एकूण 18 परिणाम
जुलै 15, 2019
औरंगाबाद - अपुरे पर्जन्यमान, रानात ओल नाही. पेरण्या खोळंबलेल्या, पीककर्ज मिळेना. त्यामुळे खासगी सावकारांचे दार ठोठवावे लागलेय, दुसरीकडे सरकारच्या धोरणांची अंमलबजावणी नाही या गर्तेत अडकलेल्या शेतकऱ्यांना आता पीकविम्याचाही आधार मिळत नाही. दरम्यान, जेही पेरले त्या पिकांनी भरपावसाळ्यात माना टाकल्या...
जून 02, 2019
हिंगोली - नागपंचमीपासून पाऊस गायब झाला त्यो आलाच नाही. येलदरी धरण कितीतरी वर्षांपासून भरलं नाही. चारा विकत घेऊन आजवर जनावरं सांभाळली. आता चारा बी नाय अन् पैसे बी नाईत. यंदा पाऊस लवकर आला तर ठीक, नाहीतर चाऱ्यापायी उरली सुरली जनावरेदेखील विकून टाकावी लागतील. पेरणीसाठी पीककर्ज वेळेवर दिले तर बरं, नाही...
मे 07, 2019
बेळगाव - दरवर्षी उन्हाळयात पाण्याची गरज भासल्यानंतर महाराष्ट्र सरकार कर्नाटकाला पाणी सोडते. त्यामोबदल्यात पैसे दिले जातात. पहिल्यांदा पाण्याच्या मोबदल्यात पाण्याची मागणी महाराष्ट्र सरकारने केली आहे. शिवाय कायस्वरुपाची करार करण्याचा प्रस्ताव आहे. यावर निर्णय घेण्यासाठी तांत्रिक समिती स्थापण्याचा...
मे 06, 2019
औरंगाबाद : पिण्यासाठी पाणी, जनावरांना चारा आणि हाताला काम द्या, या मागणीसाठी अन्नदाता शेतकरी संघटनेच्या नेतृत्वाखाली सोमवारी (ता. 6) हंडा मोर्चाने सर्वांचे लक्ष वेधले. सरकारने चाऱ्याच्या रेल्वे तयार ठेवल्या असल्याची विधीमंडळात पशुसंवर्धन मंत्री महादेव जानकर यांनी घोषणा केली होती, मग या रेल्वे कुठे...
मे 04, 2019
भडगाव ः दुष्काळ सध्या जणू पाहुणा म्हणून वर्षापासून मुक्कामाला आला आहे. तीन- चार वर्षांपासून तो घर सोडायला तयार नाही. त्यामुळे तालुक्यात शेतीचे गणित पुरते कोलमडून गेले आहे. हिरवाईने बहरणाऱ्या शेत शिवार उजाळ झाले आहे. जनावरांना चारा नाही, पाण्यासाठी वणवण भटकंती करावी लागत आहे. मजुरांच्या हातांना काम...
डिसेंबर 24, 2018
सद्यःस्थितीत राज्यात १ हजार २६२ टॅंकर सुरू सोलापूर - यंदा पावसाअभावी खरीप आणि आता रब्बीचा हंगाम पूर्णपणे वाया गेला असून पिण्याच्या पाण्याची टंचाई दिवसेंदिवस गंभीर होत आहे. २० डिसेंबरपर्यंत राज्यातील अकराशे गावांमध्ये आणि दोन हजार ३२९ वाड्या-वस्त्यांवर एक हजार २६२ टॅंकरद्वारे पाणीपुरवठा...
नोव्हेंबर 12, 2018
बीड : राज्यात सरासरीच्या 70 टक्के पाऊस पडला असून बीड जिल्ह्यातील पावसाचे प्रमाण केवळ 50 टक्के आहे. मराठवाड्यात सर्वाधिक दुष्काळी परिस्थिती असलेल्या जिल्ह्यात बीड आहे. मात्र, दुष्काळावर मात करण्यासाठी सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी पूर्ण ताकदीने उभे असल्याची ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली...
ऑक्टोबर 25, 2018
परभणी - मिरगाला पाणी पडला तव्हा नदीला रटाऊन पूर आला व्हता. तव्हा ज्यांनी पेरलं त्यांचं साधलं; पण आम्ही पंधरा दिसांनी पेरलं ते नीट उगवलं नाही. यंदा कापूस, सोयाबीन, हाब्रिट समंदच वाळून गेलंय. कायीच आमदानी झाली नाही. गेलसाली बरं व्हतं संक्रांती पस्तोर कापूस, तूर सुरु होती, पण औंदा दिवाळीच्या आधीच...
ऑक्टोबर 12, 2018
मुंबई - राज्यातील 201 तालुक्‍यांतील संभाव्य दुष्काळाचा मुकाबला करण्यासाठी केंद्र सरकारकडून मदत मिळावी म्हणून राज्य सरकारने वेगाने हालचाली सुरू केल्या आहेत. खरीप पिकांच्या स्थितीवर केंद्राची मदत अवलंबून असल्याने पुढील आठ ते दहा दिवसांत पीक परिस्थितीची माहिती सादर करण्याचे आदेश...
