एकूण 12 परिणाम
डिसेंबर 20, 2019
घनसावंगी (जि.जालना) -  तालुक्‍यात खरीप पिकांतून शेतकऱ्यांच्या हाती काही लागले नाही. आता खरिपाची पिके मोडून अनेक शेतकरी रब्बीच्या तयारीला लागले आहेत. शेतीकामाला मजूर मिळत नसल्याने जेसीबीचा वापर होत आहे. शेतजमीन नांगरून तसेच मिळेल त्या साधनाने पिके काढून गहू, हरभरा त्याचबरोबर पाण्याची...
सप्टेंबर 03, 2019
शेंदूरवादा, ता. 2 (जि.औरंगाबाद) : मृग नक्षत्राच्या सुरवातीनंतर पावसाने घेतलेल्या दीर्घ विश्रांतीने शेंदूरवादा (ता. गंगापूर) परिसरातील शेतकरी धास्तावला असून या परिसरावर पुन्हा एकदा दुष्काळाचे ढग दाटू लागले आहेत. चारही बाजूने पाण्याचे स्रोत उपलब्ध असताना केवळ राज्यकर्त्यांच्या इच्छाशक्तीच्या...
सप्टेंबर 02, 2019
सातारा : अतिवृष्टीकाळात निर्माण झालेल्या पूरपरिस्थितीमुळे जिल्ह्यातील कऱ्हाड, पाटण, सातारा, वाई, जावळी तालुक्‍यांना झळ बसली. त्यामुळे झालेल्या नुकसानीचे पंचनामे अखेरच्या टप्प्यात असून, आतापर्यंत 350 कोटींचे नुकसान झाल्याचे शासकीय आकडेवारीतून स्पष्ट झाले आहे. जिल्हा प्रशासनाने पूरस्थिती निर्माण...
मे 04, 2019
भडगाव ः दुष्काळ सध्या जणू पाहुणा म्हणून वर्षापासून मुक्कामाला आला आहे. तीन- चार वर्षांपासून तो घर सोडायला तयार नाही. त्यामुळे तालुक्यात शेतीचे गणित पुरते कोलमडून गेले आहे. हिरवाईने बहरणाऱ्या शेत शिवार उजाळ झाले आहे. जनावरांना चारा नाही, पाण्यासाठी वणवण भटकंती करावी लागत आहे. मजुरांच्या हातांना काम...
एप्रिल 13, 2019
पाचोरा तालुक्याला सहा नद्यांचा किनारा लाभला असून, तीन नद्यांवर मोठी धरणे आहेत. मात्र, तरीही तालुका तहानलेलाच असल्याने बागायती क्षेत्र दिवसागणिक कमी होत आहे, तर खरीप व रब्बी उत्पादनावरही विपरीत परिणाम होऊन बळीराजाचे बळ खचत आहे. ‘तापी’ अथवा इतर नद्यांचे पाणी या तालुक्यात वळवून नदी, नाले...
ऑक्टोबर 22, 2018
"दुष्काळात तेरावा महिना' ही म्हण जळगावकरांसाठीच तयार झालीय का, असा प्रश्‍न नेहमीच पडतो. एकतर अत्यल्प पावसाने शेतकरीवर्गासह साऱ्यांनाच चिंताग्रस्त केलंय, तर दुसरीकडे "ऑक्‍टोबर हीट'मध्ये भारनियमनाचे चटके तीव्र झाल्याने जगणं असह्य झालंय. वर्षभरात जळगावचा चेहरामोहरा बदलू, अशी साद घालत जळगाव...
जुलै 21, 2018
मोहोळ : तालुक्यात अत्यल्प पाऊस झाल्याने खरीप पिकांना पाणी कमी पडत असून, शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचे संकट आले आहे. तरी उजनी धरणातून शेतीसाठी सीना नदीद्वारे पाणी सोडावे, अन्यथा माजी आमदार राजन पाटील यांच्या नेतृत्वाखाली मोहोळ तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष तीव्र आंदोलन करणार असल्याचा...
जुलै 13, 2018
अकोला : राज्यात सर्वत्र जोरदार पाऊस पडत आहे. जिल्ह्यात सलग चार दिवसांपासून सुरू असलेल्या पावसाने विसावा घेतला असून खरीप पिकांची खोळंबलेली मशागत सुरू होणार आहे. मात्र, त्यासाठी किमान पाच ते सहा दिवसांची उघडीप असणे गरजेचे आहे. दरम्यान जिल्ह्यातील धरणाच्या जलसाठ्यात सहा टक्क्यांनी वाढ...
नोव्हेंबर 06, 2017
काले (ता. कऱ्हाड, जि. सातारा) : कऱ्हाडच्या दक्षिण भागात येवती व म्हासोली तलावातून येणारे पाणी लाभार्थी क्षेत्रासह लाभार्थी नसलेल्यांनाही मिळणार आहे. त्यामुळे भागातील अनेक पिढ्यांपासून पाण्याचा होणारा त्रास कायमचा संपणार आहे, अशी ग्वाही श्रमिक मुक्ती दलाचे अध्यक्ष डॉ. भारत पाटणकर यांनी येथे दिली....
ऑगस्ट 13, 2017
औरंगाबाद - यंदा सर्वत्र ‘फिल गुड’ असल्याचे हवामान विभागाचे अंदाज जाहीर होत असताना जूनमध्येच पावसाने जोरदार सलामी दिली. शेतकऱ्यांचा आनंद गगनात मावेनासा झाला. त्यांनी शेतं गाठली आणि मोठ्या उत्साहात पेरणी केली. पेरलेले चांगले उगवले. निंदणी, कोळपणीला जाऊ, असा विचार करणाऱ्या शेतकऱ्यांचा भ्रमनिरास झाला....
ऑगस्ट 03, 2017
पुणे जिल्ह्यात आंबेगाव तालुक्‍यात येणाऱ्या भराडी गावची लोकसंख्या आहे सुमारे दोन हजारांपर्यंत. गावात ३२६ कुटुंबे राहतात. घोडनदीच्या काठावर खरे तर गाव आहे. पण धरण उशाला व कोरड घशाला अशी गावची एकेकाळची अवस्था होती. दिवाळीनंतर येथील गावकऱ्यांना पाणीटंचाईच्या समस्येला तोंड द्यावे लागत होते. शेतीची...
जून 28, 2017
खेड - तालुक्‍यात पाणीटंचाईच्या काळात अतिशय महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या नातूवाडी व पिंपळवाडी धरण क्षेत्रात गतवर्षीच्या तुलनेत चांगला पाऊस होत आहे. तालुक्‍यात आतापर्यंत १२३४ मिलिमीटर पावसाची नोंद झाली असून, असाच पाऊस झाल्यास दोन्ही धरणे जुलैच्या शेवटच्या आठवड्यात पूर्ण क्षमतेने भरतील, अशी शक्‍यता...