एकूण 107 परिणाम
जून 26, 2019
रातकिडा ओरडतो त्याने डोके फिरते. तो कुठे दडून ओरडतो, हे न समजल्याने अधिक डोके फिरते! माहितीच्या अधिकाराचे हे सरळसरळ उल्लंघन आहे. पण रातकिड्याला ते कोणी सांगावे? सांगण्यासाठी तो सापडावयास तर हवा!! सांप्रत आमची डिट्टो अश्‍शीच परिस्थिती झाली आहे. ‘आमचं ठरलंय...आमचं ठरलंय...आमचं ठरलंय...’ हे ऐकून ऐकून...
मे 13, 2019
किती पाहसी रे किती अंत आता  पुरे ना अनंता तुझे खेळणे  असे काय आम्ही कुठे पाप केले  सेवेत बा काय राही उणे  माथ्यावरी रोज अस्मान फाटे,  सत्तेत सुलतानही माजला  पोटावरी एक मारी तडाखे,  आसूड पाठीवरी वाजला  कुणी पेरिला गा शिवारात माझ्या  असा नष्ट अवकाळ फोफावला  बियाणेच सारे विषारी निघाले  अनायास दुष्काळ...
एप्रिल 19, 2019
प्रति, संबंधित अधिकारी किंवा टू व्हूमसोएव्हर इट मे कन्सर्न- सध्या देशात आणि राज्यात निवडणुकीचे वारे जोरात वाहत असल्याचे आपल्याला ठाऊक असेलच. तथापि, निवडणूक प्रक्रियेत काही नियमबाह्य प्रकार घडत असल्याचे आपल्या निदर्शनास आणून देण्यासाठी सदरील अर्ज देण्यात येत आहे. निवडणुकीच्या रिंगणात उतरलेल्या...
ऑक्टोबर 29, 2018
दादू  - (फोन फिरवत) सदूराया... मी बोलतोय! सदू - (क्षणभर थांबून) बोल! दादू  - (खवचटपणाने) कसा झाला दौरा? सदू  -  (सावध होत) बरा! दादू  - (आणखी चौकशी करत)  कुठे कुठे गेला होतास? सदू  - (शांतपणे) पक्षबांधणीसाठी जिथं जायला हवं होतं, तिथं गेलो होतो! कारण शिवाजी पार्कात बसून पक्षबांधणी होणार नाही, हे मला...
ऑगस्ट 16, 2018
करोड सव्वाशे डोक्‍यांवर लोकशाहीचे गळके छप्पर पागोळीच्या खाली भगोली बर्तन भांडी आणिक टिप्पर इथून तेथे तिथून येथे अशी पसरली अफाट वस्ती जगणे येथे तेथे महाग बंधो मौत येथली बिलकुल सस्ती बिमार वस्तीमधुनी इथल्या कितिक जीविते पडली झडली पैदासाची परंतु पर्वा इथे कुणाला नाही पडली बुजबुजलेल्या सांदिफटीतून उगवत...
एप्रिल 05, 2018
आदरणीय माननीय प्रात:स्मरणीय मोटाभाई ह्यांच्या चरणकमळी बालके नानाचा शिर साष्टांग नमस्कार. पत्र लिहिण्यास कारण की गेल्या काही दिवसांत अनेक पक्षांनी आंदोलने, मोर्चे, मेळावे, यात्रा असे कार्यक्रम हाती घेतले व तडीसही नेले. सर्वांना शक्‍तिप्रदर्शन करता आले. आपलाच पक्ष मागे राहिल्याचे चित्र निर्माण झाले...
एप्रिल 04, 2018
तसे पाहू गेल्यास आम्ही हाडाचे पत्रकार आहो. पत्रकारितेत आम्ही प्रवेश केला, तेव्हा आम्ही खरोखर हाडाचा सापळा होतो, परंतु अनुभवाने परिपक्‍वता येत गेल्यावर आज आम्ही चांगले ऐंशी रत्तल वजनी गटातील ज्येष्ठ पत्रकार झालो आहो. कालाय तस्मै नम: दुसरे काय?  आम्ही कायम मूल्याधिष्ठित पत्रकारितेचाच अंगीकार केला....
