एकूण 31 परिणाम
ऑक्टोबर 13, 2019
नागपूर : महाराष्ट्रात प्रथमच निवडणुकीत कोण निवडून येणार याची प्रत्येकाला जाणीव आहे. किती जागा निवडून येणार, यावरच चर्चा होत आहे. महायुतीपुढे सर्वच पक्ष हतबल झाले. कॉंग्रेसचे नेते राहुल गांधी महाराष्ट्रातील अपयशाच्या भीतीमुळे बॅंकॉकला गेले, असा टोला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज...
ऑक्टोबर 03, 2019
नागपूर : दक्षिण नागपूरचे आमदार सुधाकर कोहळे यांचे तिकीट कापल्याने त्यांचे समर्थक व दक्षिणेतील भाजपचे काही कार्यकर्ते आक्रमक झाले असून बुधवारी उदयनगर चौकात रास्ता रोको आंदोलन करून त्यांनी निषेध व्यक्त केला. कार्यकर्त्यांचा अपमान, बंडखोर मित्राचा सन्मान असे फलक झळकावून त्यांनी थेट...
ऑक्टोबर 02, 2019
नागपूर : पाच वर्षात माझे काय चुकले हे पक्षाने सांगावे? मित्रप्रेमामुळे तिकीट कापल्या जात असेल तर हा सर्वसामान्य कार्यकर्त्यांवरचा अन्याय आहे, अशा शब्दात दक्षिण नागपूरचे विद्यमान आमदार सुधाकर कोहळे यांनी पक्षश्रेष्ठींवर नाराजी व्यक्त केली. उद्या बुधवारी दक्षिण नागपुरातील...
सप्टेंबर 14, 2019
नागपूर : महानगरपालिकेच्या माध्यमातून बजेरियासारख्या भागात तयार होणाऱ्या "ई-लायब्ररी'तून भविष्यात अटलजींसारखे प्रज्ञावंत विद्यार्थी घडतील, असा विश्‍वास केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी व्यक्त केला. लिकेतर्फे बजेरियातील लाल शाळेत "ई लायब्ररी'च्या भूमिपूजनप्रसंगी ते बोलत होते....
सप्टेंबर 11, 2019
नागपूर : राज्यात देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री आणि केंद्रात मी मंत्री असल्याने शहराच्या विकासासाठी निधी आणण्याची संधी मिळाली. या डबल इंजिनमुळे कामाला वेग आला असला तरी शहराच्या चौफेर विकासाचे श्रेय हे येथील जनतेलाच जाते, असे नमूद करीत केंद्रीय रस्ते परिवहनमंत्री नितीन गडकरी यांनी जनतेने...
जुलै 28, 2019
नागपूर : राज्यात भाजपची सत्ता येताच मुख्यमंत्र्यांच्या शहरातील भाजपच्या नेत्यांचाही दर्जा उंचावला आहे. नागपूरमधील एका आमदारासह चार पदाधिकाऱ्यांना राज्यमंत्र्यांचा दर्जा मिळाला आहे. नुकतीच नगरसेवक अविनाश ठाकरे यांची ओबीसी महामंडळावर नियुक्ती करण्यात आली. ओबीसी मंत्रालय झाल्याने या...
जुलै 23, 2019
नागपूर  ः शहरातील पाणीपुरवठ्याबाबत विरोधकांनी केलेल्या चर्चेच्या मागणीला महापौरांनी बगल दिला. त्यामुळे विरोधी पक्षासह बसप, राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या नगरसेवकांनी महापौरांच्या आसनापुढे घोषणाबाजी केली. विरोधकांच्या घोषणाबाजीला सत्ताधाऱ्यांनीही महापौरांच्या आसनापुढे घोषणाबाजीनेच प्रत्युत्तर...
जुलै 07, 2019
नागपूर : पूर्व नागपुरातून सर्वाधिक 76 हजार मतांची आघाडी मिळाली. पुढील विधानसभेत एक लाखावर मतांची आघाडी मिळाली पाहिजे. लोकसभा निवडणुकीदरम्यान कुठल्या बूथवर किती आघाडी मिळाली, यावरून कार्यकर्त्यांचे ग्रेडेशन करा. नापास तसेच थर्ड व सेकंड ग्रेड कार्यकर्त्यांना 'प्रोटीन' द्या, परंतु...
जून 22, 2019
नागपूर : लोकसभेतील दारुण पराभवानंतर कॉंग्रेसचे आणखी खच्चीकरण करण्यासाठी अनेक नेत्यांना ऐन विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर भाजपमध्ये आणण्याच्या हालचाली मुख्यमंत्र्यांनी सुरू केल्या आहेत. यात नागपूरचाही समावेश असून, शुक्रवारी मुंबईत काही नेत्यांसोबत त्यांनी चर्चाही केल्याचे खात्रीलायक...
जून 14, 2019
नागपूर : जिल्ह्यात डझनभर आमदार, मुख्यमंत्री, केंद्रीयमंत्री, पालकमंत्री असतानाही लोकसभेच्या निवडणुकीत भाजपला पाच लाखांचे मताधिक्‍य मिळू शकले नाही. उलट कॉंग्रेसच्या मतांमध्ये तुलनेत वाढ झाली आहे. त्यामुळे भाजपला रोखण्याची चांगली संधी असून आता विधानसभेसाठी जोमाने कामाला लागण्याचे निर्देश...
