एकूण 31 परिणाम
March 02, 2021
नाशिक : काळाराम मंदिराचा सत्याग्रह आपणाला माहीतच आहे. माणसाला माणूस म्हणून सन्मान मिळण्याकरिता बाबासाहेबांनी अथक परिश्रम घेतले. "देव्हाऱ्यात जनावरांना जायला परवानगी आहे परंतु दलितांना का नाही. आम्हीही माणसेच आहोत." हा संदेश देण्यासाठी बाबासाहेबांनी अनेक मंदिर सत्याग्रह केलेली आहेत. त्याबद्दल...
February 28, 2021
सोलापूर ः विसरू नका मराठीला, हिचा गोडवा अवीट आहे  माझ्यासाठी मराठी आहे नाणे, एक बाजू ती तर दुसरी मी आहे...तुझ्या स्वर्गाहुनी मला, माझी झोपडीच बरी, तिच्या काळजात नांदे, गाथा आणि ज्ञानेश्वरी.....या आणि अशा एकाहुन एक मराठी काव्यरचना सादर करुन शहरातील मान्यवर कवींनी मराठी भाषा दिनाचा कार्यक्रम साजरा...
February 27, 2021
अकोला : भाषेचा विकास साहित्यातून होत असतो. मराठी भाषेला तर समृद्ध साहित्याची परंपराच लाभली आहे. विद्यार्थ्यांना मराठी साहित्याची गोडी लागावी व मातृभाषेविषयी आत्मियता निमार्ण व्हावी, या उद्देशाने विदर्भ साहित्य संघ, शाखा अकोला अभिनव उपक्रम घेत असते. या उपक्रमांचा भाग म्हणून मराठी राजभाषा दिनाचे...
February 27, 2021
नांदेड : सत्तावीस फेब्रुवारी हा जागतिक मराठी भाषा दिवस, मराठी भाषा दिन, मराठी भाषा गौरव दिन अशा नावाने साजरा केला जातो. साहित्य अकादमी, पद्‍मभूषण, ज्ञानपीठ पुरस्काराने गौरवान्वित कुसुमाग्रज यांच्या जन्मदिनानिमित्ताने या दिनाला सुरुवात झाली ती मुळात भावी पिढीने मराठीचा-मातृभाषेचा वारसा...
February 27, 2021
माझ्या आयुष्याच्या जडणघडणीत माझे परमपूज्य आई-वडील, गुरुजन आणि अनेक मार्गदर्शक, तसेच साहित्यक्षेत्रातील सर्वोच्च स्थान असलेले आणि माझे श्रद्धास्थान कविश्रेष्ठ कुसुमाग्रज यांचा मोलाचा सहभाग आहे. कुसुमाग्रजांची माझी पहिली भेट मी शाळकरी विद्यार्थी असताना झाली. मराठीच्या पाठ्यपुस्तकातील ‘...
February 26, 2021
मुंबई: मराठी भाषा दिनाच्या निमित्ताने म्हणजेच २७ फेब्रुवारीला महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे मुंबईत आयोजित केलेल्या कार्यक्रमाला परवानगी नाकारण्यात आली आहे. राज ठाकरे यांच्या मराठी स्वाक्षरी कार्यक्रमाला पोलिसांनी परवानगी नाकारली आहे.  या मुद्द्यावरून आता मनसे आक्रमक होण्याची शक्यता आहे. या...
February 25, 2021
कऱ्हाड (जि. सातारा) : लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची जन्मशताब्दी नुकतीच झाली आहे. अण्णाभाऊंची उपेक्षा अखिल भारतीय मराठी साहित्य संमलेनात होत असते. त्यांना भारतरत्न किताब देण्याचा ठराव नाशिकच्या संमेलनात करावा, या मागणीसाठी दलित महासंघाच्यावतीने नाशिकच्या साहित्य संमेलनावर मोर्चा काढण्यात येणार आहे...
February 12, 2021
नाशिक : नाशिक परिसराला दक्षिण भारतातील आर्यसंस्कृती प्रचारातील आरंभस्तंभ मानले जाते. जगातील वेगाने वाढणाऱ्या काही मोजक्या शहरांमध्ये नाशिकचा क्रमांक लागतो. प्राचीन संस्कृती आणि आधुनिकतेचा अनोखा संगम या शहरात अनुभवायला मिळतो. विविध संस्कृतींच्या विकासात गोदा संस्कृतीचे स्थानही मोठे आहे. प्रथा,...
February 10, 2021
नाशिक : राज्य शासनाने दैनंदिन वापरात मराठी भाषा सक्तीची केली असली, तरी त्याचा वापर होताना दिसत नाही. हाच नियम शहरातील दुकाने, संस्था व आस्थापनांना लागू होत असला, तरी अद्यापही बहुतांश ठिकाणी फलके इंग्रजी भाषेतच आढळून येत असल्याने राज्य शासनाच्या सूचनेनुसार महापालिकेने इंग्रजीत असलेले फलक मराठीत...
February 08, 2021
जन्मापासूनच आपल्याला कळत-नकळत जाणीव होत जाते पृथ्वीमातेची- जलावरण आणि वातावरणात लपटलेल्या शिलावरणाची आणि त्यातील वैविध्याने नटलेल्या जीवावरणाची! पृथ्वीमातेचे अस्तित्वच गूढ. ‘बिग बॅंग’ नामक स्फोटातून निर्माण झालेले अथांग विश्व. स्फोट म्हणजे विध्वंस आलाच. मात्र त्यातून निर्माण झाली स्वतःच्याच तालात...
