एकूण 73 परिणाम
ऑक्टोबर 13, 2019
साकोली (जि. भंडारा) : मतदार आता आंधळेपणाने मतदान करीत नाही. तो विकास करणाऱ्यालाच मते देतो आणि गेल्या पाच वर्षांत भाजप सरकारने विकासाची अनेक कामे केली आहेत. घराघरांत शौचालये झाली, ग्रामीण भागात सर्वांना वीज पुरविण्यात आली, गरिबांचे घरांचे स्वप्न साकार होत आहे, चांगल्या दर्जेदार रुग्णालयातून मोफत...
सप्टेंबर 04, 2019
नागपूर ः विदर्भातील नंदनवन म्हणून ओळखल्या जाणाऱ्या चिखलदरा येथे केलेल्या सर्वेक्षणात संशोधकांना सापाची एक नवीन प्रजाती शोधून काढली. यानिमित्ताने मेळघाटातील जैवविविधतेचे पुरावे पुन्हा एकदा जगासमोर आले आहेत. महाराष्ट्रातील सातपुड्याच्या शुष्क पानगळी वनांमध्ये आर्द्र वनांचा प्रकार केवळ...
सप्टेंबर 03, 2019
मुंबई - शासनाच्या विविध योजनांद्वारे गावांच्या सर्वांगिण विकास करणाऱ्या गावे, व्यक्ति व संस्थांना देण्यात येणाऱ्या महाराष्ट्र आदर्शगाव भूषण पुरस्काराची घोषणा मृद व जलसंधारण मंत्री प्रा. डॉ.तानाजीराव सावंत यांनी आज येथे केली असून यवतमाळ जिल्ह्यातील मौजे कोठोडा या गावास पाच लाख रुपयांचा प्रथम...
ऑगस्ट 26, 2019
नागपूर  : सायंकाळ होत आली की त्यांच्या हृदयाची धडधड वाढते...आपली कच्चीबच्ची घेऊन त्या घरात बंदिस्त होतात...भांडणाला आज काय नवीन कारण, या विचाराने त्यांचे अंग घामाघूम होते...रात्र झाली की बहुतांश घरातून भांडणाचे, रडण्याचे आवाज...हे ऐकले की अंगावर अक्षरश: काटा उभा राहायचा...कर्ता पुरुष...
ऑगस्ट 10, 2019
नागपूर : सन 1956 मध्ये विदर्भाचा आठ जिल्ह्यांचा प्रदेश मध्य प्रांतातून काढून द्विभाषिक मुंबई राज्याला जोडण्यात आला. पुढे 1960 मध्ये द्वैभाषिक राज्याचे विघटन करण्यात येऊन विदर्भासह संपूर्ण मराठी प्रदेशाचे नवे महाराष्ट्र राज्य अस्तित्वात आले. उर्वरित भाग जोडून गुजरात राज्याची निर्मिती...
जुलै 30, 2019
नागपूर : सार्वजनिक आरोग्याच्या पूर्व विभागात क्‍युलेक्‍स डासांमुळे होणाऱ्या जपानी मेंदूज्वराची लक्षणे असलेल्या 15 रुग्णांची नोंद झाली आहे. मात्र हे रुग्ण जपानी मेंदूज्वराचे आहेत की चंडीपुरा मेंदुज्वराचे आहेत हे अद्याप स्पष्ट झाले नसल्यामुळे आरोग्य विभागाची ही आकडेवारी गोंधळात घालणारी...
जुलै 28, 2019
नागपूर : राज्यात भाजपची सत्ता येताच मुख्यमंत्र्यांच्या शहरातील भाजपच्या नेत्यांचाही दर्जा उंचावला आहे. नागपूरमधील एका आमदारासह चार पदाधिकाऱ्यांना राज्यमंत्र्यांचा दर्जा मिळाला आहे. नुकतीच नगरसेवक अविनाश ठाकरे यांची ओबीसी महामंडळावर नियुक्ती करण्यात आली. ओबीसी मंत्रालय झाल्याने या...
जुलै 19, 2019
नागपूर : राज्याच्या पुरवणी अर्थसंकल्पात 8,400 कोटींची तरतूद करून राज्य सरकारने कोराडी येथे 660 मेगावॉट क्षमतेचे दोन औष्णिक विद्युत केंद्र सुरू करण्याचे ठरविले आहे. परंतु, विदर्भातील विविध संघटनांनी या प्रकल्पाला विरोध केला आहे. विदर्भात नवीन औष्णिक विद्युत केंद्र सुरू करू नये यासाठी...
जुलै 16, 2019
नागपूर : ठिबक, तुषार सिंचन नाही तर ऊस, संत्रा आणि बारमाही फळबागांना देणार नाही, असा निर्णय सरकारने घेतला आहे. 31 ऑक्‍टोबर 2020 नंतर म्हणजे 1 नोव्हेंबर 2020 पासून ही सोय नसलेल्या शेतकऱ्यांना उपसा सिंचन योजनांमधील पाणी मिळणार नाही. ठिबक सिंचनासाठी दोन ते तीन लाखांपर्यंतचा खर्च येतो....
जुलै 13, 2019
नागपूर : वाघ वाचविण्यासाठी मोठ्या प्रमाणात प्रयत्न होत असताना वाघांच्या मृत्यूची वाढणारी संख्या चिंताजनक आहे. राज्यात गेल्या सहा महिन्यांत 12 वाघांचा मृत्यू झाला. यात चंद्रपूर जिल्ह्यात सर्वाधिक 5, अमरावती तीन, नागपुरात दोन वाघ दगावले. तर यवतमाळ, भंडारा जिल्ह्यात प्रत्येकी एका वाघाचा...
