एकूण 34 परिणाम
ऑक्टोबर 16, 2019
नागपूर : शहरात स्वच्छतेसाठी महापालिका उपद्रव शोधपथक परिश्रम घेत आहे. मात्र, महापालिका आवारातच कर्मचाऱ्यांकडूनच घाण केली जात असल्याने आयुक्तांनी तीव्र संताप व्यक्त केला. त्यांनी महापालिकेच्या 12 कर्मचाऱ्यांना शिस्तभंगाच्या कारवाईची नोटीस बजावून निलंबित का करू नये, अशी विचारणा केली...
सप्टेंबर 02, 2019
नागपूर ः पंतप्रधान नरेंद्र मोदी येत्या 7 सप्टेंबरला सुभाषनगर स्टेशनपर्यंत मेट्रोतून सफारी करणार आहेत. नागपूर दौऱ्यात पंतप्रधान महापालिकेच्या काही प्रकल्पांचे लोकार्पणही करण्याची शक्‍यता आहे. यावेळी पंतप्रधान बहुप्रतीक्षित गोरेवाडा प्राणिसंग्रहालयाचेही लोकार्पण करणार...
ऑगस्ट 26, 2019
नागपूर : महापालिकेच्या अनेक सेवा कंत्राटी पद्धतीने सुरू आहे. आता महापालिकेने कंत्राटी पद्धतीवर क्रीडाधिकारी नियुक्त करण्यासंदर्भात पावले उचलली आहे. महापालिकेत या पदासाठी अनेकजण पात्र आहेत. मात्र, त्यांच्याकडे प्रभार न देता महिन्याला 20 हजार रुपये मानधनावर अधिकाऱ्यांची नियुक्ती म्हणजे...
ऑगस्ट 17, 2019
नागपूर ः चौराई धरणाचे दोन दरवाजे उघडण्यात आल्याने तोतलाडोह जलाशयाच्या पातळीत वाढ झाली. उपसा करण्यात आलेल्या मृतसाठ्यापेक्षा जास्त पाणी जमा झाले. मात्र, मनपाने नागरिकांना पुढील वर्षीही जूनपर्यंत पाणी मिळावे, यासाठी नियोजनावर भर दिला आहे. शिवाय चौराई धरणातून दररोज पाणी मिळण्याची शक्‍यता...
ऑगस्ट 10, 2019
नागपूर ः सध्या पाच इलेक्‍ट्रिक बस महापालिकेत दाखल होण्याचा मार्ग मोकळा झाला. आता केंद्र सरकारच्या अवजड उद्योग व सार्वजनिक उपक्रम विभागाने नागपूर शहरासाठी 100 इलेक्‍ट्रिक बसला मंजुरी दिली. त्यामुळे शहर बससेवा अत्याधुनिक होणार आहे. लवकरच इलेक्‍ट्रिक बसेस "आपली बस'च्या...
ऑगस्ट 10, 2019
नागपूर : महापालिकेच्या हद्दीत असलेल्या शाळांना शिजविलेला पोषण आहार देणाऱ्या बचतगटांच्या किचनची तपासणी शिक्षण समिती व अन्न व औषधे प्रशासन विभागाद्वारे करण्याचे ठरविले होते. मात्र, तपासणी करण्यात आलेले एकही किचन मानकानुसार नसताना, त्यांना "क्‍लीन चिट' देत तपासणीचा सोपस्कार समितीने करीत...
जुलै 09, 2019
नागपूर  : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नुकतेच "मन की बात'मधून पावसाचे पाणी जमिनीत मुरविण्यासाठी "रेन वॉटर हार्वेस्टिंग'ची मोहीम राबविण्याचा सल्ला दिला होता. मात्र, भाजपचीच सत्ता असलेल्या महापालिकेने "रेन वॉटर हार्वेस्टिंग'कडे यंदाही पाठ फिरविल्याने पंतप्रधानांच्या सल्ल्यालाही कुठलाही...
जुलै 01, 2019
नागपूर, : पावसाळ्यात बहुमजली इमारतीला लागून असलेल्या नाल्यावर पुलाच्या कामास सुरुवात करून कंत्राटदार 20 कुटुंबांच्या जिवावर उठल्याची धक्कादायक बाब पुढे आली आहे. बांधकामासाठी खोदकाम करीत असताना रविवारी रात्री झालेल्या पावसामुळे इमारतीलगतची माती खचण्यास प्रारंभ झाला. त्यामुळे दोन...
जून 24, 2019
नागपूर : नदी, नाला स्वच्छतेवर लक्ष केंद्रित केलेल्या महापालिकेने रस्त्यांवरील खड्ड्यांकडे पूर्णपणे दुर्लक्ष केल्याने पावसाच्या केवळ एका सरीमध्ये अनेक रस्त्यांवर पाणी साचले. रस्त्यांवरील खड्ड्यात साचलेल्या पाण्यामुळे वाहनधारकांना मनस्ताप सहन करावा लागला. त्यामुळे पावसाळ्यापूर्वी तयारीचा...
जून 14, 2019
नागपूर : महापालिकेने खासगी इंग्रजी माध्यमातील शाळांना टक्कर देण्याची तयारी सुरू केली. महापालिका शाळांमधून सेमी इंग्लिश विषयाचे वर्ग सुरू करण्याचा प्रस्ताव प्रशासनाने तयार केला आहे. हा प्रस्ताव मंजूर झाल्यास महापालिकेच्या प्राथमिक व माध्यमिक शाळांमध्ये इंग्रजीतून शिक्षण दिले जाणार असून...
मे 20, 2019
नागपूर - महापालिकेत कुठल्याही देखभाल दुरुस्तीवरच अधिक खर्च केला जात असल्याची अनेक उदाहरणे आहेत. आता वाचनालयेही याला अपवाद नाहीत. वाचनालयांत पुस्तकांचे महत्त्व सर्वश्रुत आहे. मात्र, महापालिकेने गेल्या काही वर्षांत पुस्तक खरेदीवरील खर्चाच्या तुलनेत दुप्पट निधी वाचनालये दुरुस्तीवर खर्च...
एप्रिल 15, 2019
नागपूर - शहरावर पाण्याचे संकट असताना रविवारी अग्निशमन विभागाच्या जवानांनी प्रात्यक्षिकासाठी हजारो लिटर पाण्याची उधळण केली. विशेष म्हणजे महापौर नंदा जिचकार, अतिरिक्त आयुक्त रवींद्र ठाकरे यांच्या उपस्थितीतच पाण्याची नासाडी करण्यात आली. त्यामुळे पाणी बचतीबाबत महापालिका पदाधिकारी व...
डिसेंबर 27, 2018
पुणे : महापालिकेतील अतिरिक्त आयुक्त शितल उगले-तेली यांची आज बदली करण्यात आली असून त्याबाबतचा आदेशही निघाला आहे. उगले यांच्या बदलीसाठी सत्ताधारी भाजपच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांनी  मुख्यमंत्र्यांकडे आग्रह धरला होता. त्यातून उगले यांची बदली झाल्याची चर्चा आहे. याआधी प्रेरणा देशभ्रतार यांचीही मुदतीपुर्वीच...
ऑक्टोबर 28, 2018
नागपूर - प्रशासन आणि लोकप्रतिनिधी दोन चाके असून त्यांनी मिळून काम केल्यास विकास शक्‍य आहे. परंतु महापालिका सभागृहात आयुक्तांविरुद्ध सत्ताधारी चित्र दिसते, ते व्हायला नको, असे नमूद करीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विविध महापालिकेतील सत्तारुढ पक्षांचे कान टोचले. नुकताच नागपूर...
ऑक्टोबर 28, 2018
नागपूर : प्रशासन आणि लोकप्रतिनिधी दोन चाके असून त्यांनी मिळून काम केल्यास विकास शक्‍य आहे. परंतु महापालिका सभागृहात आयुक्तांविरुद्ध सत्ताधारी चित्र दिसते, ते व्हायला नको, असे नमूद करीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विविध महापालिकेतील सत्तारुढ पक्षांचे कान टोचले. नुकताच नागपूर...
ऑक्टोबर 16, 2018
नागपूर - कामाची बिले न मिळाल्याने तसेच सिमेंट, गिट्टी दुकानदारांनी पैशाचा तगादा लावल्याने आलेल्या नैराश्‍यातून किशोर नायडू या कंत्राटदाराला हृदयविकाराचा धक्का आला. त्यामुळे त्यांना खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांच्या पत्नीने उपचारासाठी पैसे नसल्याने आयुक्तांना थकीत बिल...
सप्टेंबर 04, 2018
सोलापूर : मातीच्या गणेशमूर्तीच्या तुलनेत प्लास्टर ऑफ पॅरिसच्या म्हणजेच पीओपीचे गणेशमूर्ती स्वस्त असल्याने पीओपीच्या मूर्ती खरेदीकडे कल वाढला आहे. पीओपीच्या गणेशमूर्ती पाण्यात विरघळत नाहीत, त्यामुळे शहर आणि परिसरातील तलाव, विसर्जन कुंडाच्या ठिकाणी पाणी कमी झाल्यावर पीओपीच्या गणेशमूर्ती भग्नावस्थेत...
ऑगस्ट 22, 2018
गणेशोत्सवाच्या संदर्भातील अनेक नियमांना यंदा सवलत देण्यामागे आपली मतपेढी शाबूत ठेवण्याचा हेतू स्पष्ट दिसतो. तोंडावर आलेल्या निवडणुकांमुळे सणांच्या काळातील दणदणाट अधिकाधिक कर्कश्‍श होणार, अशीच चिन्हे आहेत.   लोकमान्य टिळकांनी सव्वाशे वर्षांपूर्वी सार्वजनिक गणेशोत्सवाची प्रथा सुरू केली, तेव्हा...
जुलै 19, 2018
औरंगाबाद : गेल्या पाच महिन्यांपासून शहरातील कचऱ्याचा प्रश्‍न सुटलेला नाही. यामुळे बुधवारी (ता.18) मुख्यमंत्र्यांनी हा प्रश्‍न तातडीने मार्गी लावा, अन्यथा महापालिका बरखास्त करू, असा इशारा देताच संतापलेल्या शिवसैनिकांनी गुरुवारी (ता.19) सकाळी अकरा वाजेच्या सुमारास जिल्हाधिकारी कार्यालयातच दोन ट्रक...
जुलै 14, 2018
सोलापूर : नागपूरच्या बैठकीत झालेल्या निर्णयानुसार मुख्यमंत्र्यांच्या आदेशाबाबत कोणतेही अधिकृत आदेश, पत्र किंवा सूचना न मिळाल्याने ई-लिलावाची प्रक्रिया राबविण्याबाबतचे काम सुरूच राहील, असे आयुक्त डॉ. अविनाश ढाकणे यांनी सांगितले. जसा आदेश येईल, तसा निर्णय घेण्यात येईल, असेही ते म्हणाले. ...