मार्च 27, 2018
''ग्हब्रीघॉये आहा याहू न भावा,'' गडकरीसाहेबांनी काढलेले हे उद्‌गार ऐकून बाकी कोणी बुचकळ्यात पडले असते, पण आम्ही नाही. समोरच्या प्लेटीतील गर्मागर्म कचोरी मुखात जाण्यासाठी धडपड करत नसती, तर 'गरीबाघरच्याले असं छळू नये, बापा,' हा त्यांचा उदात्त एवं स्वच्छ उद्‌गार कोणालाही ऐकू आला असता. पण आमचे कान तयार...
फेब्रुवारी 23, 2018
थोरल्या साहेबांच्या पुण्यातील (पक्षी : ऐतिहासिक) मुलाखतीनंतर अवघा महाराष्ट्र मुलाखतमय झाला होता. मुलाखत घेणाराच इतका तालेवार की ती मुलाखत आपापत: ऐतिहासिक झाली. ही मुलाखत आमच्या एकमेव व लाडक्‍या साहेबांनीच घेतली होती. साहजिकच इतिहासपुरुषाची छाती रेल्वेच्या इंजिनासारखी धडधडत होती. कान टवकार्ले होते....
फेब्रुवारी 02, 2018
बेटा : ('रॉकस्टार'सारखी जोशात एण्ट्री घेत...) ढॅणट ढॅऽऽण! यो, मम्मा, आयॅम बॅक!  मम्मामॅडम : (गंभीरपणे पेपर वाचण्यात मग्न...) हं!  बेटा : (आश्‍चर्यानं थक्‍क होत) मम्मा, आय सेड, आय ऍम बॅक!  मम्मामॅडम : (मान वर न करता)...हंहं!!  बेटा : (स्टायलीत गॉगल ठीकठाक करत) जस्ट लुख ऍट मी, मम्मा!! काय वाचते आहेस...
जानेवारी 19, 2018
नेमके सांगावयाचे तर ती पौषातील प्रतिपदा होती. दिस माथ्यावर आलेला. राजेयांचे नुकतेंच कोठे झुंजूमुंजू झालेले. राजगडाच्या पायथ्यालगत नवी पेठेतील दुकाने उघडली होती. (सूचना : नवी पेठ म्हंजे न्यू मार्केट ह्या अर्थी!! हे पुणे नव्हे!! शिवाजी पार्क आहे!! च्याऽ** तुम्ही सुद्धा नाऽऽ...) नवी पेठेतील...
जानेवारी 05, 2018
विक्रमादित्याने हट्ट सोडला नाही. तो पुन्हा झाडापाशी गेला. झाडावर लटकणारा कबंध त्याने खेचून काढला. पाठुंगळी टाकून तो निघाला. त्याची वाटचाल सुरू होते न होते तोच, कबंधामध्ये असलेल्या वेताळाने संधी साधली आणि डांबरटासारखा हसून तो म्हणाला,  ''राजा, ऐक, मी तुला एक गोष्ट सांगतो. ती नीट ऐकून मला माझ्या...
डिसेंबर 28, 2017
कमळ भवन, कमळाध्यक्ष कक्ष,  11, अशोका रोड,  न्यू डेल्ही, 110001.  प्रत रवाना : 1. प्रात:स्मरणीय,  अजेय सर्वसाक्षी सर्वव्यापी  श्री नमोजी हुकूम.  2. कमलमित्र कमलतारक  श्रीमान मणिशंकरजी अय्ययोर.  श्री. अमितशाहजी (मोटाभाई) ह्यांच्या मेजावरून.  (अत्यंत तातडीचे आणि गोपनीय)  भारतवर्षातील सर्व...
