एकूण 13 परिणाम
ऑक्टोबर 04, 2019
मा. पक्षाध्यक्ष, स. न. वि. वि. अत्यंत विचित्र परिस्थितीत हे पत्र लिहीत आहे. मोबाइल फोन बंद करून ठेवला आहे आणि लॅंडलाइनचा फोनही काढून ठेवला आहे. घराचे दरवाजे व खिडक्‍या कडेकोट बंद आहेत. हट्टाने दाराची बेल वाजवणाऱ्याला ‘साहेब घरात नाहीत’ असे सांगण्यास कुटुंबाला बजावून ठेवले आहे. (कुटुंबदेखील पदरात...
ऑगस्ट 08, 2019
बेटा : (घुश्‍शात एण्ट्री घेत) ढॅण टढॅण...ढॅण...ढॅण...ढॅण! मी आलोय!! मम्मामॅडम : (कागद हातावेगळे करताना दचकून) ओह!...ही काय एण्ट्री झाली? केवढी दचकले मी!! बेटा : (हाताची घडी घालून घुश्‍शात) हल्ली मी आवाज न करता कुठे गेलो, तरी लोक दचकतातच! मम्मामॅडम : (चष्मा उतरवून पुसत) हल्ली तुझा मूड नसतो चांगला!...
ऑगस्ट 05, 2019
प्रिय मित्र मा. उधोजीसाहेब यांसी, सध्या महाजनादेश यात्रेत बिझी असल्याने पत्र लिहून ही कडकडून शाब्दिक मिठी मारत आहे. -हॅप्पी फ्रेंडशिप डे!! खरे तर फ्रेंडशिप डेला आपण एकत्र भेटावे. साइडकार लावलेल्या बाइकवर बसून ‘ये दोसती हम नहींऽऽ तोडेंगे...तोडेंगेऽऽएऽऽए दम्मगर तेरासाऽऽथना छोडेंगे...’ हे गाणे म्हणावे...
जानेवारी 12, 2019
विक्रमादित्य : (धाडकन दार ढकलत) हाय देअर बॅब्स...मे आय कम इन? उधोजीसाहेब : (लक्ष न देता) हा प्रश्‍न आहे की धमकी? नो! ही सभ्य माणसांची झोपण्याची वेळ असते! गुड नाइट!! विक्रमादित्य : (स्मार्टली)...पण राजकारणी लोक रात्रीच पॉलिटिक्‍स खेळतात ना!! उधोजीसाहेब : (ठणकावून) रात्रीच्या अंधारात पॉलिटिक्‍स...
सप्टेंबर 05, 2017
परमपूज्य प्रात:स्मरणीय श्रीश्री नमोजी ह्यांच्या चरणकमळी शि. सा. नमस्कार. जपानला सुखरूप पोचलो. काळजी नसावी; पण प्रवासभर ब्यागेज गहाळ झालेल्या विमान प्रवाशासारखे वाटत होते. जपानला गेल्यावर काय सांगायचे, हा प्रश्‍न होता. खरे तर संरक्षणविषयक द्विपक्षीय चर्चा करायला मी जपानला आलो आहे. पण ''वकीलसाहब, जो...
जून 29, 2017
आम्हा आंतरराष्ट्रीय गुप्तहेरांचे जग फार्फार वेगळे आणि थरारक असते. आमची काम करण्याची तऱ्हा वेगळी, भाषाही वेगळी. बहुधा आम्ही सांकेतिक भाषाच वापरतो. तुम्हाला सांगायला हरकत नाही. जरा कान इकडे करा, आम्ही किनई सीआयएचे हस्तक आहो!! सीआयए ही अमेरिकेची गुप्तचर संस्था आहे. अतिमहत्त्वाच्या व्यक्‍तींच्या...
