एकूण 81 परिणाम
जून 09, 2019
मुंबई - फेसबुक, व्हॉट्‌सॲप, इन्स्टाग्राम यांसारख्या माध्यमांचा वाढता प्रभाव लक्षात घेऊन राष्ट्रवादी काँग्रेसने सोशल मीडियावर भर देण्याचे ठरवले आहे. पक्षाच्या २०व्या वर्धापन दिनाचे औचित्य साधून पक्षाध्यक्ष शरद पवार उद्या (ता. ९) फेसबुक लाइव्हच्या माध्यमातून जनतेशी संवाद साधणार आहेत. पवार उद्या सकाळी...
जून 07, 2019
मुंबई - राज्यातील दुष्काळी परिस्थितीच्या पार्श्‍वभूमीवर चारा छावण्यांचा कालावधी जूननंतरही वाढवण्याबाबत राज्य सरकार लवकरच निर्णय घेणार आहे. दुष्काळी परिस्थितीवर राबवलेल्या उपाययोजनांचा तपशील दाखल करण्याचे निर्देश उच्च न्यायालयाने गुरुवारी (ता. 6) राज्य सरकारला दिले.  राज्यातील बहुतेक जिल्ह्यांमध्ये...
जून 06, 2019
मुंबई - राज्य सरकारने बारामतीला जाणाऱ्या कालव्याचे पाणी बंद केले आहे. या पार्श्‍वभूमीवर बुधवारी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी राज्य सरकारला ‘पाण्यावरून राजकारण करू नये,’ असा टोला लगावत ‘घरचा आहेर’ दिला. दरम्यान, सरकार राजकारण करीत नसल्याचे स्पष्टीकरण अर्थ आणि वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी...
जून 02, 2019
हिंगोली - नागपंचमीपासून पाऊस गायब झाला त्यो आलाच नाही. येलदरी धरण कितीतरी वर्षांपासून भरलं नाही. चारा विकत घेऊन आजवर जनावरं सांभाळली. आता चारा बी नाय अन् पैसे बी नाईत. यंदा पाऊस लवकर आला तर ठीक, नाहीतर चाऱ्यापायी उरली सुरली जनावरेदेखील विकून टाकावी लागतील. पेरणीसाठी पीककर्ज वेळेवर दिले तर बरं, नाही...
मे 28, 2019
मुंबई - राज्यातील दुष्काळाबाबत दाखल झालेल्या जनहित याचिकांवर तातडीने सुनावणी घेण्यास उच्च न्यायालयाने सोमवारी नकार दिला. या याचिकेवर उन्हाळी सुटीनंतर नियमित न्यायालयात सुनावणी होईल. सरकारने सुमारे 400 तालुके-महसूल मंडळांत दुष्काळ जाहीर केला आहे. दुष्काळी परिस्थितीमुळे विदर्भ आणि मराठवाड्यासह...
मे 25, 2019
मुंबई - राज्यातील अनेक जिल्ह्यांत गंभीर पाणीटंचाई निर्माण झाली असून, मागील वर्षाच्या तुलनेत यंदा निम्माच पाणीसाठा असल्याची माहिती राज्य सरकारने प्रतिज्ञापत्रावर उच्च न्यायालयात दिली. राज्यातील विहिरी आणि धरणांत मागील वर्षी मे महिन्यात 24.80 टक्के पाणीसाठा होता; या वर्षी केवळ 13.76...
मे 22, 2019
वडगाव पंगू (जि. नाशिक) - गाव तस सधन. ग्रामविकासात उमद्या तरुणांची फळी. ‘जलयुक्त’ योजनेत गावाने कामांची विकास गंगा आणून ती पूर्णत्वास नेली. गावाने जिल्ह्यात दुसरा क्रमांकही मिळविला. मात्र, वरुणराजाने व पाणी योजनेच्या अभावाने गावाला दुष्काळाला सामोरे जावे लागत आहे.  नांदगाव तालुक्‍याच्या शिवजवळ...
मे 18, 2019
कास - सदाहरीत व अतिवृष्टीच्या कास पठाराच्या कुशीत वसलेल्या मौजे कुसुंबीमुरा येथील आखाडे वस्तीवर गेल्या महिनाभरापासून भीषण पाणीटंचाई जाणवत आहे. ग्रामस्थांना हंडाभर पाण्यासाठी अनेक किलोमीटरची पायपीट करून डोंगरदऱ्यातील झऱ्यांचा शोध घ्यावा लागत आहे.  कुसुंबीमुरा हे कास पठाराच्या पश्‍चिमेला...
मे 16, 2019
टाकोबाईचीवाडी गावाने राबवला ओढाजोड प्रकल्प सातारा जिल्ह्यातील फलटण तालुक्याचा काही भाग दुष्काळाने होरपळत आहे. मात्र काही गावे नियोजनबद्ध कामांमधून दुष्काळ व पाणीटंचाईमुक्त होण्याकडे वाटचाल करू लागली आहेत. टाकोबाईचीवाडी हे त्यातीलच एक छोटेसे गाव आहे. या गावात २०१४ पासून जलसंधारणाची विविध कामे झाली....
मे 16, 2019
देशाला आणि महाराष्ट्राला स्वातंत्र्यपूर्व काळात आणि स्वातंत्र्यानंतरच्या काळात वरचेवर दुष्काळाच्या संकटाला सामोरे जावे लागले आहे. भीषण दुष्काळी परिस्थितीत मोठ्या संख्येने भूकबळी गेल्याचे भयावह संकट जनतेला अनुभवावे लागले आहे. आपल्या राज्यात 1972 मध्ये पडलेल्या भीषण दुष्काळी परिस्थितीमध्ये भूकबळी...
