एकूण 756 परिणाम
जून 23, 2019
पुणे - यंदा मॉन्सून लांबणीवर पडल्यामुळे पश्‍चिम महाराष्ट्रातील धरणांमधील पाणीसाठा तळाला गेला आहे. ३० धरणांमध्ये दहा टक्‍क्‍यांहून कमी, तर १६ धरणांत शून्य टक्‍के पाणीसाठा आहे. त्यामुळे जून संपत आला तरी नागरिकांना पाणीटंचाईला तोंड द्यावे लागत आहे. तसेच, पुरेशा पावसाअभावी खरिपाच्या पेरण्या खोळंबल्या...
जून 22, 2019
पुणे - शहरातून वाहणारी मुठा ही तुम्हाला खरंच नदी वाटते, हा स्वाभाविक प्रश्‍न प्रत्येकाच्या मनात येतो. कारण यातून फक्त सांडपाणीच वाहते. हे आपल्या अंगवळणी पडलेय. पण, हे चित्र बदलण्याची भीष्मप्रतिज्ञा महापालिकेने केलीय. नदीमध्ये सोडण्यात येणाऱ्या सांडपाण्यावर प्रक्रिया करण्याची यंत्रणा (एसटीपी) ५२...
जून 20, 2019
दोन वर्षांपूर्वी संपलेल्या करारावर निर्णय घेण्यासाठी युती सरकारने लोकसभा निवडणुकीनंतरचा व विधानसभा निवडणुकीपूर्वीचा मुहूर्त निवडला. त्यामुळे पाणीप्रश्‍नाच्या माध्यमातून राजकीय लाभ उठविण्याचा प्रयत्न होताना दिसत आहे. कोणी काहीही म्हटले, तरी हा छुपा अजेंडा असल्याचे राजकीय तज्ज्ञांचे म्हणणे आहे.   ...
जून 19, 2019
पुणे - ‘खेड तालुक्‍यातील भामा आसखेड व चासकमान या धरणांच्या पाण्याचे फेरवाटप करण्यासाठी कृष्णा खोरे महामंडळ मंत्रिमंडळाला प्रस्तावाद्वारे शिफारस करेल आणि अंमलबजावणीसाठी आग्रह करेल,’’ अशी ग्वाही कृष्णा खोरे महामंडळाचे उपाध्यक्ष नितीन बानुगडे पाटील यांनी दिली.  भामा आसखेड व चासकमान धरण प्रकल्पाच्या...
जून 18, 2019
पुणे : एरंडवणा गावठाण येथील हिमाली सोसायटीत पुणे महानगरपालिकेच्या वारजे कर्वेरोड क्षेत्रीय कार्यालयातील पाणी पुरवठा विभागाने धडक कारवाई केली. यामध्ये बेकायदा पाणी उपसा करणाऱ्या 30 रो हाऊसेस मधील मोटारी जप्त करण्यात आल्या. पुण्यातील उच्चभ्रू व सुशिक्षित नागरिकांचा रहिवास...
जून 18, 2019
सातारा - जिल्ह्यात असलेल्या विविध सिंचन प्रकल्पांतून १५१.९० टीएमसी पाणीसाठा होतो. यापैकी २२.२० टीएमसी पाणी सांगलीला, तर ५.७५ टीएमसी पाणी सोलापूर जिल्ह्याला असे फक्त २७.९५ टीएमसी पाणी जिल्ह्याबाहेर जाते. उर्वरित पाणी त्या-त्या प्रकल्पांतर्गत असलेले...
जून 18, 2019
‘खडकवासला’तील ३.९० ‘टीएमसी’वर इंदापूरचा हक्क  पुणे - इंदापूर तालुक्यासाठी सोडले जाणारे नीरा-देवघर प्रकल्पाचे पाणी बंद करण्याच्या सरकारच्या निर्णयामुळे पुणे शहराच्या साडेतीन टीएमसी पाण्यावर संक्रांत येण्याची शक्यता आहे. खडकवासला प्रकल्पातील ३.९० टीएमसी पाणी सणसर जोड...
जून 17, 2019
पुणे - संतश्रेष्ठ ज्ञानेश्‍वर महाराज आणि जगद्‌गुरू संत तुकाराम महाराज यांचा पालखी सोहळा पुण्यात दोन दिवस मुक्कामी असणार आहे. त्यामुळे २६ आणि २७ जूनला शहरातील पाणीकपात रद्द करण्यात आली असून, या काळात पूर्ण वेळ पाणीपुरवठा केला जाणार आहे.  खडकवासला धरण प्रकल्पात अत्यल्प पाणीसाठी असल्याने शहरात २० ते...
जून 14, 2019
पुणे - नीरा देवघर धरणाच्या डाव्या कालव्याचे पाणी उजव्या कालव्यात वळविल्यास इंदापूर, बारामती आणि पुरंदर या तीन तालुक्‍यांतील सिंचनासाठीच्या पाण्यात पावणेपाच टीएमसीने कपात होणार आहे. परिणामी या तीनही तालुक्‍यांतील रब्बी आणि उन्हाळी आवर्तनात घट करावी लागणार आहे. यामुळे या तालुक्‍यांमधील...
जून 13, 2019
पुणे - महापालिकेच्या जलकेंद्रांच्या देखभाल-दुरुस्तीसाठी गुरुवारी (ता. १३) शहरातील बहुतांश भागांतील पाणीपुरवठा बंद राहणार आहे. दुसऱ्या दिवशी (शुक्रवारी ता. १४) कमी दाबाने आणि उशिराने पाणीपुरवठा होईल. दरम्यान, वडगाव जलकेंद्रात येणाऱ्या भागांतील पाणीपुरवठा जाहीर झाल्याप्रमाणे आठवड्यातून एक दिवस बंद...
जून 11, 2019
पुणे : महापालिकेच्या विविध जलकेंद्र केंद्रांची देखभाल-दुरुस्ती करण्यात येणार असल्याने येत्या गुरुवारी (ता.१४) शहरातील बहुतांश भागातील पाणीपुरवठा बंद राहणार आहे. दुसऱ्या दिवशी म्हणजे, शुक्रवारी (ता.१५) कमी दाबाने आणि उशिराने पाणीपुरवठा होईल. दरम्यान, वडगाव जलकेंद्राअंतर्गतच्या भागांत आधीच पाणीकपात...
जून 11, 2019
पुणे - महापालिकेच्या विविध जलकेंद्र केंद्रांची देखभाल-दुरुस्ती करण्यात येणार असल्याने येत्या गुरुवारी (ता.१४) शहरातील बहुतांश भागातील पाणीपुरवठा बंद राहणार आहे. दुसऱ्या दिवशी म्हणजे, शुक्रवारी (ता.१५) कमी दाबाने आणि उशिराने पाणीपुरवठा होईल. दरम्यान, वडगाव जलकेंद्राअंतर्गतच्या भागांत आधीच पाणीकपात...
जून 08, 2019
पुणे : पुणेकरांनी पाण्याची चिंता करू नये. पिण्याच्या पाण्याबाबत काही अडचण येणार नाही. तसेच, मेट्रोच्या कामाला आपण गती देणार असून, 26 जानेवारीपर्यंत मेट्रोच्या पहिल्या टप्प्याचे काम सुरू करण्याचा प्रयत्न राहील. स्मार्ट सिटी, वाहतूक कोंडीचा प्रश्‍न मार्गी लावण्यासाठी प्रयत्न करण्यात येतील, असे आश्‍...
