एकूण 63 परिणाम
मे 31, 2019
नाशिकमध्ये प्रतिक्विंटल ५००० ते ६००० रुपये नाशिक - येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत बुधवारी (ता. २९) हिरवी मिरचीची आवक १०१ क्विंटल झाली. तिला प्रतिक्विंटल किमान ५००० ते कमाल ६००० रुपये असा दर मिळाला. सर्वसाधारण दर ५५०० रुपये होते, अशी माहिती बाजार समितीच्या सूत्रांनी दिली. मंगळवारी (ता. २८) हिरवी...
एप्रिल 16, 2019
अकोला - जिल्ह्यात पाणी समस्येने बागायती क्षेत्रातील शेतकऱ्यांची मोठी अडचण निर्माण केली आहे. अनेकांवर उभी पिके सोडून देण्याची वेळ आली आहे. यावर्षी एक हेक्टरमध्ये लागवड केलेल्या केळी बागेवर अडीच लाखांचा खर्च करणाऱ्या हिवरखेड येथील विनोद रेखाते या तरुण शेतकऱ्याचीही अशीच अवस्था झाली आहे....
एप्रिल 10, 2019
अकोला जिल्ह्यात गोंधळवाडी हे पातूर-मालेगाव मार्गावर वन्य भागात वसलेले पुनर्वसित गाव आहे. साधारणतः ९०० पर्यंत लोकसंख्येच्या या गावात आदिवासी समाजाचे प्राबल्य आहे. येथील सुमारे २०० कुटुंबांपैकी निम्मी कुटुंबे गोडंबी व्यवसायात मजुरीचे काम करून आपल्या कुटुंबाच्या उदरनिर्वाह चालवितात. यात...
मार्च 15, 2019
अकोल्यात प्रतिक्विंटल  २००० ते २७५० रुपये अकोला  - स्थानिक जनता भाजी बाजारात टोमॅटोचे दर प्रतिक्रेट ४०० ते ५५० रुपयांपर्यंत पोचले आहेत. २० किलो वजनाच्या एका क्रेटचे हे दर आहेत. येथील बाजारात टोमॅटोची दररोज ७०० ते ८०० क्रेट आवक होत आहे. बाजारात येणारा माल दररोज विक्री होत असल्याने व आवक...
जानेवारी 25, 2019
सोलापुरात प्रतिक्विंटल ४५०० रुपये सोलापूर  - सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात गतसप्ताहात भेंडीला चांगली मागणी राहिली. भेंडीला प्रतिक्विंटल सर्वाधिक ४५०० रुपये दर मिळाल्याचे बाजार समितीच्या सूत्रांकडून सांगण्यात आले.  बाजार समितीच्या आवारात या सप्ताहात भेंडीची आवक रोज ७ ते १०...
जानेवारी 18, 2019
औरंगाबादेत प्रतिक्‍विंटल १५०० ते २००० रुपये औरंगाबाद  - येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये गुरुवारी (ता. १७) काकडीची ४७ क्‍विंटल आवक झाली. या काकडीला १५०० ते २००० रुपये प्रतिक्‍विंटलचा दर मिळाला.  औरंगाबाद बाजार समितीमध्ये २४ डिसेंबर २०१८ रोजी ५ क्‍विंटल आवक झालेल्या काकडीला १५०० ते २२०० रुपये...
ऑक्टोबर 30, 2018
सुधाकर रामटेके यांची बारव्हा शिवारात (जि. नागपूर) ३६ एकर शेती आहे. यातील सुमारे २५ एकरांवर रब्बी हंगामात सूर्यफूल लागवड असते. सूर्यफुलामध्ये परागीकरणाला फार महत्त्व आहे. यासाठी शेती परिसरात मधमाश्या असणे गरजेचे आहे. परागीकरणासोबतच उत्पन्नात वाढ होण्यासाठी सुधाकर रामटेके यांनी २०१४ मध्ये शेतीला...
सप्टेंबर 05, 2018
अकोला - शासकीय दूध संकलनात अनेक अडचणी आहेत.भंडारा येथील पावडर प्लांटमध्ये दूध वेळेत पोचवणे शक्य होते. परंतु भंडारा प्लांट बंद झाल्यापासून वऱ्हाडातील दुधाचा प्रश्‍न प्रामुख्याने चव्हाट्यावर आला. आता इतर ठिकाणी दूध द्यायचे म्हटल्यावर अनेक तास लागतील. या काळात दूध टिकणे, तसेच अल्कोहोल...
ऑगस्ट 17, 2018
शेतीची बाजारव्यवस्था मध्यस्थांच्या हातात अाहे. यात शेतकऱ्यालाच अधिक फटका सहन करावा लागतो. मात्र, प्रचलित पद्धतीला छेद देताना अकोला येथे कार्यरत असलेल्या स्नातकोत्तर पशुवैद्यक व पशुविज्ञान संस्थेने यासंबंधीचा स्तुत्य उपक्रम शेतकऱ्यांसाठी राबवला आहे. विविध यंत्रणांची मदत घेत अकोला...
जुलै 08, 2018
भाले कुटुंबीयाचे मूळ गाव हिंगोली जिल्ह्यातील कसबे धावंडा. संभाजी नारायणराव भाले यांचा पारंपरिक सुतार कामाचा व्यवसाय आहे. त्यांना रामेश्वर, विश्वनाथ, नवनाथ ही तीन मुले आहेत. रामेश्वर हे पूर्णा (जि. परभणी) येथील एका संस्थेच्या सेवेत आहेत. त्यामुळे भाले कुटुंबीय काही वर्षांपूर्वी पूर्णा येथे स्थायिक...
