एकूण 159 परिणाम
सप्टेंबर 21, 2019
अभिनेत्री वाणी कपूरने 'शुद्ध देसी रोमान्स' या चित्रपटामधून तिच्या फिल्मी करिअरला सुरुवात केली. तिने काही मोजक्‍या हिंदी चित्रपटातून वेगवेगळ्या भूमिका साकारून अल्पावधीतच प्रेक्षकांच्या मनावर राज्य केले. तिचा ग्लॅमरस अंदाज प्रेक्षकांना विशेष भावला. वाणी आता 'वॉर' या बिग बजेट चित्रपटात अभिनेता हृतिक...
ऑगस्ट 29, 2019
मुंबई : ज्येष्ठ रहस्यकथाकार गुरुनाथ नाईक बेपत्ता झाले आणि वसईतील त्यांचे चाहते, आप्तपरिवार यांचे धाबे दणाणले. महाराष्ट्राला आपल्या रहस्यकथांनी एकेकाळी वेड लावलेल्या या कथाकाराची प्रकृती हल्ली ठीक नसते. वैद्यकीय उपचारांसाठीच त्यांना गोव्याला जायचे होते. त्यासाठी ते रेल्वेचे आरक्षण करण्यासाठी गेले...
एप्रिल 21, 2019
महाभारताचं नाव उच्चारलं, तरी जीवनातल्या विविध समस्यांवर असलेल्या निरसनाची आपल्याला जाणीव होते. जीवनातल्या प्रत्येक पैलूला या महाकाव्यानं सामावून घेतलं आहे. आयुष्यातल्या प्रत्येक समस्येवर महाभारतात ठोस उत्तर आहे. अशा महाकाव्याकडे डॉ. अपर्णा जोशी यांनी मूल्यशिक्षणाच्या दृष्टिकोनातून पाहिलं आहे. मुळात...
एप्रिल 05, 2019
मी वि. स. खांडेकर प्रशालेचा विद्यार्थी. शाळेतच नाटकाविषयीचं वातावरण इतकं चांगलं होतं की आमच्यासारखी पोरं आपसूकच तिकडे आकर्षित झाली. त्यातही मंदाकिनी खांडेकर आमच्या शिक्षिका. एकीकडे हा सारा शैक्षणिक प्रवास सुरू असताना टाकाळ्यावर बालपण फुलत होतं. याच परिसरात मी रहायला. टाकाळ्याच्या खाणीत पोहणं असो...
फेब्रुवारी 25, 2019
समाजात वावरतांना स्वत:ला कसे जपावे आणि वेळोवेळी बोलून कसे व्यक्त व्हावे हे आतापर्यंत ‘ह.म.बने तु.म.बने’ मालिकेतून दाखवण्यात आले आहे. सर्वात महत्त्वाचा विषय जो आपल्या पाल्याच्या हितासाठी आहे, असा विषय आता या मालिकेत दाखविण्यात येणार आहे. तो म्हणजे ‘चांगला आणि वाईट स्पर्श कसा ओळखावा’. पार्थच्या...
जानेवारी 17, 2019
सकाळी मुलांना शाळेत सोडून घरी येताना गाडीत रेडिओ लावला त्यावर पु.ल.च्या आयुष्यावरच्या चित्रपटाबद्दल चर्चा सुरु होती, त्यात बाहेर रिमझिम पाऊस सुरु होता. का कुणास ठाऊक पण पु.ल.चा अंतूबर्वा आठवला. पु.ल.चं  लिखाण आणि त्याहून वाचन हे इतकं प्रभावी होतं की त्यांच्या कथेतील पात्रं आयुष्यभर स्मरणात राहायचे...
जानेवारी 13, 2019
कला म्हणजे आयुष्यातलं हरितद्रव्य! "प्रत्येक मनुष्यात कुठली ना कुठली कला असते,' असं कुठल्याशा प्राध्यापकानं वर्गात शिकवलेलं वाक्‍यं आठवून तो मनाशीच खजील झाला. त्यानं मेंदूला, मनाला भरपूर ताण देऊन पाहिला; पण आपल्यात नेमकी कुठली कला आहे हेच त्याला उमजेना. नंतर त्याच्या डोक्‍यात अचानक प्रकाश पडला....
