एकूण 21 परिणाम
जून 02, 2019
हिंगोली - नागपंचमीपासून पाऊस गायब झाला त्यो आलाच नाही. येलदरी धरण कितीतरी वर्षांपासून भरलं नाही. चारा विकत घेऊन आजवर जनावरं सांभाळली. आता चारा बी नाय अन् पैसे बी नाईत. यंदा पाऊस लवकर आला तर ठीक, नाहीतर चाऱ्यापायी उरली सुरली जनावरेदेखील विकून टाकावी लागतील. पेरणीसाठी पीककर्ज वेळेवर दिले तर बरं, नाही...
मे 04, 2019
भडगाव ः दुष्काळ सध्या जणू पाहुणा म्हणून वर्षापासून मुक्कामाला आला आहे. तीन- चार वर्षांपासून तो घर सोडायला तयार नाही. त्यामुळे तालुक्यात शेतीचे गणित पुरते कोलमडून गेले आहे. हिरवाईने बहरणाऱ्या शेत शिवार उजाळ झाले आहे. जनावरांना चारा नाही, पाण्यासाठी वणवण भटकंती करावी लागत आहे. मजुरांच्या हातांना काम...
जानेवारी 15, 2019
ब्रह्मपुरी (सोलापुर) - मंगळवेढा तालुका ज्वारीचे कोठार म्हणून राज्यभर प्रसिद्ध असताना या भागात पावसाने पाठ फिरवल्याने दुष्काळाच्या झळा दिवसेंदिवस वाढत चालल्या आहेत. पावसाअभावी खरीप व रब्बीची  पेरणीच झाली नसल्याने गहू, ज्वारी, बाजरीच्या किमतींत दुपटीने वाढ झाली आहे. यामुळे अगोदरच...
जानेवारी 06, 2019
माजलगाव - निसर्गाची अवकृपा झाल्याने दुष्काळाच्या झळा दिवसेंदिवस वाढत चालल्या आहेत. पावसाअभावी रब्बीची पेरणीच झाली नसल्याने गहू, ज्वारी, बाजरीच्या किमतींत दुपटीने वाढ झाली आहे. यामुळे अगोदरच दुष्काळाचे चटके सोसणाऱ्या शेतकऱ्यांसह गोरगरीब मजुरांची भाकरीही महागल्याने आता जगायचं कसं, असा प्रश्न...
ऑक्टोबर 26, 2018
नांदेड - यंदा चांगला पाऊस होईल असं टीव्हीवर सांगितलं जात होतं. तव्हा बरं वाटलं होतं. पण हवामान खात्यानं सांगितलेला अंदाज उलटा ठरला. आमच्या भागात गेल्या चार वरसारखीच यंदाबी परिस्थिती झाली आहे. यंदा तर दुबार पेरणी करावी लागली. पण पाऊस न आल्यामुळे काहीच हाती लागलं नाही. मागचंच वरीस बरं होत असं म्हणावं...
ऑक्टोबर 14, 2018
सोलापूर : राज्यातील 355 पैकी 172 तालुक्‍यांमध्ये सरासरीच्या 25 ते 75 टक्‍के पाऊस पडला आहे. सरकारने जाहीर केलेल्या 172 तालुक्‍यांतील बाधित क्षेत्राचा शासकीय यंत्रणेकडून "महामदत' या ऍपद्वारे सर्व्हे सुरू झाल्याचे नैसर्गिक आपत्ती विभागाकडून सांगण्यात आले. मात्र, नुकसान भरपाई कधीपर्यंत मिळणार हे...
ऑक्टोबर 09, 2018
माळेगाव - ऑक्‍टोबर महिना उजाडला, तरी अद्यापही जिल्ह्यात बारामती, इंदापूर, पुरंदर आदी तालुक्‍यात गेल्या वर्षीच्या सरासरीच्या निम्माही पाऊस झाला नाही. या परिसरात गेल्या वर्षी आजअखेर सरासरी ५०० मिलिमीटर पाऊस झाला होता. यंदा मात्र २५० मिलिमीटर इतकाच पाऊस झाला आहे.  पावसाने नीरा डावा कालव्याअंतर्गत...
