एकूण 220 परिणाम
February 22, 2021
नाशिक : शहरातील वाहतूक नियंत्रणासाठीच्या ४७ सिग्नलची व्यवस्था आता महापालिकेकडून शहर पोलिसांकडे आली आहे. शहरातील कमांड कंट्रोल रूममधून त्यांचे नियंत्रण सुरू होणार आहे. त्यासाठी पोलिस महापालिका यांच्यात पत्रव्यवहारही सुरू आहे. त्यामुळे यापुढे वाहतूक नियंत्रणासोबतच वाहतूक नियोजनाचे आणि सिग्नल देखभाल...
February 21, 2021
नागपूर : शहर वाहतूक पोलिस दलात पोलिस अधिकाऱ्यांमध्ये दुफळी निर्माण झाली आहे. काही ‘वजनी’ अधिकाऱ्यांच्या आशीर्वादाने शहरातील अवैध वाहतूक सुसाट सुरू असल्याची चर्चा आहे. यामुळे शहरातील वाहतुकीवर परिणाम झाला आहे. वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांनी याकडे लक्ष देण्याची गरज असल्याची चर्चा रंगू लागली आहे. शहर...
February 19, 2021
जळगाव : ‘अमृत’ व भुयारी गटार योजनेच्या कामामुळे संपूर्ण शहरातील रस्त्यांची वाट लागल्यामुळे त्रस्त झालेल्या नागरिकांना चौकाचौकातील बंद सिग्नल व गायब झालेल्या पोलिसांमुळे वाहतुकीच्या खोळंब्यालाही सामोरे जावे लागत आहे. त्यामुळे वाहनधारकांचा मनस्ताप वाढला असून योजनेचे ठेकेदार, मनपा यंत्रणा व पोलिस अशा...
February 18, 2021
नागपूर : शासकीय वैद्यकीय महाविद्यालय (मेडिकल) तसेच शासकीय दंत महाविद्यालयीन रुग्णालयात चाळीसच्या वर निवासी डॉक्टर, एमबीबीएस विद्यार्थी व कर्मचारी कोरोनाबाधित आढळून आले आहेत. कोरोनाची ही दुसरी लाट असून केवळ नागपुरात नव्हेतर विदर्भात दिसून येत आहेत. अमरावती, अकोला, यवतमाळ येथे प्रशासनाने गर्दी आढळून...
February 17, 2021
मुंबई, ता.17 : सर्वसामान्य नागरिकांना वाहतूक नियमांचे धडे देणारे आणि त्यांच्यावर कारवाई करणाऱ्या वाहतुक पोलिसांकडूनच सर्रास मोटार वाहन कायद्याच्या नियमांची पायमल्ली केली जात आहे. चक्क परिवहन आयुक्तांचे कार्यालय असलेल्या एमजी रोड फाऊंटन मार्गावर हा प्रकार उघड झाला आहे.  एमजी रोड फाऊंटन मार्गाच्या...
February 16, 2021
आळंदी (पुणे) : पिंपरी महापालिका आयुक्तालयाच्या कारभार हाती आल्यावर लक्षात आले की इथे मुळशी पॅटर्न जोरात चालतो. मग मी तीन वेळा सिनेमा पाहिला. एवढेच काय दिग्दर्शक प्रविण तरडे यांच्यासोबतही सिनेमा पाहिला. एक गुंड जेलमधून सुटल्यावर त्याच्या स्वागतासाठी चारचाकी गाड्या आणि तरुणाईची गर्दी मोठी होती. चार...
February 16, 2021
सोनई (अहमदनगर) : शनिशिंगणापूर-शिर्डी रस्त्यावर सात पोलिस ठाण्याची नजर असतानाही जिल्ह्यातील सर्वात मोठी बेकायदा प्रवासी वाहतूक दिमाखात सुरु झाली आहे. आठ दिवसात एकही कारवाई झाली नसल्याने नवल व्यक्त होत आहे.  कोरोना संसर्गाची स्थिती लक्षात घेवून ११ महिन्यापासून दोन देवस्थानचे दर्शन घडविणारी बेकायदा...
February 14, 2021
पुणे : कार पार्किंग करण्याच्या कारणावरून झालेल्या भांडणात 20 जणांच्या टोळक्‍याने तरुणावर कोयत्याने वार केले. त्याचबरोबर तरुणाच्या डोक्‍यात दगड घालून त्यास जीवे मारण्याचा प्रयत्न केला. ही घटना शनिवारी सकाळी साडेदहा वाजता फुरसुंगीतील संकेत विहार परिसरामध्ये घडली. टोळक्‍याने हत्यारे हवेत भिरकावून...
February 14, 2021
पुणे : श्री गणेश जयंतीनिमित्त सोमवारी (ता.15) शिवाजी रस्ता परिसरातील श्रीमंत दगडुशेठ हलवाई गणपती मंदिरासह अन्य गणपती मंदिरांमध्ये भाविकांची गर्दी होण्याची शक्‍यता आहे. त्यामुळे वाहतुक पोलिसांनी भाविकांची होणारी गर्दी लक्षात घेऊन सोमवारी शिवाजी रस्ता वाहतुकीसाठी बंद ठेवला आहे, त्यामुळे वाहन चालकांना...
February 14, 2021
बांबवडे (कोल्हापूर) : सावधान शाहुवाडी पर्यटनासाठी येताय? तर तुम्हाला खिंडीत आडवले जाऊ शकते, ही भिती लोकांच्यात आहे. याचे कारण आहे ते म्हणजे पोलिस. कधी महामार्ग पोलिस तर कधी स्थानिक पोलिस किंवा होमगार्ड प्रवाशांना गाडीच्या पासिंगवरुन आडवतात. नेमके  बाहेरील पासिंग हेरून गाडीचे कागदपत्रे मागतात. मग...
February 14, 2021
नागपूर : बेलगाम तरुणाईला त्यांच्याच भाषेत समज देण्यासाठी आरटीओ विभागाचे प्रशांत चिंचोळकर यांच्या पुढाकारातून नागपूरकर हर्षद सालपेने रॅप साँग तयार केले आहे. सध्या ‘नीट चालव गाडी नाहीतर फाईन मारू भाऊ’ हे रॅप सॉंग चर्चेत आले आहे. नागपूर जिल्ह्याचा विचार केल्यास जानेवारी ते सप्टेंबर-२०२०मध्ये तब्बल १५५...
February 13, 2021
मुंबई, ता.13 : राज्यातील आणखी एक वरिष्ठ IPS अधिकाऱ्याच्या नावाने बनावट फेसबुक अकाउंट तयार करण्यात आल्याचा प्रकार उजेडात आला आहे. आरोपीने फ्रेन्ड लिस्टमधील मित्रांची ऑनलाईन फसणूक करण्यासाठी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे अतिरिक्त महासंचालक विनयकुमार चौबे यांच्या नावाने बनावट फेसबुक खाते तयार केल्याचे...
February 13, 2021
सावंतवाडी (सिंधुदुर्ग) - मळगाव येथे मायनिंग वाहतूक करणाऱ्या एका डंपर चालकाने तेथील मायनिंग डंपर सोडण्यासाठी रस्त्यावर नेमलेल्या एका सुरक्षा रक्षकाला शिविगाळ केल्याने संतप्त मळगाव ग्रामस्थांनी डंपर वाहतूक रोखली. अखेर त्या डंपर चालकाने घटनास्थळी येऊन माफी मागितल्यावर ग्रामस्थांनी डंपर वाहतूक पूर्ववत...
