एकूण 145 परिणाम
ऑक्टोबर 15, 2019
म्हसळा (वार्ताहर) : म्हसळा तालुक्‍यातील मेंदडी गावामधील बौद्ध व मुस्लिम वस्तीत गेले सहा महिने पाणीपुरवठा होत नाही. या संदर्भात नागरिकांनी तहसीलदार व गटविकास अधिकारी म्हसळा यांच्याकडे तक्रार केली आहे. मेंदडी गावातील बौद्ध व मुस्लिम समाज, प्राथमिक आरोग्य केंद्र व परिसरात आणि अन्य काही भागांत गेल्या...
सप्टेंबर 28, 2019
पुणे -  अस्मानी थैमानानंतर ओढ्यानाल्यांचे पाणी ओसरले असले, तरी घराघरांत साचलेला चिखल काढून पुन्हा संसार उभा करण्याचे आव्हान आहे मांगडेवाडीपासून नवी पेठेपर्यंतच्या वस्त्या आणि सोसायट्यांमध्ये. या भागात पाणी आणि वीजही नाही. रस्तेही वाहून गेले आहेत. महापालिकेची यंत्रणा कामाला...
सप्टेंबर 28, 2019
पुणे - पूरग्रस्त भागात वीज नसल्याने पाणी नाही, अशी परिस्थिती सलग दुसऱ्या दिवशी (शुक्रवारी) दिसून आली. काही भागांत महापालिकेकडून टॅंकरने पाणीपुरवठा करण्यात येत होता. पद्मावती पंपिंग स्टेशनच्या दुरुस्तीचे काम अंतिम टप्प्यात असून शनिवारपासून (ता. २८) सुरळीत पाणीपुरवठा होईल, असा दावा...
सप्टेंबर 27, 2019
मुरूड : गतवर्षापेक्षा यंदा मुरूडच्या पर्यटन व्यवसायाला पावसाचा फटका बसला आहे. अतिवृष्टीमुळे मुरूडमधील सर्वच रस्त्यांची दुरवस्था झाली आहे. त्यामुळे मुंबई, पुणे येथून येणाऱ्या पर्यटकांचे प्रमाण घटले आहे. त्यामुळे मुरूडमधील पर्यटन व्यवसाय अडचणीत आला आहे. गतवर्षीच्या तुलनेत दीडपट जास्त पर्जन्यवृष्टी...
सप्टेंबर 27, 2019
पुणे - राज्यातील अनेक जिल्ह्यांत बुधवारी (ता. २५) पावसाने दाणादाण उडवली. पुणे शहर व जिल्ह्यात मध्यरात्री पावसाने अक्षरश- थैमान घातले. यात शहरात पाच महिलांसह १२ जणांचा मृत्यू झाला. पुणे जिल्ह्यातील खेड शिवापूरमध्ये सहा जण वाहून गेले. पुरंदर तालुक्‍यातील भिवडी येथे नाल्याच्या पुरात दोन महिला वाहून...
सप्टेंबर 26, 2019
बारामती (पुणे): पुरंदर तालुक्‍यातील नाझरे धरण सन 1974 मध्ये बांधल्यानंतर गेल्या 45 वर्षांत पहिल्यांदाच धरणातून 80 हजार क्‍युसेकने पाणी सोडण्याची वेळ आली. नाझरे धरणाची उंची बावीस मीटरपर्यंत असून, 788 दशलक्ष घनफूट एवढी पाणीक्षमता आहे. धरणाचे सर्वच्या सर्व 26 दरवाजे सोडले, तरी त्याची कमाल...
सप्टेंबर 08, 2019
वैभववाडी - जिल्ह्याला पावसाने अक्षरशः झोडपून काढले असून, जनजीवन विस्कळीत झाले आहे. या पावसामुळे परतीच्या प्रवासाला निघालेल्या चाकरमान्यांची कोंडी झाली आहे. मुसळधार पावसामुळे असनिये-घारपी मार्गावर दरड कोसळली. मांडकुली (ता. गगनबावडा) येथे पुराचे पाणी रस्त्यावर आल्यामुळे तळेरे-कोल्हापूर...
