एकूण 1625 परिणाम
मार्च 01, 2017
औरंगाबाद जिल्हा परिषदेच्या 62 जागा असून, 2012 मधील निवडणुकीच्या तुलनेत भाजपला तब्बल 16 जागांचा फायदा झाला आहे. हा पक्ष सहावरून थेट 22 जागांवर पोचला आहे. शिवसेनेला 18 जागा असून, गेल्यावेळच्या तुलनेत एक जागा वाढली असली, तरी भाजप मोठा भाऊ होऊन बसला आहे. कॉंग्रेसच्या 16 जागा कायम आहेत. या निवडणुकीत...
मार्च 01, 2017
बीड - पंकजा मुंडे आणि विनायक मेटेंतील दुरावा कमी करण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतलेला पुढाकार, यातून मुंबईत दोघांची झालेली बैठक, राष्ट्रवादीत पदासाठी सुरू असलेली ओढाताण आदी बाबी भाजपच्या पथ्यावर पडण्याची शक्‍यता आहे. त्यामुळे भाजपलाही सत्तास्थापनेची संधी मिळू शकते.  जिल्हा परिषदेत...
मार्च 01, 2017
ठाणे - मतदानासाठी वापरण्यात आलेल्या ईलेक्‍ट्रॉनिक व्होटिंग मशिनमध्ये (ईव्हीएम) झालेल्या गोंधळाची केंद्रीय अन्वेषण विभागातर्फे (सीबीआय) चौकशी करण्याची मागणी ठाण्यातील शिवसेनेसह भाजपच्या उमेदवारांनी केली आहे. शिवसेनेसोबत भाजपच्या उमेदवारानेही थेट "सीबीआय' चौकशीची मागणी केल्याने हा चर्चेचा विषय ठरला...
मार्च 01, 2017
कॉंग्रेसची मुंबईतील पुढील "राजकारणा'ची दिशा ठरणार मुंबई - पक्षांतर्गत वादामुळे चर्चेत आलेले मुंबई कॉंग्रेसचे प्रदेश अध्यक्ष संजय निरुपम हे "हायकमांड'च्या भेटीसाठी दिल्लीत दाखल झाले आहेत. उपाध्यक्ष राहुल गांधी यांना बुधवारी (ता. 1) भेटून मुंबईतील पराभवाचा अहवाल "युवराजां'समोर सादर केला जाणार...
मार्च 01, 2017
मुंबई - मुंबई महानगरपालिकेमध्ये महापौर पदासाठी शिवसेनेबाबतची भूमिका कॉंग्रेस स्पष्ट करावी, असे आवाहन राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी मंगळवारी येथे केले. तटकरे म्हणाले, की जिल्हा परिषद सत्तेमध्ये कॉंग्रेस व आम्ही एकत्र येण्याबाबत...
मार्च 01, 2017
नाशिक - जिल्हा परिषदेच्या निवडणुकीनंतर कुठल्याच एका पक्षाला बहुमत मिळाले नाही, तसेच शिवसेना व भारतीय जनता पक्षातील संबंध ताणल्यामुळे अनिश्‍चिततेची परिस्थिती निर्माण झाली आहे. यामुळे सत्तेचे गणित जुळविण्यासाठी राष्ट्रवादी कॉंग्रेसनेही मोर्चेबांधणीस सुरवात करून या अनिश्‍चितेचा फायदा उठविण्याचा निर्णय...
फेब्रुवारी 28, 2017
लखनौ : बहुजन समाज पक्षाच्या (बसप) प्रमुख मायावती यांनी आम्ही सत्तेत आल्यास उत्तर प्रदेशचे पूर्वांचलसह चार छोट्या राज्यांत विभाजन करू, अशी भूमिका मांडल्याने वातावरण पुन्हा तापले आहे.   उत्तर प्रदेशच्या विभाजनाचा मुद्दा यामुळे पुन्हा चर्चेत आला असून, बसपने आम्ही पूर्वी दिलेली वचने पूर्ण करू असे...
फेब्रुवारी 28, 2017
मुंबई - विधिमंडळाचे अर्थसंकल्पी अधिवेशन 6 मार्चपासून सुरू होत आहे. फडणवीस सरकारची या अधिवेशनात कसोटी लागणार आहे. मुंबई महापालिका सत्तास्थापनेत भाजपने शिवसेनेला लक्ष्य केल्यास अधिवेशनात शिवसेना आमदार कोणती भूमिका घेतात याची उत्सुकता आहे. शिवसेनेने यापूर्वीच शेतकऱ्यांच्या कर्जमाफीची मागणी केली आहे....
फेब्रुवारी 28, 2017
नवी दिल्ली - विद्यापीठात घडणाऱ्या घटनांना काँग्रेसमार्फत वेगळा रंग देण्याचा प्रयत्न करण्यात येत असल्याचे विधान केंद्रीय मंत्री वेंकय्या नायडू यांनी केले होते. त्यास प्रत्युत्तर देत काँग्रेस नेते मल्लिकार्जुन खर्गे यांनी नायडू यांच्या वक्तव्याला विरोध म्हणजे देशविरोध असल्याची टीका केली आहे. जवाहरलाल...
फेब्रुवारी 28, 2017
औरंगाबाद - ऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादुल मुस्लिमीन पक्षाचा जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकीत "पतंग' कटला असला तरी दहा महापालिका निवडणुकीत त्यांनी 25 नगरसेवक निवडून आणले आहेत. नांदेड, औरंगाबाद महापालिका निवडणुकीत लक्षणीय यश मिळविल्यानंतर राज्यातील इतर महापालिकांतसुद्धा या पक्षाने दखल घेण्याइतपत...
