एकूण 24 परिणाम
मे 30, 2019
नागपूर -  नागपूरच्या पाऱ्याने मंगळवारी अचानक विक्रमी उसळी घेतल्यांनतर काल तापमानाचा शतकातील विक्रम मोडीत निघणार काय, याविषयी नागपूरकरांमध्ये उत्सुकता होती. परंतु, सूर्यनारायणाने थोडी उसंत दिल्याने विक्रम अबाधित राहिला. चंद्रपूरवासींवर मात्र बुधवारी सुर्य चांगलाच कोपला. कमाल तापमानाने...
मे 20, 2019
नागपूर - विदर्भात उन्हाच्या लाटेचा प्रभाव दिवसेंदिवस वाढू लागला आहे. रविवारी ढगाळ वातावरण असूनही नागपूरच्या कमाल तापमानात वाढ झाली. तर चंद्रपूर येथे राज्यातील उच्चांकी तापमानाची नोंद करण्यात आली. प्रादेशिक हवामान विभागाचा इशारा लक्षात घेता, या आठवड्यात लाट आणखी तीव्र होण्याची शक्‍यता...
मे 19, 2019
नागपूर - ढगाळ वातावरणाने थोडाफार दिलासा दिल्यानंतर विदर्भात अपेक्षेप्रमाणे पुन्हा उन्हाची तीव्र लाट उसळली. उन्हाच्या तडाख्यामुळे नागपूरचा पारा अर्ध्या अंशाने चढून तापमान 45.4 अंशांवर गेले. उष्णतेची लाट किमान आठवडाभर कायम राहणार असल्याचा हवामान विभागाचा अंदाज आहे.  राजस्थानकडून येणाऱ्या...
मे 18, 2019
जळगाव ः राज्यातल्या बऱ्याच भागातील कमाल तापमानात 19 मे पासून वाढ होणार असल्याचा अंदाज हवामान तज्ज्ञांनी वर्तविला आहे. विदर्भ, मराठवाडा, खानदेशातील बऱ्याच भागातील कमाल तापमानात लक्षणीय वाढ होणार असल्यामुळे 25 मेपर्यंत या भागातील कमाल तापमान सरासरीपेक्षा अधिक राहील.  गेल्या दीड महिन्यापासून खानदेशात...
एप्रिल 27, 2019
अमरावती : रात्री आणि दिवसाच्या तापमानात दोन-चार नव्हे, तर तब्बल 20 अंश सेल्सिअस तापमानाची तफावत आहे. ही तफावत जास्त असल्याने उष्णता असह्य होत आहे. यातूनच शहरातील मुख्य रस्ते दुपारच्या वेळी निर्मनुष्य दिसू लागले आहेत. शनिवारी अमरावतीचे कमाल तापमान 46 अंश सेल्सिअस तर किमान तापमान 26 अंश सेल्सिअस...
मार्च 28, 2019
पुणे - राज्यातील 30 पैकी 13 शहरांमधील कमाल तापमानाच्या पाऱ्याने चाळिशी ओलांडल्याचे निरीक्षण हवामान खात्याने बुधवारी (ता. 27) नोंदले. राज्यात मालेगाव येथे सर्वाधिक म्हणजे 41.6 अंश सेल्सिअस तापमान नोंदले गेले. विदर्भात पुढील दोन दिवसांमध्ये उष्णतेच्या लाटेचा इशारा देण्यात आला आहे. तर, येत्या शनिवारी...
डिसेंबर 19, 2018
अमरावती : बंगालच्या उपसागरात निर्माण झालेले पेथाई वादळ शमल्यानंतर बदललेली वाऱ्याची दिशा पूर्ववत होऊन वातावरणात कमालीचा गारठा वाढला. विदर्भात नागपूर जिल्ह्यात आज, बुधवारी किमान तापमानाची सर्वांत कमी 9.6 अंश सेल्सिअस नोंद झाली. उत्तर भारतात बर्फवृष्टी होत असून उत्तरेकडून थंड वारे...
मे 18, 2018
नागपूर - ढगाळ वातावरणामुळे खाली आलेला पारा गुरुवारी पुन्हा विक्रमी झेपावला. चंद्रपूर आणि ब्रह्मपुरी येथे कमाल तापमानाने या मोसमातील नवा उच्चांक गाठला. विदर्भात उन्हाची लाट आणखी दोन दिवस कायम राहणार आहे.  पाऊस व ढगाळी वातावरणामुळे विदर्भातील बहुतांश जिल्ह्यांमध्ये कमाल तापमानात घट झाली...
एप्रिल 18, 2018
नागपूर - गेल्या काही दिवसांपासून विदर्भात वादळी पावसाने सर्वत्र धुमाकूळ घातल्यानंतर आता उन्हाची तीव्र लाट आली आहे. मंगळवारी विदर्भात बुलडाण्याचा अपवाद वगळता सर्वच शहरांमध्ये तापमानात वाढ झाली. नागपुरात कमाल तापमानाने या मोसमातील उच्चांक गाठला, तर चंद्रपुरात संपूर्ण राज्य तसेच मध्य...
मार्च 22, 2018
नागपूर - विदर्भात तापमानाचा भडका पुन्हा उडाला असून, अनेक शहरांमध्ये पारा चाळिशीच्या उंबरठ्यावर आहे. नागपुरात कमाल तापमानाने बुधवारी मोसमातील 39.1 अंशांचा नवा उच्चांक गाठला आहे. या आठवड्यात तापमान आणखी वाढण्याची शक्‍यता प्रादेशिक हवामान विभागातर्फे वर्तविण्यात आली आहे.  उत्तर भारताकडून...
