एकूण 60 परिणाम
जुलै 17, 2019
परभणी : कसा तरी पडणारा हलका पाऊसही आता गायब झाला आहे. मागील सहा दिवसापासून पावसाने उघडिप दिल्याने कोवळी पिके संकटात आली असून त्यामुळे दुबार पेरणीचे संकट घोंगावत आहे. जिल्ह्यातील तब्बल चार लाख 55 हजार 880 हेक्टरवरील पिके संकटात असून तेरा टक्के क्षेत्र अजुनही पडीक आहे.अजुनही दोन ते तीन दिवसात पाऊस...
जुलै 17, 2019
मराठवाडा, खानदेश, विदर्भात गंभीर स्थिती पुणे - कोकण आणि पश्चिम महाराष्ट्राचा काही भाग वगळता विदर्भ, मराठवाडा, खानदेशवर दुष्काळाचे सावट गडद झाले आहे. अत्यल्प पाऊस, असमान वितरण आणि खंडामुळे काही ठिकाणी झालेल्या पेरण्या वाया गेल्यात जमा आहेत. बऱ्याच ठिकाणी उगवण होऊन खुरटलेली पिके पाण्यासाठी आकाशाकडे...
जून 22, 2019
हिंगणा : खरीप हंगाम 2018-19 मध्ये पावसाने दगा दिल्याने शेतकरी संकटात सापडला होता. दुष्काळसदृश परिस्थिती निर्माण झाल्याने सर्वेक्षण करून अहवाल पाठवला होता. कर्जमाफीसाठी तालुक्‍यातील 4,257 शेतकरी पात्र ठरले असून, 29 कोटी 82 लाख 89 हजारांची कर्जमाफी केली आहे. ही आकडेवारी सहायक निबंधक...
फेब्रुवारी 28, 2019
बीड - खरिपात पावसाने पाठ फिरविली आणि रब्बीतही परतीचा पाऊस न झाल्याने चाऱ्याचे पीक आलेच नाही. त्यामुळे जनावरांच्या चारा-पाण्याचा प्रश्‍न बिकट झाल्याने पशुपालक हैराण आहेत. मात्र, किचकट शासन निर्णयामुळे छावण्यांचे प्रस्ताव जिल्हाधिकारी कार्यालयात धूळखात पडून आहेत. जिल्हाभरातून छावण्या सुरू करण्याचे...
फेब्रुवारी 03, 2019
जळगाव ः यंदा अत्यल्प झालेल्या पावसामुळे जिल्ह्यात दुष्काळी परिस्थिती आहे. खरीप पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले. रब्बीची पिकेही धोक्‍यात आहेत. यामुळे जिल्ह्यासह राज्यात दुष्काळ शासनाने जाहीर केला. राज्यातील दुष्काळावर शेतकऱ्यांना मदत म्हणून साडेसात हजार कोटींची मागणी केली आहे....
फेब्रुवारी 01, 2019
दुष्काळात शेतीची अक्षरक्षः होरपळ सुरू आहे. पिण्याच्या पाण्यासह जनावरांच्या चारा-पाण्याचा प्रश्‍न उभा आहे. अशा भीषण संकटात आपल्याकडील पाणी दुसऱ्याला देऊन स्वतःबरोबर दुसऱ्यांची शेती जगवण्याचे मोलाचे कार्य भुयार चिंचोली (जि. उस्मानाबाद) येथील काही शेतकरी मंडळींनी केले आहे. दुसऱ्यांसाठी दूत झालेल्या या...
जानेवारी 29, 2019
पुणे जिल्ह्याच्या परिसरात मांजरी (बु.) भागामध्ये शहरीकरण वाढत असताना केवळ शेतीच नव्हे, तर पारंपरिक देशी गहू वाण नैसर्गिक पद्धतीने जपणाऱ्या घुले कुटुंबीयांतील कसदार धान्य उत्पादनाची धुरा पुढील उच्चशिक्षित पिढीने उचलली आहे. वंदन घुले हे तीन वर्षांपासून २२ गुंठे क्षेत्रातून सुभाष पाळेकर यांच्या झिरो...
