एकूण 19 परिणाम
सप्टेंबर 23, 2019
पुणे - महाराष्ट्र पाण्यात असताना सत्ताधारी मात्र, यात्रा काढून विकास केल्याचा डिंडोरा पिटत होते, असा आरोप करतानाच गेल्या पाच वर्षांत काय केले, अशी विचारणा करीत राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका केली. पुण्यालगतची धरणे भरूनही पुणेकरांना प्यायला पुरेसे...
सप्टेंबर 17, 2019
पुणे - पश्‍चिम महाराष्ट्रातील कोल्हापूर जिल्हा वगळता उर्वरित चार जिल्ह्यांमध्ये 11 लाखांहून अधिक नागरिक आणि साडेचार लाख जनावरांना पिण्याच्या पाण्याची समस्या भेडसावत आहे. या जिल्ह्यांत 587 टॅंकरद्वारे पाणीपुरवठा करण्यात येत असून, त्यापैकी सर्वाधिक 345 टॅंकर सोलापूर जिल्ह्यात सुरू आहेत. पुणे...
सप्टेंबर 17, 2019
पुणे - पश्‍चिम महाराष्ट्रासह नाशिक आणि कोकण विभागात पावसाने वार्षिक सरासरी ओलांडली. विदर्भातही बहुतांश भागात पाणीसंकट दूर झाले आहे. परंतु, मराठवाड्यातील जायकवाडी वगळता लातूर, बीड, उस्मानाबाद, हिंगोली आणि परभणी जिल्ह्यांतील धरणे पावसाअभावी कोरडी ठाक आहेत. पावसाळा संपत आला, तरी मराठवाड्यात पाण्याचे...
सप्टेंबर 11, 2019
पुणे - जिल्ह्यात मागील वर्षी सप्टेंबर महिन्यात तीन टॅंकर सुरू होते, तिथे आता टॅंकरने पन्नाशी गाठली आहे. बारामती, पुरंदर, इंदापूर व दौंड या जिल्ह्यांच्या पूर्वेकडील चार तालुक्‍यांत भीषण टंचाई आतापासूनच जाणवू लागली आहे. संपूर्ण राज्याच्या धरणाकाठच्या भागापासून सह्याद्रीच्या घाटमाथ्यावर प्रचंड पाऊस...
सप्टेंबर 09, 2019
पुणे - पुण्यापासून जेमतेम तासा-दीड तासाच्या अंतरावरील उदाची वाडी (ता. पुरंदर) गावातील एकही जण ‘फिल्टर’ केल्याशिवाय पिण्याच्या पाण्याचा एकही थेंब तोंडात घेत नाही. हे संपूर्ण गाव फिल्टरचे आहे. तेही ‘आरओ’ (रिव्हर्स ऑस्मोसिस) बसवलेले.  ही परिस्थिती या गावावर का आली? याला जबाबदार कोण? असा प्रश्‍न...
जुलै 17, 2019
पुणे - खासगी सोसायट्यांमध्ये रेनवॉटर हार्वेस्टिंग करून नियमबाह्य पद्धतीने पैसा जिरविण्याचा प्रयत्न नगरसेवकांकडून केला जात होता. मात्र, महापालिकेच्या आयुक्तांनी खासगी जागेत निधी खर्च करता येणार नाही, हे सर्वसाधारण सभेत स्पष्ट केले. त्यामुळे या प्रस्तावावर नगरसेवकांना पाणी सोडावे लागले....
जुलै 02, 2019
नाशिक - तब्बल महिन्यापासून प्रतीक्षा असलेल्या पावसाने रविवारपासून खऱ्या अर्थाने शहर-जिल्ह्यावर मेहेरनजर दाखवली. दिवसभर रिमझिम पडणाऱ्या पावसाचा दुपारी चारनंतर जोर वाढला. दीड ते दोन तास झालेल्या दमदार पावसाने महापालिकेच्या गटार योजनेची पोलखोल केली. सराफ बाजार, टाकळी रोड, नवले चाळ, पुणे महामार्गासह...
जून 19, 2019
पुणे - ‘खेड तालुक्‍यातील भामा आसखेड व चासकमान या धरणांच्या पाण्याचे फेरवाटप करण्यासाठी कृष्णा खोरे महामंडळ मंत्रिमंडळाला प्रस्तावाद्वारे शिफारस करेल आणि अंमलबजावणीसाठी आग्रह करेल,’’ अशी ग्वाही कृष्णा खोरे महामंडळाचे उपाध्यक्ष नितीन बानुगडे पाटील यांनी दिली.  भामा आसखेड व चासकमान धरण प्रकल्पाच्या...
मे 29, 2019
राज्यात उद्‌भवलेल्या तीव्र दुष्काळी परिस्थितीवर मात करण्यासाठी पाण्याच्या उपलब्धतेसाठी आवश्‍यक त्या सर्व तंत्रज्ञानाचा वापर करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला असून, पर्जन्यवाढीसाठी ‘एरियल क्‍लाऊड  सिडिंग’ची उपाययोजना करून कृत्रिमरीत्या पाऊस पाडण्यास मंगळवारी झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत मान्यता...