February 02, 2021
नाशिक :  ९४ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात खास कवींसाठी कविकट्टा कार्यक्रम होणार असून यासाठी महाराष्ट्रातून कविता मागविण्यात येत आहे. कविकट्टा उपक्रमाला पहिल्याच दिवशी उर्त्स्फुत प्रतिसाद मिळाला आहे.  महाराष्ट्रभरातून २२० कविता मराठी साहित्य संमेलनात कवीकट्टा उपक्रमातंर्गत कवी संमेलन...
February 02, 2021
नाशिक :  ९४ वे अखिल भारतीय साहित्य संमेलन नाशिक येथे होत असल्याने तसेच स्वातंत्र्यवीर सावरकरांनी मराठी साहित्य संदर्भात केलेल्या कार्यामुळे नाशिक येथील आगामी साहित्य संमेलनात संमेलन नगरी स्वातंत्र्यवीर सावरकर नगरी असे नाव देण्याच्या मागणीला टाळण्यात आल्याने स्वातंत्र्यवीर सावरकर समुहातर्फे याचा...
February 01, 2021
कुसुमाग्रजनगरी (नाशिक) :  येथील ९४ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचा स्वागताध्यक्ष प्रत्येक नाशिककर असेल, असे संमेलनाचे स्वागताध्यक्ष तथा पालकमंत्री छगन भुजबळ यांनी रविवारी (ता. ३१) येथे स्पष्ट केले. तसेच सामाजिक प्रश्‍न मांडणाऱ्या साहित्यिकांच्या समावेशातून सगळ्या समाजाला हे संमेलन आपले...
February 01, 2021
नाशिक : नाशिकमध्ये होत असलेल्या ९४ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनासाठी लोकहितवादी मंडळाकडून तयारी सुरू आहे. तीनदिवसीय सारस्वतांच्या मेळ्याचे चोख नियोजन करण्यात येत आहे. संमेलनात उद्‌घाटनपासून ते समारोपापर्यंत विविध कार्यक्रमांची मेजवानी आलेल्या सारस्वत पाहुण्यांना मिळणार आहे.  तीनदिवसीय...
January 30, 2021
नाशिक : ९४ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या तयारीच्यादृष्टीने आजवर जाहीर झालेल्या स्वागत, मार्गदर्शक अन्‌ सल्लागार समितीच्यापुढे संमेलनाशी नाशिककरांना जोडून घेण्याच्या दिशेने पाऊल पडताना दिसत नाही. एवढेच नव्हे, तर विश्‍वस्तपदाच्या अनुषंगाने यजमानांमध्ये विसंवादाचे धुमारे फुटले आहेत....
January 29, 2021
नाशिक : ९४ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या तयारीनिमित्ताने साहित्यातील ‘नाट्य’चा पडदा उघडल्यापासून एकामागून एक रंजक किस्से पुढे येऊ लागलेत. स्वागताध्यक्ष तथा पालकमंत्री छगन भुजबळ यांच्यापाठोपाठ माजी खासदार समीर भुजबळांनी संमेलनस्थळाची पाहणी केलीय. एवढेच नव्हे, तर पालकमंत्र्यांच्या...
January 26, 2021
नाशिक : स्‍वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांना सर्वोच्च भारतरत्‍न पुरस्‍कार देण्याचा ठराव ९४ व्‍या अखिल भारतीय मराठी साहित्‍य संमेलनात मांडावा, अशी मागणी संस्‍कार भारती संस्‍थेने केली आहे. यासंदर्भात संस्‍थेच्‍या नाशिक महानगर कार्यकारिणी पदाधिकाऱ्यांनी संमेलनाच्‍या कार्यालयाच्‍या ठिकाणी...
January 25, 2021
नाशिक : नाशिकमध्ये होणाऱ्या ९४ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या स्वागताध्यक्षपदी साहित्य मंडळाने केलेली माझी निवड हा माझ्यासाठी सर्वोच्च सन्मान असल्याची प्रतिक्रिया राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री तथा नाशिक जिल्ह्याचे पालकमंत्री छगन भुजबळ यांनी सोमवारी (ता. 26) रोजी...
January 12, 2021
गडचिरोली : काही वर्षांपूर्वी नवे वर्ष, दिवाळी, दसरा, ईद, ख्रिसमस, व्हॅलेंटाईन डे असे कोणतेही सण किंवा वाढदिवसाप्रसंगी शुभेच्छा द्यायच्या असल्या की, शुभेच्छापत्र पाठविले जायचे. त्यातील सुंदर, रंगीत चमचमणाऱ्या कागदावर वळणदार अक्षरात आशयघन संदेश लिहिले जात होते. मात्र, कधीकाळी दुकानांतून रूबाबात...
January 10, 2021
नाशिक : कविवर्य कुसुमाग्रज व वसंत कानेटकर यांचे वास्तव्य असलेल्या भूमीत पार पडत असलेले ९४ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन दर्जेदार होईल या दृष्टीने शासन स्तरावरून आवश्यक ती मदत मिळवून देत पूर्णपणे सहकार्य केले जाईल असे राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री तथा नाशिक...