एकूण 137 परिणाम
जून 26, 2019
रातकिडा ओरडतो त्याने डोके फिरते. तो कुठे दडून ओरडतो, हे न समजल्याने अधिक डोके फिरते! माहितीच्या अधिकाराचे हे सरळसरळ उल्लंघन आहे. पण रातकिड्याला ते कोणी सांगावे? सांगण्यासाठी तो सापडावयास तर हवा!! सांप्रत आमची डिट्टो अश्‍शीच परिस्थिती झाली आहे. ‘आमचं ठरलंय...आमचं ठरलंय...आमचं ठरलंय...’ हे ऐकून ऐकून...
मे 13, 2019
किती पाहसी रे किती अंत आता  पुरे ना अनंता तुझे खेळणे  असे काय आम्ही कुठे पाप केले  सेवेत बा काय राही उणे  माथ्यावरी रोज अस्मान फाटे,  सत्तेत सुलतानही माजला  पोटावरी एक मारी तडाखे,  आसूड पाठीवरी वाजला  कुणी पेरिला गा शिवारात माझ्या  असा नष्ट अवकाळ फोफावला  बियाणेच सारे विषारी निघाले  अनायास दुष्काळ...
एप्रिल 19, 2019
प्रति, संबंधित अधिकारी किंवा टू व्हूमसोएव्हर इट मे कन्सर्न- सध्या देशात आणि राज्यात निवडणुकीचे वारे जोरात वाहत असल्याचे आपल्याला ठाऊक असेलच. तथापि, निवडणूक प्रक्रियेत काही नियमबाह्य प्रकार घडत असल्याचे आपल्या निदर्शनास आणून देण्यासाठी सदरील अर्ज देण्यात येत आहे. निवडणुकीच्या रिंगणात उतरलेल्या...
मार्च 04, 2019
"नया भारत नीडर, निर्भीक अने निर्णायक छे...सांभळ्यो?'' आमचे तारणहार (आमचे काय, सर्वांचेच!) श्रीमान नमोजी ह्यांनी अभिमानाने सांगितले, आणि आम्ही एकदम सांभळलो. छाती फुगून आली. नजरेत आत्मविश्‍वास तरळला. पायात बळ आले. पण हा इफेक्‍ट जेमतेम तीनेक मिनिटेच टिकला. तीन मिनिटांनंतर आम्ही पुन्हा मूळ अवस्थेत आलो...
फेब्रुवारी 26, 2019
तसा आमचा स्वभावच मुळात सेवाभावी आहे, हे कोणीही सांगेल. बालपणापासून आम्ही सेवेचे महत्त्व जाणून आहोत. इतके की, "जे का रंजले गांजले त्यासी म्हणे जो आपुले...' हे भजन कोणी म्हणू लागले की आम्ही लाजून-संकोचून भजनगायकास थांबवत असू. आपले कवतिक किती म्हणून ऐकायचे? कवतिकासाठी का सेवाधर्म असतो? आम्ही चौथ्या...
जानेवारी 31, 2019
नुकतेच ऐकिवात आले की-  कळिकाळाला न डरणारे  क्रांतीची ठिणगी पोटात सामावलेले  जुलूमशाहीच्या चिंधड्या उडवणारे  एक ज्वालाग्राही स्फोटक  क्रांतिकारकांच्या हाती गावले...  सत्तांधांच्या सिंहासनांखाली  पेरलेल्या ह्या स्फोटकाचे  दुष्परिणाम अटळ आहेत.  ह्या स्फोटकाला दर्प आहे,  श्रमिकांच्या घामाचा.  ह्या...
जानेवारी 30, 2019
""अर्ज करुन ऱ्हायलो, बावा, सुन ले..."उनसे कह दो के न बेचें हमें सुनहरे ख्वाब...''  ""उव्वाह व्वाह...उनसे कह दो के न बेचें हमें सुनहरे ख्वाब... क्‍या खूब कहा...'' बोटांचा पाचुंदा व्हटांशी आणून आम्ही कळवळून दाद दिली. "काय अशक्‍य ओळ आहे बावा' असे शेजारच्या रसिकाला उद्देशून सांगितले. "कहर कहर!' अशा...
