एकूण 108 परिणाम
ऑक्टोबर 19, 2019
वाशी ः तालुक्यात शुक्रवारी व शनिवारी पहाटेपर्यंत जोरदार पाऊस झाला. तालुक्यातील तिन्ही महसूल मंडळात अतिवृष्टी आहे. सकाळी आठपर्यंत संपलेल्या गेल्या 24 तासांत तालुक्यात सरासरी 78 मिलीमीटर पाऊस नोंदला गेला. खरीप हंगामाचे उत्पन्न शेतकऱ्यांच्या हातून गेल्यानतंर तालुक्यात परतीच्या पावसाने...
ऑक्टोबर 12, 2019
नायगाव येथे १५१ मिलिमीटरची नोंद पुणे - राज्यात परतीच्या पावसाने जोर धरला आहे. नांदेड जिल्ह्यात गुरुवारी (ता. १०) झालेल्या परतीच्या पावसामुळे काढणी सुरू असलेल्या सोयाबीन, तूर, वेचणीस आलेल्या कापसाचे मोठे नुकसान झाले.  पाऊस सुरू असल्यामुळे अनेक मंडळांमध्ये रब्बीची पेरणी लांबणीवर पडली आहे. नांदेड...
ऑक्टोबर 10, 2019
मनमाड : सध्या खरिपाची काढणी सुरू असल्याने शेतकऱ्यांनी रब्बी हंगामाची तयारी सुरू केली आहे. खरिपाची काढणी आणि रब्बीची लागण एकाच वेळी सुरू असल्याने शेतकरी शेतीकामात गुंतला आहे. त्यातच निवडणुकीचा हंगाम सुरू झाल्याने उमेदवारही कामाला लागले आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांच्या भेटीला उमेदवाराला थेट शेताच्या...
सप्टेंबर 30, 2019
पुणे - शेतकरी दुष्काळातून सावरण्याचा प्रयत्न करीत असताना खरीप हंगामात पावसाने उशिरा हजेरी लावली. त्यामुळे शेतकऱ्यांचे खरीप हंगामाचे नियोजन कोलमडले. उशिरा पाऊस झाला असला तरी हाती काहीतरी येईल म्हणून शेतकऱ्यांनी पिकांच्या पेरण्या व भातलागवडी केल्या. त्यानंतर पिकेही चांगली...
सप्टेंबर 26, 2019
नांदेड जिल्ह्यातील शेळगाव गौरी (ता. नायगाव) गावाने स्वच्छता आणि जल व्यवस्थापनाचा ‘पॅटर्न’ तयार केला आहे. लोकाभिमुख उपक्रम राबवत निर्मल, पर्यावरण संतुलित समृद्धग्राम, आदर्शगाव म्हणून राज्यात नावलौकिक प्राप्त केला आहे. शाश्वत उत्पन्नासाठी गावातील शेतकरी फळबाग, रेशीम शेतीकडे वळले आहेत....
सप्टेंबर 24, 2019
कऱ्हाड ः शेतकऱ्यांनी कर्ज काढून, उसनेपासने करून घेतलेली पिके महापुरात जमीनदोस्त झाली. त्यामुळे शेतकरी हवालदिल झाले. पुरातील पीक नुकसानीचे पंचनामे करण्याचे आदेश सरकारकडून देण्यात आले. त्यानुसार पंचनामे करण्यात आले. त्यानंतर लवकरच भरपाई मिळेल, अशी आशा शेतकऱ्यांना होती. मात्र, दीड महिने उलटूनही...
सप्टेंबर 19, 2019
अमरावती : विभागात खरिपातील पिकांची स्थिती गत दहा वर्षांच्या तुलनेत यंदा सर्वांत चांगली आहे. यवतमाळ व वाशीम जिल्ह्यांचा अपवादवगळता इतर जिल्ह्यांमध्ये जर आता सतत पाऊस पडला, तर तो पिकांसाठी धोकादायक ठरू शकतो. पावसाच्या पाण्याचा निचरा न होणाऱ्या जमिनीतील पिकांची पाने पिवळी पडण्याची शक्‍यता आहे. या...