जुलै 11, 2019
नागपूर : शहरातील युवा नेते विशाल विलास मुत्तेमवार यांची महाराष्ट्र प्रदेश कॉंग्रेस कमिटीच्या सचिवपदी यांची नियुक्ती करण्यात आली. विशाल मुत्तेमवार यांनी यापूर्वी प्रदेश युवक कॉंग्रेसचे महासचिवपद भूषविले आहे. सध्या ते भारतीय राष्ट्रीय कॉंग्रेसच्या प्रसार-प्रसिद्धी समितीचे सदस्य (मीडिया...
जुलै 02, 2019
 मुंबई : बंगालच्या उपसागराकडून येणाऱ्या एका कमी दाबाच्या क्षेत्रामुळे 2 ते 4 जुलै दरम्यान विदर्भातील बहुतांश भागात पाऊस पडण्याचा अंदाज हवामान तज्ज्ञांनी वर्तविला आहे. या दरम्यान पूर्व-विदर्भातील भंडारा, गोंदिया, गडचिरोली, चंद्रपूर, नागपूर, वर्धा, पूर्व-अमरावती आणि यवतमाळ जिल्ह्यांत...
जून 14, 2019
नागपूर : जिल्ह्यातील एकमेव कॉंग्रेसचे आमदार सुनील केदार आणि चंद्रपूर लोकसभा जिंकून देण्यात महत्त्वाचा वाटा असणाऱ्या विजय वडेट्टीवार यांना कॉंग्रेसने प्रमोशन दिले आहे. वडेट्टीवारांना गटनेते करण्यात आले असून केदार यांना पक्षाचा प्रतोद करण्यात आले आहे. विशेष म्हणजे दोन्ही नेत्यांची दबंग...
जून 14, 2019
नागपूर : राज्यात गर्भवती राहणाऱ्या एकूण महिलांपैकी 30 टक्के माता प्रसूतीदरम्यान जोखमीच्या उंबरठ्यावर उभ्या असतात. त्यापैकी प्रसूत होणाऱ्या दर लाख गरोदर मातांमध्ये 61 माता दगावतात. प्रसूतीदरम्यान होणाऱ्या मातामृत्यूस अतिरिक्त रक्तस्रावाचे प्रमाण सर्वाधिक आहे. देशातील अन्य राज्यांशी...
मे 15, 2019
मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी दुष्काळ निवारणाबाबत आज 'वर्षा'वर जाण्याचे ठरवले असतानाच राज्य सरकारने या संदर्भात केलेल्या कामांचा तपशील मुख्यमंत्री कार्यालयाने जारी केला आहे. आज महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी पत्रकार परिषद बोलावली आहे.  तंत्रज्ञानाचा उचित वापर केला, तर...
मे 04, 2019
नागपूर : राज्यातील ग्रामीण भागातील अर्थव्यवस्थेला हातभार लावणाऱ्या तेंदूपत्ता लिलावाला यंदा मागणी नसल्याने सात राउंडनंतरही महाराष्ट्रातील सरासरी 77 युनिटची विक्री झालेली नाही. परिणामी, शासनासह तेंदूपत्ता तोडणाऱ्या मजुरांनाही आर्थिक फटका बसण्याची शक्‍यता आहे. 218 युनिट विक्रीसाठी होते,...
एप्रिल 29, 2019
पुणे : उन्हाच्या चटक्‍यात संपूर्ण महाराष्ट्र अक्षरशः होरपळत आहे. विदर्भात तीव्र उष्णतेच्या लाटेचा इशारा देण्यात आला; तर मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात उष्णतेची लाट पुढील दोन दिवस कायम राहणार आहे. याचदरम्यान बंगालच्या उपसागरावर घोंगावणाऱ्या "फोणी' चक्रीवादळाची तीव्रता वाढणार असल्याचा इशाराही हवामान...
एप्रिल 28, 2019
नागपूर : गेल्या तीन-चार दिवसांपासून उन्हाच्या तडाख्याने त्रस्त असलेल्या वैदर्भींचा ताप आणखी वाढला असून नागपूरचा पारा 45.3 अंशावर गेला आहे. त्यामुळे नागपूरकरांना दिवसभर चटके सहन करावे लागत असून उष्माघाताने चार जणांचा बळी घेतला. त्यामुळे बस करा सूर्यदेवा अशी म्हणण्याची पाळी नागरिकांवर...
एप्रिल 27, 2019
मुंबई : मागील काही दिवसांपासून संपुर्ण महाराष्ट्रात सुर्य आग ओकत आहे. त्यातही विदर्भात याचे प्रमाण सर्वाधिक आहे. जगातल्या सर्वात उष्ण 15 शहरांमध्ये विदर्भातील तब्बल सहा शहरांचा समावेश असल्याचे 'इआय डोरॅडो' हवामानाचा अभ्यास करणाऱ्या वेबसाइटवर जाहीर करण्यात आला आहे. यावरून वाढत्या तापमानाची दाहकता...
एप्रिल 11, 2019
लोकसभा 2019 नागपूर : लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यात विदर्भातील सात मतदारसंघांत आज गुरुवारी (ता. 11) मतदान झाले. यामध्ये नागपूर, रामटेक, भंडारा-गोंदिया, गडचिरोली-चिमूर, वर्धा, चंद्रपूर व यवतमाळ-वाशीम मतदारसंघांचा समावेश आहे.  आज दिवसभर महाराष्ट्रात उन्हाचा पारा तापत...