जानेवारी 28, 2019
ज्याच्यासाठी आहे। सारा अट्‌टहास।  तोचि परिहास। सुरु जाला।।  लागा तयारीला। बसा सावरुन।  दारी इलेक्‍शन। आले आले।।  कुठल्याही क्षणी। वाजेल बिगुल।  होई डब्बागुल। आपुला हो।।  अजुनी जरिही। न ठरे तारीख।  भाकितांचे पीक। तरारले।।  शहाजोग सत्ता। पाहीं बिलंदर।  करिते "अंदर'। विरोधकां।।  हेच अच्छे दिन। बरे...
जानेवारी 12, 2019
विक्रमादित्य : (धाडकन दार ढकलत) हाय देअर बॅब्स...मे आय कम इन? उधोजीसाहेब : (लक्ष न देता) हा प्रश्‍न आहे की धमकी? नो! ही सभ्य माणसांची झोपण्याची वेळ असते! गुड नाइट!! विक्रमादित्य : (स्मार्टली)...पण राजकारणी लोक रात्रीच पॉलिटिक्‍स खेळतात ना!! उधोजीसाहेब : (ठणकावून) रात्रीच्या अंधारात पॉलिटिक्‍स...
नोव्हेंबर 12, 2018
मा. ना. ना. नानासाहेब फडणवीस, यांसी शतप्रतिशत प्रणाम. पांढरकवड्याची नरभक्षक वाघीण अवनी ऊर्फ टी-वन हिच्या शिकारीप्रकरणी विरोधक माझाच गेम करून राहिले असून, झुडपात दडलेल्या जनावराप्रमाणे माझी अवस्था झाली आहे. वनमंत्र्यांच्या विरोधात राजकीय शिकाऱ्यांची नेमणूक झाल्याचे चित्र असून, परवा मंत्रालयात...
नोव्हेंबर 05, 2018
प्रिय मा. सुधीरभाऊ, यवतमाळमधली पांढरकवड्याची टी-वन वाघीण ऊर्फ अवनी हिला शुक्रवारी रात्री साडेअकरा वाजता झोपेत गोळी घालून ठार करण्याचे कारण काय? ह्याचे अठ्‌ठेचाळीस तासात उत्तर देणे. मुक्‍या बिचाऱ्या वन्यजीवाला असे विश्‍वासघाताने ठार मारून काय साधलेत? असा सवाल प्राणीप्रेमी संघटना करू लागल्या आहेत....
ऑक्टोबर 29, 2018
दादू  - (फोन फिरवत) सदूराया... मी बोलतोय! सदू - (क्षणभर थांबून) बोल! दादू  - (खवचटपणाने) कसा झाला दौरा? सदू  -  (सावध होत) बरा! दादू  - (आणखी चौकशी करत)  कुठे कुठे गेला होतास? सदू  - (शांतपणे) पक्षबांधणीसाठी जिथं जायला हवं होतं, तिथं गेलो होतो! कारण शिवाजी पार्कात बसून पक्षबांधणी होणार नाही, हे मला...
ऑक्टोबर 22, 2018
साहेबांच्या विदर्भ दौऱ्याची गोष्ट. तांबडफुटी झाली. साहेब उठले. जाग आल्या आल्या साहेबांना चहा लागतो. पण चंद्रपुरातल्या त्या निबीड जंगलात चहा कुठला? इतक्‍या दुर्गम भागात चहा मिळत नाही, चहा एकवेळ मिळेल, पण दूध मिळणे अशक्‍य, असे त्यांना सांगण्यात आले. साहेबांना हे पटले नाही. दुधाचा चहा म्हंजे काय...
