एकूण 17 परिणाम
मे 19, 2019
नागपूर - ढगाळ वातावरणाने थोडाफार दिलासा दिल्यानंतर विदर्भात अपेक्षेप्रमाणे पुन्हा उन्हाची तीव्र लाट उसळली. उन्हाच्या तडाख्यामुळे नागपूरचा पारा अर्ध्या अंशाने चढून तापमान 45.4 अंशांवर गेले. उष्णतेची लाट किमान आठवडाभर कायम राहणार असल्याचा हवामान विभागाचा अंदाज आहे.  राजस्थानकडून येणाऱ्या...
मे 18, 2019
जळगाव ः राज्यातल्या बऱ्याच भागातील कमाल तापमानात 19 मे पासून वाढ होणार असल्याचा अंदाज हवामान तज्ज्ञांनी वर्तविला आहे. विदर्भ, मराठवाडा, खानदेशातील बऱ्याच भागातील कमाल तापमानात लक्षणीय वाढ होणार असल्यामुळे 25 मेपर्यंत या भागातील कमाल तापमान सरासरीपेक्षा अधिक राहील.  गेल्या दीड महिन्यापासून खानदेशात...
एप्रिल 29, 2019
पुणे : उन्हाच्या चटक्‍यात संपूर्ण महाराष्ट्र अक्षरशः होरपळत आहे. विदर्भात तीव्र उष्णतेच्या लाटेचा इशारा देण्यात आला; तर मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात उष्णतेची लाट पुढील दोन दिवस कायम राहणार आहे. याचदरम्यान बंगालच्या उपसागरावर घोंगावणाऱ्या "फोणी' चक्रीवादळाची तीव्रता वाढणार असल्याचा इशाराही हवामान...
एप्रिल 27, 2019
अमरावती : रात्री आणि दिवसाच्या तापमानात दोन-चार नव्हे, तर तब्बल 20 अंश सेल्सिअस तापमानाची तफावत आहे. ही तफावत जास्त असल्याने उष्णता असह्य होत आहे. यातूनच शहरातील मुख्य रस्ते दुपारच्या वेळी निर्मनुष्य दिसू लागले आहेत. शनिवारी अमरावतीचे कमाल तापमान 46 अंश सेल्सिअस तर किमान तापमान 26 अंश सेल्सिअस...
एप्रिल 27, 2019
मुंबई : मागील काही दिवसांपासून संपुर्ण महाराष्ट्रात सुर्य आग ओकत आहे. त्यातही विदर्भात याचे प्रमाण सर्वाधिक आहे. जगातल्या सर्वात उष्ण 15 शहरांमध्ये विदर्भातील तब्बल सहा शहरांचा समावेश असल्याचे 'इआय डोरॅडो' हवामानाचा अभ्यास करणाऱ्या वेबसाइटवर जाहीर करण्यात आला आहे. यावरून वाढत्या तापमानाची दाहकता...
मे 11, 2018
पुणे (प्रतिनिधी) : उष्णतेच्या लाटेमुळे विदर्भ, मराठवाड्यातील तापमानाचा पारा वाढत आहे. त्यामुळे उन्हाच्या झळा अधिक तीव्र झाल्या आहेत. शुक्रवारी (ता. ११) सकाळी आठ वाजेपर्यंतच्या चोवीस तासांमध्ये विदर्भातील चंद्रपूर येथे ४६.० अंश सेल्सिअसची देशातील उच्चांकी तापमानाची नोंद झाली असल्याचे हवामान...
मे 08, 2018
पुणे - राज्यात उन्हाचा चटका कायम असून, पुढील दोन ते तीन दिवसांत विदर्भातील काही भागांत उष्णतेची लाट निर्माण होईल, असा अंदाज हवामान खात्यातर्फे देण्यात आला आहे. पुण्यात आकाश मुख्यत- निरभ्र राहणार आहे, त्यामुळे कमाल तापमानाचा पारा 39 अंश सेल्सिअसच्या दरम्यान राहील, असेही खात्यातर्फे स्पष्ट करण्यात...
एप्रिल 30, 2018
पुणे - राज्यात तापमानातील वाढ सुरूच असल्याने विदर्भ, मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात काही ठिकाणी उष्णतेची लाट आली आहे. विदर्भात चटका अधिक असून, चंद्रपूर, अकोला, वर्धा येथे तापमान ४५ अंशांच्या पुढे गेले आहे. गुरुवारपर्यंत (ता. ३) उन्हाचा ताप अधिक राहणार असून, विदर्भात उष्णतेची लाट कायम राहण्याचा इशारा...
