एकूण 29 परिणाम
नोव्हेंबर 15, 2019
मुंबई - राज्यात परतीच्या पावसाने पिकांच्या झालेल्या नुकसानाने शेतकरी हैराण झाला आहे. शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेले पीक गेले आहे. राज्यात ओला दुष्काळ जाहीर करण्याच्या या मागणीसाठी आमदार बच्चू कडू यांनी त्यांच्या नेतृत्वाखाली शेतकऱ्यांचा गुरुवारी राजभवनावर मोर्चा काढण्याचा प्रयत्न केला. मात्र,...
नोव्हेंबर 06, 2019
पुणे - अतिपावसामुळे राज्यात आतापर्यंत फळबागांसह खरीप पिकांची ३५ हजार कोटी रुपयांची हानी झाल्याचा अंदाज आहे. ‘‘राज्यात ओला दुष्काळ पडला असून, पिकांचे नुकसान वाढत आहे. त्यामुळे यंदा वाटली जाणारी पीक नुकसानभरपाई विक्रमी स्वरूपाची असेल,’’ अशी माहिती उच्चपदस्थ सूत्रांनी दिली. शेतकऱ्यांनी...
ऑक्टोबर 30, 2019
  नाशिक : देवळा तालुक्यात गेल्या काही  दिवसापासुन सततच्या परतीच्या पावसाने थैमान घातले असून हाती आलेल्या पिकांची मोठ्या प्रमाणात नासाडी झाली आहे. तालुक्यातील खामखेडा व परिसरात शेतपिकांचे मोठे नुकसान झाले आहे. खामखेडा येथील शेतकरी शामराव बोरसे यांच्या शेतीमध्ये पावसाचे पाणी साचल्याने काढून ठेवलेल्या...
ऑगस्ट 23, 2019
अतिवृष्टी, पुरामुळे नुकसान, खरिपाचा पेरा ९५ टक्क्यांवर पुणे - राज्यात अतिवृष्टी व पुरामुळे आत्तापर्यंत चार लाख हेक्टरवरील पिकांना तडाखा बसल्याची माहिती कृषी विभागाने दिली आहे. प्रामुख्याने यात ऊस, भुईमूग, कापूस, ज्वारी, मका, भात, सोयाबीन, तूर, मूग, उडीद, बाजरी, नागली आणि भाजीपालावर्गीय पिकांचा...
जुलै 22, 2019
६३४ कोटी प्रलंबित; मशागतीसाठीही पैसे नाहीत सोलापूर - मागच्या वर्षीच्या खरीप हंगामातील ६३४ कोटी रुपये मार्चएंडमुळे सरकारला परत पाठविण्यात आल्याची माहिती मदत व पुनर्वसन विभागाच्या सूत्रांनी दिली. दरम्यान, अचूक खाते क्रमांक तलाठ्यांकडे देऊनही रक्‍कम जमा न झाल्याने आता खरीप...
जुलै 17, 2019
मराठवाडा, खानदेश, विदर्भात गंभीर स्थिती पुणे - कोकण आणि पश्चिम महाराष्ट्राचा काही भाग वगळता विदर्भ, मराठवाडा, खानदेशवर दुष्काळाचे सावट गडद झाले आहे. अत्यल्प पाऊस, असमान वितरण आणि खंडामुळे काही ठिकाणी झालेल्या पेरण्या वाया गेल्यात जमा आहेत. बऱ्याच ठिकाणी उगवण होऊन खुरटलेली पिके पाण्यासाठी आकाशाकडे...
मे 14, 2019
सोलापूर - राज्यातील दुष्काळामुळे नागरिकांना पाण्यासाठी भटकावे लागत आहे. खरीप व रब्बी वाया गेल्याने जगाच्या पोशिंद्यावरच उपाशीपोटी झोपण्याची वेळ आली आहे. तरीही, केंद्र सरकारकडून दुष्काळ निवारणाचे ३१४ कोटी रुपये अद्याप मिळालेले नाहीत. दुसरीकडे, राज्य सरकारने तरतूद केलेल्या साडेचार हजार...
एप्रिल 13, 2019
सोलापूर - केंद्र सरकारच्या मदतीतून दुष्काळात तरी कुटुंबाच्या उदरनिर्वाहाची चिंता दूर होईल, अशी आशा बळिराजाला होती. मात्र, केंद्र सरकारने मंजूर केलेल्या चार हजार ५० कोटींपैकी आतापर्यंत दोन हजार कोटी रुपयेच राज्य सरकारला दिले आहेत. दुष्काळाची तीव्रता वाढत असल्याने शेतकऱ्यांना मदत करण्यास राज्य...
मार्च 05, 2019
मुंबई - यंदा फेब्रुवारी महिन्यापासूनच राज्यात चारा आणि पाणी टंचाईला जनतेला सामोरे जावे लागत असल्याने सरकारने उपाययोजना राबविण्यास सुरवात केली आहे.  खरीप हंगाम 2018 मध्ये राज्यातील 50 पैशांपेक्षा कमी पैसेवारी असलेल्या उर्वरित 4,518 गावांमध्ये दुष्काळसदृश परिस्थिती घोषित करून दुष्काळी...
फेब्रुवारी 16, 2019
मुंबई - गेल्या वर्षी खरीप हंगामात अपुऱ्या पर्जन्यमानामुळे दुष्काळ जाहीर केलेल्या १५१ तालुक्‍यांतील शेतकऱ्यांना पीक नुकसानपोटीचा सुमारे १ हजार ४५४ कोटी रुपयांचा दुसरा हप्ता आज राज्य शासनाने वितरित केला असल्याची माहिती मदत व पुनर्वसन विभागाचे सचिव किशोरराजे निंबाळकर यांनी दिली....
