजले जातात आणि जे यक्षप्रश्‍न आहेत, त्यांच्याकडे दुर्लक्ष केलं जातं. परिणामी खरे प्रश्‍न दिवसेंदिवस मोठे होत राहतात आणि आपल्याला त्यावर उत्तर सापडणं कठीण होतं...
ऑक्टोबर 20, 2019
व्यसनमुक्ती केंद्रातल्या लोकांशी माझा संवाद सुरू असताना अनेक प्रश्‍न पडत होते...व्यसन माणसाला किती घट्ट पकडतं याची अनेक उदाहरणं मी या केंद्रात पाहिली. अनेकांना भेटलो. अनेकांशी बोललो. प्रत्येकाची कहाणी चित्रपटात शोभावी अशी... त्या दिवशी लातूरमध्ये होतो. सकाळी सहा वाजता रामेश्‍वर धुमाळ यांचा फोन आला...
ऑक्टोबर 19, 2019
गडचिरोली : मागील तब्बल 26 महिन्यांपासून सायकलने भारतभ्रमण करणाऱ्या राजस्थान राज्यातील अजमेर (जयपूर) येथील अंकित अरोरा (वय 19) या युवकाचे गडचिरोलीत आगमन झाले. त्यांनी अखिल भारतीय श्रीगुरुदेव सेवा मंडळाच्या शाखेला भेट देत नागरिकांशी संवाद साधला. शनिवारी (ता. 19) आयोजित पत्रकार परिषदेत त्यांनी आपल्या...
ऑक्टोबर 19, 2019
हडपसर : ''हडपसर विधानसभा मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने सामान्यांना आपला वाटणारा, सुसंस्कृत उमेदवार दिला आहे. समाजातील सर्व घटकांना आपलेसे वाटणारे, समजून घेणारे हे व्यक्तिमत्त्व आहे. स्व. खासदार विठ्ठल तुपे यांच्या विकासाच्या राजकारणाचे संस्कार त्यांच्यावर झालेले आहेत. हीच ताकद त्यांना...
ऑक्टोबर 19, 2019
नागपूर : मी पुन्हा येतोय. आपण विजयाचा जल्लोष साजरा करू, असा विश्‍वास व्यक्त करून मतदानाचा दिवस युद्धदिन समजून कार्यकर्त्यांनी जोमाने कामाला लागावे, असे आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज, शनिवारी सकाळी जाहीर सभेत केले. आज निवडणूक प्रचाराचा शेवटचा दिवस असल्याने मुख्यमंत्री फडणवीस यांनी "रोड...
ऑक्टोबर 19, 2019
मांजरी : ''आमदार योगेश टिळेकर कर्तृत्ववान, अभ्यासू, धडपडे आणि सर्वसामान्यांना वेळ देणारे आमदार आहेत. मुख्यमंत्र्याबरोबर झालेल्या बैठकीत पुढे सरकार चालवणाऱ्या शंभर जणांच्या यादीत त्यांचे नाव असून उद्याच्या मंत्रिमंडळात मंत्री म्हणून त्यांना संधी आहे. त्यामुळे त्यांना प्रचंड मतांनी निवडून द्यावे, असे...
ऑक्टोबर 19, 2019
मुक्ताईनगर : मुक्ताईनगर विधानसभा मतदारसंघात माजीमंत्री आमदार एकनाथराव खडसे यांनी विविध विकासकामे केली. या कामांच्या बळावरच जनता सदैव श्री. खडसेंच्या पाठिशी असून, भाजप- शिवसेना महायुतीच्या उमेदवार ॲड. रोहिणी खडसे-खेवलकर या किमान ३० हजारांहून अधिक मताधिक्याने विजयी होतील, असा विश्वास भाजपचे...
ऑक्टोबर 19, 2019
विधानसभा 2019 : पालघर जिल्ह्यातील नालासोपारा मतदारसंघात ‘चकमक फेम’ माजी पोलिस अधिकारी प्रदीप शर्मा शिवसेनेकडून युतीचे उमेदवार म्हणून रिंगणात उतरलेत. त्यांना बहुजन विकास आघाडीचे (बविआ) युवा नेते क्षितिज ठाकूर टक्कर देत आहेत. मतदारसंघ भाजपचा असतानाही शिवसेनेने दावा करीत तो पदरात पाडून घेतला आणि...
ऑक्टोबर 19, 2019
नागपूर : दक्षिण-पश्‍चिम विधानसभा मतदारसंघातील प्रचाराच्या अंतिम दिवशी मुख्यमंत्री रोड शो करणार आहेत. दोन किलोमीटरच्या या रोड शोमध्ये सुमारे दहा हजारांहून अधिक समर्थक सहभागी होतील, असा दावा मुख्यमंत्र्यांचे प्रचारप्रमुख संदीप जोशी यांनी पत्रपरिषदेत केला.  शनिवारी प्रचाराचा शेवटचा दिवस...
ऑक्टोबर 19, 2019
विधानसभा 2019 : पिंपरी - वाढणारी लोकसंख्या लक्षात घेऊन शहरातील प्रत्येक नागरिकाला पुरेसे पाणी मिळावे, यासाठी पुढील ५० वर्षांचे नियोजन करून कामे सुरू करण्यात आली आहेत. भामा-आसखेड, आंद्रा आणि पवना या धरणांतून शहरासाठी ४०० एमएलडी पाणी सरकारने मंजूर केले आहे. हे पाणी आणण्याच्या कामांना सुरवात झाली आहे...
ऑक्टोबर 18, 2019
नागपूर : भूसंपादनाची रक्कम मिळवून देण्यासाठी परिचयातील व्यक्तीने मदत केली. यानंतर भूसंपादन विभाग, महामार्ग प्राधिकरण, सार्वजनिक बांधकाम विभागातील अधिकाऱ्यांचे नाव पुढे करीत त्यांना देण्यासाठी तब्बल 22 लाखांच्या लाचेची मागणी केली. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने शुक्रवारी बुटीबोरी येथे सापळा...
ऑक्टोबर 18, 2019
आर्वी (जि. वर्धा) : राहुल गांधींप्रमाणे भारताला जमिनीचा तुकडा समजणाऱ्यांना नाही, तर देशाला आई समजणाऱ्यांना मत द्या. लक्ष्मी कमळावर बसून येते. तुम्हाला लक्ष्मीला घरी आणायचे असेल तर कमलाचे बटण दाबावे लागेल, असे आवाहन केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांनी येथे केले. भाजप-शिवसेना युतीच्या उमेदवाराच्या...
ऑक्टोबर 18, 2019
कल्याण : नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली भारत बलशाली करण्यासाठी, देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्र शक्तिशाली बनविण्यासाठी मतदारांनी मतदान करावे, असे आवाहन केंद्रीय राज्यमंत्री तथा रिपब्लिकन पक्षाचे अध्यक्ष रामदास आठवले यांनी केले. कल्याण पूर्व विधानसभा मतदारसंघाचे महायुतीचे उमेदवार...