ऑगस्ट 29, 2019
भूम (जि.उस्मानाबाद) : यंदाच्या पावसाळ्यात आत्तापर्यंत तालुक्‍यात केवळ 240 मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. अधूनमधून झालेल्या रिमझिम पावसाने शेतशिवार हिरवे झाले आहे; मात्र विहिरी, प्रकल्प कोरडे असल्याने दुष्काळाच्या झळा कायम आहेत. त्यामुळे हिरवळीत दुष्काळ लपल्याचे चित्र दिसून येत आहे. यंदा पावसाने...
ऑगस्ट 28, 2019
तळेगाव, ता. 27 (जि.औरंगाबाद) ः तळेगाव (ता.फुलंब्री) परिसरातील तळेगाव, रिधोरा, टाकळी धानोरा, निमखेडा, गेवराई, पिंपरी परिसरातील पिके पावसाअभावी सुकू लागली आहेत. गेल्या वर्षीच्या दुष्काळातून परिसरातील शेतकऱ्यांनी कसाबसा धीर धरून या वर्षीची खरीप पेरणी मोठ्या आशेने केली आहे. खरीप...
ऑगस्ट 25, 2019
लोहारा (जि.उस्मानाबाद) ः तब्बल पंधरा दिवसांच्या खंडानंतर शहरासह तालुक्‍यातील बहुतांश भागांत शनिवारी (ता. 24) सायंकाळी जोरदार पाऊस झाला. या पावसामुळे माना टाकलेल्या खरीप पिकांना जीवदान मिळाले आहे. गतवर्षीच्या दुष्काळामुळे सर्वसामान्यांचे अर्थचक्र कोलमडले आहे. चालू हंगामात उभारी येईल,...
ऑगस्ट 23, 2019
अतिवृष्टी, पुरामुळे नुकसान, खरिपाचा पेरा ९५ टक्क्यांवर पुणे - राज्यात अतिवृष्टी व पुरामुळे आत्तापर्यंत चार लाख हेक्टरवरील पिकांना तडाखा बसल्याची माहिती कृषी विभागाने दिली आहे. प्रामुख्याने यात ऊस, भुईमूग, कापूस, ज्वारी, मका, भात, सोयाबीन, तूर, मूग, उडीद, बाजरी, नागली आणि भाजीपालावर्गीय पिकांचा...
ऑगस्ट 21, 2019
सातारा - शासनाने पूरग्रस्त भागातील पीककर्ज माफ करण्याचा निर्णय घेतला आहे. जिल्ह्यातील कऱ्हाड आणि पाटण तालुक्‍याला पूरपरिस्थितीचा सर्वाधिक फटका बसलेला आहे. त्यामुळे शासनाच्या कर्जमाफी निर्णयाचा लाभ हा कऱ्हाड, पाटण तालुक्‍यांतील शेतकऱ्यांनाच मिळणार हे निश्‍चित. या दोन तालुक्‍यांतून पीककर्ज घेतलेले ३७...
ऑगस्ट 18, 2019
जेवळी (जि.उस्मानाबाद) ः गेल्या आठवड्यातील ढगाळ वातावरण अन्‌ भुरभुर पावसामुळे खरीप पिकावर किडीचा प्रादुर्भाव झाला आहे. शेतकरी महागड्या औषधांची फवारणी करीत असतानाही कीडरोग नियंत्रणात येत नसल्याने पिके हातातून जाण्याचा धोका आहे. अशा परिस्थितीतही कृषी विभागाकडून योग्य मार्गदर्शन मिळत...