ऑगस्ट 30, 2019
पुणे- महापालिकेने नव्याने पाणीकरार करण्यापूर्वी पाणीबिलाची थकीत रक्‍कम भरावी. तसेच, पाणीकराराचे ३१ ऑगस्टपर्यंत नूतनीकरण करून न घेतल्यास दुप्पट दराने पाणीपट्टी आकारण्यात येईल, असा इशारा जलसंपदा विभागाने पुणे महापालिका प्रशासनाला दिला आहे. जलसंपदा विभागाने याबाबत महापालिकेला पत्र पाठविले आहे.  ...
ऑगस्ट 25, 2019
आंबेठाण (पुणे) : पुणे शहराला पाणीपुरवठा करण्यासाठी भामा आसखेड धरणावरून राबविण्यात येत असलेल्या जलवाहिनी आणि जॅकवेलचे काम रविवारी (ता. 25) भामा आसखेड प्रकल्पग्रस्त आंदोलकांनी बंद पाडले. वारंवार आश्वासन देऊनही प्रशासन मागण्या पूर्ण करण्यास टाळाटाळ करीत असल्याने आक्रमक झालेल्या प्रकल्पग्रस्तांनी धरण...
ऑगस्ट 14, 2019
पुणे  : वाघोलीत काही ठिकाणचे खड्डे वर्षानुवर्षे आहेत. पावसाळा आला की त्या ठिकाणचा परिसर हा खड्ड्यांचे साम्राज्य होतो. तात्पुरती दुरुस्ती अन्‌ पावसानंतर पुन्हा खड्डे, ही मालिका कायम आहे. परिसरात अनेक वर्षांपासून हीच स्थिती आहे. मात्र त्यात प्रशासनाकडून ठोस भूमिका घेतली जात नसल्याने परिस्थितीत बदल...
ऑगस्ट 13, 2019
सांगली - महापूर ओसरू लागल्यानंतर शहरासह तीरावरील गावांतील पूरग्रस्तांच्या नुकसानीच्या कळांनी आता पुन्हा अश्रू ओघळू लागले आहेत. पूर सोसला आता नुकसानीच्या धक्‍क्‍यातून सावरण्यासाठीची मानसिकता पूरग्रस्त करीत आहेत. पूर ओसरलेल्या सांगली शहरासह जिल्हाभरात शासकीय मदतीचे वाटप सुरू झाले असून, शहर व...
ऑगस्ट 11, 2019
निपाणी : वेदगंगा नदीच्या पुराचे पाणी पात्रा बाहेर पडून गेल्या सहा दिवसांपासून पुणे-बंगळूर राष्ट्रीय महामार्गावरील यमगरणी रस्त्यावरून मोठ्या प्रमाणात वाहत होते. त्यामुळे कोल्हापूर निपाणी महामार्ग वरील सर्व वाहतूक ठप्प झाली आहे. दोन दिवसात परिसरात पडणाऱ्या पावसाचे प्रमाण कमी झाले असून...
ऑगस्ट 11, 2019
कोल्हापूर : तब्बल सात दिवसांनी आज (रविवार) पंचगंगेची पाणीपातळी कमी झाल्याने पुणे-बंगळूर महामार्ग एका बाजूने वाहतुकीसाठी खुला होण्याची शक्यता आहे. कोल्हापूरात पावसान उसंत घेतली असून, पाणीपातळी काही फुटांनी कमी झाली आहे. कोल्हापूरातील पाणी ओसरण्यास सुरवात झाली असली तरी, शिरोळ तालुक्‍...