मार्च 15, 2018
नागपूर - विदर्भात तापमानाचा पारा वाढत असून, मार्च महिन्यातच तापमानाने अनेक शहरांमध्ये चाळिशी गाठली आहे. बुधवारी सर्वाधिक 40.1 अंश तापमानाची नोंद ब्रह्मपुरी येथे झाली. चंद्रपूर आणि वर्धा येथेही या मोसमातील आतापर्यंतच्या उच्चांकाची नोंद प्रादेशिक हवामान विभागातर्फे करण्यात आली आहे....
मे 21, 2017
लाट कायम : उपराजधानीतही पारा 45.7 अंशांवर नागपूर - गेल्या दोन दिवसांपासून तापमानात वाढ झाल्याने त्याचा दैनंदिन कामांवर परिणाम झाल्याचे चित्र आहे. हवामान विभागाने विदर्भात पुन्हा दोन दिवस उष्णतेची लाट कायम राहण्याची शक्‍यता वर्तविली आहे. त्यामुळे पुन्हा दोन दिवस दोन उन्हाचे...
मे 20, 2017
पुणे - विदर्भात तुरळक ठिकाणी उष्णतेची लाट असल्यामुळे कमाल तापमानात वाढ झाली आहे. शुक्रवारी (ता.19) सकाळपर्यंत चंद्रपूर येथे 46.2 अंश सेल्सिअसचे उच्चांकी तापमान नोंदविले गेले. रविवारी (ता.21) व सोमवारी (ता.22) मध्य महाराष्ट्राच्या उत्तर भागात तुरळक ठिकाणी पावसाची शक्‍यता, उर्वरित भागात हवामान कोरडे...
मे 09, 2017
पुणे (प्रतिनिधी) - पश्चिम आणि मध्य महाराष्ट्रातील नगर, नाशिक, सांगली, सातारा, सोलापूर आणि मराठवाड्यातील औरंगाबाद, जालना, हिंगोलीसह उस्मानाबाद जिल्ह्यांत सोमवारी (ता. ७) वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस झाला. राज्यात गेल्या काही दिवसांपासून होत असलेल्या गारपीट, पावसाने केळी, उन्हाळ कांदा, आंबा, द्राक्ष,...
एप्रिल 20, 2017
नागपूर -  मंगळवारी देशात सर्वाधिक तापमानाचा उच्चांक गाठणाऱ्या चंद्रपूरसह विदर्भातील बहुतांश शहरांच्या तापमानात किंचित घट झाली. मात्र, हवामान विभागाने नव्याने उन्हाच्या लाटेचा इशारा दिल्याने विदर्भातील जनतेला आणखी दोन दिवस उन्हाचा तडाखा सहन करावा लागणार, अशी चिन्हे दिसत आहेत.  राज्यातील...
एप्रिल 18, 2017
नागपूर - गेल्या तीन-चार दिवसांपासून उन्हाचे असह्य चटके सहन करणाऱ्या नागपूरकरांना सोमवारी तापमान घसरल्यामुळे किंचित दिलासा मिळाला. पण, उन्हाच्या झळा व उकाडा दिवसभर जाणवला. उष्णतेची लाट आणखी चोवीस तास कायम राहणार असल्याचे संकेत हवामान विभागातर्फे देण्यात आले.  विदर्भासह संपूर्ण देशभर...
एप्रिल 18, 2017
पुणे - वायव्य भारतातून येणाऱ्या उष्ण आणि कोरड्या वाऱ्यांमुळे विदर्भासह मराठवाडा; तसेच मध्य महाराष्ट्र उन्हाच्या चटक्‍यांनी सोमवारी (ता.17) तापला. राज्यात सर्वाधिक तापमान चंद्रपूर येथे 45.9 अंश सेल्सिअस नोंदले गेले. पुण्यात 39.4 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. पुढील चोवीस तासांमध्ये राज्यातील...
एप्रिल 17, 2017
पुणे - राज्याचा बहुतांश भाग उन्हाच्या चटक्‍यात होरपळून निघत आहे. पुढील चोवीस तासांमध्ये मध्य महाराष्ट्र, मराठवाड्याच्या तुरळक ठिकाणांसह विदर्भात तीव्र उष्णतेची लाट येण्याची शक्‍यता हवामान खात्याने रविवारी (ता. १६) वर्तविली. येत्या मंगळवारपर्यंत (ता. १८) उष्णतेची ही लाट कायम राहील, असा इशाराही...
एप्रिल 10, 2017
पुणे - महाराष्ट्र उन्हाच्या चटक्‍याने होरपळत असून 16 शहरांमध्ये कमाल तापमानाच्या पाऱ्याने रविवारी चाळिशी ओलांडली. आगामी दोन दिवस राज्यात हवामान कोरडे राहील. पुण्यात 39.5 अंश सेल्सिअसवर पोचलेला कमाल तापमानाचा पारा पुढील अठ्ठेचाळीस तासांमध्ये 41 अंश सेल्सिअसपर्यंत वाढेल, असा अंदाज हवामान खात्यातर्फे...