एकूण 16 परिणाम
नोव्हेंबर 11, 2019
अकोला : तब्बल तीन महिने पावसाने घातलेल्या थैमानात पीक उत्पादनासोबतच गुणवत्तेलाही मोठा फटका बसला आहे. अतिवृष्टी आणि अवकाळी पावसामुळे जवळपास 70 ते 80 टक्के सोयाबीन उद्‍ध्वस्त झाले आहे तर, हाती आलेले पीक सुद्धा डागाळलेले असून, कापसाचे उत्पादन आणि धाग्याची लांबी सुद्धा घटण्याची शक्यता आहे. दुष्काळ,...
नोव्हेंबर 04, 2019
शिरूर कासार (जि. बीड) - शिरूर कासार तालुक्‍यात दोन वर्षांपूर्वी दुष्काळ परिस्थितीने शेतकरी होरपळून निघाले होते; पण यंदा खरीप हंगामात रिमझिम पडणारा पाऊस रब्बीत धो धो बरसत असल्याने 51 हजार हेक्‍टर क्षेत्रातील पिके उद्‌ध्वस्त झाली आहेत. पिके पाण्यात सडत पडल्याने शेतकऱ्यांचे शंभर टक्के...
सप्टेंबर 30, 2019
बीड - पीकविम्यापासून वंचित आणि अनेक दिवसांपासून खेटे मारून त्रस्त असलेल्या शेतकऱ्यांच्या जिव्हाळ्याच्या प्रश्‍नाला "सकाळ'ने वाचा फोडली. त्यामुळे सुरवातीला 346 कोटी रुपये असलेला पीकविमा मंजुरीचा आकडा हळूहळू वाढत आता तब्बल एक हजार 142 कोटी रुपयांवर पोचला आहे. दुष्काळग्रस्त जिल्ह्यातील 12 लाख आठ हजार...
ऑगस्ट 29, 2019
भूम (जि.उस्मानाबाद) : यंदाच्या पावसाळ्यात आत्तापर्यंत तालुक्‍यात केवळ 240 मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. अधूनमधून झालेल्या रिमझिम पावसाने शेतशिवार हिरवे झाले आहे; मात्र विहिरी, प्रकल्प कोरडे असल्याने दुष्काळाच्या झळा कायम आहेत. त्यामुळे हिरवळीत दुष्काळ लपल्याचे चित्र दिसून येत आहे. यंदा पावसाने...
ऑगस्ट 23, 2019
अतिवृष्टी, पुरामुळे नुकसान, खरिपाचा पेरा ९५ टक्क्यांवर पुणे - राज्यात अतिवृष्टी व पुरामुळे आत्तापर्यंत चार लाख हेक्टरवरील पिकांना तडाखा बसल्याची माहिती कृषी विभागाने दिली आहे. प्रामुख्याने यात ऊस, भुईमूग, कापूस, ज्वारी, मका, भात, सोयाबीन, तूर, मूग, उडीद, बाजरी, नागली आणि भाजीपालावर्गीय पिकांचा...
जुलै 17, 2019
मराठवाडा, खानदेश, विदर्भात गंभीर स्थिती पुणे - कोकण आणि पश्चिम महाराष्ट्राचा काही भाग वगळता विदर्भ, मराठवाडा, खानदेशवर दुष्काळाचे सावट गडद झाले आहे. अत्यल्प पाऊस, असमान वितरण आणि खंडामुळे काही ठिकाणी झालेल्या पेरण्या वाया गेल्यात जमा आहेत. बऱ्याच ठिकाणी उगवण होऊन खुरटलेली पिके पाण्यासाठी आकाशाकडे...
जानेवारी 06, 2019
माजलगाव - निसर्गाची अवकृपा झाल्याने दुष्काळाच्या झळा दिवसेंदिवस वाढत चालल्या आहेत. पावसाअभावी रब्बीची पेरणीच झाली नसल्याने गहू, ज्वारी, बाजरीच्या किमतींत दुपटीने वाढ झाली आहे. यामुळे अगोदरच दुष्काळाचे चटके सोसणाऱ्या शेतकऱ्यांसह गोरगरीब मजुरांची भाकरीही महागल्याने आता जगायचं कसं, असा प्रश्न...
जानेवारी 05, 2019
जातेगाव : भाजीपाल्याचे अधिक उत्पादन घेण्यात येणाऱ्या भेंडटाकळी शिवारात यंदा हिवाळ्यात पिण्याचे पाणी गायब झाले असून, शेतशिवारांना वाळवंटारखे भयाण रूप प्राप्त झाले आहे. खरीप हंगामात केलेल्या खर्चाइतपत उत्पन्न मिळाले नाही. उन्हाळी परिस्थिती निर्माण झाल्याने गावातील युवक आणि शेतमजुरांनी...
