एकूण 19 परिणाम
जुलै 01, 2019
पुणे - कोकणात गेल्या काही दिवसांपासून पावसाने जोर धरला असून, रविवारी (ता. ३०) अनेक ठिकाणी १०० मिलिमीटर, तर आठ ठिकाणी २०० मिलिमीटरपेक्षा अधिक पाऊस झाला. रत्नागिरीतील हेदवी येथे सर्वाधिक २४५ मिलिमीटर पाऊस पडला. मध्य महाराष्ट्रातील कोल्हापूरसह नाशिक, पुणे, सातारा जिल्ह्यांत मध्यम ते जोरदार, तर...
जून 05, 2019
बीडमध्ये विजांचा कडकडाट, वादळी वारे, परंड्यात अर्धा तास पाऊस बीड/उस्मानाबाद - तप्त ऊन, उकाड्याने चार महिने त्रस्त झालेल्या बीडकरांना मंगळवारी (ता. चार) सायंकाळी झालेल्या मॉन्सूनपूर्व पावसाने काहीसा थंडावा दिला. विजांचा कडकडाट, वादळासह मध्यम स्वरूपाचा पाऊस झाला. परळी तालुक्‍यातील काही भागांत पावसाने...
जानेवारी 30, 2019
शेती आणि शेतकऱ्यांच्या सर्वांगिण उन्नतीसाठी कृषि विभागाच्या माध्यमातून शासन विविध योजना राबवित आहेत. राज्याचे मुख्यमंत्री देवेंन्द्र फडणवीस यांनी तर कृषि विभागाचा चेहरा-मोहरा बदलून शेतकऱ्यांच्या जीवनात आनंद निर्माण करण्यास प्राधान्य दिले आहे. शेतकऱ्यांना खते, बियाणे, आधुनिक यंत्रसामुग्रीसारख्या...
डिसेंबर 06, 2018
जळगाव ः यंदाच्या भीषण दुष्काळाची धग आता खऱ्या अर्थाने जाणवू लागली असून, या धगीत शेतकरी आणि जनावरेही होरपळून निघत असल्याचे चित्र ग्रामीण भागात दिसून येत आहे. तोकड्या पावसाअभावी खरीप हंगाम पूर्णपणे हातातून गेल्याने शेतकऱ्यांचे अर्थकारण बिघडले आणि जमिनीत ओल नसल्याने रब्बीचा पेरा...
डिसेंबर 06, 2018
जळगाव : यंदाच्या भीषण दुष्काळाची धग आता खऱ्या अर्थाने जाणवू लागली असून, या धगीत शेतकरी आणि जनावरेही होरपळून निघत असल्याचे चित्र ग्रामीण भागात दिसून येत आहे. तोकड्या पावसाअभावी खरीप हंगाम पूर्णपणे हातातून गेल्याने शेतकऱ्यांचे अर्थकारण बिघडले आणि जमिनीत ओल नसल्याने रब्बीचा पेरा...
ऑक्टोबर 26, 2018
नांदेड - यंदा चांगला पाऊस होईल असं टीव्हीवर सांगितलं जात होतं. तव्हा बरं वाटलं होतं. पण हवामान खात्यानं सांगितलेला अंदाज उलटा ठरला. आमच्या भागात गेल्या चार वरसारखीच यंदाबी परिस्थिती झाली आहे. यंदा तर दुबार पेरणी करावी लागली. पण पाऊस न आल्यामुळे काहीच हाती लागलं नाही. मागचंच वरीस बरं होत असं म्हणावं...
ऑक्टोबर 17, 2018
सटाणा - केंद्र शासनाच्या नेशनल सेंटर फॉर क्रॉप फोरकास्टिंग या संस्थेच्या पिक पाण्याच्या स्थिती बाबतचा अहवाल राज्य सरकारला अजूनही प्राप्त न झाल्याने शासनाला राज्यात दुष्काळ जाहीर करण्यास विलंब होत आहे. बागलाण तालुक्याची भीषण दुष्काळी परिस्थिती लक्षात घेता राज्य शासनाच्या महसूल यंत्रणेकडील अहवाल...
ऑक्टोबर 04, 2018
उमरगा : उमरगा शहरासह परिसरात बुधवारी (ता. 3) रात्री दमदार पाऊस झाला आहे. विजांचा कडकडाट व वादळी वाऱ्यासह पाऊस झाल्याने शेतातील पिकांचे, काढणी केलेल्या आणि शेतातील सोयाबीनचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. उमरगा महसूल मंडळात अतिवृष्टी झाली असून, 81 मिलीमीटर पाऊस झाला. वाऱ्याचा जोर अधिक असल्याने ऊसाचे...
सप्टेंबर 07, 2018
नांदगाव - जनतेला दिलासा देण्यासाठी वास्तववादी वस्तुस्थितीचा दृष्टिकोन ठेवून कार्यरत राहिले पाहिजे अशी अपेक्षा खासदार हरिश्चंद्र चव्हाण यांनी व्यक्त केली. खासदार चव्हाण यांच्या उपस्थितीत तालुका पंचायत समितीच्या सभागृहात लोकप्रतिनिधी व प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या संयुक्त आढावा बैठक झाली त्यात ते बोलत...
जून 20, 2018
सटाणा - मृग नक्षत्रातील पावसाच्या प्रतीक्षेत असलेल्या बागलाण वासीयांना काल (ता.१९) रोजी सायंकाळी वादळी वाऱ्यासह झालेल्या मुसळधार पावसामुळे मोठा दिलासा दिला आहे. विजांचा कडकडाट व वादळी वाऱ्यासह पडलेल्या पावसाने शेतकऱ्यांची त्रेधातिरपीट उडाली. सटाणा बाजार समितीत दुपारनंतरच्या लिलावासाठी आलेला हजारो...