डिसेंबर 27, 2017
कटकातील काही फितुरांनी फंद केलियाने महाराजांच्या गुप्त महाबळेश्‍वर मोहिमेची वार्ता चौदिशांस फुटली. चार तोंडे चौ दिशी गेली. भिंतीस कान फुटलें. अत: गनिम सावध जाहला. फंदफितुरी हा तो मऱ्हाटी मुलखास लाभलेला पुरातन शाप! अहह!!  मऱ्हाटी रयतेसाठी क्षण नि क्षण वेंचणाऱ्या, अहर्निश झटणाऱ्या मा. उधोजीमहाराजांस...
डिसेंबर 19, 2017
सुटलो एकदाचे! गेले महिनाभर आम्हाला भयंकर टेन्शन आले होते. गुजराथेत काय होणार? ह्या प्रश्‍नाने आमची झोप की हो उडाली होती. गेले तीन-चार दिवस तर आम्ही अन्नपाणीही कंप्लीट सोडले होते. काय करणार? गुजराथेतून येणाऱ्या बातम्यांनी आम्हाला इतके वेडे केले होते की लोकांनी आम्हांस ''विकाऽऽस ए विक्‍याऽऽ...'' अशी...
नोव्हेंबर 28, 2017
काय करु देवा। उमजेना गोंधळ।  जाईना कवळ। मुखामध्ये।।  आमुच्या खिशाला। कडकी बारमाही।  आम्ही भारवाही। नशिबाचे।।  जयापाशी जावे। मागाया उधार।  हसे तो लाचार। कसनुसा।।  शोधावया जावे। एखादा लाभार्थी।  कर्ज त्याच्यावरती। लाखावेरी।।  देवा कोठे आता। लाभार्थी मी शोधू।  दृष्टी माझी अधू। पापात्म्याची।।  कुणास...
नोव्हेंबर 23, 2017
स्थळ : मातोश्री महाल, वांद्रे संस्थान. वेळ : मध्यरात्रीची... काळवेळच म्हणा! प्रसंग : निकराचा! पात्रे : राजाधिराज उधोजी महाराज आणि सौभाग्यवती कमळाबाई.  कमळाबाई घाईघाईने ब्याग रिकामी करत आहेत. कुठूनतरी प्रवासाहून आल्या असाव्यात. इकडे तिकडे बघत त्या ब्यागेतील चीजवस्तू कपाटात दडवत आहेत. तेवढ्यात ताडताड...
नोव्हेंबर 08, 2017
कस्सले दचकलात ना...हाहा!! गंमत केली!! नुसतं हेडिंग वाचून तुमचे हे हाल...मजकूर काय धडधडत्या छातीनं वाचणार का? डोण्ट वरी! आपण असलं काही हॉररबिरर करत नाय. माणसानं कसं लोकांना खुश ठेवलं पायजे. जमलं तर हशिवलं पायजे. उगीच थरथराट माजवण्यात अर्थ नाही. आपला तसा स्वभाव पण नाही. म्हंजे आपण फार वेगळा माणूस आहे...
नोव्हेंबर 01, 2017
मी पीडी गांधी. पीडा नव्हे...पीडी!! पीडी हे माझं नाव आहे, 'पांडुरंग दत्ताराम' किंवा 'पुरुषोत्तम दामोदर' असं इनिशियल नाही. लोक मला पीडीसाहेब किंवा पीडीजी किंवा आदरणीय पीडीजी असं म्हणतात. एका मल्टिनॅशनल कंपनीत मी उच्चपदावर नोकरीला आहे. ''पीडी म्हंजेऽऽऽ...?'' असा एक जातीय प्रश्‍नार्थक हेल तुमच्या...
ऑक्टोबर 28, 2017
जय महाराष्ट्र!...बरं!! चातुर्मास संपला. दसरा गेला. दिवाळीही गेली. सणासुदीचे दिवस. खिश्‍यात पैका नाही. घरात अडका नाही. अंगावर धडका नाही. नाकाला फडका नाही. आईने हाकलले. बापाने झोडले. जावे कोठे? सबब रयत अस्वस्थ. आम्ही काळजीत. जगदंब, जगदंब.  गेली कैक वर्षे आम्हाला येक स्वप्न पडत होते...पाऊसकाळ चांगला...