एकूण 15 परिणाम
जुलै 29, 2018
पुणे : शहरातील एका पंचतारांकित हॉटेलात शेफ म्हणून काम करणाऱ्या तरुणीस भेटवस्तू देण्याचे आमिष दाखवून सव्वा लाख रुपयांची फसवणूक केली. या प्रकरणी सायबर गुन्हे शाखेने तत्काळ चक्रे फिरवून दिल्ली येथून एका नायजेरियन तरुणास ताब्यात घेतले.  ऍटेसे शिरगे (वय 30, रा. मेघालय, सध्या मोहन गार्डन, दिल्ली) असे अटक...
मे 24, 2017
नवी दिल्ली: पेटीएमची बहुप्रतिक्षित पेमेंट्स बॅंकेचे कामकाज आजपासून (मंगळवार) सुरू झाले आहे. आता इतर बँकांप्रमाणेच त्यामध्ये तुम्हाला बचत खाते उघडता येणार आहे. पेटीएमकडून बचत खात्यावर 4 टक्के दराने व्याज देण्यात येणार आहे. 2020 पर्यंत बँकेने 50 कोटी ग्राहक जोडण्याचे लक्ष्य ठेवले आहे. बॅंकेकडून नॉन...
एप्रिल 15, 2017
टोळी जेरबंद; नाममात्र दरात विकली माहिती  नवी दिल्ली - विविध बॅंकांमधील सुमारे एक कोटी ग्राहकांच्या खात्याची माहिती लीक करून ती अल्पदरात इतर कंपन्यांना विकल्याचा प्रकार राजधानी दिल्लीत उघडकीस आला आहे. पोलिसांनी याप्रकरणी मुख्य सूत्रधार पूरण गुप्तासह दोघांना अटक केल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. ...
मार्च 21, 2017
शर्मिला ओसवाल यांच्या 'डिजिटल वूमन वॉरियर'चे कौतुक पुणे - समाजाच्या तळागाळातील महिलांना आधुनिक तंत्रज्ञानाचे आणि त्याद्वारे आर्थिक व्यवहार करण्याचे प्रशिक्षण देण्याच्या "डिजिटल वूमन वॉरियर' या पुणेकर महिलेच्या उपक्रमाचे कौतुक खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले आहे. या उपक्रमात केंद्र...
मार्च 09, 2017
नवी दिल्ली: पेटीएमने आता क्रेडिट कार्ड वापरुन मोबाईल वॉलेटमध्ये पैसे हस्तांतरित करणाऱ्या ग्राहकांना 2 टक्के व्यवहार शुल्क करण्याचा निर्णय घेतला आहे. अनेक क्रेडिट कार्डधारकांनी मोफत क्रेडिट मिळविण्यासाठी कंपनीच्या मंचाचा फायदा घेत असल्याचे निदर्शनास आल्यानंतर कंपनीने हा निर्णय घेतला आहे...
मार्च 07, 2017
सर्वसामान्य नागरिकांची वैयक्तिक माहिती त्यांच्या परोक्ष बाजारात विकण्याचा धंदा वाढत जाणे, हे मूलभूत स्वातंत्र्यावरचे अतिक्रमण मानले पाहिजे. नुकतीच एक बातमी वाचली. बातमीचे शीर्षक ‘All your personal data up for sale for less than a rupee’ म्हणजेच ‘तुमची सर्व व्यक्तिगत माहिती एक रुपयांपेक्षा कमी...
फेब्रुवारी 01, 2017
नवी दिल्ली : राजकीय पक्षांना मिळणार्‍या देणग्यांवर केंद्र सरकारने आता कायद्याचा बडगा उगारला आहे. यापुढे धनादेशाद्वारे किंवा डिजिटल माध्यमातूनच निधी स्वीकारण्याचे बंधन राजकीय पक्षांना असेल. केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांनी आज (बुधवार) अर्थसंकल्पात याची घोषणा केली. गेल्या अनेक महिन्यांपासून...
जानेवारी 18, 2017
नोटाबंदीची सर्वेक्षणातील माहिती; अर्थव्यवस्थेवर तात्पुरता परिणाम, दीर्घकाळासाठी फायदेशीर  नवी दिल्ली - नोटाबंदी आणि नंतरच्या चलन तुटवड्याचा सर्वांत मोठा फटका कृषी क्षेत्राला बसला. फळे, भाजीपाला, फलोत्पादन, फुलोत्पादन, शेती, अन्न प्रक्रिया अादी कृषी क्षेत्राशी जोडलेल्या ८१ टक्के उद्योगांवर...