ऑगस्ट 07, 2019
सांगली -  सांगलीत आलेल्या महापुराने आज सकाळी सर्वोच्च पातळीचे रेकॉर्ड मोडले. आयर्विन पुलाजवळ आज दुपारी तीन वाजता आजवरच्या सर्वोच्च ५५ फूट पाणीपातळीची नोंद झाली. पंधरा वर्षांपूर्वी आलेल्या पुरावेळी ५३ फूट नऊ इंच इतकी पाणीपातळी होती. या महापुरात निम्मे शहर पाण्यात आहे. एक नजर   जिल्ह्यातील १.२५ लाख...
ऑगस्ट 06, 2019
भोर (पुणे) : भाटघर धरणाच्या भिंतीच्या खाली शहराला पाणीपुरवठा करण्यासाठी असलेल्या विद्युत पंपहाउसमधील जलवाहिनी सोमवारी (ता. 5) पावसाच्या पाण्यात वाहून गेल्याने शहराचा पाणीपुरवठा बंद झाला आहे. शहराला पाणीपुरवठा करण्यासाठी असलेल्या दुसऱ्या लाइनमधील जलवाहिनी फुटल्याने ती मागील आठवड्यातच बंद झालेली आहे...
ऑगस्ट 06, 2019
मिरज - येथे कृष्णा नदीच्या पुरामुळे मिरज रेल्वे जंक्शनची स्वतंत्र पाणी उपसा योजना बंद पडली आहे, परिणामी जंक्शनचा पाणीपुरवठा आज सकाळपासून ठप्प झाला. स्थानकात पिण्याच्या पाण्याबरोबर स्वछतेची समस्या निर्माण झाल्याने रेल्वे प्रशासनाने टँकर मागवले आहेत.   बेळगाव ते पुणे आणि कोल्हापूर ते...
ऑगस्ट 06, 2019
कोल्हापूर - पावसाचा कहर आजही कायम राहिला. काल (ता. 5) रात्रभर कोसळणारा पाऊस, त्याच वेळी राधानगरी धरणातून बाहेर पडणारे पाणी, पंचगंगेच्या महापुराने कहर केला आहे. दरम्यान जिल्ह्यातील 107 बंधारे पाण्याखाली गेले आहेत. तर राजाराम बंधाऱ्यावर सकाळी सात वाजता 51 फुट तीन इंच इतकी पाणी...
ऑगस्ट 05, 2019
मांडवगण फराटा (पुणे)  : भीमा नदीच्या पाणीपातळीत वाढ झाल्याने आलेल्या पुरामुळे मांडवगण फराटा (ता. शिरूर) येथील पूल व रस्ते पाण्याखाली गेले आहेत. त्यामुळे ग्रामस्थांचा जनसंपर्क तुटल्याने जनजीवन विस्कळित झाले आहे.  येथील वडगाव रासाई रस्ता, इनामदार वस्ती रस्ता, गणेगाव, बाभूळसर रस्ता व भीमानदीवरील...
ऑगस्ट 05, 2019
पुणे : खडकवासला धरणातून मुठा नदीमध्ये 49 हजार क्यूसेकने सोमवारी सकाळी 11 वाजता विसर्ग होणार असल्यामुळे नदी काठावर पुन्हा पाणी वाढणार आहे. खडकवासला, पानशेत, वरसगाव आणि टेमघर ही धरणे सुमारे 100 टक्के भरली आहेत. चारही धरणात मिळून 28.95 टीएमसी (99.31 टक्के) पाणीसाठा झाला आहे. गेल्यावर्षी...
ऑगस्ट 04, 2019
मिरज - पावसाचा जोर कायम असल्याने आणि पंचगंगेच्या पुराने धोक्याची पातळी गाठल्याने मिरज - कोल्हापूर दरम्यानची रेल्वेवाहतुक रोखली आहे. रुकडी येथील रेल्वे पुलाजवळ पाणीपातळी वाढल्याने सकाळपासून रेल्वेसेवा पुर्णतः ठप्प झाली. कोल्हापुरला जाणाऱ्या सर्व गाड्या मिरज स्थानकातून सोडण्यात आल्या. सकाळी साडेआठ...