एकूण 16 परिणाम
October 21, 2020
उरुळी कांचन (पुणे) - वळती (ता.हवेली) हद्दीतील घाटमाथ्यावर रविवारी (ता.१८) झालेल्या ढगफुटी सदृश्य पावसामुळे ग्रामपंचायत हद्दीतील तीनशेहुन अधिक शेतकऱ्यांच्या सुमारे बाराशे एकरावरील पिकांचे अतोनात नुकसान झाले आहे. वळती हद्दीत पडलेल्या पावसाचे पाणी उरुळी कांचन गावात शिरले. त्यामुळे ...
October 19, 2020
सोलापूर : अतिवृष्टी आणि महापुरामध्ये नुकसान झालेल्या घरांचे, शेतीचे, जनावरांचे आणि जिवीत हानीची माहिती शक्‍य तितक्‍या लवकर संकलित करा. मदतीचा प्रस्ताव तातडीने पाठवावा. हे प्रस्ताव तयार करताना महसूल, कृषि, पशुसंवर्धन या सर्व विभागांनी एकत्रित पंचनामे करुन एकही नुकसानग्रस्त शेतकरी भरपाईपासून वंचित...
October 19, 2020
उरुळी कांचन (पुणे)- वळती (ता.हवेली) हद्दीतील घाटमाथ्यावर रविवारी (ता.१८) सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास ढगफुटी सदृश्य पाऊस झाल्याने वळतीसह आसपासच्या परिसरातील शेतीचे कोट्यावधीचे नुकसान झाले आहे. वळती गावाच्या हद्दीतील तीन ते साडेतीन हजार एकराहून अधिक क्षेत्रावरील फळबागा, कांदा, तरकारी अशा पिकांचे...
October 18, 2020
या वर्षी काही तालुक्यांचा अपवाद वगळता चांगला पाऊस झाला असल्याने शेतकऱ्यांनी आणि शासनाने सुटकेचा निःश्वास सोडला असला, तरी दुष्काळ निर्मुलनासाठी करण्यात येणाऱ्या जलसंधारणाच्या कामांचे आयुष्य अल्प असते. त्यामुळे झालेल्या कामाची निगा राखणे, देखरेख करणे आणि नवीन कामे करणे आदी कामांमध्ये सातत्य असणे खूपच...
October 17, 2020
करकंब (सोलापूर) : तब्बल तेरा वर्षांनंतर भीमा नदीला आलेल्या महापुरामुळे शेतीचे कोट्यवधी रुपयांचे नुकसान झाले असून, शेकडो कुटुंबे बेघर झाली आहेत. मात्र उजनी धरणाच्या व्यवस्थापनाने हवामान खात्याने दिलेल्या इशाऱ्याची वेळीच दखल घेतली असती तर महापूर आणि त्यामुळे झालेले नुकसानही टाळता आले असते, असे...
October 15, 2020
उस्मानाबाद : उस्मानाबादसह इतर अनेक जिल्ह्यात परतीच्या पावसाने हाहाकार माजविला असून शेतीचे मोठे नुकसान झाले आहे. त्यामुळे पंचनाम्याची गरज नसून शेतकऱ्यांना सरसगट मदत द्यावी, अशी मागणी माजी कृषीमंत्री तथा भाजपा किसान मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष डॉ. अनिल बोंडे यांनी व्यक्त केली आहे. देशभरातील महत्त्वाच्या...
October 13, 2020
नगर ः अहमदनगर जिल्ह्यातील जामखेड हा शेवटचा तालुका आहे. तो दुष्काळी म्हणूनच ओळखला जातो. येथील गावांना नेहमीच दुष्काळ पाणीटंचाईचा सामना करावा लागतो. त्यातीलच हे धोंडपारगाव वेगळे नाही. येथील संतोष मोहनराव पवार यांनी ॲग्री व इलेक्ट्रिकल पदविकेचे शिक्षण घेतले. वडिलोपार्जित ४० एकर शेती. मात्र अवर्षणाचे...
October 05, 2020
आंबेठाण : नैसर्गिक प्रवाहाव्दारे वाहून येणाऱ्या पाण्यात केमिकलयुक्त पाणी वाहून येत असल्याने विहरीतील पाणी खराब होऊन गोनवडी (ता. खेड) येथे पिण्याच्या पाण्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. याशिवाय शेतीला पाणीपुरवठा करणाऱ्या विहरी आणि ओढ्यात देखील रसायनमिश्रित पाण्याचा तवंग...