नोव्हेंबर 27, 2017
सातारा जिल्ह्यातील पाटण हा डोंगराळ तालुका आहे. बहुतांशी भागांत उतारावरची शेती आहे. पाऊस मोठ्या प्रमाणात पडत असल्याने भात हे तालुक्याचे प्रमुख खरीप पीक आहेे. पाटणपासून सुमारे तीन किलोमीटरवर असलेले कातवडी हे सुमारे पंधराशे लोकसंख्या असलेले गाव. विहीर व शेततळ्यांच्या माध्यमातून अनेक...
नोव्हेंबर 02, 2017
राज्यातील प्रत्येक शहरासह गावासमोर सध्या कचऱ्याचा गंभीर प्रश्‍न उभा आहे; मात्र त्यावर प्रक्रिया करून पर्याय शोधण्याचे काम सातारा जिल्ह्यातील कऱ्हाड तालुक्‍यात असलेल्या बनवडी गावाने केले आहे. प्रक्रियायुक्त गांडूळखताचा वापर त्यामुळे वाढेलच, शिवाय ग्रामपंचायतीला त्यातून उत्पन्नाचे मोठे साधन निर्माण...
ऑक्टोबर 11, 2017
मागील दोन ते तीन दिवसांपासून राज्यात परतीच्या पावसाने जोरदार हजेरी लावली. सध्या सोयाबीन, मूग, उडीद, भात आणि कापूस वेचणीची कामे सुरू आहेत. मात्र, पावसाने काढणीच्या कामात व्यत्यय येत असून, पिकांचे नुकसान झाले आहे. शेतात पाणी साचून राहिल्याने काढणी केलेले पीक, भाजीपाला व पेरणी बियाण्याला फटका बसला....
ऑक्टोबर 09, 2017
बीड - हवामान खात्याने वर्तविलेल्या अंदाजानुसार शनिवारी (ता. ७) दुपारी जिल्ह्यातील काही भागांत वादळी वाऱ्यासह पाऊस झाला. या वेळी विजांचा प्रचंड कडकडाट झाल्याने धारूर तालुक्‍यात पाच, तर माजलगाव तालुक्‍यात एक असे जिल्ह्यात एकूण ६ जणांचा वीज अंगावर पडल्याने मृत्यू झाला. याशिवाय अंबाजोगाई तालुक्‍यात दोन...
जुलै 19, 2017
सांगली - जिल्ह्यातील दुष्काळी भागात पावसाने दडी मारल्याने शेतकरी मोठ्या आर्थिक संकटात सापडला आहे. उपसा सिंचन योजनेच्या लाभक्षेत्रातील डाळिंब, ऊस, द्राक्ष शेती धोक्यात आली आहे. अजून पंधरा दिवस अशीच परिस्थिती राहिली, तर पिके सोडून देण्याशिवाय पर्याय नाही. पिके वाचवण्यासाठी ताकारी, म्हैसाळ, टेंभू...
जून 23, 2017
पंधरा दिवसांच्या प्रतीक्षेनंतर हजेरी; शेतकऱ्यांमध्ये काहीसे समाधानाचे वातावरण जळगाव - गेल्या पंधरा दिवसांच्या प्रतीक्षेनंतर आज जिल्ह्यातील जळगाव शहरासह अमळनेर, पारोळा, तसेच चाळीसगाव तालुक्‍यातील पिलखोड परिसरात पावसाने दुपारी हजेरी लावली. जळगावात तुरळक, अमळनेरला मध्यम, पारोळ्यात मुसळधार, तर पिलखोड...
जून 10, 2017
मरखेल - देगलूर तालुक्‍यातील रमतापूर येथे शुक्रवारी वादळी पावसात शेतात काम करणाऱ्या दोन सख्ख्या चुलतभावांवर वीज कोसळून त्यांचा मृत्यू झाला. रमतापूर येथील गोपाळ पंढरी पाटील (वय 32) व ज्ञानेश्वर शंकरराव पाटील (वय 17) हे दोघे खरीप हंगामपूर्व मशागतीच्या कामासाठी शिवारातील स्वतःच्या शेतात...
जून 07, 2017
सोलापूर - राज्यातील शेतकऱ्यांकडे असलेले वीज बिल पूर्णपणे माफ करावे, शेतकऱ्यांना पूर्णपणे कर्जमाफी द्यावी, या मागण्यांसाठी राज्यभर शेतकऱ्यांनी संप पुकारला आहे. अशातच महावितरणने थकबाकीदार शेतकऱ्यांकडून वसुली सुरू केली आहे. वसुलीची मोहीम तीव्र करण्याच्या सूचना त्यांनी स्थानिक कार्यालयांना देऊन...
जून 03, 2017
चांगल्या पावसावर व्यावसायिकांची गणिते; पण आधी द्या शेतकऱ्याला मदत पुणे - यंदा सरासरीएवढ्या पावासाचा अंदाज भारतीय हवामान विभागाने जाहीर केला आहे. तेव्हापासून बाजारपेठेत उत्साह आहे. शेअर निर्देशांक नवनवीन उच्चांक गाठत आहे. शेती पिकली तर एकूणच अर्थकारणाला गती येते. कारण चांगला पाऊस म्हणजे...