एकूण 57 परिणाम
डिसेंबर 05, 2019
औरंगाबाद : मराठवाडा आणि खानदेशातील 19 साखर कारखान्यांनी गाळपासाठी परवाना मागितला होता. त्यापैकी 16 कारखान्यांना गाळपाचा परवाना देण्यात आला असून, 10 कारखान्यांनी प्रत्यक्ष गाळपाला सुरवात केल्याची माहिती साखर सहसंचालक कार्यालयाकडून देण्यात आली.  19 कारखान्यांनी मागितला होता परवाना  साखर सहसंचालक...
डिसेंबर 05, 2019
सोलापूर - ओल्या दुष्काळामुळे ओढवलेल्या आपत्तीने पशुधनाची मोठी हानी झालीच, पण सध्या एकीकडे चाराटंचाई आणि दुसरीकडे पशुखाद्याचे वाढते दर, यामुळे राज्यातील दूध व्यवसाय अडचणीत आला आहे. गतवर्षी याच काळात दूध उत्पादनाचा सुकाळ होता. पण सध्या राज्यातील दूध संकलन प्रतिदिन एक कोटी ७० लाख लिटरपर्यंत खाली आले...
नोव्हेंबर 27, 2019
फुलंब्री (जि.औरंगाबाद) : ऑक्‍टोबर महिन्याचा शेवटचा आठवडा आणि नोव्हेंबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यात पडलेल्या परतीच्या पावसामुळे शेतकऱ्यांच्या पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. त्याचबरोबर जनावरांसाठी असलेला मका व बाजरीचा चारा संततधारेमुळे सडल्याने शेतकऱ्यांना आतापासूनच चाराटंचाई...
नोव्हेंबर 20, 2019
औरंगाबाद: परतीच्या पावसामुळे हाती आलेले खरिपाचे पीक वाया गेले आहे. यामुळे किमान रब्बीच्या हंगामातून तरी हे नुकसान भरून काढण्याचा प्रयत्न शेतकरी करीत आहेत. त्याअनुषंगाने रब्बीसाठी बी-बियाणे खरेदी केले जात आहेत. जिल्ह्यात केवळ 8.14 टक्‍के रब्बीचा पेरा झाला आहे. अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांसाठी चाऱ्याचे...
नोव्हेंबर 19, 2019
रहिमाबाद  (जि.औरंगाबाद) :  पालोद (ता. सिल्लोड) परिसरात मेंढ्या चारण्यासाठी आणलेल्या मेंढ्यांचा शेतातील सडलेल्या मक्‍याची कणसे, तथा काळी, पांढरी, बुरशी लागलेला चारा खाल्ल्याने गेल्या चार ते पाच दिवसांपासून पंचवीस ते तीस मेंढ्यांचा मृत्यू झाला आहे. अनेक पशुपालक मेंढ्या सांभाळतात व त्या...
नोव्हेंबर 14, 2019
लोक जैवविविधता पार्कचा चांगला उपयोग होत आहे. झुडपे वाचवली जात आहेत. विविध प्रकारच्या वेली, सराटा, तांदुळका, खाजकुयरी, चिगूर, फांग, माठला, तरोठा आदी रानभाज्या आणि औषधी वनस्पती मुबलक प्रमाणात उपलब्ध होत आहेत. शेळ्या, गायींना चारा मिळत आहे. परिसरात विविध प्रकारचे किडे, फुलपाखरे, मधाची...
नोव्हेंबर 12, 2019
जळगाव ः नवीन शासन सत्तेत आल्यानंतर किमान गेल्या साडेतीन वर्षांत रखडलेल्या विकासाला गती मिळणे अपेक्षित होते. मात्र, विधानसभा निवडणुकीचा निकाल जाहीर होऊन तब्बल अठरा दिवस उलटले, तरी राज्यात कोणत्याच पक्षाने सत्ता स्थापन केली नाही. यामुळे जिल्ह्यातील विकासकामे रखडल्याचे चित्र निर्माण झाले आहे. ...