ऑक्टोबर 08, 2018
नवी दिल्ली/मुंबई - पावसाने दडी मारल्याने अवघे शिवार करपले, खरीप हंगाम तर हातचा गेलाच, पण रब्बीचेही काही खरे नाही. ऐन हिवाळ्यामध्ये राज्याच्या घशाला कोरड पडली असताना मायबाप सरकार मात्र दुष्काळ जाहीर करायला तयार नाही. अवघ्या शिवाराला दुष्काळामुळे भयाण स्मशानकळा आल्याने बळिराजा हवालदिल...
ऑक्टोबर 02, 2018
येवला - पावसाळ्याची चार महिने आजच संपली...तसा खरीपाचा हंगामाही सरतीवर आहे.चार दिवसांनी रब्बीचा हंगाम सुरू होईल पण जिल्ह्यात आजही जणू काय पावसाळा सुरू नसल्याचे चित्र आहे. आतापर्यंत जिल्ह्यात केवळ ८७ टक्के इतकाच पाऊस पडला असून पेठ व सुरगाणा या दुष्काळाच्या माहेरघरीच फक्त सरासरीची शंभरी गाठली आहे....
सप्टेंबर 10, 2018
टाकळी ढोकेश्वर - भूमिपुत्र शेतकरी संघटनेची पारनेर तालुक्याची बैठक संघटनेचे अध्यक्ष संतोष वाडेकर यांच्या उपस्थितीत टाकळी ढोकेश्वर (ता.पारनेर) येथे पार पडली यावेळी तालुक्याच्या हक्काच पाणी मिळण्यासाठी व्यापक लढा उभारण्याचा निर्णय घेण्यात आला. यावेळी वाडेकर म्हणाले, तालुक्याच्या चारही बाजुने पाणी असुन...
जुलै 31, 2018
कोल्हापूर - गेल्या पंधरवड्यात झालेल्या पावसामुळे जिल्ह्यातील नदीकाठावरील सुमारे वीस हजार हेक्‍टर क्षेत्रावरील पिके पाण्याखाली गेली होती. पाणी चार ते पाच दिवस शिवारात राहिल्याने आडसाली ऊस, भात, सोयाबीनचे मोठे नुकसान झाल्याची शक्‍यता व्यक्त होत आहे. अद्याप नेमके किती नुकसान झाले आहे. याचा आकडा सामोरा...
सप्टेंबर 08, 2017
सोनगीर (जिल्हा धुळे)  - पावसाळा संपण्याच्या मार्गावर आहे तरी येथे व परिसरात अद्याप एकही जोरदार पाऊस न झाल्याने शेतकरीवर्गासह सर्वच हवालदिल झाले आहेत. गेल्या दोन महिन्यांपासून दोनदाच हलका पाऊस झाला. गेल्सरी देखील नाहीत. भयावह दुष्काळ असूनही जाहीर केले जात नाही. पिक विमा काढला असूनही कंपनीतर्फे पीक...
ऑगस्ट 24, 2017
हिंगोली जिल्ह्यातील स्थिती - '...तर गावं भिकेला लागलीच समजा' यंदा सोयाबीनची पेरणी करत असतानाच तिफणीमाग धुराळा उडत होता. त्यानंतर दोन महिने पावसाचा पत्ता नव्हता. खांदेमळणीच्या आदल्या दिवशी वेळ चूकवून आलेला पाऊस दोन-तीन दिवस झाला. त्यामुळं मरगळेल सोयाबीन वरवर हिरव झाल्याचं दिसतयं; पण मुळ्या वाळून...
ऑगस्ट 13, 2017
सोनगीर जि. धुळे : पावसाळा अर्धा संपला तरी येथे व परिसरात अद्याप एकही मोठा पाऊस न झाल्याने शेतकरीवर्गासह सर्वच हवालदिल झाले आहेत. 32 दिवसापासून हलक्या सरी देखील नाहीत. चार पाच दिवसांत पाऊस न झाल्यास 1972 सारखा भयावह दुष्काळाची पुनरावृत्ती होण्याची शक्यता नाकारता येत नाही. आज कृषी विभागाने सोनगीर...
ऑगस्ट 13, 2017
औरंगाबाद - यंदा सर्वत्र ‘फिल गुड’ असल्याचे हवामान विभागाचे अंदाज जाहीर होत असताना जूनमध्येच पावसाने जोरदार सलामी दिली. शेतकऱ्यांचा आनंद गगनात मावेनासा झाला. त्यांनी शेतं गाठली आणि मोठ्या उत्साहात पेरणी केली. पेरलेले चांगले उगवले. निंदणी, कोळपणीला जाऊ, असा विचार करणाऱ्या शेतकऱ्यांचा भ्रमनिरास झाला....
ऑगस्ट 10, 2017
बीड - गेल्या महिनाभरापासून पावसाने दडी मारल्याने शेतकरी चिंतेत असून खरीप पिके पाण्याअभावी सुकू लागलेली आहेत. त्यामुळे माजलगाव धरण क्षेत्रातील शेतकऱ्यांसाठी धरणातून गुरुवारी (ता.10) उजव्या कालव्यात 20 दलघमी पाणी सोडण्यात येणार आहे. यामुळे कालवा क्षेत्रातील शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे...