एकूण 16 परिणाम
ऑक्टोबर 10, 2019
तब्बल ऐंशी टक्के इतकं घसघशीत साक्षरतेचं प्रमाण असलेल्या ठाण्याचे भावी आमदार मात्र अल्पशिक्षीत असणार आहेत. कारण ठाण्यातल्या बहूतेक मतदारसंघातले उमेदवार जेमतेम दहावी पास आहेत. त्यामुळे तब्बल २४ आमदारांसह मुंबई खालोखाल राज्याच्या राजकीय पटलावर महत्व राखून असलेल्या ठाण्यातून दहावी पास आमदार विधानसभेत...
सप्टेंबर 08, 2019
नवी मुंबई : सतत लांबणीवर पडत चाललेल्या माजी मंत्री गणेश नाईक यांच्या भाजप प्रवेशात आता आणखिन एक नवीन अडचण उभी राहीली आहे. नवी मुंबईतील शिवसनेच्या नगरसेवकांसोबत पदाधिकाऱ्यांनी नाईकांना तिव्र विरोध केला आहे. संदीप व गणेश नाईकांचे निवडणूकीत काम करण्यास या नगरसेवकांनी तिव्र शब्दांत नकार दिला आहे....
जुलै 19, 2019
ठाणे : उत्तर भारतीयांची निर्णायक मते लक्षात घेऊन एकनाथ शिंदे यांनी नालासोपारा विधानसभा मतदारसंघातून वरिष्ठ पोलिस निरीक्षक प्रदीप शर्मा यांना मैदानात उतरवण्याची तयारी सुरू केली आहे. त्यामुळे भाजपमधील स्थानिक इच्छुकांची चिंता वाढली आहे. नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत पालघर लोकसभा...
जुलै 12, 2019
नवी मुंबई - लोकसभा निवडणुका घोषित होण्याच्या पार्श्‍वभूमीवर घाईघाईत वाशीच्या पोस्ट कार्यालयात पासपोर्ट कार्यालयाचे उद्‌घाटन करणाऱ्या शिवसेनेच्या नेत्यांना शनिवारी पुन्हा एकदा कार्यालयाचे उद्‌घाटन करावे लागणार आहे. ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते कार्यालयाचे उद्‌...
मे 24, 2019
भाजपवर शरसंधान साधूनही ऐन निवडणुकीतील युतीद्वारे जागा जिंकणे सत्ताधाऱ्यांना जमले. परंतु, काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीला सभा जिंकणाऱ्या नेतृत्वापासून मुद्द्यांचे राजकारण करण्यापर्यंत अनेक बाबतीत अपयश आले. वंचित आघाडीने मते मिळविली, ही आणखी जमेची बाजू आहे. मुंबईतील सहा लोकसभा मतदारसंघांसह मुंबईशी...
एप्रिल 28, 2019
मुंबई - राज्यात लोकसभा निवडणुकीसाठी नुकतेच तीन टप्प्यांतील मतदान पार पडले असून, चौथ्या आणि अखेरच्या टप्प्यातील सतरा मतदारसंघांसाठीचा जनादेश सोमवारी (ता.२९) मतपेटीत बंद होणार आहे.  या शेवटच्या टप्प्यासाठी सर्वच राजकीय पक्षांनी चांद्यापासून बांद्यापर्यंत प्रचार करीत घाम गाळला. राष्ट्रवादी काँग्रेसचे...
फेब्रुवारी 22, 2019
युतीच्या घोषणेमुळे कल्याण मतदारसंघातील शिवसेनेच्या विजयाचा मार्ग सुकर झाल्याने काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीच्या गोटात शांतता पसरली आहे. आघाडीला ‘मनसे’च्या ‘इंजिन’मुळे गती मिळाल्यास ‘आगरी कार्ड’च्या बळावर चुरशीची लढत पाहायला मिळू शकते. शिवसेनेतून २००९ मध्ये आनंद परांजपे निवडून आले होते. त्यानंतर ते...
डिसेंबर 13, 2018
मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी 18 डिसेंबरला कल्याण मेट्रोच्या भूमिपूजन कार्यक्रमास येत असल्याने शहरातील राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. सहा महिन्यावर केंद्रातील निवडणुका आल्याने पुन्हा एकदा लोकांच्या भावनेला हात घालण्याचा हा प्रयत्न असल्याची टीका विरोधकांनी केली आहे. ''तुम्ही लोकांना एकदाच मूर्ख...
ऑक्टोबर 22, 2018
वज्रेश्वरी : भिवंडी कृषि उत्पन्न बाजार समिती या ठिकाणी खाली असलेल्या संचालक पदासाठी आज विशेष बैठक घेऊन निवड प्रक्रिया करण्यात आली. यावेळी राष्ट्रवादी, काँग्रेस व शिवसेना या पक्षांनी मिळून राष्ट्रवादीचे ईरफान भूरे याना आठ व नऊ अशा सखेने निवडून संचालक पदी निवड करण्यात आली भिवंडी तालुक्यातील सुपरीचित...
जून 06, 2018
नवी मुंबई - कोकण पदवीधर मतदार संघाच्या निवडणुकीच्या प्रचाराचे बिगूल वाजले असून राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार बुधवारी (ता. 6) प्रचार सभा घेणार आहेत. कोकण पदवीधर मतदार संघाचे राष्ट्रवादी कॉंग्रेसचे उमेदवार नजीब मुल्ला यांच्या प्रचारासाठी वाशीतील विष्णुदास भावे नाट्यगृहात सकाळी त्यांची सभा...
जून 03, 2018
ठाणे - गेली पंचवीस वर्षे लक्ष न दिलेल्या पालघर लोकसभा मतदारसंघात सुमारे अडीच लाख मतांपर्यंत मजल मारल्याने शिवसेनेतील चाणक्‍यांचा आत्मविश्वास दुणावला आहे. त्यामुळेच राजकीय जाणकारांनी युतीचा कितीही होरा केला, तरी लोकसभा आणि विधानसभा निवडणूक भाजपशिवाय लढविण्याच्या मतावर शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव...
मे 15, 2018
मोखाडा : भाजपचे दिवंगत खासदार अॅड.चिंतामण वनगा यांच्या निधनानंतर, पालघर लोकसभेची पोटनिवडणूक सहानुभूतीमुळे बिनविरोध होईल ही अपेक्षा सर्वच राजकीय पक्षांना होती. मात्र, शिवसेना आणि भाजप मधील कलह, तसेच भाजप मधील जिल्ह्यातील राजकीय कुरघोडीने ही पोटनिवडणूक होऊ घातली आहे. ही निवडणूक जाहीर होताच,...
नोव्हेंबर 11, 2017
भिवंडी - राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत भाजप आणि शिवसेनेत चुरशीच्या लढती झाल्या असताना ठाणे जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत मात्र भाजपने शिवसेनेबरोबर युतीसाठी तयारी दर्शवली आहे. भाजपचे ठाणे विभागीय अध्यक्ष आणि खासदार कपिल पाटील यांनी भाजप युतीसाठी तयार असल्याची माहिती पत्रकारांना दिली...
नोव्हेंबर 09, 2017
ठाणे - ठाणे जिल्ह्याच्या विभाजनानंतर तब्बल साडेतीन वर्षांनंतर ठाणे जिल्हा परिषदेत प्रशासकीय राजवट संपुष्टात येऊन लोकप्रतिनिधींची राजवट येणार आहे. जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीच्या घोषणेने ग्रामीण राजकारणात ‘चैतन्य’ आले असून, इच्छुक उमेदवारांची लगबग सुरू झाली आहे. ठाणे जिल्ह्याचे १...
जून 05, 2017
भिवंडी - भिवंडी महापालिकेची महापौर व उपमहापौरपदासाठीची निवडणूक ९ जूनला होणार आहे. पदासाठी नगरसेवकांमध्ये धावपळ उडाली आहे. महापालिकेत सत्ता स्थापन करण्यासाठी भाजपने व्यूहरचना सुरू केल्याने काँग्रेसही सतर्क झाली आहे. नगरसेवकांत फूट पडू नये, यासाठी काँग्रेसने नगरसेवक सुरक्षित स्थळी नेऊन ठेवल्याचे...
मार्च 07, 2017
ठाणे - ठाणे महापालिकेचे 21 वे महापौर म्हणून सोमवारी शिवसेनेच्या मीनाक्षी शिंदे यांची; तर उपमहापौरपदी रमाकांत मढवी यांची बिनविरोध निवड झाली. महापौरपदासाठी भाजप आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या; तर उपमहापौरपदासाठी कॉंग्रेस, भाजप आणि राष्ट्रवादीच्या नगरसेवकांनी उमेदवारी दाखल केली होती; पण या सर्व...