सप्टेंबर 25, 2018
करमाळा : करमाळा तालुक्‍यात पावसाने ओढ दिली आहे. खरिपाची पिके अक्षरशः करपून गेली. काहीही खरीप हाती लागले नाही. तरीही आशावाद जीवंत ठेवत शेतकऱ्यांनी रब्बी हंगामातील ज्वारीची पेरणी सुरू केली आहे. निसर्गाने कितीही हुलकावण्या दिल्यातरी आपल्यातील आशावाद जीवंत ठेवणारा शेतकरी पावसाच्या...
सप्टेंबर 14, 2018
सोलापूर : पावसाळा सुरू होऊन तीन महिन्यांचा कालावधी उलटून गेला असला, तरी सोलापूर जिल्ह्यात 11 पैकी 10 तालुक्‍यांमध्ये 45 टक्‍क्‍यांपेक्षाही कमी पाऊस झाला आहे. जिल्ह्यात साधारणपणे रक्षाबंधनानंतर पाऊस येतो, असे सांगितले जात होते. मात्र, आज विघ्नहर्त्या गणरायाचे आगमन झाले. पण, तोही पाऊस न आणता कोरडाच...
सप्टेंबर 13, 2018
येवला: लाखो रुपये भांडवल गुंतवून अल्प पावसावरही घेतलेला खरीप हंगाम निम्याने संपल्यात जमा आहे. खरिपाच्या पिकांची अवस्था पाहता थोडाफार पाऊस पडला तरी उत्पन्नात 50 ते 60 टक्के घट होणार असून नाही पडला तर राखरांगोळी निच्छित आहे. त्यामुळे आता खरीपातून उत्पन्न नको पण गुंतवलेले भांडवल तरी...
ऑगस्ट 08, 2018
गंगापूर : पावसाळा सुरू होऊन अडीच महीने उलटले तरीही तालुक्यात दुष्काळाच्या झळा संपल्या असून ९२ गावांत ७८ टँकरने पाणी पुरवठा सुरू आहे. १४ गावांत ३२ विहिरी अधिगृहीत करण्यात आल्या आहेत. तालुक्यात अनेक भागात समाधानकारक पाऊस न पडल्याने पाणीटंचाई कायम आहे. त्यामुळे ऑगस्टमध्येही टँकरद्वारे पाणीपुरवठा सुरू...
जून 28, 2018
बीड - जून महिना उलटत आला तरी अद्यापही जिल्ह्यातील १८९ गावांमध्ये तीव्र पाणीटंचाई आहे. सद्यःस्थितीत जिल्ह्यातील सहा तालुक्‍यांमध्ये २२ टॅंकर सुरू असून या टॅंकरच्या प्रतिदिन ५० फेऱ्या करण्यात येत आहेत. पाणीटंचाईचा प्रश्‍न सुटण्यासाठी आणि खरीप पेरण्या शंभर टक्के होण्यासाठी अद्यापही मोठ्या...
मे 28, 2018
पुणे - जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी खरीप हंगामाची तयारी सुरू केली आहे. सध्या जिल्ह्यातील पश्‍चिम पट्यात भात रोपवाटिकांची तयारी, पूर्व पट्यात शेताच्या नांगरटी सुरू आहेत. यंदा भात, सोयाबीन आणि ऊस लागवडीवर भर देण्यात येणार असल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले. सध्या आर्थिक अडचणी भेडसावत आहेत....
फेब्रुवारी 26, 2018
परभणी जिल्ह्यातील शेवडी (ता. जिंतूर) या डोंगराळ भागात असलेल्या गावातील शेतकरी एकत्र आले. त्यांना शासकीय योजनांचे पाठबळ मिळाले. त्यातून गावचे शिवार जलसंधारणाच्या माथा ते पायथा कामांमुळे पाणीदार झाले. गावात नव्या पीकपद्धतीचा अंगीकार होत आहे. शेततळ्यातील संरक्षित पाण्याच्या काटेकोर वापरातून वर्षभरात...
नोव्हेंबर 27, 2017
सातारा जिल्ह्यातील पाटण हा डोंगराळ तालुका आहे. बहुतांशी भागांत उतारावरची शेती आहे. पाऊस मोठ्या प्रमाणात पडत असल्याने भात हे तालुक्याचे प्रमुख खरीप पीक आहेे. पाटणपासून सुमारे तीन किलोमीटरवर असलेले कातवडी हे सुमारे पंधराशे लोकसंख्या असलेले गाव. विहीर व शेततळ्यांच्या माध्यमातून अनेक...
नोव्हेंबर 02, 2017
नागपूर - यंदा मॉन्सूनने जिल्ह्याला चांगलाच हिसका दाखवला. नियमित तर नाहीच सरासरी एवढाही पाऊस पडला नाही. यामुळे पिण्याचे पाण्याचे संकट निर्माण झाले. मात्र, जो पाऊस पडला तो पीकपाण्यासाठी चांगला मानला जात आहे. शेतकऱ्यांना हे पटत नसले तरी यंदाच्या खरीप हंगामात जिल्ह्यात पिकांचे चांगले...
ऑगस्ट 20, 2017
नागपूर - गेले अनेक दिवस गायब असलेल्या पावसाने जिल्ह्यात हजेरी लावली. शुक्रवारी झालेल्या जोरदार पावसाने संपूर्ण जिल्ह्यातील पिकांना नवसंजीवन दिले. खोळंबलेली धानरोवणी मार्गी लागली तर कशीबशी तग धरून असलेली पऱ्हाटी पावसामुळे टवटवीत झाल्याचे दृश्‍य पहावयास मिळत आहे.  कन्हान क्षेत्रात १२५.४ मिमी पाऊस...
ऑगस्ट 13, 2017
औरंगाबाद - यंदा सर्वत्र ‘फिल गुड’ असल्याचे हवामान विभागाचे अंदाज जाहीर होत असताना जूनमध्येच पावसाने जोरदार सलामी दिली. शेतकऱ्यांचा आनंद गगनात मावेनासा झाला. त्यांनी शेतं गाठली आणि मोठ्या उत्साहात पेरणी केली. पेरलेले चांगले उगवले. निंदणी, कोळपणीला जाऊ, असा विचार करणाऱ्या शेतकऱ्यांचा भ्रमनिरास झाला....
जुलै 19, 2017
सांगली - जिल्ह्यातील दुष्काळी भागात पावसाने दडी मारल्याने शेतकरी मोठ्या आर्थिक संकटात सापडला आहे. उपसा सिंचन योजनेच्या लाभक्षेत्रातील डाळिंब, ऊस, द्राक्ष शेती धोक्यात आली आहे. अजून पंधरा दिवस अशीच परिस्थिती राहिली, तर पिके सोडून देण्याशिवाय पर्याय नाही. पिके वाचवण्यासाठी ताकारी, म्हैसाळ, टेंभू...
जुलै 13, 2017
तळेगाव दिघे (जि. नगर) - पेरणीसाठी पुरेसा झाल्यानंतर शेतकऱ्यांनी खरीप पिकाची पेरणी केली. मात्र, त्यानंतर पावसाने दडी मारल्याने संगमनेर तालुक्‍यातील अवर्षणप्रवण असलेल्या तळेगाव दिघे परिसरातील शेतकऱ्यांसमोर दुबार पेरणीचे संकट उभे राहिले आहे. संगमनेर तालुक्‍यातील अवर्षणप्रवण असलेल्या...