February 09, 2021
सिंहगड रस्ता - वेळ संध्याकाळची. डाव्या बाजूने वाहनांच्या रांगा. इंच इंच लढवू अशी वाहनांची स्थिती. एका बाजूला चारचाकी, तर दुसऱ्या बाजूला दुचाकी वाहनांच्या रांगा. त्यातूनही घरी लवकर जाण्यासाठी गडबड. दुसऱ्या बाजूस आनंदनगर चौकाकडे येणाऱ्या वाहनांच्या रांगा. दोन्ही बाजू वाहनांनी खचाखच भरलेल्या... अशी...
February 05, 2021
रत्नागिरी : शहरामध्ये वाहतूक पोलिस आणि पालिकेकडून फक्त नो पार्किंगचे बोर्ड लावले आहेत. वाहनधारकांना वाहन कुठे पार्क करावे, असे पार्किंगचे बोर्ड क्वचितच आहेत. त्यामुळे वाहनधारकांची प्रचंड गैरसोय होते. त्यात सणासुदीच्या दिवसात तर वाहनांची मोठी गर्दी होते. गाड्या लावण्यास जागा मिळत नाही. त्यामुळे उलट-...
February 04, 2021
हिंगणघाट (जि. वर्धा) : एका गर्भवतीला पहाटेच्या वेळी दोन अनोळखी स्त्रियांनी घरून बाहेर नेत बाळंतपण करून नवजात अर्भक घेऊन पळाल्याचे प्रकरण पोलिसांत पोहोचल्यावर त्या महिलेने झालेला गर्भपात लपविण्यासाठी स्वतःच षड्‌यंत्र रचल्याचे पोलिस तपासात उघडकीस आले आहे. शहरातील शास्त्री वॉर्ड येथील ही घटना आहे. ...
February 01, 2021
पंचवटी (जि.नाशिक) : मितभाषी वाहतूक पोलिसाच्या अचानक एक्झिटने  कुटुंबीयांसह अनेकांना धक्का बसला. गावातील व्यवहार बंद ठेवण्यात आले. शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले.  कर्तव्यावर असणाऱ्या वाहतूक पोलीसावर काळाचा घाला पेठ शहरालगत कंटेनरने चिरडल्याने जागीच ठार झालेले वाहतूक शाखेच्या पोलिस...
February 01, 2021
नागपूर ः शहरातील प्रत्येकच व्यक्तीला ‘ग्रीन लाइट' सुरू होईपर्यंत सिग्नलजवळ थांबावे लागते. अर्थात सकाळी घरातून बाहेर पडल्यानंतर पानटपरीनंतर सिग्नलवर थांबा बंधनकारकच आहे. घर ते नोकरीचे किंवा व्यवसायाच्या ठिकाणापर्यंत ये-जा करताना प्रत्येकाला एका वाहतूक सिग्नलवर किमान दोनदा थांबावे लागत आहे. हिशेब...
January 30, 2021
नाशिक : पेठ रोडवर वाहतूक पोलिसाला कंटेनरने चिरडले असल्याची माहिती समोर येत आहे. कुमार गायकवाड असं पोलिस कर्मचाऱ्याचं नाव असून कंटेनर चालकास पोलिसांनी अटक केली आहे. कंटेनरची जोरदार धडक लागल्याने पोलिस कर्मचाऱ्याचा मृत्यू झाला आहे. आडगावचे उत्कृष्ट कबड्डीपटू लोकनेते व्यंकटराव हिरे पंचवटी कॉलेजचे...
January 29, 2021
लंडन : खासगी जीवन कसे असावे, ही प्रत्येकाची चॉईस असते. पण युनायटेड किंग्डममधील एका प्रकरणामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या गेल्या आहेत. एका प्रकरणामध्ये कोर्टानेच आरोपीला अजबगजब अट घातली आहे. सेक्शुअल हॅरेसमेंटप्रकरणी आरोपी असलेल्या एका ब्रिटीश नागरिकाला महिलांपासून दूर ठेवण्यासाठी तेथील कोर्टाने...