मे 09, 2017
पॉम्पी सभागाराच्या थंडगार  फरसबंद पटांगणातच  सम्राट ज्युलियस सीझरवर  कोसळले तलवारीचे घाव...  कास्काचे खड्‌ग घुसले  आरपार त्याच्या छाताडात,  पाठोपाठ झाले अन्योन्यांचे वार...  कटवाल्यांच्या कोंडाळ्यात  मरणथक्‍क झालेल्या घायाळ  सीझरच्या शरीरात तरीही  उरले होते काहीतरी सजीव,  अंत:करणाजोगे चिवट. ...
एप्रिल 01, 2017
प्रिय मित्रवर्य उधोजीसाहेब,  शतप्रतिशत प्रणाम. माझे मनपरिवर्तन झाले आहे. मी पूर्ण बदललो आहे. गेल्या काही महिन्यांत आपल्यात झालेल्या बेबनावाला काही अंशी मीच कारणीभूत आहे, असे माझे मत झाले आहे. गेल्या वर्षी मी तुमच्याकडे जेवायला आलो होतो. त्यानंतर आपले संबंध काहीसे बिनसले, असे वाटते. काय झाले असेल?...
मार्च 24, 2017
प्रिय मित्र उधोजी, फारा दिवसांनी पत्र लिहीत आहे. सध्याचे दिवस बरे नाहीत, हे मलाही कळते. म्हणूनच फोन केला नाही. गोपनीयरीत्या हे पत्र पाठवतो आहे. ते गोपनीयरीत्याच वाचावे. वाचून झाल्यावर गोपनीय जागीच टाकून साखळी ओढावी!! असो. पत्र लिहिण्यास कारण, की महाराष्ट्राच्या राजकारणात एक मोठा भूकंप होण्याची शक्‍...
मार्च 01, 2017
(अर्थात पुन्हा सदू आणि दादू...) दादू - (फोनमध्ये) सदूराया! सदू - (तिरसट सुरात) कोणॅय? दादू - (प्रेमळपणाने) अरे, मी तुझा दादू...आवाज नाही ओळखलास? सदू - (तिरसट धा...) कॅय कॅमॅय? दादू - (दुखावून) धाकट्या भावाशी बोलायला का काही काम असावं लागतं? कसाही असलास, तरी माझा धाकटा भाऊ आहेस तू! तू विसरलास, पण मी...
नोव्हेंबर 30, 2016
आजची तिथी : दुर्मुखनाम संवत्सरे श्रीशके 1938 कार्तिक कृ. चतुर्दशी, सोमवती अमावस्या. (दुपारी 3:20 नंतर) आजचा वार : मंडेवार! आजचा सुविचार : हाती नाही नोट। नशिबात खोट। त्याने कधी व्होट। मागू नये।। नमो नम: नमो नम: नमो नम: (लक्षवेळा लिहिणे!) खरेच ह्या मंत्रामध्ये किती टेरिफिक शक्‍ती आहे! पूर्वीच्या काळी...
नोव्हेंबर 16, 2016
प्रिय श्री. रा. रा. नमोजी ह्यांस बालके उधोजीचे लाखलाख दंडवत आणि कोटी कोटी कोपरापासून नमस्कार! आपल्या कृपेने गेले चार दिवस हातात पाश्‍शेच्या चार नोटा घेऊन बॅंकोबॅंकी हिंडलो. पायाचे तुकडे पडले. सरतेशेवटी पाच-सहा तास रांगेत उभे राहिल्यावर एका ब्यांकेत क्‍याशियरच्या खिडकीपर्यंत यशस्वी मजल मारली....
ऑक्टोबर 25, 2016
दादू : (फोनमध्ये कुजबुजत्या आवाजात) हलोऽऽऽ...कोण उलैतां मरे?  सदू : (अर्धवट झोपेत अनवधानाने) हांव सदूबाब...आपलं ते हे...मी सदू!  दादू : (खुशीत) द्येव बरे करो तुजें! हांव दादूबाब रेऽऽ...  सदू : (प्रसिद्ध खर्जात) आता कोकणीत बोलायला लागलात का आपण...आनंद आहे!  दादू : (टिपिकल गोंयकार स्टाइलीत) ऍक......