एकूण 5 परिणाम
नोव्हेंबर 25, 2016
काय वानू आता। तुझे रूप आत्म। प्रत्यक्ष एटीएम। सामोरे गा।। शुभ्रवर्ण काया। उजळले मुख। पाहोनिया सुख। वाटे भारी।। गाभाऱ्यात उभा। एटीएमदेव। आता कैसे भेव। रांगेचे हो।। काय ती मूरत। साख नि सूरत। दातृत्वाचा दूत। मूर्तीमंत।। पुढ्यात गा माझ्या। पुंजाळली स्क्रिन। पुसें भक्‍तीपिन। क्रमांक हो।। आठवितो मीही।...
नोव्हेंबर 23, 2016
स्थळ : मातोश्री महाल, वांद्रे संस्थान. वेळ : खुळखुळाटाची. काळ : पन्नास दिवस थांबलेला! प्रसंग : कडकीचा! पात्रे : मऱ्हाटीहृदयसम्राट राजाधिराज उधोजीराजे आणि... वज्रचुडेमंडित सौभाग्यवती कमळाबाई. प्रसंग बांका आहे. अंत:पुराची दारे-खिडक्‍या बंद करून कमळाबाई कपाटातला चिल्लरखुर्दा मोजीत आहेत. अधूनमधून...
नोव्हेंबर 22, 2016
तसे आम्ही हार्डकोर देशभक्‍त आहो; पण गेले काही दिवस आमच्यात देशद्रोहाची लक्षणे दिसू लागल्याने काळजीत पडलो. देशद्रोह हा एक दुर्धर आजार आहे. एका रात्रीत माणूस हजाराच्या नोटेसारखा बाद होतो. चांगल्या भल्या देशभक्‍तालाही त्याची लागण होऊ शकते. म्हंजे असे, की साबुदाणा खिचडी आणि शेंगदाणा उसळ आवडीने खाणाऱ्या...
नोव्हेंबर 18, 2016
आजची तिथी : दुर्मुखनाम संवत्सरे श्रीशके 1938, कार्तिक कृष्ण चतुर्थी. आजचा वार : योगगुरुवार! आजचा सुविचार : सकाळी उठोनी पाहुनि गाय। नमस्करोनी म्हणतील हाय। तयांच्या घरी वाढत्ये सौख्यवल्ली। म्हणे सूत्र सत्यार्थ ही पतंजल्ली।। (योगगुरू बाबा बामदेव ह्यांच्या आगामी "दुग्धकोशा'तून साभार...
नोव्हेंबर 16, 2016
प्रिय श्री. रा. रा. नमोजी ह्यांस बालके उधोजीचे लाखलाख दंडवत आणि कोटी कोटी कोपरापासून नमस्कार! आपल्या कृपेने गेले चार दिवस हातात पाश्‍शेच्या चार नोटा घेऊन बॅंकोबॅंकी हिंडलो. पायाचे तुकडे पडले. सरतेशेवटी पाच-सहा तास रांगेत उभे राहिल्यावर एका ब्यांकेत क्‍याशियरच्या खिडकीपर्यंत यशस्वी मजल मारली....