नोव्हेंबर 04, 2019
औरंगाबाद -  परतीच्या पावसामुळे शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास हिरावला गेला आहे. शासनाकडून मिळणाऱ्या नुकसानभरपाईसाठी सेतुसुविधा केंद्रावर रांगा लावाव्या लागत आहेत. आधीच हातबल झालेल्या शेतकऱ्यांना कागदपत्रांसाठी अडीच तीनशे रुपयेखर्च करावे लागत आहेत. यासाठी शेतीचे वैयक्‍तिक पंचनामे करण्याऐवजी...
ऑक्टोबर 23, 2019
अंधारी (जि.औरंगाबाद) ः पळशी (ता. सिल्लोड) परिसरातील अंधारी, लोणवाडी, मांडगाव, उपळी, म्हसला परिसरात शुक्रवारपाठोपाठ रविवारी सोमवारी व मंगळवारी जोरदार पाऊस झाल्याने सर्वाधिक नुकसान मका पिकाचे झाले आहे. हातातोंडाशी आलेला घास परतीच्या पावसाने हिरावल्याने शेतकरी अडचणीत आले आहेत. तोडणी करून शेतात ठेवलेली...
ऑक्टोबर 20, 2019
शेलगाव (जि.औरंगाबाद ) : शेलगाव (ता. कन्नड) परिसरात शुक्रवारी (ता.18) व शनिवारी (ता.19) दोन दिवस परतीचा पाऊस झाल्यामुळे पिकांचे नुकसान झाले आहे. त्याचा मोठा फटका कपाशी व मका पिकाला बसला आहे. शेतात अक्षरशः पाणी साचल्यामुळे परिसरात काही ठिकाणी शेतात मक्‍याची कणसे पाण्यावर तरंगत आहेत. शेतात साचलेल्या...
ऑक्टोबर 18, 2019
आळंद (जि.औरंगाबाद) :  आळंद (ता.फुलंब्री) परिसरात शुकवारी (ता.18) दुपारनंतर परतीच्या पावसाने काही क्षणात धुवाँधार हजेरी लावली. यामुळे  येथील आठवडे बाजारात व्यापाऱ्यांसह ग्राहकांची एकच धांदल उडाली. चिखल झाल्याने व्यापाऱ्यांचे हाल झाले. तसेच दुपारनंतर बाजारात  शुकशुकाट दिसून आला. वडोद बाजार, आळंद,...
ऑक्टोबर 09, 2019
नाचनवेल (जि.औरंगाबाद) : नाचनवेल (ता. कन्नड) परिसरात मंगळवारी (ता. आठ) दुपारी तीनच्या सुमारास तासाभराच्या जोरदार पावसाने झोडपल्याने रब्बीच्या पिकाच्या आशा पल्लवित झाल्या आहेत. परतीच्या पावसाने विजयादशमीच्या सणाच्या दिवशी दुपारी जोरदार हजेरी लावली. यामुळे शेतातून पाणी वाहिले. सायंकाळी नदीला पाणी आले...
ऑक्टोबर 06, 2019
पिशोर  (जि.औरंगाबाद) : माळेगाव ठोकळ (ता.कन्नड) परिसरातील मका पिकावर दुर्मिळ करपा रोगाचा प्रादुर्भाव झाला आहे. त्यामुळे जवळपास सत्तर टक्के मक्‍याचे पीक वाया जाऊन केवळ चारा शिल्लक हातात राहणार असल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे. मका पीकविषयक कृषितज्ज्ञ डॉ.एस.बी.पवार, डॉ.जगताप, डॉ.त्रिपाठी...
ऑक्टोबर 02, 2019
औरंगाबाद : पाणचक्कीच्या फुटलेल्या नहरीतून रोज लाखो लिटर पाणी वाया जात आहे; पण ही गळती काही नवी नाही. किमान शंभरेक वर्षांपासून हे पाणी नहराच्या फुटलेल्या बंब्यातून उसळून खाम नदीच्या पात्रात धो-धो वाहते. जवळच्या बेगमपुरा भागातील महिलांचे कपडे धुण्याचे हे पारंपरिक स्थळ आहे, असे म्हटले, तरी वावगे ठरणार...