डिसेंबर 23, 2018
लातूर : मऱाठी चित्रपटांची संख्या वाढली म्हणजे, मराठी चित्रपट पुढे चालला असे म्हणता येणार नाही. मराठी चित्रपटात प्रयोग होण्याची गरज आहे. हे प्रयोग झाले नाही तर पंधरा वर्षापूर्वीचीच स्थिती मराठी चित्रपटांना येईल, असे मत चित्रपट दिग्दर्शक संदीप सावंत यांनी रविवारी (ता. २३) येथे पत्रकार परिषदेत बोलताना...
डिसेंबर 23, 2018
"टायटॅनिक'नं अजरामर प्रेमकहाणीचं समुद्ररूप दाखवलं. पाहतापाहता या चित्रसुरांच्या गारुडानं सात समुद्र ओलांडले. जगभर "टायटॅनिक'वर रसिकांच्या उड्या पडल्या. भावगर्भ संगीत, त्या कलाकृतीतला अभिजाताचा प्रत्येक चतकोर चंद्रकोरीसारखा उजळून निघालेला. मृत्यूदेखील देखणा असू शकतो, त्याचं रौद्र स्वरूप प्रीतीपुढे...
डिसेंबर 11, 2018
पुणे : ''साहित्यिक कलावंत प्रतिष्ठानच्य वतीने 23, 24 डिसेंबरला आयोजित केलेल्या जाणाऱ्या 18 व्या साहित्यिक कलावंत संमेलनाच्या अध्यक्षपदी ज्येष्ठ साहित्यिक, विचारवंत फादर फ्रान्सिस दिब्रिटो भूषविणार आहेत.'' ,अशी माहिती साहित्यिक कलावंत प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष, संमेलनाचे प्रमुख संयोजक दिलीप...
नोव्हेंबर 25, 2018
भारतातला सर्वात आवडता खेळ कुठला? अर्थातच क्रिकेट. मात्र, पु. ल. देशपांडे म्हणाले होते तसं, हा हा खेळ प्रत्यक्षात "खेळण्या'पेक्षा "बोलण्याचा'च अधिक आहे! भारतात तरी असं आहे. मात्र, आपल्या या लेखाचा विषय काही क्रिकेट नसून, दुसराच एक खेळ आहे, जो कदाचित क्रिकेटपेक्षाही जास्त लोकप्रिय आहे आणि या "खेळा'...
नोव्हेंबर 12, 2018
भुकेल्यांच्या हाती क्रांतीचा उजेड देणारे "गुलसितां' नागपूर : लक्ष्मीच्या कपाळावर कुंकू नाही, तरीही तीन लेकरांसहित जीवनाचं हिरवं स्वप्न डोळ्यात. परंतु, भूकबळी ठरलेल्य लक्ष्मीच्या जाण्याने लेकरांचा आधार गेला. मोठा मुलगा "वामन्या'च्या डोळ्यांतून रक्ताश्रू वाहत होते. परंतु, न खचता दुःख झेलत वाघिणीचं...
ऑक्टोबर 10, 2018
कोल्हापूरचं अंबाबाई मंदिर म्हणजे साडेतीन शक्तिपीठांपैकी एक प्रमुख पीठ. त्याचं ऐतिहासिक, धार्मिक, सांस्कृतिक माहात्म्यही तितकंच मोठ्ठं. मंदिर शहराच्या मध्यवस्तीत आणि त्याच्या आजूबाजूला रोजगारांचं एक महाजाळंच विणलं गेलं आहे. नाही म्हटलं, तरी किमान आठ ते दहा हजार कुटुंबांना या परिसरानं सामावून घेतलं...
