एकूण 13 परिणाम
ऑगस्ट 27, 2019
फुलंब्री, ता. 26 (जि.औरंगाबाद) : तालुक्‍यात चार-पाच वर्षांपासून शेतकऱ्यांसमोर संकटांची मालिका एकापाठोपाठ एक सुरूच आहे. कधी बोंडअळी, कधी दुष्काळ तर आता अमेरिकन लष्कर अळी अशा संकटांना तोंड देता देता शेतकरी अडचणीत सापडला आहे. त्यामुळे यंदा पिकांचे पंचनामे करून शेतकऱ्यांना तत्काळ नुकसान भरपाई द्यावी,...
जुलै 17, 2019
मराठवाडा, खानदेश, विदर्भात गंभीर स्थिती पुणे - कोकण आणि पश्चिम महाराष्ट्राचा काही भाग वगळता विदर्भ, मराठवाडा, खानदेशवर दुष्काळाचे सावट गडद झाले आहे. अत्यल्प पाऊस, असमान वितरण आणि खंडामुळे काही ठिकाणी झालेल्या पेरण्या वाया गेल्यात जमा आहेत. बऱ्याच ठिकाणी उगवण होऊन खुरटलेली पिके पाण्यासाठी आकाशाकडे...
जून 23, 2019
जलालखेडा (जि. नागपूर) : नरखेड तालुक्‍यातील शेतकऱ्यांची परिस्थिती अत्यंत हलाखीची आहे. शेतकरी आत्महत्यापर्यंत पाऊल उचलत आहे. अस्मानी संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांना सुलतानी दिलासाही मिळत नसल्यामुळे शेतकरी निराश झाला आहे. अशात तालुक्‍याला लागून असलेल्या मोर्शी वरुड मतदारसंघाचे आमदार राज्याचे कृषीमंत्री...
मे 17, 2019
जळगाव : यंदा दुष्काळाची भीषणता तीव्र असताना मॉन्सूनही लांबणार असल्याचा अंदाज वर्तविण्यात आल्याने शेतकरी चिंतेत आहे. तर दुसरीकडे जिल्ह्यात खरीप हंगामासाठी आत्तापर्यंत केवळ दहा हजार शेतकऱ्यांना अवघे तीन टक्केच कर्जवाटप झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. बॅंकांची कर्जवाटपाबाबतची...
जानेवारी 26, 2019
सोलापूर : दुष्काळ, गारपीट, अवकाळी अन्‌ गडगडलेले शेतमालांचे दर, बॅंकांचा कर्जवाटपात ठेंगा व सरकारी मदतीची प्रतीक्षा आणि डोक्‍यावरील सावकाराचे कर्ज या प्रमुख कारणांमुळे मागील पाच वर्षांत राज्यात तब्बल 14 हजार 74 शेतकऱ्यांनी जीवनयात्रा संपविली आहे. त्यामध्ये अमरावती विभाग अव्वल असून औरंगाबाद विभाग...
नोव्हेंबर 08, 2018
सोलापूर : राज्यातील 151 तालुक्‍यांमध्ये गंभीर व मध्यम स्वरूपाचा दुष्काळ जाहीर करण्यात आला आहे. त्या पार्श्‍वभूमीवर सहकारी बॅंकांसह राष्ट्रीयीकृत बॅंकांनी दुष्काळी तालुक्‍यांमधील थकबाकी वसुली थांबवावी, असा आदेश राज्य सरकारने काढल्याचे सूत्रांनी सांगितले. हा आदेश शेतकऱ्यांसाठी दिलासादायक असला तरी...
सप्टेंबर 26, 2018
औरंगाबाद : मराठवाड्यातील अनेक भागात भर पावसाळ्यात टँकरने पाणी पुरवठा केला जात असून पावसाअभावी पिके करपली आहेत. त्यामुळे खरीपाची सर्वच पिके हातची गेली असल्याने मराठवाड्यात तातडीने मंत्रीमंडळाची बैठक बोलावून तत्काळ दुष्काळ जाहीर करण्यात यावा, अशी मागणी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते तथा माजी...
ऑगस्ट 29, 2018
येवला : शेतकरी दुष्काळ,पावसाभावी खरीपाचे नुकसान,कर्जमाफीचा लाभापासून वंचित राहण्याचे दुख सहन करत आहेत. अशात जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने शेतकरी कर्जवसुलीसाठी सक्तीची मोहीम हाती घेऊन शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ चोळण्याचे काम चालू केले आहे. ही वसुली न थांबल्यास जिल्हाभर आंदोलन केले जाईल असा इशारा...
जून 13, 2018
अकोला : खरिपाच्या तोंडावर पीकविम्याची रक्कम बँकांनी शेतकऱ्यांच्या कर्ज खात्यात परस्पर जमा केली. शासनाच्या आदेशानंतरही परस्पर रक्कम वळविल्याने दुष्काळाच्या झळा बसलेल्या शेतकऱ्यांचे आर्थिक गणित कोलमडले. ही बाब राज्य सरकारच्या लक्षात आणून दिल्यानंतर मंत्र्यांनी मंगळवारी मुंबईत तातडीने बैठक घेवून...
सप्टेंबर 06, 2017
सोयाबीनला पोखरले कीड- रोगाने खोडमाशी, उंटअळी, चक्रीभुंगा, तंबाखू पाने खाणारी अळी अशा अनेक प्रकारच्या किडींनी जिल्ह्यातील सोयाबीन पोखरला आहे. २००९-१० मध्येदेखील तंबाखूची पाने खाणाऱ्या अळीचा प्रादुर्भाव जिल्ह्यात सर्वदूर झाला होता. लष्करी अळी ही धान (भात) पिकावर येते. परंतु लष्करी अळीचा प्रादुर्भाव...
ऑगस्ट 13, 2017
औरंगाबाद - यंदा सर्वत्र ‘फिल गुड’ असल्याचे हवामान विभागाचे अंदाज जाहीर होत असताना जूनमध्येच पावसाने जोरदार सलामी दिली. शेतकऱ्यांचा आनंद गगनात मावेनासा झाला. त्यांनी शेतं गाठली आणि मोठ्या उत्साहात पेरणी केली. पेरलेले चांगले उगवले. निंदणी, कोळपणीला जाऊ, असा विचार करणाऱ्या शेतकऱ्यांचा भ्रमनिरास झाला....
जून 15, 2017
बीड - सरकारने कर्जमाफी करण्याची घोषणा आणि निर्यण घेतला असला तरी त्यामध्ये ‘तत्त्वत:’ आणि ‘निकषांअधारे’ हे दोन शब्द घुसडले आहेत. त्यामुळे कुठलीच स्पष्टता नसली तरी यामधील अल्पभूधारक, मध्यम भूधारक व सरसकट या शब्दांमुळे जिल्ह्यातील सव्वादोन लाख शेतकऱ्यांच्या पदरात एक हजार कोटी रुपयांची माफी पडेल, असा...
जून 13, 2017
बीड - सरकारने कर्जमाफी करण्याची घोषणा आणि निर्णय घेतला असला तरी त्यामध्ये तत्वत: आणि निकषांआधारे हे दोन शब्द घातले आहेत. या शब्दांबद्दल कोणतीही स्पष्टता नाही. या पार्श्‍वभूमीवर जाणकारांच्या मते बीड जिल्ह्यातील अल्पभूधारक, मध्यमभूधारक व सरसकट या शब्दांमुळे जिल्ह्यातील सव्वा दोन लाख शेतकऱ्यांच्या...