एकूण 13 परिणाम
डिसेंबर 08, 2019
रिझर्व्ह बँकेनं पतधोरण गुरुवारी जाहीर केलं. त्यात व्याजदर ‘जैसे थे’ ठेवण्यात आले असले, तरी सलग दरकपातीनंतर घेतलेला हा ‘ब्रेक’ आहे. रिझर्व्ह बँकेनं एकुणात घेतलेल्या भूमिकेचा नक्की अन्वयार्थ काय, विकासदराची गाडी घसरल्याच्या काळात रिझर्व्ह बँकेला आगामी काळात काय भूमिका घ्यावी लागेल, दरकपातीचे एकूण...
ऑक्टोबर 13, 2019
यंदाचा मॉन्सून अनेक अर्थांनी वेगळा आणि विचित्र ठरतो आहे. आगमनाच्या लांबलेल्या तारखा, परतीच्या लांबलेल्या तारखा, चुकलेलं अनुमान, अनेक ठिकाणी ढगफुटीसदृश्य पावसाचं वाढलेलं प्रमाण, असमान वितरण असे बरेच धक्के त्यानं दिले आहेत. ‘असा पाऊस आधी कधी पाहिला नाही,’ अशी भावना अनेकांकडून व्यक्त होते आहे. हे...
जुलै 07, 2019
सदैव बदलते मॉन्सूनचे आकृतिबंध (पॅटर्न) ही भारतासमोरची सध्याची मोठी समस्या आहे. देशातील शेती, अन्न-उत्पादन, पृष्ठजल आणि भूजल यांची उपलब्धता या गोष्टी त्यामुळे नेहमीच संवेदनशील बनलेल्या आहेत. भारताच्या मोठ्या भागांत जाणवणारी पाण्याची समस्या ही नित्याचीच बाब झाली आहे. या सगळ्याचा परिणाम देशाच्या...
एप्रिल 21, 2019
देशात मॉन्सून यंदा सरासरीइतका म्हणजे 96 टक्के असेल, असा अंदाज भारतीय हवामानशास्त्र विभागानं वर्तवला आहे. पावसाचा विस्तार देशभर असल्यानं अवघं शिवार भिजणार आहे, ही आनंदवार्ता आहे. या अंदाजाचा नेमका अर्थ काय, त्याचे फायदे-तोटे काय, वेगळेपण काय, अंदाज आणि प्रत्यक्ष पाऊस यांच्यात फरक असण्याची शक्‍यता...
ऑक्टोबर 07, 2018
भारतात मॉन्सूननं परतीचा प्रवास सुरू केला असताना, दुसरीकडं त्यानं सरासरी मात्र पूर्ण केली नसल्याचं सिद्ध झालं आहे. मॉन्सूनचं गेल्या काही वर्षांतलं वेळापत्रक अशा प्रकारे विस्कटत चालल्याचं दिसतं. यंदा तर त्यानं अनेक वेगळे "पॅटर्न' दाखवले आहेत. मॉन्सूनचं हे वेळापत्रक कशामुळं विस्कटतं, त्यातले सूक्ष्म...
मे 27, 2018
पाणलोट विकासाची कामं होत असताना त्यांचं आयुष्य कमाल असावं आणि पुनःपुन्हा कामाचे "उपचार' करण्याची आवश्‍यकता भासू नये. कामं सुरू होणं ही बाब जितकी महत्त्वाची तितकीच झालेल्या किंवा होत असलेल्या कामांची गुणवत्ता राखण्याची बाबही महत्त्वाची. त्यासाठी सगळ्यांनीच हातभार लावण्याची आवश्‍यकता आहे....
फेब्रुवारी 21, 2018
नीरव मोदी, विजय मल्यासारख्या प्रवृत्तींना आपल्या देशात शाही वागणूक मिळते आणि शेतकऱ्यांना मात्र कावळ्यासारखे टोचे मारून हैराण केलं जातं. शेतकरी आस्मानी संकटाने गांजून गेलेला असताना समाजातील एक वर्ग मात्र शेतकऱ्यांच्या विरोधात कोल्हेकुई करत आहे. त्यांचा पवित्रा शेखचिल्लीसारखा आहे. शेतकऱ्यांची उपेक्षा...
फेब्रुवारी 15, 2018
लांड्यालबाड्या करून मुळात पिकांचा उत्पादनखर्चच कमी धरायचा आणि त्यावर दीडपट हमीभाव जाहीर करून आश्वासनपूर्तीच्या प्रचाराचा ढोल जोरजोरात वाजवायचा ही सरकारपक्षाची रणनीती आहे. मोदी सरकारने आवळा देऊन कोहळा काढला आहे.   केंद्रीय अर्थमंत्री अरूण जेटली यांनी आगामी खरीपात पिकांना उत्पादनखर्चाच्या दीडपट...
फेब्रुवारी 10, 2018
मध्य प्रदेश आणि कर्नाटकात शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी तिथल्या सरकारांनी पावले उचलली आहेत. महाराष्ट्रात त्याचे अनुकरण का होत नाही, याचे उत्तर कोण देणार? मंदसौर येथे आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांवर गोळ्या झाडल्यामुळे मध्य प्रदेशातील शिवराजसिंह चौहान सरकार चर्चेत आले होते. हे कमी म्हणून शिवराजसिंहांनी...
जानेवारी 21, 2018
भारत शेतीप्रधान देश आहे. मात्र, शेतीत अपयश येत असल्यामुळं स्थलांतराचं प्रमाण आता वाढताना दिसत आहे. शेती उत्तम होण्यासाठी नेमकी कोणती उपाययोजना करणं गरजेचं आहे, धोरणांपासून शेतकऱ्यांच्या मानसिकतेपर्यंत कोणत्या गोष्टींचा विचार करायला हवा आदी गोष्टींबाबत विवेचन. हरितक्रांतीत आपण नेमकं कोणत्या बाबींकडं...
सप्टेंबर 17, 2017
आता सगळा माल शेतकऱ्यांकडून व्यापाऱ्यांच्या ताब्यात गेल्यावर सरकारला निर्यातबंदी उठवण्याची बुध्दी सुचावी, हा निव्वळ योगायोग म्हणता येणार नाही. सरकारला शेतकऱ्यांपेक्षा व्यापाऱ्यांची आणि शहरातील मध्यवर्गीय ग्राहकांची काळजी जास्त आहे, याचा हा पुरावा म्हणावा लागेल.  वास्तविक यंदा तूर व इतर कडधान्यांचे...
जुलै 28, 2017
ऐतिहासिक कर्जमाफी केली म्हणून सत्ताधारी पक्षाचे आमदार विधानसभा आणि विधानपरिषदेत सरकारच्या अभिनंदनाचा ठराव मांडत असताना शेतकरी मात्र थकीत पिककर्जाच्या वसुलीसाठी राष्ट्रीयकृत बॅंकांकडून कायदेशीर कारवाईच्या नोटीसा आल्याने हवालदिल झाले आहेत. शेतकऱ्यांची चेष्टा करणारा हा क्रूर योगायोग म्हणावा लागेल....
जून 17, 2017
मी भोग द्यायला तयार आहे, परंतु तू मनुष्यरूपात येता कामा नये; तर तू अग्नी, जल वा वायू रूपात यावे, आणि माझ्या फर्माईशीप्रमाणे काही सेकंदात एका रूपातून दुसऱ्या रूपात अवस्थांतर करावे लागेल, अशा अटी घालणाऱ्या एका लावण्यवतीची पुराणातली कहाणी मी परवाच वाचली. राज्य सरकारने शेतकऱ्यांना बि-बियाणे, खतांसाठी...