जानेवारी 03, 2017
नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आठ नोव्हेंबर रोजी नोटाबंदीचा निर्णय जाहीर केल्यानंतर कॅशलेस व्यवहारांना प्रोत्साहन देण्याचा देशभर प्रयत्न करण्यात येत आहेत. आता तेल कंपन्यांनी स्वयंपाकासाठी वापरण्यात येणारे एलपीजी सिलेंडर ऑनलाईन बुक करून, ऑनलाईन पैसे भरणाऱ्या ग्राहकांना पाच रुपयांची सूट...
डिसेंबर 09, 2016
दोन हजार रुपयांपर्यंतची मर्यादा; डिजिटल व्यवहारांना प्रोत्साहन देणार नवी दिल्ली - नोटाबंदीनंतर निर्माण झालेल्या रोकड टंचाईवर मार्ग काढण्यासाठी आणि डिजिटल व्यवहारांना प्रोत्साहन देण्यासाठी डेबिट आणि क्रेडिट कार्डद्वारे होणाऱ्या दोन हजार रुपयांपर्यंतच्या व्यवहारावरील सेवा कर सरकार माफ...
डिसेंबर 06, 2016
नवी दिल्ली - राष्ट्रीय महामार्गावरील टोलवर क्रेडिट व डेबिट कार्ड; तसेच ई-वॉलेटद्वारे भरणा करावा, अशा सूचना केंद्रीय गृहमंत्रालयाने दिल्या आहेत. याचसोबत 15 डिसेंबरपर्यंत या टोल नाक्‍यांवर पाचशेच्या जुन्या नोटा स्वीकारण्यात येणार आहेत. कायदा सुव्यवस्थेचा प्रश्‍न निर्माण होऊ...
नोव्हेंबर 24, 2016
नवी दिल्ली - शेतकऱ्यांना कोणत्याही परिस्थितीत अडचणी निर्माण न करता आणि त्यांच्याकडे पैसे नसतील तर प्रसंगी कर्जाऊ किंवा उधारीवरही (क्रेडिट) खत उपलब्ध करुन द्यावे अशा सूचना केंद्र सरकारतर्फे आज सर्वत्र देण्यात आलेल्या आहेत. देशात सर्व प्रकारच्या खतांचा पुरेसा साठा उपलब्ध आहे आणि शेतकरी विविध स्वरूपात...
नोव्हेंबर 22, 2016
नवी दिल्ली : पाचशे आणि हजाराच्या नोटा चलनातून रद्द केल्यानंतर सिगारेटच्या विक्रीत तब्बल 40 टक्के घसरण झाल्याचे समोर आले आहे. यामुळे या निर्णयाचा फटका सिगारेट कंपन्यांनादेखील बसला आहे.  सिगारेटच्या पाकिटावर वैधानिक इशारा दिलेला असतो, त्याचा सिगारेटच्या विक्रीवर काहीही परिणाम झालेला नाही. मात्र पाचशे...
नोव्हेंबर 16, 2016
नवी दिल्ली - काळा पैसा रोखण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पाचशे आणि एक हजार रुपयांच्या नोटांवर बंदी घालण्याच्या निर्णयास आठवडा लोटल्यानंतरही सर्वसामान्य नागरिकांची नोटा बदलून घेण्यासाठी सुरू असलेली परवड थांबलेली नाही. परिस्थितीवर नियंत्रण मिळवण्यासाठी केंद्र सरकार, राज्य सरकार आणि रिझर्व्ह...
नोव्हेंबर 09, 2016
नवी दिल्ली: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काल मध्यरात्रीपासून सध्या चलनात असलेल्या पाचशे आणि हजाराच्या नोटा बंद झाल्याची घोषणा केली. आता लवकरच 500 आणि 2000 च्या नव्या नोटा चलनात येणार आहे. त्यामुळे आपल्याकडे असलेल्या पाचशे आणि हजारांच्या नोटांचे काय करायचे याबाबत जाणून घेण्यासाठी पुढील माहिती वाचा....