जून 07, 2019
धरणांत उपयुक्त पाणीसाठा ७.३७ टक्के; ६४४३ टॅंकर सुरू माळीनगर (जि. सोलापूर) - राज्यातील सर्वच धरणांतील पाणीसाठ्यात कमालीची घट झाली आहे. आजमितीला राज्यातील धरणांतील उपयुक्त पाणीसाठ्याची टक्केवारी साडेसात टक्‍क्‍यांच्या खाली म्हणजे ७.३७ टक्‍क्‍यांवर आली आहे. राज्यात सध्या सहा हजार ४४३ टॅंकरने...
जून 07, 2019
पुणे - शहरात पाणीटंचाई असतानाच वाढलेली बांधकामे आणि सिमेंट-काँक्रीटच्या जाळ्यामुळे शहरातील भूजल पातळी सुमारे ४० टक्के घटल्याचे उघड झाले. त्यामुळे भूजल पातळी वाढविण्याचे आव्हान असल्याचे भूजलतज्ज्ञांनी स्पष्ट केले आहे. महापालिकेच्या जलयुक्त अभियानातून ही बाब पुढे आली. दरम्यान, काँक्रिटीकरणावर बंधने...
जून 06, 2019
पुणे - पोटात गेलेले पाणीही पचत नाही... अन्न तर दूरची गोष्ट. गेल्या दोन दिवसांपासून अन्नाचा कणही पोटात गेला नसल्याने आलेला अशक्तपणा... सतत उलट्या आणि जुलाब... अशा तक्रारी, त्याही विशेषतः लहान मुलांना घेऊन पालक डॉक्‍टरांकडे धाव घेत असल्याचे चित्र सध्या शहरात दिसत आहे. गेल्या दोन आठवड्यांपासून अशा...
जून 05, 2019
चिखली(पुणे) : कुदळवाडी येथे मंगळवारी (ता. 4) मध्यरात्री लागलेल्या आगीत चार गोदामे जळून खाक झाली. अग्निशामक दलाचे दहा बंब आणि सहा खासगी टँकरच्या साह्याने तब्बल सहा तासांनी बुधवारी (ता. 5) सकाळी आठच्या सुमारास ही आग आटोक्‍यात आली, अशी माहिती अग्निशामक दलाचे अधिकारी किरण गावडे यांनी दिली. आगीचे कारण...
जून 05, 2019
सासवड (जि. पुणे) : येथील सासवड (ता. पुरंदर) शहराच्या सध्या उद्भवलेल्या पाणीप्रश्नावरुन काल मुंबईला मंत्रालयात पुरंदरचे लोकप्रतिनिधी तथा जलसंपदा राज्यमंत्री विजय शिवतारे यांच्या पुढाकारातून एक तातडीची बैठक झाली. त्यात वीर धरणावरील चारी खोदाई, नवीन वीजपंप बसविणे, सौर उर्जेवर पंप चालविण्याची उपाययोजना...
जून 04, 2019
पुणे : दीर्घकालीन वीज करार तसेच नवीन व नवीनकरणीय स्त्रोतांमधून महावितरणला आवश्यक असलेली वीज उपलब्ध होत असून त्यामुळे कोयना वीज निर्मितीचा चौथा टप्पा बंद झाला तरीही विजेच्या उपलब्धतेवर कुठलाही परिणाम होणार नाही. तसेच महावितरणाकडे पुरेशा प्रमाणात वीज उपलब्ध असल्यामुळे राज्यात कोठेही भारनियमन होणार...
जून 01, 2019
पुणे/वडगाव शेरी - एकीकडे पाणीटंचाईने नागरिक त्रस्त झाले असताना दुसरीकडे मात्र शहरात जलवाहिन्या फुटून लाखो लिटर पाण्याची नासाडी होत आहे. शुक्रवारी विमाननगर, शनिवार पेठ, बाजीराव रस्ता, कोथरुड आदी भागांत अशा घटना घडल्या. महापालिका कर्मचाऱ्यांच्या हलगर्जीपणामुळे वारंवार या घटना घडत असल्याने पुणेकर...