ऑक्टोबर 26, 2018
नांदेड - यंदा चांगला पाऊस होईल असं टीव्हीवर सांगितलं जात होतं. तव्हा बरं वाटलं होतं. पण हवामान खात्यानं सांगितलेला अंदाज उलटा ठरला. आमच्या भागात गेल्या चार वरसारखीच यंदाबी परिस्थिती झाली आहे. यंदा तर दुबार पेरणी करावी लागली. पण पाऊस न आल्यामुळे काहीच हाती लागलं नाही. मागचंच वरीस बरं होत असं म्हणावं...
ऑक्टोबर 04, 2018
परंडा : दुष्काळ उंबरठ्यावर आलेला असताना शेतकऱ्यांसाठी शासनाचे हमी भाव केंद्र आधार वाटत आहे. मात्र हमी भाव केंद्रासाठी शासनाच्या नियम अटीची पूर्तता करणारी सक्षम संस्था सध्या तरी नसल्याने परंडा तालुक्यातील शेतकऱ्यांवर हमी भावाने नव्हे तर मिळेल त्या भावाने शेतमाल विकण्याची वेळ येणार आहे.  पावसाने दगा...
सप्टेंबर 22, 2018
येवला - कपाशीच्या झाडाला चाळीसच्या ठिकाणी चारच बोंड, मकाला एक-दोन बीट लागले पण त्यात दाणेच नाही. मूग, सोयाबीन, भुईमुगाचा केव्हाच पालापाचोळा झालाय तर कांद्याची पाऊस पडेल या आशेने लागवड केली पण पाण्याअभावी लागवड झालेले रोपे करपून माती होत आहे..यामुळे येवल्यातील शेतकऱ्यांना यंदा खरीपातून सुमारे ७०...
सप्टेंबर 01, 2017
यंदाच्या खरिपाला अगदी पेरणीपासून नाट लागली. जूनच्या दुसऱ्या आठवड्यात पाऊस आला त्यावर पेरणी केली. नंतर पावसाने २० ते २३ दिवस ओढ दिली. त्यात ज्वारी, कापूस, सोयाबीन उगवलाच नाही. दुबार पेरणी केली. त्यावरही पाणी फिरले. तिबार पेरणी केली. पण उशीर झाल्याने पिकं चांगली नाहीत. उडीद, मूग तर पुरती हातून गेली,...
ऑगस्ट 31, 2017
जिल्ह्यातील पीकपरिस्थितीचा अाढावा घेतला असता जिल्हाभर सर्वत्र पीकपरिस्थिती समाधानकारक नसल्याची वस्तुस्थिती समोर अाली. जिल्ह्याचे अर्थकारण हे खरीप हंगामावर व त्यातही या हंगामातील सोयाबीन अाणि कापूस या प्रमुख पिकावर अवलंबून असते. शेतकऱ्यांना नेमका याच पिकांनी मागील तीन हंगामांत दगा दिला...
ऑगस्ट 27, 2017
सोलापूर जिल्ह्यावर यंदाही दुष्काळाचे संकट ओढावले आहे. जून महिन्यात झालेल्या पावसानंतर तब्बल अडीच महिन्यांपासून विश्रांती घेतली. गेल्या आठवड्यात पावसाने पुन्हा सुरवात केली; पण अवघ्या एकाच रात्रीत तो पुन्हा गायब झाला. आता तर रोज नुसतेच ढगाळ वातावरण असते. अधून-मधून पाऊस पडतो, पण त्यात जोर नाही....
ऑगस्ट 24, 2017
हिंगोली जिल्ह्यातील स्थिती - '...तर गावं भिकेला लागलीच समजा' यंदा सोयाबीनची पेरणी करत असतानाच तिफणीमाग धुराळा उडत होता. त्यानंतर दोन महिने पावसाचा पत्ता नव्हता. खांदेमळणीच्या आदल्या दिवशी वेळ चूकवून आलेला पाऊस दोन-तीन दिवस झाला. त्यामुळं मरगळेल सोयाबीन वरवर हिरव झाल्याचं दिसतयं; पण मुळ्या वाळून...
ऑगस्ट 11, 2017
जळकोट - तालुक्‍यात पावसाने डोळे वटारल्याने खरीप हंगामातील सोयाबीन, उडीद, मूग, तीळ ही नगदी पिके शेतकऱ्यांच्या हातून गेली आहेत. शिवाय पाणीटंचाईचे मोठे संकटही भविष्यात निर्माण होणार आहे. गेल्या दोन महिन्यांपासून दोन ते तीन वेळा तुरळक पाऊस सोडला, तर या तालुक्‍याला पावसाने वगळले. एकहंगामी व...