फेब्रुवारी 28, 2017
नागपूर - शहराचे महापौरपद महिला खुल्या प्रवर्गासाठी आरक्षित असून, नगरसेविकांमधून महापौरांचा शोध अद्याप सुरू आहे. भाजपने आता उपमहापौरपदही नगरसेविकांमधूनच देण्याचा निर्णय घेतल्याचे समजते. महापौर व उपमहापौरपदही नगरसेविकाच राहणार असल्याने भाजप नागपुरात मिशन महिला बळकटीकरण राबवित असल्याची चर्चा रंगली आहे...
फेब्रुवारी 28, 2017
नागपूर - महापालिका निवडणुकीतील पराभवामुळे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांना बदलण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. दिल्लीतून प्रदेशाध्यक्ष कोण आणि कसा हवा, अशी विचारणा स्थानिक नेत्यांना केली जात आहे. यावरून चव्हाण विरोधकांच्या मागणीला यश येत असल्याचे बोलले जात आहे. नेतृत्व बदलावर मुंबईत घमासान सुरू...
फेब्रुवारी 28, 2017
नाशिक - महापालिकेत भाजपला निर्विवाद बहुमत मिळाल्यानंतर महापौर, उपमहापौर व स्थायी समिती सभापतिपदासाठी जोरदार फिल्डिंग लावली जात आहे. महापौरपद अनुसूचित जमातीसाठी राखीव असल्याने जुन्या नगरसेवकांचा दावा भक्कम असला, तरी पक्षाची प्रतिमा उंचावण्यासाठी नवीन चेहरासुद्धा आणण्याचे सूचक उद्‌गार पालकमंत्र्यांनी...
फेब्रुवारी 28, 2017
मनसेच्या साथीची अटकळ; भाजपला हाक देण्याची शक्‍यता कमीच मुंबई - भारतीय जनता पक्षासोबत युती तोडण्याचा निर्धार केल्यानंतर आता मुंबई महानगरपालिकेतील महापौर व उपमहापौरपदही स्वबळावरच मिळविण्यासाठी शिवसेना डावपेच आखत असल्याचे संकेत मिळत आहेत. कोणत्याही परिस्थितीत भाजपला युतीसाठी हाक द्यायची नाही,...
फेब्रुवारी 28, 2017
नागपूर - एकेकाळी कॉंग्रेसचा बालेकिल्ला समजल्या जाणाऱ्या पूर्व नागपूर विधानसभा मतदारासंघाने सर्वाधिक 22 नगरसेवक भाजपला दिलेत. येथून फक्त पाच उमेदवारांचा पराभव झाला. विशेष म्हणजे तिकीट वाटपानंतर सर्वाधिक रोष याच मतदारसंघात खदखदत होता. मात्र, आमदार कृष्णा खोपडे यांनी सर्वाधिक नगरसेवक निवडून आणून...
फेब्रुवारी 28, 2017
पुणे - 'देशातील नागरिकांची बौद्धिक पातळी उंचावत असली तरी, सामाजिक नैतिकता हरवत आहे. यामुळेच मतदानाचे राष्ट्रीय कर्तव्य बजावतानाही नागरिक पैसे घेतात. भावी पिढीवर चांगले संस्कार घडविण्याची जबाबदारी असणारे शिक्षकदेखील यामध्ये सहभागी असतात. यामुळेच समाजामध्ये संस्काराचा अभाव आहे,'' असे मत कॉंग्रेसचे...
फेब्रुवारी 28, 2017
लातूर - जिल्हा परिषदेतील भाजपचे गटनेते व भावी अध्यक्ष म्हणून ज्यांच्या नावाची चर्चा सुरू आहे असे रामचंद्र तिरुके यांनी ता. 29 डिसेंबर रोजी जिल्हा परिषदेतील काही अधिकाऱ्यांसोबत चर्चा करीत असताना एका चिठ्ठीवर सही करून निवडणुकीचा अंदाज वर्तविला होता. तो खरा ठरला आहे. त्यामुळे एखाद्या राजकारण्याचा...
फेब्रुवारी 28, 2017
नाशिक - जिल्ह्यातील 15 पंचायत समितींच्या सभापतींची निवड 14 मार्चला होणार आहे; तर जिल्हा परिषदेच्या अध्यक्षांची निवड 21 मार्चला होणार असल्याचे आज जिल्हा प्रशासनाने जाहीर केले. त्यामुळे 21 मार्चला राबविल्या जाणाऱ्या निवडणूक प्रक्रियेपूर्वीच 15 तालुक्‍यांमधील पंचायत समित्यांमध्ये सत्तास्थापनेसाठी...
फेब्रुवारी 28, 2017
शेतकरी कर्जमाफीवरून भाजपची सत्त्वपरीक्षा मुंबई - विधिमंडळाचे अर्थसंकल्पी अधिवेशन सहा मार्चपासून सुरू होत असताना भाजप सरकारची मात्र या अधिवेशनात कसोटी लागणार आहे. मुंबई महापालिका सत्तास्थापनेत भाजपने शिवसेनेला लक्ष्य केल्यास अधिवेशनात शिवसेना आमदार कोणती भूमिका घेतात, याची उत्सुकता आहे....
फेब्रुवारी 28, 2017
औरंगाबाद - महापालिका निवडणुकीत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या इंजिनाचा सुफडा साफ झालेला असताना जिल्हा परिषदेतही इंजिनची वाट लागली आहे. राज्यातील 25 जिल्हा परिषदांत फक्त औरंगाबादमध्ये मनसेचा एकमेव सदस्य विजयी झाला. विधानसभेत एक आमदार असलेल्या मनसेचा जिल्हा परिषदेतही फक्त एकच सदस्य आहे. 2012 मध्ये...