जून 13, 2018
केळी पिकातून समृद्धीची  वाट चोखाळणाऱ्या अंजनगाव सुर्जी (जि. अमरावती) येथील येऊल बंधूंनी एकात्‍मिक शेतीचा मार्ग स्वीकारला आहे. लिंबू, भाडेतत्त्वावर भाजीपाला शेती, पोल्ट्री, शेळीपालन आदींच्या माध्यमातून उत्पन्नाचे स्त्रोत वाढवत आर्थिक वहिवाट प्रशस्त करण्यात यश आले आहे.  अमरावती जिल्ह्यातील  ...
मे 23, 2018
धुळे जिल्ह्यातील पढावद (ता.शिंदखेडा, जि.धुळे) हे अवर्षण प्रवण. गावशिवारात कोरडवाहू पिके अधिक असतात. फेब्रुवारीच्या दरम्यान हिरवेगार शिवार उजाड होण्यास सुरवात होते. गावातील प्रकाश पवार यांनी सुरवातीपासूनच प्रयोगशील शेतीची मनोवृत्ती ठेवत शेतीत सुधारणा सुरू केल्या. सन १९८८ च्या दरम्यान गावानजीकच्या...
मे 18, 2018
पुण्यात  प्रतिक्विंटल १५०० ते ४००० रुपये पुणे  - गुलटेकडी येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये गुरुवारी (ता. १७) खरबुजाची सुमारे १ हजार क्रेट आवक झाली हाेती. रमझानचे उपवास सुरू झाल्याने खरबुजाला मागणी वाढली असून, प्रतिक्विंटल १५०० ते ४००० रुपयांपर्यंत दर मिळत असल्याचे आडत्यांनी सांगितले.  याबाबत...
एप्रिल 30, 2018
पुणे - राज्यात तापमानातील वाढ सुरूच असल्याने विदर्भ, मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात काही ठिकाणी उष्णतेची लाट आली आहे. विदर्भात चटका अधिक असून, चंद्रपूर, अकोला, वर्धा येथे तापमान ४५ अंशांच्या पुढे गेले आहे. गुरुवारपर्यंत (ता. ३) उन्हाचा ताप अधिक राहणार असून, विदर्भात उष्णतेची लाट कायम...
एप्रिल 11, 2018
अकोला - ॲग्रोवन यशोगाथांमधील शेतकऱ्यांशी संपर्क साधत त्यांना आर्थिक आणि तांत्रिक मदत करण्यासाठी पुढाकार घेण्याचा आगळावेगळा उपक्रम अकोला जिल्हा मध्यवर्ती बॅंकेने राबविला आहे. ॲग्रोवनची विश्‍वासार्हता असल्यानेच अशा प्रकारच्या उपक्रमासाठी पुढाकार घेण्यात आल्याची माहिती...
एप्रिल 11, 2018
कृषी विभागाच्या सहकार्यातून व अनुदानातून नांदेड जिल्ह्यातील गोकुंदा येथील राम मुंढे यांनी मिनी डाळमिल घेतली. पूर्वीच्या पारंपरिक गिरणीचा वापर थांबवून ते आधुनिक यांत्रिकीकरणाकडे वळले. आज पंचक्रोशीतील शेतकरी व व्यापाऱ्यांना डाळ तयार करून देणे, स्वतः डाळ व बेसन विक्री करणे या व्यवसायातून त्यांनी...
एप्रिल 03, 2018
जळगाव - जगात सर्वाधिक कापूस लागवड करणारा देश म्हणून भारताची ओळख आहे, परंतु चांगल्या कापूस वाणांचा अभाव, नैसर्गिक समस्या व सिंचनासंबंधीच्या अडचणी यामुळे उत्पादकतेमध्ये भारत जगात मागे आहे. भारताला कापूस उत्पादकता ६०० किलो रुई प्रतिहेक्‍टरी गाठणेही अवघड झाले असून, बीटीसंबंधीचे बीजी-३ (बॅसीलस...
एप्रिल 01, 2018
अकोला येथील सुनील शालिग्राम गर्जे यांनी नोकरी संभाळून चिंचोली रुद्रायणी (जि. अकोला) येथील वडिलोपार्जित शेतीमध्ये आश्वासक बदल केला. पारंपरिक पीक पद्धतीपेक्षा नियोजनाच्यादृष्टीने डाळिंब, शेवगा, चिकू लागवड केली. शेतीची बांधबंदिस्ती करून बांधावरही विविध फळपिकांची लागवड केली....
मार्च 29, 2018
पुणे  - ग्रामीण भागात लोडशेडींगच्या काळात नागरिकांना पिण्याच्या पाण्यासाठी तासनतास वाट पाहावी लागते किंवा पाटपीट करत दूरवरून पाणी आणावे लागते. या समस्येवर मात करण्यासाठी शासनाने राज्यात नऊ वर्षांपासून सौरऊर्जेवर आधरित दुहेरी पंप नळाद्वारे पाणीपुरवठा सुरू केला आहे. त्यामुळे राज्यातील जवळपास चार हजार...
मार्च 19, 2018
विदर्भातील उन्हाळ्यात असणारे जिवाची  काहिली करणारे तापमान हीच पोल्ट्री व्यवसायाच्या दृष्टीने अडचणीची बाब ठरते. पूरक व्यवसायामध्ये पोल्ट्री उद्योग सुरू करण्याचे अनेक प्रयत्न अयशस्वी झाल्याची उदाहरणे आहेत. अगदी अकोला जिल्ह्यातील ९९ टक्के पोल्ट्री बंद झाल्या, पर्यायाने शेतकऱ्यांच्या आशा-...