मे 29, 2019
भवानीनगर - माढ्याचे भाजपचे खासदार रणजितसिंह नाईक-निंबाळकर यांनी बारामतीच्या नीरा डाव्या कालव्याला अतिरिक्त पाणी जात असून, ते मुख्यमंत्र्यांना थांबविण्यास सांगितले आहे, असा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. या व्हिडिओचे बारामती व इंदापूर तालुक्‍यांत प्रतिसाद उमटू लागले आहेत. डाव्या कालव्यावर...
मे 28, 2019
पुणे - ‘मराठवाड्यातील ७६ तालुक्‍यांत दुष्काळाची स्थिती विदारक आहे. पाण्याची भूजल पातळी ८०० फुटांपेक्षा खाली गेली आहे. दुष्काळी पट्टा असतानाही येथे ३० ते ३५ किलोमीटरवर साखर कारखाने आहेत. या कारखान्यांना सरकारने परवानगी देऊन मराठवाड्याचे वाळवंटीकरण केले आहे,’ असा आरोप पर्याय संस्थेचे विश्‍वनाथ तोडकर...
मे 17, 2019
पुणे : सहकारनगर परिसरातील सुमारे पाच लाख लिटर सांडपाण्यावर दररोज प्रक्रिया करून त्याचा वापर तळजाई टेकडी व सदू शिंदे क्रिकेट स्टेडियमवरील झाडांसाठी केला जात आहे. तसेच, स्टेडियमच्या सुशोभीकरणासाठी देखील हे पाणी वापरले जात आहे. शहरात पाण्याची टंचाई जाणवत असताना महापालिकेने बागूल उद्यानात...
मे 12, 2019
औरंगाबाद - पाण्यामुळे मुलामुलींचे लग्न गावाबाहेर करावे लागत असल्याचे दुःख अहमदपूर तालुक्‍यातील दुष्काळग्रस्त चोबळी येथील गावकरी सांगत होते. शिऊर ताजबंद, उदगीर, अहमदपूर अशा पाणी असलेल्या ठिकाणी लग्न लावले जात असल्याचे सय्यद बाशू आझमसाहब यांनी सांगितले; तसेच पाण्यासाठी अधिकचे पैसे घेतले...
मे 09, 2019
पुणे - ‘गावाकड शेत हाय, पण त्यात नुसती धसकट अन ढेकळ हाईत. माणसं, जनावरांना प्यायला पाणी मिळना, हंडाभर पाण्यासाठी दूर जावं लागतय. गावाकडं हाताला काम नाही म्हणून पुण्यात आलो. इथ कसं बसं चालयं, पाणी पडलं की परत जाऊ गावाकडं, या दुष्काळान समदं कुटुंब होरपळंय’’ अशा शब्दांत...
एप्रिल 09, 2019
पुणे - दुष्काळामुळे वाढत जाणाऱ्या पाण्याच्या दुर्भिक्ष्यामुळे राज्यावर जलजन्य आजारांचे संकट आले आहे. अतिसार, जुलाब, काविळ अशा आजारांचा उद्रेक राज्याच्या वेगवेगळ्या भागात वाढत असल्याचे निरीक्षण आरोग्य विभागाने नोंदविले आहे. राज्यात यंदा पावसाने ओढ दिल्याने पश्‍चिम महाराष्ट्रासह मराठवाडा, उत्तर...
एप्रिल 04, 2019
पुणे : भाजपला उमेदवार मिळाले नाहीत म्हणून त्यांना उमेदवार आयात करावे लागले. माध्यमांनी ही धुळ उठवली होती. पक्षात काम केलेल्या कार्यकर्त्यांचा विचार काँग्रेस पक्ष करत असतो. माझ्या निवडीने राज्यातील काँग्रेस पक्षामध्ये एक चांगला संदेश गेला. माझ्यासारख्या सामान्य कुटुंबातील ज्याला कसलिही राजकीय...
मार्च 06, 2019
पुणे - क्‍लोरिनने शुद्ध केलेल्या पाण्याचे दुष्परिणाम टाळण्यासाठी ओझोनच्या वापराने जलशुद्धीकरण करण्याचे तंत्र पुण्यातील संशोधकाने विकसित केले आहे. या तंत्राने एका लिटरला अवघ्या दोन ते तीन पैशांमध्ये पाणी संपूर्णपणे निर्जंतूक होत असल्याने पारंपरिक पद्धतीच्या खर्चात सत्तर टक्के बचत होते....
फेब्रुवारी 17, 2019
हिंगोली जिल्ह्यातील ग्रामीण भाग सामाजिक आणि आर्थिक समृद्धीकडे नेण्यासाठी उगम ग्रामीण विकास संस्था कार्यरत आहे. दुष्काळापासून कायमची मुक्ती हवी असेल तर पाणी व्यवस्थापन आणि संधारण, जैवविविधता संवर्धन महत्त्वाचे आहे. संस्थेने हिंगोली जिल्ह्याची जीवनवाहिनी असणाऱ्या कयाधू नदी काठावरील गवताळ...
नोव्हेंबर 25, 2018
पुणे - जिल्ह्यातील दुष्काळी परिस्थितीवर मात करण्यासाठी चारा व्यवस्थापन आणि पाणीटंचाई कृती आराखडा राबविण्यात येत आहे. त्यासाठी निवासी उपजिल्हाधिकारी डॉ. जयश्री कटारे यांच्या समन्वयाखाली जिल्हाधिकारी कार्यालयात दुष्काळ आपत्ती निवारण कक्ष सुरू  केला आहे.  राज्य सरकारने पुणे जिल्ह्यात सात तालुक्‍...