एकूण 65 परिणाम
ऑक्टोबर 02, 2019
नागपूर : राष्ट्रपिता महात्मा गांधी यांनी दिलेला स्वच्छतेचा संदेश सर्वसामान्य जनतेपर्यंत पोहोचावा तसेच त्यांच्यात स्वच्छतेची भावना जागृत व्हावी, यासाठी भारत सरकारने चलनी नोटावर स्वच्छतेचा लोगो व स्लोगन प्रकाशित केला. नोटावर अशाप्रकारचा लोगो असावा, अशी सूचना खुद्द एका नागपूरकरानेच...
सप्टेंबर 26, 2019
नागपूर : तत्काळ उपचार देऊन रुग्णाला होणारा त्रास कमी करावा, हाच कुठल्याही शासकीय रुग्णालयाचा हेतू असतो. परंतु, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात (मेडिकल) गंभीर उपचाराकडे दुर्लक्ष होण्याचे प्रमाण वाढले आहे. गंभीर अपघाताचा तसेच गंभीर दुखणे घेऊन आलेल्या रुग्णांना पहिले एक्‍स-रे...
सप्टेंबर 21, 2019
हिंगणा एमआयडीसी  (जि.नागपूर):   अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेला आपली बसचा प्रश्‍न अखेर मार्गी लागला. "सकाळ'मधून या संदर्भात वृत्त प्रकाशित होताच यंत्रणा खळबडून जागी झाली. सोमवारी बसचे उद्घघाटन झाले. बस सुरू झाल्याने गावक-यांनी "सकाळ' चे आभार मानले.  आमदार समीर मेघे यांनी बसला हिरवी...
सप्टेंबर 20, 2019
नागपूर ः सकाळची वेळ. मेडिकलच्या अस्थिरोग विभागाच्या शस्त्रक्रियागृहात हिप (कमरेचे हाड) प्रत्यारोपण सुरू होते. ही शस्त्रक्रिया सुरू असताना अचानक 62 वर्षीय महिला रुग्णाच्या हृदयाचे ठोके बंद पडले. रुग्ण दगावला असल्याचे कळताच मेडिकलमधील या शस्त्रक्रिया गृहातील डॉक्‍टरांमध्ये एकच खळबळ उडाली...
सप्टेंबर 18, 2019
नागपूर : नागपूरकर गाढ झोपेत असताना मध्यरात्री बाराच्या सुमारास अचानक मेघगर्जना व विजांच्या प्रचंड कडकडाटासह मुसळधार पावसाने उपराजधानीला चांगलेच झोडपून काढले. जवळपास तासभर बरसलेल्या धो-धो पावसामुळे अख्खे शहर चिंब भिजले. अंबाझरी तलावही "ओव्हरफ्लो' झाला. हवामान विभागाने गुरुवारीदेखील...
ऑगस्ट 29, 2019
नागपूर ः विदेशी व शोभेच्या वृक्षांमुळे अन्नसाखळीत बाधा निर्माण होत असल्याने या वृक्षांचे वाटप करणाऱ्या अधिकाऱ्यांवर शिस्तभंगाची कारवाई करण्याच्या सूचना मंत्रालयातून आल्याने वन विभागात खळबळ उडाली होती. मात्र, या वृक्षांच्या लागवडीमुळे पशुपक्ष्यांचा अधिवास व नैसर्गिक अन्नसाखळीत बाधा...
ऑगस्ट 26, 2019
नागपूर  : महिला व बालकल्याण विभागाने अंगणवाडीतील लाभार्थी, तीन ते सहा वर्षे वयोगटातील लाभार्थ्यांचा नाश्‍ता आणि आहार अवघ्या आठ रुपयांत देण्याची अट निविदेत टाकल्याने बचतगटांना एवढ्या अत्यल्प दरात पोषण आहार कसा द्यायचा, ही चिंता सतावत आहे. संबंधित विभागाने अलीकडेच आहार पुरवठ्याच्या...
ऑगस्ट 19, 2019
नागपूर ः महापालिकेने शिकस्त घोषित केलेले पूनम मॉलचे बांधकाम पाडण्यासाठी महापालिकेच्या अतिक्रमण विभागाचा ताफा जेसीबी, ट्रक आदीसह पोहोचला. मात्र, दिवसभराच्या अथक प्रयत्नानंतरही महापालिकेच्या पथकाला बांधकाम पाडण्यात यश आले नाही. शिकस्त घोषित केलेले बांधकामही तोडण्यासाठी यंत्रणा अपुरी...
ऑगस्ट 17, 2019
नागपूर ः चौराई धरणाचे दोन दरवाजे उघडण्यात आल्याने तोतलाडोह जलाशयाच्या पातळीत वाढ झाली. उपसा करण्यात आलेल्या मृतसाठ्यापेक्षा जास्त पाणी जमा झाले. मात्र, मनपाने नागरिकांना पुढील वर्षीही जूनपर्यंत पाणी मिळावे, यासाठी नियोजनावर भर दिला आहे. शिवाय चौराई धरणातून दररोज पाणी मिळण्याची शक्‍यता...
ऑगस्ट 12, 2019
व्यवसायानं बालरोगतज्ज्ञ असल्यानं गेल्या ५५ वर्षांत विविध वयोगटांतील मुलांशी संपर्क आला. आजारी नसलेल्या बालकांशी गप्पा मारताना ‘कुठल्या वर्गात आहेस? कुठली शाळा? पुढे काय व्हायचं आहे?’ असे प्रश्‍न विचारले जातात. ‘पुढे काय होणार?’ या प्रश्‍नाचं उत्तर बालकाचं वय व विचारांची परिपक्‍वता यावर अवलंबून असतं...