नोव्हेंबर 01, 2018
येवला - आनंदाचा, उत्सवाचा आणि प्रकाशाचा सण असलेला दिवस चार दिवसांवर येऊनही अजून घरात खरेदीचा पत्ता नाही. घराच्या कोपऱ्यात जीव लावून ठेवलेला दहा-पंधरा किलो कापूस अन् दोन-तीन क्विंटल मका यावरच दिवाळीची खरेदी अन् घरसंसार यांचे गणित जुळवण्याचे कसब दुस्काळ पिडित शेतकऱ्यांपुढे उभे ठाकले आहे. आर्थिक...
सप्टेंबर 22, 2018
येवला - कपाशीच्या झाडाला चाळीसच्या ठिकाणी चारच बोंड, मकाला एक-दोन बीट लागले पण त्यात दाणेच नाही. मूग, सोयाबीन, भुईमुगाचा केव्हाच पालापाचोळा झालाय तर कांद्याची पाऊस पडेल या आशेने लागवड केली पण पाण्याअभावी लागवड झालेले रोपे करपून माती होत आहे..यामुळे येवल्यातील शेतकऱ्यांना यंदा खरीपातून सुमारे ७०...
सप्टेंबर 18, 2018
जयपूर (जि. अौरंगाबाद) येथील राजू, भाऊसाहेब व बाबासाहेब या मते बंधूंनी सव्वाचारशे फूट उंचावरील डोंगरावरील शेतीतून डोक्‍यावरून शेतमाल वाहतुकीचे कष्ट उपसले. नियोजनपूर्वक प्रयत्नांतून मिळविलेले उत्पन्न शेतीसाठीच खर्ची घातले. त्यातून मिळवलेल्या स्थैर्यातून शेतीचा विकास सुरूच ठेवला. माळावर सिंचनाची भक्कम...
सप्टेंबर 15, 2018
सोलापूर- राज्यात आता मूग व उडीद या पिकांची काढणी सुरू झाली आहे. काही प्रमाणात हे धान्य बाजारपेठेतही येऊ लागले आहे. त्या पार्श्‍वभूमीवर हमीभाव खरेदी केंद्र सुरू करण्याची मागणी शेतकऱ्यांमधून होत आहे. या पार्श्‍वभूमीवर ऑक्‍टोबरच्या पहिल्या आठवड्यापासून राज्यभर हमीभाव खरेदी केंद्र सुरू करण्यात येणार...
सप्टेंबर 13, 2018
येवला: लाखो रुपये भांडवल गुंतवून अल्प पावसावरही घेतलेला खरीप हंगाम निम्याने संपल्यात जमा आहे. खरिपाच्या पिकांची अवस्था पाहता थोडाफार पाऊस पडला तरी उत्पन्नात 50 ते 60 टक्के घट होणार असून नाही पडला तर राखरांगोळी निच्छित आहे. त्यामुळे आता खरीपातून उत्पन्न नको पण गुंतवलेले भांडवल तरी...
सप्टेंबर 05, 2018
झरे : खरसुंडी मंडल मध्ये खरीप 26 गावे आहेत. या मंडल मध्ये ऑगस्ट अखेर 91 मिलीमीटर इतका पाऊस पडला आहे. सध्या खरसुंडी येथे पर्जन्यमापक यंत्र आहे. या यंत्राच्या सहाय्याने पाऊस किती पडला याचे मोजमाप केले जाते. खरसुंडीत पडलेल्या पावसाची आकडेवारी हि मंडल मधील 25 गावांना लागू होते. पण काही...
सप्टेंबर 04, 2018
पुणे - तीन आठवड्यांच्या दीर्घ खंडांनतर दमदार बरसलेल्या पावसाने आॅगस्ट महिन्यातील पावसाची तूट भरून काढली. या पावसाने अडचणीत आलेल्या खरीप पिकांना तारले, तर काही ठिकाणी अतिवृष्टीने हाताशी आलेली पिके डोळ्यांदेखत वाया गेली. या पावसाने राज्यातील अवघ्या ९५ तालुक्यांमध्ये पावसाची सरासरी...
ऑगस्ट 29, 2018
मंगळवेढा : तालुक्‍यातील खरीप हंगामातील पिके पावसाअभावी करपून गेल्‍यामुळे त्‍वरीत पंचनामे करुन दुष्‍काळ जाहीर करावा व तालुक्‍यातील तलाव व छोटे मोटे नाले व शहरातील कृष्‍ण तलाव उजनी व अन्य पाण्याने त्‍वरीत भरुन घेण्‍यात यावेत. अन्‍यथा तहसिल कार्यालयासमोर आंदोलन करण्‍याचा इशारा राष्ट्रवादी...
ऑगस्ट 19, 2018
मागचे पाच-सहा वर्षे दुष्काळात गेली, गेल्या दोन वर्षांपासून जरा बरा पाऊस पडतोय. यंदाही चांगला पाऊस होईल असं वाटलं होतं. पण सारं फेल गेलं. मोठा खर्च करून खरिपाची पेरणी केली, मात्र पाऊस गायब झाल्याने पेरलेलं वाया जाऊ लागलं आहे. पिकाची वाढ खुंटली, पिकं माना टाकू लागल्याने आता उत्पादनात घट होणार हे निश्...
ऑगस्ट 17, 2018
सोलापूर - सोलापूर जिल्ह्यातील अक्‍कलकोट, बार्शी, दक्षिण सोलापूर तालुक्‍यातील फुलोऱ्यात आलेल्या उडीद, मूग, सोयाबीन या पिकांनी पाण्याअभावी माना टाकायला सुरवात केली होती. परंतु, काल (बुधवार) दुपारपासून सुरू झालेल्या पावसाने आजही (गुरुवारी) दमदार हजेरी लावली. जिल्ह्यात सर्वदूर होत असलेल्या...
ऑगस्ट 12, 2018
येवला : तालुक्यात खरीप पेरणीपासून एक ही दमदार पाऊस झाला नसून मागील १२-१५ दिवसांपासून तर पाऊस बेपत्ताच असल्याने शेतातील उभी पिके मरणासन्न अवस्स्थेत आहे. माना टाकलेल्या खरीपाच्या पिकांना मोठ्या पावसाच्या डोसची गरज आहे, मात्र तो यायचे नाव घ्यायला तयार नाही. आजपासून श्रावणाच्या आगमनासोबत...
ऑगस्ट 12, 2018
मंगळवेढा : निसर्गाच्या कृपेवर अवलंबून असणारी तालुक्यातील जिरायत पिकाची अवस्था पावसाने ओढ दिल्यामुळे वाईट झाली आहे. पावसाअभावी तालुक्यातील 18414 हेक्टर क्षेत्रातील पिके करपू लागली पिकाचे हाल बघवत नसल्याने शेतकऱ्यांचे भरल्या डोळयाने लक्ष आभाळाकडे लागले आहे. पण आकाशात फक्त ढगांची दाटी होत आहे....
ऑगस्ट 07, 2018
कापडणे (ता.धुळे) : धुळे तालुक्यात गेल्या तीन आठवड्यांपासून पाऊस नाही. पावसाचा अधुनमधून होणारा शिडकाव्याने पिकांना कोणत्याही प्रकारचा फायदा झालेला नाही. पिकांची स्थिती नाजूक झालेली आहे. बर्‍याचशा ठिकाणी पिके करपायला लागली आहेत. आठवड्याभरात पाऊस न झाल्यास पिकं स्थिती अधिकच गंभीर होणार आहे. सुमारे तीन...