एकूण 38 परिणाम
नोव्हेंबर 07, 2019
भूम (जि. उस्मानाबाद) : भरपावसाळ्यात दडी मारलेल्या पावसाने अंतिम टप्प्यात दमदार हजेरी लावली. परतीच्या पावसामुळे तालुक्‍यातील पाणीप्रश्‍न सुटल्याने दुष्काळाची दाहकता काहीशी कमी झाली आहे. मात्र खरीप हंगामातील सोयाबीन, मका, कापूस या पिकांबरोबरच फळबागांचेही मोठे नुकसान झाले. तसेच रब्बी...
सप्टेंबर 26, 2019
बीड  : मागच्या वर्षीचा तीव्र दुष्काळ आणि यंदाच्या हंगामातही अनेक दिवस उघडीप दिलेल्या पावसाने तीन दिवसांपासून जिल्ह्यात हजेरी लावली आहे. पावसाळ्याच्या शेवटच्या टप्प्यात आता कुठे पावसाची निम्मी सरासरी ओलांडली आहे. बुधवारी (ता. 25) सलग तिसऱ्या दिवशीही पावसाने हजेरी लावली. माजलगाव, धारुर, शिरूर कसार,...
सप्टेंबर 04, 2019
बदनापूर (जि.जालना) -  तालुक्‍यात यंदा पुन्हा अत्यल्प पर्जन्यमान झाल्याने जमिनीतील पाणीपातळीत अजिबात वाढ झालेली नाही. तालुक्‍यातील सर्वच सिंचन प्रकल्प कोरडेठाक पडले आहेत. विहिरींनीही तळ गाठला आहे. बहुतांश गावांत अगदी उन्हाळ्यासारखी टंचाई कायम आहे. सध्या तालुक्‍यातील 33 गावे व 10 वाडी-तांड्यांसाठी 38...
ऑगस्ट 29, 2019
भूम (जि.उस्मानाबाद) : यंदाच्या पावसाळ्यात आत्तापर्यंत तालुक्‍यात केवळ 240 मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. अधूनमधून झालेल्या रिमझिम पावसाने शेतशिवार हिरवे झाले आहे; मात्र विहिरी, प्रकल्प कोरडे असल्याने दुष्काळाच्या झळा कायम आहेत. त्यामुळे हिरवळीत दुष्काळ लपल्याचे चित्र दिसून येत आहे. यंदा पावसाने...
ऑगस्ट 20, 2019
उमरगा (जि. उस्मानाबाद) : यंदा पावसाळ्यातील तीन महिने लोटले तरी अद्याप समाधानकारक पाऊस झाला नाही. दमदार पावसाअभावी नदी, नाले वाहिले नसून, खरीप पिके धोक्‍यात सापडली आहेत. तर, पिण्याच्या पाण्यासह जनावरांच्या चारा-पाण्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. अखेरच्या टप्प्यात परतीचा पाऊस सर्वदूर...
जुलै 15, 2019
औरंगाबाद - अपुरे पर्जन्यमान, रानात ओल नाही. पेरण्या खोळंबलेल्या, पीककर्ज मिळेना. त्यामुळे खासगी सावकारांचे दार ठोठवावे लागलेय, दुसरीकडे सरकारच्या धोरणांची अंमलबजावणी नाही या गर्तेत अडकलेल्या शेतकऱ्यांना आता पीकविम्याचाही आधार मिळत नाही. दरम्यान, जेही पेरले त्या पिकांनी भरपावसाळ्यात माना टाकल्या...
मे 29, 2019
लातूर : शेतकऱ्यांची कर्जमाफी हा दुष्काळ हटविण्यासाठीचा अंतिम उपाय नव्हे. ती तात्पुरती मलपट्टी आहे; पण सध्याच्या काळात ती गरजेचीच आहे. दुष्काळ हा पॅकेजच्या किंवा पैशाच्या जोरावर हटणार नाही. त्यामुळे सर्वांनी मिळून दीर्घकालीन योजना करायला हव्यात. नुसत्याच ‘पाणी अडवा-पाणी जिरवा’ किंवा गुत्तेदारांच्या...
मे 28, 2019
मुंबई - राज्यातील दुष्काळाबाबत दाखल झालेल्या जनहित याचिकांवर तातडीने सुनावणी घेण्यास उच्च न्यायालयाने सोमवारी नकार दिला. या याचिकेवर उन्हाळी सुटीनंतर नियमित न्यायालयात सुनावणी होईल. सरकारने सुमारे 400 तालुके-महसूल मंडळांत दुष्काळ जाहीर केला आहे. दुष्काळी परिस्थितीमुळे विदर्भ आणि मराठवाड्यासह...
मे 07, 2019
जिल्ह्याच्या विकासाचे प्रश्‍न सोडविण्यासाठी मंत्र्याकडे जिल्ह्याचे पालकत्व दिले जाते. त्या-त्या जिल्ह्यातील मंत्र्याकडे ते सोपविले जाते. परंतु, त्या जिल्ह्यातील मंत्री नसेल तर अन्य जिल्ह्यातील मंत्र्याला जबाबदारी दिली जाते. जळगावच्या बाबतीत मात्र शासकीय नव्हे तर सत्ताधारी भाजपच्या सुविधेसाठी...
मे 06, 2019
औरंगाबाद : पिण्यासाठी पाणी, जनावरांना चारा आणि हाताला काम द्या, या मागणीसाठी अन्नदाता शेतकरी संघटनेच्या नेतृत्वाखाली सोमवारी (ता. 6) हंडा मोर्चाने सर्वांचे लक्ष वेधले. सरकारने चाऱ्याच्या रेल्वे तयार ठेवल्या असल्याची विधीमंडळात पशुसंवर्धन मंत्री महादेव जानकर यांनी घोषणा केली होती, मग या रेल्वे कुठे...
