एकूण 16 परिणाम
सप्टेंबर 29, 2019
नवरात्रोत्सवाच्या निमित्तानं आदिशक्तीचा जागर सगळीकडं होत असताना यवतमाळमध्ये स्त्रीशक्तीचा एक वेगळाच जागर सुरू आहे. या जिल्ह्यात २१ महिला एकाच वेळी एसटीच्या चालक म्हणून रस्त्यांवर अधिराज्य गाजवणार आहेत. आदिवासी समाजातल्या या महिला. प्रत्येकीची कहाणी वेगळी, संघर्ष वेगळा. अनेकींना यापूर्वी सायकलसुद्धा...
फेब्रुवारी 10, 2019
ज्योती पुजारी यांनी लिहिलेली "शेवटाचा आरंभ' ही बलात्कार या विषयावर मंथन करणारी कादंबरी अंधारवाटेवरच्या सख्यांना दिलासा देणारी आहे. धैर्यानं पुन्हा उभे होऊन नव्या आशेनं जगण्याचा मंत्र देणारी आहे. निर्भया प्रकरणानं संपूर्ण देश हादरून गेला होता. त्याहीपूर्वी अरुणा शानभाग, हेतल पारेख, नयना पुजारी,...
जानेवारी 13, 2019
रोठा. वर्ध्यापासून सात-आठ किलोमीटरवरचं गाव. पारधी समाजातल्या अनाथ मुलांसाठी इथं चालवलं जातं "संकल्प वसतिगृह'. मंगेशी पुसाटे-मून यांना एका रेल्वेप्रवासात ही मुलं भीक मागत असलेली दिसली आणि त्यानंतर सुरू झाला या अनाथांना सनाथ करण्यासाठीचा प्रवास. मुंबईहून वर्ध्याला निघालो...आरक्षणाचा डबा असूनही...
डिसेंबर 16, 2018
साहित्य संमेलन असो, की अन्य सांस्कृतिक कार्यक्रम, राजकीय नेत्यांचा त्यात हस्तक्षेप नसावा अशी भावना अनेक साहित्यिक बोलून दाखवत असतात. नेत्यांकडून कोणतीही अपेक्षा ठेवली नाही, तर हे शक्‍य होतं. जुन्या पिढीत असे अनेक निःस्पृह साहित्यिक आणि वाचक आढळतील. त्यामुळं त्यांचे आणि राजकीय नेत्यांचे संबंध निर्मळ...
डिसेंबर 09, 2018
तुम्ही निसर्गाच्या सान्निध्यात शून्यात कुठं तरी तंद्री लावून बसला आहात...मनात कुठल्या कुठल्या आठवणींची पिसं इकडून तिकडं तरंगत आहेत. तशातच वास्तवातही एक पांढरंशुभ्र पीस एका झुळकीसरशी तरंगत तरंगत येऊन तुमच्या खांद्यावर येऊन बसतं. तुम्ही ते हळुवारपणे उचलता. हलेकच ते आंजारता-गोंजारता. आपल्याजवळच ठेवून...
जुलै 15, 2018
जन्माला आलेला माणूस नशिबानं किंवा कर्तृत्वानं कितीही श्रीमंत झाला तरी मरताना त्याला सगळं काही इथंच सोडून जायचं असतं. ही जाणीव त्याला उतारवयात केव्हातरी होते आणि हळूहळू आसक्ती सुटत जाते. काही लोक मरणापूर्वी इच्छापत्र वगैरे करून सगळी "जायदाद' प्रिय व्यक्तींच्या नावे ठेवून जातात. काही व्यक्ती आपल्या...
जुलै 01, 2018
'द अमेरिकन्स' ही बहुचर्चित मालिका तत्कालीन सोव्हिएत युनिअनच्या गुप्तहेर जोडप्याच्या अमेरिकेतल्या हेरगिरीची कथा मांडते. त्याचबरोबर त्या जोडप्याच्या कुटुंबाची आणि एकूणच अमेरिकी संस्कृतीच्या प्रभावाविषयीही ती चर्चा करते. ठाशीव चौकटीच्या पलीकडे मांडणी करणारी आणि तपशीलांमध्ये चोख असणारी ही...
जून 03, 2018
लेखक आणि वाचक यांची पहिली भेट लेखकाच्या वाङ्मयात होते. तिथं सूर जुळले तर "तो दिसतो कसा आननी?' हे कुतूहल जागं होतं. प्रत्यक्ष भेटीत काही विपरीत न घडलं तर वाचकाकडून लेखकावर प्रेमाचा वर्षाव सुरू होतो. लेखकाकडून या प्रेमाला कसा प्रतिसाद मिळतो यावर त्या वाचकाच्या कुटुंबातल्या वाचनसंस्कृतीचं यशापयश...