मे 14, 2019
अमळनेर ः बोरी नदीकाठावरील कोळपिंप्रीसह अंबापिंप्री, कन्‍हेरे- फापोरे परिसरात भीषण पाणीटंचाई जाणवत आहे. पाण्यासाठी ग्रामस्‍थांना सुमारे पाच किलोमीटरपर्यंत नदीपात्रात येऊन पाणी भरावे लागत आहे. या गावांमध्ये विकतचे पाणी घेऊन तहान भागवली जात असून, कोळपिंप्री ते कन्‍हेरे दरम्‍यान बोरी...
मे 13, 2019
यवतमाळ : ग्रामस्थांना पिण्यासाठी पाणी, हाताला काम आणि जनावरांना चारा-छावणी मिळेल, असे नियोजन करण्याचे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज यवतमाळ जिल्हा प्रशासनाला दिले. मुख्यमंत्र्यांनी आज वर्षा निवासस्थानी ऑडिओ ब्रीज च्या माध्यमातून यवतमाळ जिल्ह्यातील सरपंचांशी संवाद साधून पाणी टंचाई आणि...
मे 12, 2019
औरंगाबाद - पाण्यामुळे मुलामुलींचे लग्न गावाबाहेर करावे लागत असल्याचे दुःख अहमदपूर तालुक्‍यातील दुष्काळग्रस्त चोबळी येथील गावकरी सांगत होते. शिऊर ताजबंद, उदगीर, अहमदपूर अशा पाणी असलेल्या ठिकाणी लग्न लावले जात असल्याचे सय्यद बाशू आझमसाहब यांनी सांगितले; तसेच पाण्यासाठी अधिकचे पैसे घेतले जातात. मंगल...
मे 12, 2019
मेहुणबारे (ता. चाळीसगाव) : दै. ‘सकाळ’च्या ८ मेच्या अंकात ‘अक्षय्य तृतीयेलाही घागरी रिकाम्याच’ या मथळ्याखाली परिसरातील पाणीटंचाई संदर्भातील झळकलेल्या वृत्ताची थेट मुख्यमंत्र्यांनीच दखल घेतली आहे. या संदर्भात उपाययोजना करण्याचे त्यांनी आश्वासित केले असून पाणीटंचाई निवारणार्थ...
मे 11, 2019
जळगाव : राजकीय पदाधिकाऱ्यांच्या उदासिनतेसह प्रशासकीय यंत्रणेच्या भोंगळ कारभारामुळे जळगाव तालुक्‍यातील असोदा, भादली, चिंचोली यासह अनेक गावांमध्ये दुष्काळ व पाणीटंचाईची झळ सोसावी लागत आहे. गेली अनेक वर्षे या गावांमधील पाणीप्रश्‍न मार्गी न लागल्यामुळे अनेक कुटुंबीयांनी स्थलांतर करून शहराकडे धाव घेतली...
मे 09, 2019
परभणी - स्वांतत्र्योत्तर काळापासून परभणी जिल्ह्यातील ६५ गावांच्या भाळी दुष्काळ गोंदला गेला आहे. जलसिंचनाच्या कोणत्याही योजनांचा लाभ मिळत नसल्याने या ६५ गावांमध्ये पाण्याच्या प्रश्नाने आता उग्ररूप धारण केले आहे. वर्षानुवर्षे दुष्काळाची दाहकता सहन केलेल्या या ६५ गावांतील ग्रामस्थांच्या संयमाचा बांध...
मे 09, 2019
धरणगाव ः अंजनी, गिरणा आणि तापी अशा तीनही नद्या असलेल्या धरणगाव तालुक्यात तीव्र पाणीटंचाई आहे. विहिरी कोरड्याठाक असून, कूपनलिका बंद पडल्या आहेत. सहाशे ते आठशे फूट केलेले कूपनलिकाही बंद पडल्या आहेत. पिण्याच्या पाण्यासाठी शहरासह ग्रामीण भागात भटकंती करावी लागत आहे. प्रशासनाकडून उपाययोजना...
मे 09, 2019
पुणे - ‘गावाकड शेत हाय, पण त्यात नुसती धसकट अन ढेकळ हाईत. माणसं, जनावरांना प्यायला पाणी मिळना, हंडाभर पाण्यासाठी दूर जावं लागतय. गावाकडं हाताला काम नाही म्हणून पुण्यात आलो. इथ कसं बसं चालयं, पाणी पडलं की परत जाऊ गावाकडं, या दुष्काळान समदं कुटुंब होरपळंय’’ अशा शब्दांत साठीकडे कललेल्या कंबळाबाई...
मे 08, 2019
बोदवड - बोदवड तालुका नेहमीच दुष्काळी समजला जातो. तालुक्यात अत्यल्प पर्जन्यमानामुळे जलस्रोत आटले आहेत. त्यामुळे शेतकरी व सर्वसामान्य नागरिक हवालदिल झाले आहेत. शहरात १५ दिवसांआड, तर ग्रामीण भागात २० ते २५ दिवसांआड पाणीपुरवठा होत असल्याने नागरिकांचे अतोनात हाल होत आहेत. नागरिकांना पाण्यासाठी वणवण...
मे 08, 2019
येवला - ज्या तालुक्‍यात शंभर गावे टॅंकरच्या पाण्यावर तहान भागवतात, त्या तालुक्‍यात द्राक्षाचे पीक जोमात आले आणि तब्बल तीन हजार ७८६ टन द्राक्षे परदेशात दिमाखात रवाना झाली, असे सांगितले तर आश्‍चर्य वाटेल, पण येवल्यातील जिगरबाज शेतकऱ्यांनी टंचाईवर अनेक पर्याय शोधत ही किमया साधली. विशेष म्हणजे,...