मे 04, 2019
भडगाव ः दुष्काळ सध्या जणू पाहुणा म्हणून वर्षापासून मुक्कामाला आला आहे. तीन- चार वर्षांपासून तो घर सोडायला तयार नाही. त्यामुळे तालुक्यात शेतीचे गणित पुरते कोलमडून गेले आहे. हिरवाईने बहरणाऱ्या शेत शिवार उजाळ झाले आहे. जनावरांना चारा नाही, पाण्यासाठी वणवण भटकंती करावी लागत आहे. मजुरांच्या हातांना काम...
फेब्रुवारी 23, 2019
जळगाव ः राज्यातील खरीप हंगाम 2018 मध्ये दुष्काळ जाहीर करण्यात आलेल्या राज्यातील 151 तालुक्‍यांमधील पीक नुकसानीसाठी बाधित शेतकऱ्यांच्या मदतीसाठी आकस्मिक निधीतून दोन हजार कोटी रुपये वितरित करण्यात आले असल्याची माहिती मदत व पुनर्वसन मंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिली.  केंद्र शासनाच्या...
जानेवारी 23, 2019
ब्रह्मपुरी (सोलापूर) : मंगलवेढा तालुक्यातील दुष्काळीजन्य भागातील परिस्थितीत पाणी आणि चाराटंचाईच्या स्थितीत बागा जगवायच्या कशा व जनावरला काय घालायचे. शेतकरी चिंतेत असून जनावरे विकण्याशिवाय शेतकऱ्यांसमोर पर्याय उरला नाही; मात्र बाजारातही जनावरांना कवडीमोल भाव असल्याने, कमी दरात जनावरे विकण्याची वेळ...
जानेवारी 10, 2019
मरवडे (सोलापूर) - मंगळवेढा तालुक्यातील अनेक गावात दुष्काळी परस्थिती निर्माण झाली आहे. ३५ गावांच्या पाणीप्रश्नांने तर सर्वसामान्य जनतेबरोबर साऱ्या पुढाऱ्यांच्याही डोळ्यात पाणी आणले. अनेक वर्षे सरली दुष्काळ कमी झाला नाही मात्र दुष्काळी गावांची संख्या मात्र वाढली. ३५ गावांचा प्रश्न आज ४५ गावांचा होऊन...
जानेवारी 05, 2019
जातेगाव : भाजीपाल्याचे अधिक उत्पादन घेण्यात येणाऱ्या भेंडटाकळी शिवारात यंदा हिवाळ्यात पिण्याचे पाणी गायब झाले असून, शेतशिवारांना वाळवंटारखे भयाण रूप प्राप्त झाले आहे. खरीप हंगामात केलेल्या खर्चाइतपत उत्पन्न मिळाले नाही. उन्हाळी परिस्थिती निर्माण झाल्याने गावातील युवक आणि शेतमजुरांनी...
डिसेंबर 24, 2018
सद्यःस्थितीत राज्यात १ हजार २६२ टॅंकर सुरू सोलापूर - यंदा पावसाअभावी खरीप आणि आता रब्बीचा हंगाम पूर्णपणे वाया गेला असून पिण्याच्या पाण्याची टंचाई दिवसेंदिवस गंभीर होत आहे. २० डिसेंबरपर्यंत राज्यातील अकराशे गावांमध्ये आणि दोन हजार ३२९ वाड्या-वस्त्यांवर एक हजार २६२ टॅंकरद्वारे पाणीपुरवठा...
नोव्हेंबर 22, 2018
मालेगाव(नाशिक) : निमगाव, सोनज, सौंदाणे जिल्हा परिषद गटात पाऊसच झाला नाही. गेली तीन वर्षे दुष्काळाची तीव्रता गडद झाल्याने शेतकरी, कामगार संकटात सापडला आहे. खरीप-रब्बीचा प्रश्‍नच नाही. पाटावर ठेवायला दाणा नाही. आर्थिक चणचण असतांना पिण्याचे पाणी विकत घ्यावे लागत आहे. पशुधन जगवावे कसे असा...
ऑक्टोबर 25, 2018
येवला - शेतात पिके उभी करपली, जनावरांना चारा-पाणी नाही, २३ गावे, १९ वाड्यांना तब्बल १५ टँकरद्वारे भर पावसाळ्यात देखील पाणीपुरवठा सुरु आहे..अशी दाहकता असतांना अजून किती गंभीर परिस्थिती असायला पाहिजे.. असा सवाल करून आठ दिवसात पिक कापणी करून शासनाने तालुका दुष्काळग्रस्त जाहीर करावा. अन्यथा...
ऑक्टोबर 24, 2018
मंगळवेढा - दुष्काळी परिस्थितीत तालुक्यातील शेतकऱ्याला मदत करण्यासाठी शासनाचे प्रयत्न असून, दुष्काळी जनतेच्या पाठीशी शासन खंबीरपणे उभे राहणार असल्याची ग्वाही पालकमंत्री विजयकुमार देशमुख यांनी दिली. ते दुष्काळी परिस्थितीची पाहणी करण्यासाठी मंगळवेढा दौऱ्यावर आले असता बोलत होते.  त्यावेळी...
ऑक्टोबर 23, 2018
मुंबई : राज्य सरकारकडून दुष्काळसदृश परिस्थितीची घोषणा करण्यात आली आहे. 180 तालुक्यांमध्ये दुष्काळसदृश परिस्थितीची घोषणा करण्यात आली आहे. सरकार आता यानुसार उपाययोजना करणार असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले आहे. दुष्काळसदृश परिस्थितीशी सामना करण्यासाठी एकूण आठ उपाययोजना राबविण्यात...