सप्टेंबर 25, 2019
मनमाड : शहरातून आनंदवाडीमार्गे वंजारवाडी, सटाणा, कऱ्ही, एकवई, माळेगाव, घडगेवाडी, निशाणवाडी, मोहेंगाव, भालूर आदी गावांकडे जाण्यासाठी मनमाड- औरंगाबाद रेल्वे मार्गावरील रेल्वे फाटक बंद करण्यात येऊन भुयारी मार्ग सुरू करण्यात आला. भुयारी मार्ग सुविधेऐवजी गैरसोयीचा अधिक होत आहे. पावसामुळे भुयारी...
सप्टेंबर 09, 2019
करमाड (जि.औरंगाबाद) : पावसाच्या अत्यल्प प्रमाणामुळे इतर कुठलेच हिरवे गवत उपलब्ध नसल्याने शेतातील अपरिपक्व लष्करी अळीग्रस्त मका व त्यावर असलेली विषारी औषधींची मात्रा खाण्यात येत असल्याने गेल्या महिन्याभरात वाहेगाव (देमणी, ता. औरंगाबाद) येथील शेतकऱ्यांची सुमारे पंधरा जनावरे दगावली आहेत. शनिवारी (ता....
सप्टेंबर 08, 2019
औरंगाबाद : गौरी, गणपतीचा सण म्हणजे आनंदोत्सवच. ग्रामीण भागात तर अधिक उत्साहाने केला जाणारा सण. पैठण तालुक्‍यात काही भागांत पाऊस झाला खरा; मात्र अजूनही जनावरांच्या चाऱ्याचीच टंचाई असल्याचे चित्र दावरवाडी, सालवडगाव, कुतुबखेडा परिसरात आहे. महालक्ष्मीचा सण साजरा करायचा की जनावरांच्या चाऱ्याची सोय...
ऑगस्ट 30, 2019
औरंगाबाद - छंद आणि हौसेला कुठलेच मोल नसते. आपल्या छंदापायी अनेक जण खर्च करण्यासाठी मागेपुढे पाहत नाही. असाच महागडे शंकरपटाचे बैल सांभाळण्याचा छंद चिकलठाणा येथील किशोर ज्ञानदेव दिवटे यांना आहे. त्यांच्याकडे वडिलोपार्जित शंकरपटाचे बैल असल्याने त्यांनी आपल्या वडिलांची ही परंपरा कायम ठेवली. इतकेच नव्हे...
ऑगस्ट 22, 2019
अजिंठा (जि.औरंगाबाद) ः अनाड (ता. सिल्लोड ) येथे बिबट्याचे हल्लासत्र सुरुच असून, दुसऱ्या दिवशी बुधवारी ( ता. 21 ) मध्यरात्रीच्या सुमारास बिबट्याने हल्ला करून एक वर्षाच्या गोऱ्ह्याला ठार केले. यात शेतकऱ्याचे दहा हजार रूपयांचे नुकसान झाले. सलग दुसऱ्या दिवशी बिबट्याने हल्ला केल्याने परिसरातील...
ऑगस्ट 21, 2019
अजिंठा, ता. 20 (जि.औरंगाबाद) ः आनाड (ता. सिल्लोड) शिवारात सोमवारी (ता. 19) रात्री साडेनऊच्या सुमारास बिबट्याने हल्ला करून गोऱ्ह्याला ठार केले. यात शेतकऱ्याचे वीस ते पंचवीस हजार रुपयांचे नुकसान झाले. परिसरातील बिबट्याच्या वावराने शेतकऱ्यांमध्ये घबराटीचे वातावरण निर्माण झाले आहे. सोमवारी सायंकाळी...