फेब्रुवारी 11, 2019
काँग्रेसकडून नागपूर हिसकावून घेतल्यानंतर तो भाजपचा बालेकिल्ला झाला. नितीन गडकरींसह मुख्यमंत्र्यांनी मोठे कार्य उभे केले हीच जमेची बाजू आहे. मात्र, सामाजिक नाराजी दूर करण्याचे आव्हान त्यांच्यासमोर आहे. काँग्रेसला गटबाजीचे ग्रहण आहे. भाजपचे ‘हेवी वेट’ नेते केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्री...
नोव्हेंबर 17, 2018
विलास मुत्तेंमवारांना "फटाके' नागपूर : पक्षश्रेष्ठींची इच्छा नसल्याने माजी केंद्रीय मंत्री विलास मुत्तेमवार यांचा पत्ता जवळपास कट झाला आहे. त्यांना नाही तर विकास ठाकरे यांना लोकसभेची उमेदवारी द्यावी अशी जोरदार मागणी आज त्यांच्या समर्थकांनी केली. पर्याय म्हणून माजी राज्यमंत्री राजेंद्र...
ऑगस्ट 03, 2018
नागपूरनागपूर लोकसभा मतदारसंघात नशीब आजमावण्यासाठी काँग्रेसमध्ये नेत्यांची चांगलीच स्पर्धा लागली असून आता उमेदवारी मजबूत करण्यासाठी उमेदवारांनी सोशल मीडियाचा वापर करण्याला सुरवात केली आहे.  नागपूर लोकसभा मतदारसंघातून केंद्रीयमंत्री नितीन गडकरी निवडून आलेले...
जानेवारी 29, 2018
नागपूर - शहरात दर्जेदार शिक्षण संस्था आणण्यासाठी शासन प्रयत्न करीत आहेत. नागपुरात लॉ युनिव्हर्सिटी सुरू झाली. आता या युनिव्हर्सिटीच्या प्रत्यक्ष कामाला सुरुवात करण्यासंदर्भात निर्णय घेण्यात आला असून ७५० कोटींचा खर्च येणार आहे. पहिल्या टप्प्यात दोनशे कोटींची कामे केली जाणार असल्याचे...
जानेवारी 08, 2018
नागपूर - नागपूरने नेहमीच इतिहास जतन करण्याचा प्रयत्न केला. चांगले रस्ते, चांगले  पूल, चांगल्या शैक्षणिक सोयी आहेत. आता भविष्यात नागपूरची पुण्यासारखीच राज्याची सांस्कृतिक राजधानी म्हणून ओळख होण्याची गरज असल्याचे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी आज येथे सांगितले.  शिवाजीनगरातील शिवाजी...
सप्टेंबर 21, 2017
नागपूर - बहुप्रतीक्षित अशा कविवर्य सुरेश भट सभागृहाचे लोकार्पण शुक्रवारी (ता. २२) देशाचे राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते होणार आहे. उद्‌घाटन सोहळ्याची जय्यत तयारी तसेच सुरक्षा यंत्रणेची रंगीत तालीम सध्या सभागृह आणि रेशीमबाग परिसरात सुरू आहे. रेशीमबाग मैदान, चौकांमधील व्हिडिओ...
जुलै 30, 2017
नागपूर - मुंबईत महापालिकेतील भाजप नगरसेवकांचे प्रशिक्षण शिबिर सुरू असून, यात प्रामुख्याने शहरातील पदाधिकारी व महापालिकेचे पदाधिकारीच मार्गदर्शन करीत आहेत. त्यामुळे काही नगरसेवकांनी नागपूरकरांकडूनच मार्गदर्शन होते, तर त्यासाठी मुंबई कशाला? नागपुरातही ते शक्‍य होते, अशी खंत व्यक्त करीत...
जून 22, 2017
नागपूर - पहाटे साडेपाचपासून हजारोंच्या संख्येने लोक धंतोलीतील यशवंत स्टेडियमच्या दिशेने वळत होते. साडेसहापर्यंत स्टेडियमवर मोठी गर्दी झाली आणि हजारोंच्या संख्येने आलेल्या लोकांनी सामूहिक योगासनांचे प्रात्यक्षिक केले. सलग तिसऱ्या आंतरराष्ट्रीय योगदिनाला नागपूरकरांनी उत्स्फूर्त प्रतिसाद ...
जून 20, 2017
नागपूर - नागरिकांना दोन डस्टबीन देण्यासाठी नगरसेवकांच्या वॉर्डनिधीतून दोन लाख देण्याचे सत्ताधाऱ्यांनी बंधनकारक केले. मात्र, आज नगरसेवकांनी अर्थसंकल्पावरील चर्चेदरम्यान डस्टबीनसाठी निधी देण्यास विरोध केला. यात केवळ कॉंग्रेस किंवा बसपाचेच नगरसेवक नाही, तर सत्ताधारी नगरसेवकांचाही समावेश...
फेब्रुवारी 28, 2017
नागपूर - महापालिका निवडणुकीतील पराभवामुळे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांना बदलण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. दिल्लीतून प्रदेशाध्यक्ष कोण आणि कसा हवा, अशी विचारणा स्थानिक नेत्यांना केली जात आहे. यावरून चव्हाण विरोधकांच्या मागणीला यश येत असल्याचे बोलले जात आहे. नेतृत्व बदलावर मुंबईत...