मे 27, 2018
राम कपूर आणि साक्षी तंवर यांची "केमिस्ट्री' रसिकांची अतिशय आवडती. तिचा पुन्हा एकदा अनुभव देणारी "कर ले तू भी मोहब्बत' ही वेब सिरीज प्रेमाच्या "सेकंड इनिंग'वर छान भाष्य करते. एकीकडे भरपूर भांडत असताना परस्परांतल्या प्रेमाचीही अनुभूती घेणाऱ्या या जोडीचं उलगडणारं नातं ही या सिरीजची खासियत. साधेपणानं,...
मे 06, 2018
फॅशन डिझायनिंग क्षेत्रात करिअर करण्यासाठी मुंबईसारख्या शहरात आलेल्या एका तरुणीची गोष्ट "गर्ल इन द सिटी' या वेब सिरीजमध्ये आहे. स्वप्नपूर्तीचा प्रवास सोपा कधीच नसतो. क्षणोक्षणी निर्णय घेत, मेहनत करत, भावनांची निरगाठ सोडवत स्वप्नं कशी प्रत्यक्षात आणायची हे सांगणारी ही सिरीज प्रेरणादायी आहे. एखादं...
नोव्हेंबर 26, 2017
‘ब्रिजेस ऑफ मॅडिसन कौंटी’ हा चित्रपट म्हणजे एखाद्या हुरहुरत्या सुंदर नज्मसारखा आहे... पडद्यावरची नज्म! हा चित्रपट पाहून सुस्कारा न टाकणारा कुठलाही मध्यमवयीन ‘तो’ किंवा ‘ती’ विरळीच म्हणावी लागेल. ‘हा चित्रपट तू पाहिलास का?’ या प्रश्‍नाचं उत्तरही किंचित हसून ‘नाही’ असंच द्यायचं असतं. पुढचा सगळा मामला...
नोव्हेंबर 12, 2017
त्याच्या दुकानाकडं पाठ फिरवून आम्ही निघालो. अलीकडं हुड्याचं रूप बदललंय. तो नोटेतून बाहेर पडलाय आणि वस्तूत घुसलाय. ‘कायद्यानं हुंड्याला बंदी आहे,’ हे कुणीच लक्षात घेताना दिसत नाही. बहुतेक वेळा पोरीचा बापच लग्न लावून देतो. लग्नाचा खर्च स्वतःच उचलतो. कारण, तशी परंपराच निर्माण झाली आहे. ‘लग्न दोघांचं...
मे 07, 2017
तिच्या किंचित पाणावलेल्या डोळ्यांत एक वेगळाच निर्धार आणि आई-वडिलांविषयीचा प्रचंड आदर मला दिसत होता. माझ्या विमानाची घोषणा झाली.‘‘देवयानी, बेस्ट लक,’’ असं म्हणत मी उठलो. त्यावर ‘‘मी नशीब मानत नाही. जर संधी माझा दरवाजा ठोठावणार नसेल, तर मी स्वतः जाऊन माझ्यासाठी दरवाजा उभा करीन,’’ ती मला म्हणाली. तु ...
एप्रिल 30, 2017
बचतीनं संसाराला हातभार माझे वडील गणपतराव कोपर्डेकर यांनी मला एक कानमंत्र दिला होता ः ‘थेंबे थेंबे तळे साचे.’ माझी आई रुक्‍मिणी हिनंही मला एक मंत्र दिला होताः ‘पोटचे, पाठचे कुणी उपयोगी येत नाही. फक्त गाठचे उपयोगी येते.’ माझं १९८०मध्ये लग्न झालं. पत्नी उज्ज्वलानं लग्नाच्या पहिल्या वाढदिवशी सोन्याचा...
एप्रिल 16, 2017
गणित ही एक रम्य फुलबाग असून इथं नानाविध रंजक, मनोरम फुलांचे ताटवे असतात, गुंजारव करणारी फुलपाखरं आणि भ्रमर असतात आणि गणितामध्येसुद्धा एक विलक्षण रोमान्स आहे, याचा दृष्टान्त घडवणारा नितांतसुंदर चित्रपट म्हणजे ः हिडन फिगर्स. लौकिकार्थानं हा काही चित्रपट म्हणता येणार नाही; पण १२७ मिनिटांची ही डॉक्‍...
एप्रिल 09, 2017
अर्धस्फुट वयातल्या प्रेमाची कहाणी सांगणाऱ्या ‘द रीडर’ या चित्रपटानं इतिहास घडवला. अजूनही तो टीव्हीवर अधूनमधून लागतो. जुन्या स्मृती चाळवतो. त्यातल्या काही चित्रपटातल्या असतात, काही वास्तवातल्या. अधेड उमरीतल्या अशा रीतीभातींच्या पल्याडच्या नात्याला भानगड किंवा लफड्याचा दुर्गंध असतो. ‘द रीडर’मधली हॅना...