ऑगस्ट 18, 2019
निलंगा (जि. लातूर) : तालुक्‍यातील यंदाची खरीप पेरणी काही भागांत वेळेवर तर काही भागांत तब्बल दीड महिना उशिरा झाल्याने पीक परिस्थितीत मोठी तफावत निर्माण झाली आहे. काही ठिकाणी सोयाबीन फुलोऱ्यात आले आहे, तर काही भागांत पिकांची उगवण होत आहे. त्याचा मोठा परिणाम रब्बी हंगामाच्या उत्पन्नावर...
ऑगस्ट 12, 2019
इस्लामपूर -  महापूराच्या प्रलयामुळे वाळवा तालुक्‍यातील साडेसात हजार हेक्‍टर शेतजमीन आणि शेकडो घरांचे नुकसान झाले आहे. घरांची मोठ्या प्रमाणात पडझड झाली असून, अनेक कुटुंबे रस्त्यावर आली आहेत. पूरग्रस्त लोक शासनाच्या मदतीच्या प्रतीक्षेत आहेत. जीवनदायिनी कृष्णा व वारणा नद्यांनी रुद्ररूप धारण केल्याने...
ऑगस्ट 06, 2019
सातारा : गेल्या आठवडाभरापासून सुरू असलेल्या मुसळधार पावसाने शेतात पाणी तुंबल्याने सोयाबीन, घेवड्यासह इतर कडधान्य पिके धोक्‍यात आली आहेत. सलग दोन दिवस अतिवृष्टीचा इशारा हवामान खात्याने दिल्यामुळे खरीप पिके हातून जाण्याची भीती व्यक्त होत आहे. सातारा, कऱ्हाड, वाई, कोरेगाव तालुक्‍यांतील...
जुलै 26, 2019
सोलापूर - महाराष्ट्रात यंदा मान्सून उशिराने दाखल झाला. प्रतीक्षेनंतर पडलेल्या पावसाच्या ओलीवर शेतकऱ्यांनी खरिपाच्या पेरण्या उरकल्या. राज्यात यंदाच्या हंगामात आतापर्यंत ७८ टक्के क्षेत्रावर खरिपाची पेरणी झाली आहे. मात्र, आता पावसाने दडी मारल्याने आता खरीप पिके धोक्‍यात आली आहेत....
जुलै 17, 2019
परभणी : कसा तरी पडणारा हलका पाऊसही आता गायब झाला आहे. मागील सहा दिवसापासून पावसाने उघडिप दिल्याने कोवळी पिके संकटात आली असून त्यामुळे दुबार पेरणीचे संकट घोंगावत आहे. जिल्ह्यातील तब्बल चार लाख 55 हजार 880 हेक्टरवरील पिके संकटात असून तेरा टक्के क्षेत्र अजुनही पडीक आहे.अजुनही दोन ते तीन दिवसात पाऊस...
जुलै 17, 2019
मराठवाडा, खानदेश, विदर्भात गंभीर स्थिती पुणे - कोकण आणि पश्चिम महाराष्ट्राचा काही भाग वगळता विदर्भ, मराठवाडा, खानदेशवर दुष्काळाचे सावट गडद झाले आहे. अत्यल्प पाऊस, असमान वितरण आणि खंडामुळे काही ठिकाणी झालेल्या पेरण्या वाया गेल्यात जमा आहेत. बऱ्याच ठिकाणी उगवण होऊन खुरटलेली पिके पाण्यासाठी आकाशाकडे...
जुलै 12, 2019
गडहिंग्लज -  केंद्र सरकारने शेतकऱ्यांसाठी पीक विमा योजना कार्यान्वित केली. जिल्ह्यात मात्र या योजनेचा फारसा लाभ शेतकऱ्यांना मिळाला नसल्याचे स्पष्ट  झाले आहे. पाच वर्षांत १२ हजार ३३ शेतकऱ्यांनी विविध पिकांसाठी ५३ लाख २७ हजारांचा विमा हप्ता भरला. परंतु, त्या बदल्यात केवळ ७१० शेतकऱ्यांना २७ लाख...