October 04, 2020
रेठरे बुद्रुक (जि. सातारा) : पुणे-मिरज लोहमार्गावरील कऱ्हाड ते ताकारी मार्गाचे दुहेरीकरण पूर्ण झाले आहे. प्रायोगिक तत्त्वावर आखलेल्या या मार्गावर रेल्वे वाहतूक सुरू झाली आहे. संबंधित विभागाचा हा प्रकल्प यशस्वी झाला असला, तरी शेणोली येथे मार्ग बनवताना अधिग्रहण केलेल्या जमिनीलगतची सुमारे 30 एकर शेती...
September 25, 2020
खडकवासला (पुणे) : खडकवासला पाटबंधारे विभागाच्या धरण साखळीतील चार धरणांपैकी खडकवासला येथे यंदा सरासरीच्या 140 टक्के तर सर्वात कमी पाऊस टेमघर येथे सुमारे 80 टक्के झाला आहे.  धरण क्षेत्रात पडणाऱ्या पावसाचे मोजमाप एक जून पासून सूरू होते. त्यानुसार, एक जून पासून खडकवासला येथे यंदा 991 मिलिमीटर पाऊस झाला...
September 25, 2020
पुणे : मुळशी प्रकल्पातून सिंचन आणि पिण्यासाठी दोन टीएमसी वाढीव पाणी मिळण्याबाबत, तसेच कोळवण खोऱ्यातील शेतीसाठी पाणी उपसा योजना राबविण्यासाठी सुर्वे समितीने लवकर अहवाल सादर करावा, अशा सूचना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिल्या.  ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप...
September 23, 2020
वालचंदनगर (पुणे) : इंदापूर तालुक्यातील शेतीच्या व पिण्याच्या पाण्याच्या प्रश्‍न कायमस्वरूपी सोडविण्यासाठी विविध योजना प्रस्तावित केल्या आहेत. या योजनांचे सर्वेक्षण करण्यासाठी ५ कोटी रुपयांचा निधी उपलब्ध झाला आहे. सर्वेक्षणाला लवकरच सुरवात होणार आहे, अशी माहिती राज्यमंत्री दत्तात्रेय भरणे यांनी दिली...
September 19, 2020
पुणे : कऱ्हामाईच्या महापुराला आता वरीस होत आलंया. गेल्या वरसी सप्टींबर महिन्यात मुसळधार पाऊस झाला अन् कऱ्हामाई दुथडी भरुन वाहू लागली. यामुळे काही कळायच्या आतच व्हत्याचं नव्हतं झालं. कुणाच्या हिरी, कुणाच्या हिरीवरल्या पाण्याच्या मोटारी, तर नदीवरील बंधारंही वाहून गेलं. यामुळं शेतीचं भयानक नुकसान झालं...
September 17, 2020
आज १७ सप्टेंबर हा दिवस मराठवाडा मुक्तिसंग्राम दिन म्हणून साजरा होत आहे. मराठवाडा हैदराबादच्या निजाम राजवटीपासून स्वतंत्र होऊन ७२ वर्ष पूर्ण झाली. मागे वळून पाहताना मराठवाड्याचे मागासलेपण सहज दिसून येते. ब्रिटिशांच्या वर्चस्वाखालील प्रदेशात ज्याप्रमाणे आधुनिकतेची मूल्ये, संचारसाधने, दळणवळणाचे मार्ग...
September 16, 2020
औरंगाबाद : भारतातील सर्वात मोठ्या हैदराबाद संस्थानातून मराठवाडा १७ सप्टेंबर १९४८ रोजी स्वातंत्र झाला. उद्या गुरुवारी (ता.१७) मराठवाडा मुक्ती दिन साजरा होत आहे. या प्रसंगी नेमके मराठवाड्याची वाटचाल कोणत्या दिशेने सुरु आहे? त्यासाठी कोणती पावले उचलायला हवीत? यावर विचारमंथन होणे आवश्‍यक आहे. याबाबत ई-...
September 14, 2020
सोलापूर जिल्ह्याचे प्रारब्ध बदलणारे साल म्हणजे 1976. महाराष्ट्राच्या हरीत क्रांतीचे स्वप्न उराशी बाळगून दुरदृष्टीने कुशल नेतृत्व (स्व.) यशवंतराव चव्हाण यांनी सोलापूरसारख्या दुष्काळी जिल्ह्याचे भाग्य उजनी सारख्या महत्वकांक्षी प्रकल्पामुळे बदलण्याची मुहुर्तमेढ उजनी प्रकल्पाचे भूमिपुजन करुन रोवली. ती...