ऑगस्ट 11, 2019
हिंगणा (जि. नागपूर) : नगरपंचायत प्रशासनाने शहर हिरवेगार करण्यासाठी एक हजार वृक्षलागवड करण्याची मोहीम सुरू केली आहे. 15 ऑगस्टपर्यंत ही मोहीम पूर्ण करण्यात येणार आहे. हिंगणा शहराला ग्रीन सिटी करण्याचा संकल्प यावेळी करण्यात आला आहे.हिंगणा शहराला पुरातन वारसा आहे. शहरात वेणा व दुर्गा नदीचा...
ऑगस्ट 07, 2019
नागपूर : डॉक्‍टरांनी भरती होण्यासाठी बोलावले होते. परंतु आज डॉक्‍टरांचा संप आहे. तपासणी होणार नाही. नंतर या....हा संवाद आहे, मेडिकलच्या रेडिओलॉजी विभागातील. संपाच्या पहिल्या दिवशीच बुधवारी मेडिकल, मेयो रुग्णालयांत रुग्णांना बाहेरचा रस्ता दाखवण्यात आला. मार्डच्या संपामुळे रुग्णसेवेसाठी...
ऑगस्ट 04, 2019
नागपूर : एका दिवसाच्या विश्रांतीनंतर शुक्रवारी पुन्हा सुरू झालेल्या पावसामुळे नागपूर जिल्ह्यातील आग्नेय (दक्षिण पूर्व) भागातील भिवापूर तालुक्‍यात पूरस्थिती निर्माण झाली आहे. अनेक गावांचा संपर्क तुटला आहे. नागपूर गडचिरोली मार्गावरून वाहतूक बंद झाली आहे. विशेषतः...
ऑगस्ट 03, 2019
नरखेड, ता. 2 : नरखेड स्थानकावर थांबा नसलेली रामेश्‍वरम एक्‍स्प्रेस अचानक थांबली. रुग्णवहिकाही प्लॅटफॉर्मवर दाखल झाली. प्रवाशांना काय होते ते कळायला मार्ग नव्हता. त्यातच एक परिचारिका धावत आली. तिने महिलेला डब्यातून काढून रुग्णवाहिकेत बसवले. तेवढ्यातच बाळाचा रडण्याचा आवाज सुरू झाला आणि सर्वांनी...
जुलै 31, 2019
नागपूर  : गेल्या पाच-सहा दिवसांपासून विदर्भात मुक्‍कामी असलेल्या वरुणराजाने मंगळवारी शहरात पुन्हा दमदार हजेरी लावली. दिवसभर कोसळलेल्या संततधार पावसाने शहर अक्षरश: पाणी पाणी झाले. पावसामुळे नागपूरकर तर सुखावलेच, शिवाय बळीराजाच्याही चेहऱ्यावर आनंद फुलला आहे. शहरात रात्री साडेआठपर्यंतच्या...
जुलै 25, 2019
नागपूर  : भारतीय हवामान विभागाने देशात यंदा सरासरी पावसाचा अंदाज वर्तविला. आतापर्यंत मॉन्सूनने विदर्भात दगा दिला असला, तरी शेतकऱ्यांसह सर्वसामान्य जनतेने चिंता करण्याचे काहीएक कारण नाही. पुढील दोन महिन्यांत दमदार पाऊस होणार असून, पावसाची सर्व तूट भरून निघेल, अशी शक्‍यता प्रादेशिक...
जुलै 25, 2019
नागपूर :  मेडिकलचा बाह्यरुग्ण विभाग. सकाळी दहाची वेळ. रुग्णांची तोबा गर्दी असतानाच येथील वीजपुरवठा खंडित झाला. याचा फटका उपचारासाठी आलेल्या हजारो गरीब रुग्णांना बसला. मेडिकलमधील एक्‍सरे, सिटी स्कॅन, सोनोग्राफीची सर्व यंत्रणा बंद पडली. याशिवाय रुग्णांच्या रक्तचाचण्यापासून इतर सर्व...
जुलै 24, 2019
नागपूर : "हॅलो ऽऽ अभिनंदन! तुमच्या मुलीने इयत्ता दहावीच्या परीक्षेत खूप छान गुण मिळविले. तिचे भविष्य अतिशय उत्तुंग असून, आम्ही तिला मोफत कोचिंग देण्यास तयार आहोत. अशाच हुशार विद्यार्थ्यांची आम्हाला गरज आहे. यासाठी तुम्हाला केवळ आमच्या संस्थेला भेट देऊन, प्रवेश निश्‍चित करावा लागेल.''...
जुलै 06, 2019
नागपूर : अग्रसेन चौकातील सेंट्रल एव्हेन्यूवर कासवांची विक्री करणाऱ्या दोघांना वन विभागाच्या पथकाने ताब्यात घेतले. त्यांच्याजवळून दहा कासव ताब्यात घेतले आहे. अग्रसेन चौक सेंट्रल एव्हेन्यूवर कासवांची तस्करी होत असल्याची माहिती पिपल्स फॉर ऍनिमल संस्थेने वन विभागाला दिली. वन विभागाने सापळा...
जुलै 06, 2019
नागपूर : बिल्डरने अनधिकृत बांधकाम करीत पार्किंगमध्येच दुकाने काढली. यातील एका गुंड प्रवृत्तीच्या दुकानदाराने दुसऱ्या दुकानदाराच्या दुकानावर ताबा घेतल्याने झालेल्या वादामुळे भांडे प्लॉट चौकात तणाव निर्माण झाला. स्थानिक नागरिकांच्या जमावाने या गुंड दुकानदाराचा कायमचा बंदोबस्त करण्याठी...