एकूण 15 परिणाम
April 01, 2021
कोलकाता- West Bengal Assembly Election 2021 पश्चिम बंगालमध्ये दुसऱ्या टप्प्यातील मतदानादरम्यान नंदीग्राम मतदारसंघाचे रणांगणात रुपांतर झाले आहे. मुख्यमंत्री ममता बॅनर्जी या एका मतदान केंद्रावर पोहोचताच भाजप आणि तृणमूल काँग्रेस (टीएमसी) कार्यकर्ते परस्परांत भिडले. परिस्थिती इतकी बिघडली की ममता...
April 01, 2021
अल्पबचत व्याजदर कमी करण्याचा निर्णय मोदी सरकारने 24 तासांच्या आत मागे घेतला आहे. निर्णयानंतर मोठ्या प्रमाणावर याविरोधात टीका केली जात होती. आता केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी केलेल्या ट्विटवरून अनेक नेत्यांनी सरकारला टोला लगावला आहे. दरम्यान, कृषी कायद्याबाबत न्यायालयाच्या त्रिसदस्यीय...
March 31, 2021
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर मुंबईतील ब्रीच कँडी हॉस्पिटलमध्ये यशस्वी शस्त्रक्रिया करण्यात आली. दुसरीकडे पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांना नंदीग्राममध्ये पराभवाला सामोरे जावे लागेल, असा सर्व्हे व्हायरल झाला आहे. अशाच देश-विदेशासह राज्यातील ठळक घडामोडी तसेच मनोरंजन...
March 31, 2021
नवी दिल्ली - भाजप नेते आणि राज्यसभा खासदार सुब्रमण्यम स्वामी हे सातत्यानं मोदी सरकारवर टीका करतात. यावेळीही त्यांनी थेट पंतप्रधान मोदींवर उपरोधिक टीका केली आहे. काश्मीर, पाकिस्तान, जीडीपी, कोरोना लस यावरून त्यांनी ट्विट केलं आहे. पाकसोबत व्यापारी संबंधांची चर्चा सुरु असल्यावरून स्वामी यांनी लिहिलं...
March 26, 2021
कोलकाता : देशातील पाच राज्यांमध्ये सध्या विधानसभेच्या निवडणुकांची रणधुमाळी शिगेला पोहोचली आहे. पश्चिम बंगाल, केरळ, तमीळनाडू, आसाम आणि पुदुच्चेरी या केंद्रशासित प्रदेशामध्ये या निवडणुका पार पडणार आहेत. यातील सर्वाधित चुरशीची लढत पहायला मिळत आहे ती पश्चिम बंगालमध्ये! याठिकाणी भाजपने आपली प्रतिष्ठा...
March 01, 2021
तमीळनाडू : काँग्रेसचे माजी अध्यक्ष आणि नेते राहुल गांधी सध्या तीन दिवसांच्या तमीळनाडूच्या प्रचार दौऱ्यावर आहेत. येत्या काही आठवड्यांवरच तमीळनाडूसह देशातील पाच राज्यांमध्ये विधानसभेच्या निवडणुका पार पडणार आहेत. यामध्ये तमीळनाडू, केरळ, पश्चिम बंगाल, आसाम आणि पुदुच्चेरी या केंद्रशासित प्रदेशाचा...
February 26, 2021
कोलकाता : ममता बॅनर्जी यांनी निवडणूक आयोगाने जाहीर केलेल्या निवडणूक वेळापत्रकावर प्रश्न उपस्थित केले आहेत. पश्चिम बंगालमध्ये येऊ घातलेल्या विधानसभेच्या निवडणुका 8 टप्प्यांमध्ये घेण्यात येतील, असं निवडणूक आयोगाने आज संध्याकाळी साडेचार वाजता घेतलेल्या पत्रकार परिषदेत जाहीर केलं आहे. मात्र, मतदानाच्या...
February 24, 2021
कोलकता/ साहागंज (पश्‍चिम बंगाल) : पंतप्रधान नरेंद्र मोदी हे देशातील सर्वात मोठे दंगेखोर असून अमेरिकेचे माजी अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यापेक्षाही त्यांची स्थिती वाईट होईल, अशी टीका आज मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी केली. हुगली जिल्ह्यातील साहागंज येथे आयोजित सभेत ममता यांनी मोदींवर हल्लाबोल केला....