सप्टेंबर 10, 2018
प्रबळ आत्मविश्‍वासाच्या जोरावर केवढी मोठी झेप घेता येऊ शकते, हे चीनची जगप्रसिद्ध ई-कॉमर्स कंपनी "अलिबाबा'चे संस्थापक जॅक मा यांनी दाखवून दिले. प्रारंभीच्या काळात तीस ठिकाणी नोकरीसाठी केलेल्या प्रयत्नांना मिळालेला नकार पचविणाऱ्या जॅक मा यांनी पुढच्या दोन दशकांतच थेट "जगातील श्रीमंत व्यक्तींपैकी एक'...
ऑगस्ट 05, 2018
सुरवातीलाच एक इटालियन लोककथा थोडक्‍यात सांगणं भाग आहे. इतालो काल्विनो नावाचे एक लेखक-पत्रकार होते. त्यांनी सन १९५६ मध्ये लिहिलेल्या इटालियन लोककथांच्या पुस्तकातली ही छोटीशी गोष्ट : गावात एक विधवा होती. तिला तेरा वर्षांचा मुलगा होता. त्याचं नाव जॅक. ‘पैसा कमावण्यासाठी मलाही बाहेरगावी जायला हवं’, असा...
जून 24, 2018
एकीकडं स्त्रियांना अजूनही अनेक क्षेत्रांत डावललं जात असताना एक मुलगी स्पेशल फोर्समध्ये सामील होते. कुटुंबातसुद्धा डावलली गेलेली ही मुलगी लष्करातल्या कडक प्रशिक्षणाला उत्तमपणे सामोरी जाते. एका विशिष्ट प्रसंगातून सगळ्यांनाच एक धक्कादायक माहिती समजते आणि त्यातून तिचा कणखरपणा आणखी ठळक होतो....
जून 18, 2018
पुणे - 'गोरीला शॉर्टस्' या युट्युब चॅनलद्वारे 'लव हॅंडल्स' या वेबसिरीजमधून 'प्रेम' या विषयावरील वेगवेगळ्या पाच कथा दिग्दर्शक अंबर चक्रवर्ती यांनी प्रेक्षकांसाठी आणल्या आहेत. यातील पाचवा भाग 'पुराना प्यार' (#PuranaPyaar) हा नुकताच प्रदर्शित झाला असून त्यात जेष्ठ अभिनेते डॉ. मोहन आगाशे व...
जून 10, 2018
एखाद्या वस्तूचं डिझाइन पाहिल्यावर "सुंदर' अशी उत्स्फूर्त दाद येते ती केवळ भावनेतून. त्या वेळी ही वस्तू उपयोगाची आहे का, तिची किंमत काय असेल, ती टिकाऊ असेल का असे तर्कशुद्ध प्रश्न नंतर जरी पडले तरी हृदयाची पहिली पसंती कायम राहते. वस्तूंची अशी भावपूर्ण डिझाईन योजण्याची कल्पना योग्य असली तरी ती अद्याप...
जून 06, 2018
छत्रपती शिवाजी महाराजांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे अनावरण ८ मार्च १९१४ रोजी बडोद्यात महाराजा सयाजीराव गायकवाड यांच्या हस्ते झाले. त्यावेळी त्यांनी इंग्रजीत केलेले तीन पानी भाषण बाबा भांड यांनी महाराष्ट्र सरकारच्या सौजन्याने प्रकाशित केलेल्या महाराजांच्या भाषणांच्या संग्रहात उपलब्ध झाले. संकल्पित...
मे 30, 2018
हिंदी मराठी चित्रपट सृष्टीत सकस अभिनयाने ठसा उमटविणारे अभिनेते विद्याधर जोशी येत्या ८ जून रोजी प्रदर्शित होणाऱ्या 'अष्टवक्र' सिनेमात एक प्रामाणिक निवृत्त पोलीस अधिकारी आणि नायिकेचे वडील या भूमिकेत प्रेक्षकांना पहायला मिळणार आहेत. या हरहुन्नरी आणि गुणी अभिनेत्याच्या अभिनय क्षमतेबद्दल वेगळ सांगायला...