ऑगस्ट 16, 2018
करोड सव्वाशे डोक्‍यांवर लोकशाहीचे गळके छप्पर पागोळीच्या खाली भगोली बर्तन भांडी आणिक टिप्पर इथून तेथे तिथून येथे अशी पसरली अफाट वस्ती जगणे येथे तेथे महाग बंधो मौत येथली बिलकुल सस्ती बिमार वस्तीमधुनी इथल्या कितिक जीविते पडली झडली पैदासाची परंतु पर्वा इथे कुणाला नाही पडली बुजबुजलेल्या सांदिफटीतून उगवत...
जुलै 24, 2018
मिठी हा शब्द उच्चारताच आम्ही गुदमरून जातो. ती उत्स्फूर्त गळाभेट आठवून अंग महिरते. हे हृदयीचे तें हृदयी डेटा ट्रान्स्फर होतो. जिवाशिवाची गाठ पडत्ये. एक अननुभूत थरार देहातून दौडत जातो. हल्लीची समाजमाध्यमे मिठी या विषयाला इतके कवटाळून कां बसली आहेत? हे आम्हाला पडलेले कोडे आहे. मिठी हा विषय संपूर्णत:...
जून 25, 2018
आम्हा घरी धन। प्लास्टिकाची रतने।  आणिक बर्तने। प्लास्टिकाची।।  प्लास्टिकाच्या मिषें। आमुचे जीवन।  सुफळ संप्रुण। झाले झाले।।  प्लास्टिकाचे हास्य। प्लास्टिक वदने।  सुहास्य रदने। प्लास्टिकाची।।  घासावया दांत। प्लास्टिकाचा ब्रश।  आम्ही हो विवश। प्लास्टिकाचे।।  प्रभात प्रहरी। दारापास हवी।  दुधाची पिशवी...
एप्रिल 05, 2018
आदरणीय माननीय प्रात:स्मरणीय मोटाभाई ह्यांच्या चरणकमळी बालके नानाचा शिर साष्टांग नमस्कार. पत्र लिहिण्यास कारण की गेल्या काही दिवसांत अनेक पक्षांनी आंदोलने, मोर्चे, मेळावे, यात्रा असे कार्यक्रम हाती घेतले व तडीसही नेले. सर्वांना शक्‍तिप्रदर्शन करता आले. आपलाच पक्ष मागे राहिल्याचे चित्र निर्माण झाले...
एप्रिल 04, 2018
तसे पाहू गेल्यास आम्ही हाडाचे पत्रकार आहो. पत्रकारितेत आम्ही प्रवेश केला, तेव्हा आम्ही खरोखर हाडाचा सापळा होतो, परंतु अनुभवाने परिपक्‍वता येत गेल्यावर आज आम्ही चांगले ऐंशी रत्तल वजनी गटातील ज्येष्ठ पत्रकार झालो आहो. कालाय तस्मै नम: दुसरे काय?  आम्ही कायम मूल्याधिष्ठित पत्रकारितेचाच अंगीकार केला....
मार्च 27, 2018
''ग्हब्रीघॉये आहा याहू न भावा,'' गडकरीसाहेबांनी काढलेले हे उद्‌गार ऐकून बाकी कोणी बुचकळ्यात पडले असते, पण आम्ही नाही. समोरच्या प्लेटीतील गर्मागर्म कचोरी मुखात जाण्यासाठी धडपड करत नसती, तर 'गरीबाघरच्याले असं छळू नये, बापा,' हा त्यांचा उदात्त एवं स्वच्छ उद्‌गार कोणालाही ऐकू आला असता. पण आमचे कान तयार...
फेब्रुवारी 23, 2018
थोरल्या साहेबांच्या पुण्यातील (पक्षी : ऐतिहासिक) मुलाखतीनंतर अवघा महाराष्ट्र मुलाखतमय झाला होता. मुलाखत घेणाराच इतका तालेवार की ती मुलाखत आपापत: ऐतिहासिक झाली. ही मुलाखत आमच्या एकमेव व लाडक्‍या साहेबांनीच घेतली होती. साहजिकच इतिहासपुरुषाची छाती रेल्वेच्या इंजिनासारखी धडधडत होती. कान टवकार्ले होते....