February 22, 2021
नॅशन हेरॉल्डप्रकरणी दिल्ली हायकोर्टानं काँग्रेसच्या हंगामी अध्यक्षा सोनिया गांधी आणि खासदार राहुल गांधी यांना नोटीस पाठवली आहे. भाजप खासदार सुब्रमण्यम स्वामी यांनी यासंदर्भात हायकोर्टात याचिका दाखल केली आहे. या याचिकेत विविध कागदपत्रं आणि साक्षीदारांना बोलवण्यासंबंधीच्या सत्र न्यायालयाच्या आदेशाला...
January 30, 2021
बंगळुरु- कर्नाटकच्या राजकारणात पुन्हा एकदा पॉर्नगेट प्रकरण समोर आले आहे. काँग्रेसच्या आमदारावर विधान परिषदेत बसून आपल्या मोबाइलवर अश्लील व्हिडिओ पाहिल्याचा आरोप करण्यात आला आहे. प्रकाश राठोड असे या आमदारांचे नाव असून भाजप याप्रकरणी आक्रमक झाली असून त्यांनी राजीनाम्याची मागणी केली आहे.  कन्नड...
January 29, 2021
कोलकत्ता : पश्चिम बंगालमध्ये राजकीय निदर्शनांदरम्यान 'गोली मारो' अशी घोषणाबाजी करणाऱ्या भाजप कार्यकर्त्यांना अटक करणाऱ्या पोलिस आयुक्तांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. हुमायूँ कबीर असं या पोलिस अधिकाऱ्याचं नाव असून त्यांनी वैयक्तिक कारणास्तव आपल्या पदाचा राजीनामा देत असल्याचे कारण दिले आहे....
January 27, 2021
नवी दिल्ली : पंजाबी गायक-अभिनेता दीप सिद्धू याने प्रजासत्ताक दिनी दिल्ली येथे झालेल्या हिंसाचारप्रकरणी जमावाचे नेतृत्व केले आणि शेतकरी संघटना तसेच तरुणांना भडकविल्याचा आणि शीखांचा धार्मिक ध्वज फडकवण्याकरता उद्युक्त केल्याचा ठपका ठेवण्यात आला आहे. ऐतिहासिक लाल किल्ल्यावर 'निशाण साहीब' फडकवल्यानंतर...
December 08, 2020
नवी दिल्ली- पेट्रोलचे दर 90 रुपयांच्या पुढे गेले आहेत. त्यामुळे लोकांमध्ये संताप वाढत आहे. काँग्रेसच्या काळात पेट्रोल-डिझेलचे दर वाढल्यानंतर भाजप नेत्यांकडून कठोर टीका करण्यात आली होती. आता भाजप सरकारच्या काळातही पेट्रोल-डिझेलचे दर प्रचंड वाढले आहेत. भाजपच्या काही नेत्यांनी या मुद्द्यावरुन पक्षावर...
November 12, 2020
नवी दिल्ली : आज गुरुवारी भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे जवाहरलाल नेहरु विद्यापीठातील स्वामी विवेकानंदांच्या एका पुतळ्याचे अनावरण करणार आहेत. याबाबतची माहिती त्यांनी आपल्या ट्विटरवरुन दिली आहे. हा कार्यक्रम व्हिडीओ कॉन्फरंन्सिगद्वारे पार पडणार आहे. जेएनयूच्या प्रशासकीय विभागामध्ये संध्याकाळी...
October 08, 2020
नवी दिल्ली- बलात्कार प्रकरणात भाजप नेते तथा माजी केंद्रीय गृहराज्यमंत्री स्वामी चिन्मयानंद यांना सर्वोच्च न्यायालयाने मोठा झटका दिला आहे. सर्वोच्च न्यायालयाने अलाहाबाद उच्च न्यायालयाचा आदेश रद्द करताना बलात्कार पीडितेला मॅजिस्ट्रेटसमोर दिलेल्या जबाबाची प्रत चिन्मयानंद यांना देऊ नये, असे म्हटले आहे...