एकूण 11 परिणाम
जानेवारी 01, 2020
वालसावंगी (ता.भोकरदन) - जालना जिल्ह्यात ठिकठिकाणी परतीच्या पावसानंतर यंदा दुष्काळाचा नूर पालटला. शेतीतून फारसे काही हाती आले नाही; पण किमान पुढील काळात पाणीप्रश्‍नापासून सुटका झाल्याचे समाधान आहे. सध्या अस्मानी संकटांचा सामना करीत शेतशिवारही बहरलेले आहेत. आगामी काळात गहू, ज्वारी, हरभऱ्याचे चांगले...
ऑगस्ट 31, 2019
कळस (पुणे) : खडकवासला कालव्याच्या पाण्यासाठी इंदापूर तालुक्‍यातील शेतकरी आक्रमक झाले असून, आठवडाभरात कालव्याला आवर्तन न दिल्यास मोठे आंदोलन करण्याच्या तयारीत शेतकरी आहेत. पाण्याचे राजकारण करून तालुक्‍यात पाणीटंचाई निर्माण केली आहे, असा आरोप भाजपच्या किसान मोर्चाचे जिल्हा कार्याध्यक्ष रमेश खारतोडे...
मे 04, 2019
भडगाव ः दुष्काळ सध्या जणू पाहुणा म्हणून वर्षापासून मुक्कामाला आला आहे. तीन- चार वर्षांपासून तो घर सोडायला तयार नाही. त्यामुळे तालुक्यात शेतीचे गणित पुरते कोलमडून गेले आहे. हिरवाईने बहरणाऱ्या शेत शिवार उजाळ झाले आहे. जनावरांना चारा नाही, पाण्यासाठी वणवण भटकंती करावी लागत आहे. मजुरांच्या हातांना काम...
सप्टेंबर 13, 2018
येवला: लाखो रुपये भांडवल गुंतवून अल्प पावसावरही घेतलेला खरीप हंगाम निम्याने संपल्यात जमा आहे. खरिपाच्या पिकांची अवस्था पाहता थोडाफार पाऊस पडला तरी उत्पन्नात 50 ते 60 टक्के घट होणार असून नाही पडला तर राखरांगोळी निच्छित आहे. त्यामुळे आता खरीपातून उत्पन्न नको पण गुंतवलेले भांडवल तरी...
ऑगस्ट 08, 2018
गंगापूर : पावसाळा सुरू होऊन अडीच महीने उलटले तरीही तालुक्यात दुष्काळाच्या झळा संपल्या असून ९२ गावांत ७८ टँकरने पाणी पुरवठा सुरू आहे. १४ गावांत ३२ विहिरी अधिगृहीत करण्यात आल्या आहेत. तालुक्यात अनेक भागात समाधानकारक पाऊस न पडल्याने पाणीटंचाई कायम आहे. त्यामुळे ऑगस्टमध्येही टँकरद्वारे पाणीपुरवठा सुरू...
मे 28, 2018
पुणे - जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी खरीप हंगामाची तयारी सुरू केली आहे. सध्या जिल्ह्यातील पश्‍चिम पट्यात भात रोपवाटिकांची तयारी, पूर्व पट्यात शेताच्या नांगरटी सुरू आहेत. यंदा भात, सोयाबीन आणि ऊस लागवडीवर भर देण्यात येणार असल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले. सध्या आर्थिक अडचणी भेडसावत आहेत....
फेब्रुवारी 26, 2018
परभणी जिल्ह्यातील शेवडी (ता. जिंतूर) या डोंगराळ भागात असलेल्या गावातील शेतकरी एकत्र आले. त्यांना शासकीय योजनांचे पाठबळ मिळाले. त्यातून गावचे शिवार जलसंधारणाच्या माथा ते पायथा कामांमुळे पाणीदार झाले. गावात नव्या पीकपद्धतीचा अंगीकार होत आहे. शेततळ्यातील संरक्षित पाण्याच्या काटेकोर वापरातून वर्षभरात...
नोव्हेंबर 27, 2017
सातारा जिल्ह्यातील पाटण हा डोंगराळ तालुका आहे. बहुतांशी भागांत उतारावरची शेती आहे. पाऊस मोठ्या प्रमाणात पडत असल्याने भात हे तालुक्याचे प्रमुख खरीप पीक आहेे. पाटणपासून सुमारे तीन किलोमीटरवर असलेले कातवडी हे सुमारे पंधराशे लोकसंख्या असलेले गाव. विहीर व शेततळ्यांच्या माध्यमातून अनेक...
ऑगस्ट 20, 2017
नागपूर - गेले अनेक दिवस गायब असलेल्या पावसाने जिल्ह्यात हजेरी लावली. शुक्रवारी झालेल्या जोरदार पावसाने संपूर्ण जिल्ह्यातील पिकांना नवसंजीवन दिले. खोळंबलेली धानरोवणी मार्गी लागली तर कशीबशी तग धरून असलेली पऱ्हाटी पावसामुळे टवटवीत झाल्याचे दृश्‍य पहावयास मिळत आहे.  कन्हान क्षेत्रात १२५.४ मिमी पाऊस...
ऑगस्ट 13, 2017
औरंगाबाद - यंदा सर्वत्र ‘फिल गुड’ असल्याचे हवामान विभागाचे अंदाज जाहीर होत असताना जूनमध्येच पावसाने जोरदार सलामी दिली. शेतकऱ्यांचा आनंद गगनात मावेनासा झाला. त्यांनी शेतं गाठली आणि मोठ्या उत्साहात पेरणी केली. पेरलेले चांगले उगवले. निंदणी, कोळपणीला जाऊ, असा विचार करणाऱ्या शेतकऱ्यांचा भ्रमनिरास झाला....
जून 28, 2017
खेड - तालुक्‍यात पाणीटंचाईच्या काळात अतिशय महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या नातूवाडी व पिंपळवाडी धरण क्षेत्रात गतवर्षीच्या तुलनेत चांगला पाऊस होत आहे. तालुक्‍यात आतापर्यंत १२३४ मिलिमीटर पावसाची नोंद झाली असून, असाच पाऊस झाल्यास दोन्ही धरणे जुलैच्या शेवटच्या आठवड्यात पूर्ण क्षमतेने भरतील, अशी शक्‍यता...