मार्च 15, 2018
नागपूर - विदर्भात तापमानाचा पारा वाढत असून, मार्च महिन्यातच तापमानाने अनेक शहरांमध्ये चाळिशी गाठली आहे. बुधवारी सर्वाधिक 40.1 अंश तापमानाची नोंद ब्रह्मपुरी येथे झाली. चंद्रपूर आणि वर्धा येथेही या मोसमातील आतापर्यंतच्या उच्चांकाची नोंद प्रादेशिक हवामान विभागातर्फे करण्यात आली आहे....
मे 25, 2017
नागपूर - दोन-तीन दिवस उन्हाचा प्रभाव कमी झाल्यानंतर बुधवारी पुन्हा विदर्भात उन्हाची तीव्र लाट आली. चंद्रपुरात कमाल तापमानाने या मोसमातील नवा उच्चांक गाठला. बुधवारी चंद्रपूर येथील कमाल तपमान 47.2 अंश होते. नागपुरातही पारा 45.3 अंशांवर गेला. सर्वाधिक उन्हासाठी प्रसिद्‌ध असलेला नवतपा...
मे 23, 2017
नागपूर - गेल्या नऊ दिवसांपासून विदर्भात सुरू असलेला उन्हाचा तडाखा सोमवारीही कायम राहिला. नागपूर, चंद्रपूर आणि ब्रह्मपुरीसह बहुतांश जिल्ह्यांमध्ये तापमान किंचित खाली आले असले तरी, उन्हाचे चटके व उकाडा मात्र ‘जैसे थे’ होता. लवकरच नवतपा सुरू होत असल्यामुळे उष्णलाट आणखी तीव्र...
मे 20, 2017
पुणे - विदर्भात तुरळक ठिकाणी उष्णतेची लाट असल्यामुळे कमाल तापमानात वाढ झाली आहे. शुक्रवारी (ता.19) सकाळपर्यंत चंद्रपूर येथे 46.2 अंश सेल्सिअसचे उच्चांकी तापमान नोंदविले गेले. रविवारी (ता.21) व सोमवारी (ता.22) मध्य महाराष्ट्राच्या उत्तर भागात तुरळक ठिकाणी पावसाची शक्‍यता, उर्वरित भागात हवामान कोरडे...
मे 20, 2017
लाट कायम - उपराजधानीतही पारा 45.9 अंशांवर नागपूर - विदर्भातील उन्हाची लाट दिवसेंदिवस वाढत चालल्याने दैनंदिन जीवन विस्कळीत झाले आहे. चंद्रपूर आणि ब्रह्मपुरी येथे पारा 46 अंशांवर गेला असून, उपराजधानीतही कमाल तापमान 45.9 अंश सेल्सिअस इतके नोंदविण्यात आले. हवामान विभागाने पुन्हा...
मे 19, 2017
चंद्रपूर 46.2, ब्रह्मपुरी 46 अंशांवर नागपूर - विदर्भात सूर्यदेवाचा प्रकोप सुरूच असून, नागपूरसह सर्वच शहरे उन्हाच्या तीव्र लाटेखाली आले आहेत. गुरुवारी चंद्रपूर येथे सर्वाधिक 46.2 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद करण्यात आली. उष्ण लाटेचा प्रभाव आणखी काही दिवस कायम राहणार असल्याचा...
मे 09, 2017
पुणे (प्रतिनिधी) - पश्चिम आणि मध्य महाराष्ट्रातील नगर, नाशिक, सांगली, सातारा, सोलापूर आणि मराठवाड्यातील औरंगाबाद, जालना, हिंगोलीसह उस्मानाबाद जिल्ह्यांत सोमवारी (ता. ७) वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस झाला. राज्यात गेल्या काही दिवसांपासून होत असलेल्या गारपीट, पावसाने केळी, उन्हाळ कांदा, आंबा, द्राक्ष,...
एप्रिल 24, 2017
नागपूर - गेल्या काही दिवसांपासून उन्हाच्या कडाक्‍याने होरपळून निघालेल्या विदर्भवासींना रविवारी किंचित दिलासा मिळाला. ढगाळ वातावरणामुळे विदर्भातील सर्व शहरांमध्ये कमाल तापमानात घट झाली. नागपुरात तब्बल दहा दिवसांनंतर पारा प्रथमच त्रेचाळिशीच्या खाली आला. येत्या आठवड्यात पारा स्थिर...
एप्रिल 18, 2017
नागपूर - गेल्या तीन-चार दिवसांपासून उन्हाचे असह्य चटके सहन करणाऱ्या नागपूरकरांना सोमवारी तापमान घसरल्यामुळे किंचित दिलासा मिळाला. पण, उन्हाच्या झळा व उकाडा दिवसभर जाणवला. उष्णतेची लाट आणखी चोवीस तास कायम राहणार असल्याचे संकेत हवामान विभागातर्फे देण्यात आले.  विदर्भासह संपूर्ण देशभर...
एप्रिल 18, 2017
पुणे - वायव्य भारतातून येणाऱ्या उष्ण आणि कोरड्या वाऱ्यांमुळे विदर्भासह मराठवाडा; तसेच मध्य महाराष्ट्र उन्हाच्या चटक्‍यांनी सोमवारी (ता.17) तापला. राज्यात सर्वाधिक तापमान चंद्रपूर येथे 45.9 अंश सेल्सिअस नोंदले गेले. पुण्यात 39.4 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. पुढील चोवीस तासांमध्ये राज्यातील...