फेब्रुवारी 13, 2019
मुंबई - राज्यात २०१८च्या खरीप हंगामातील नैसर्गिक परिस्थितीमुळे १५१ तालुक्‍यांत दुष्काळ घोषित करण्यात आला आहे. या तालुक्‍यातील बाधित शेतकऱ्यांना शेतीपिकाच्या नुकसानापोटी तातडीने मदत वाटप करण्यासाठी दोन हजार कोटींचा आकस्मिकता निधी अग्रिमाद्वारे उपलब्ध करून देण्यास मंत्रिमंडळाकडून मान्यता...
जानेवारी 23, 2019
सोलापूर - राज्यातील 73 कारखान्यांकडे तब्बल पाच हजार 320 कोटी 36 लाखांची एफआरपी थकली आहे. त्यापैकी 50 टक्‍क्‍यांहून अधिक एफआरपी थकविलेल्या 39 कारखान्यांना कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली असून, त्यावर 24 जानेवारीला सुनावणी होणार असल्याची माहिती राज्याच्या साखर आयुक्‍तालयाकडून देण्यात आली. राज्यात...
जानेवारी 13, 2019
राज्यातील 5.68 लाख शेतकरी पात्र - 15 जानेवारी अर्जाची अंतिम मुदत  सोलापूर - कांद्याचे दर गडगडल्याने अडचणीत सापडलेल्या शेतकऱ्यांना मदतीचा हात म्हणून सरकारने 1 नोव्हेंबर ते 15 डिसेंबर या कालावधीत बाजार समित्यांमध्ये कांदा विकलेल्या शेतकऱ्यांना प्रतिक्‍विंटल दोनशे रुपयांचे अनुदान सरकारने जाहीर केले....
डिसेंबर 24, 2018
सद्यःस्थितीत राज्यात १ हजार २६२ टॅंकर सुरू सोलापूर - यंदा पावसाअभावी खरीप आणि आता रब्बीचा हंगाम पूर्णपणे वाया गेला असून पिण्याच्या पाण्याची टंचाई दिवसेंदिवस गंभीर होत आहे. २० डिसेंबरपर्यंत राज्यातील अकराशे गावांमध्ये आणि दोन हजार ३२९ वाड्या-वस्त्यांवर एक हजार २६२ टॅंकरद्वारे पाणीपुरवठा...
डिसेंबर 22, 2018
सोलापूर - राज्यात यंदा गंभीर दुष्काळ असून, पिकांचेही मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. नुकसानीपोटी भरपाई मिळावी, या उद्देशाने राज्यातील 94 लाख 64 हजार कर्जदार आणि बिगरकर्जदार शेतकऱ्यांनी विमा भरला आहे. विमा कंपन्यांकडून आता छाननीचे काम सुरू झाले असून, नववर्षाच्या प्रारंभी शेतकऱ्यांना भरपाईची रक्...
डिसेंबर 20, 2018
मुंबई - राज्य सरकारने दुष्काळ जाहीर केलेल्या १५१ तालुक्‍यांत आणि २६८ महसुली मंडळांतील शेतकऱ्यांच्या पीककर्जाचे पुनर्गठन करताना शेतीच्या सर्वप्रकारच्या कर्ज वसुलीला स्थगिती देण्याचा निर्णय घेतला आहे. सहकार विभागाने बुधवारी याबाबतचे आदेश जाहीर करीत सर्व बॅंकांना निर्णयाची अंमलबजावणी करण्याचे निर्देश...
डिसेंबर 18, 2018
बीड : पंतप्रधान नरेंद्र मोदींनी मुंबईत भूमिपूजन केलेले एकही काम अद्याप सुरु झालेले नाही. छत्रपती शिवाजी महाराज स्मारक, डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक, मेट्रो प्रकल्प यांपैकी काम सुरु नाहीत. त्यांचे हात लागलेले एकही काम सुरु नाही, अशी टीका विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी आज (मंगळवार...
नोव्हेंबर 29, 2018
मुंबई - राज्यातील लाखो दुष्काळग्रस्त शेतकरी मदतीपासून वंचित असताना भाजप-शिवसेनेचे सरकार दुष्काळी उपाययोजना सुरू असल्याचे ढोल बडवते आहे. हे वस्तुस्थितीचे "भान' नसलेले "बेभान' सरकार आहे. सरकारने तातडीने प्रभावी व व्यापक उपाययोजना करून शेतकऱ्यांना दिलासा द्यावा. शेतकरी सुखी झाला तर मीच या सरकारचा...
नोव्हेंबर 20, 2018
मुंबई - हिवाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी आज राज्य सरकारने २० हजार ३२६ कोटी रुपयांच्या पुरवणी मागण्या सादर केल्या. यात २०१८ च्या खरीप हंगामात दुष्काळ घोषित केलेल्या बाधित शेतकऱ्यांना मदतीचे वाटप करण्यासाठी २,२०० कोटींच्या निधीची तरतूद करण्यात आली आहे. दूध खरेदी आणि दूध भुकटी...
नोव्हेंबर 12, 2018
बीड : राज्यात सरासरीच्या 70 टक्के पाऊस पडला असून बीड जिल्ह्यातील पावसाचे प्रमाण केवळ 50 टक्के आहे. मराठवाड्यात सर्वाधिक दुष्काळी परिस्थिती असलेल्या जिल्ह्यात बीड आहे. मात्र, दुष्काळावर मात करण्यासाठी सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी पूर्ण ताकदीने उभे असल्याची ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली...