एकूण 4517 परिणाम
January 18, 2021
करमाड (जि.औरंगाबाद) : कुंभेफळ (ता.औरंगाबाद) येथील कुंभेश्वर ग्रामविकास पॅनलने अकरापैकी दहा जागा जिंकून सलग चौथ्यांदा एक हाती विजय मिळविला. यात भारतीय जनता पक्षाचे तालुकाध्यक्ष तथा बाजार समितीचे माजी ज्येष्ठ संचालक श्रीराम शेळके यांच्या भावजय आणि खरेदी-विक्री संघाचे सभापती आप्पासाहेब...
January 18, 2021
मुंबई : ग्रामपंचायत निवडणुकांचे निकाल समोर येत आहेत. या पार्श्वभूमीवर महाराष्ट्राचे विरोधीपक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी आज समोर येणाऱ्या ग्रामपंचायत निवडणूक निकालांवर भाष्य केलंय. ज्यांच्या पॅनल्सचा भारतीय जनता पक्षाला पाठिंबा होता ते चांगल्या पद्धतीने जिंकतायत. संपूर्ण महाराष्ट्रात...
January 18, 2021
सेलू ( जिल्हा परभणी ) : तालुक्यातील ५५ ग्रामपंचायतची मतमोजणी सोमवारी ( ता.१८ ) रोजी शांततेत पार पडली.  आठ फेर्‍यांमध्ये ५५ ग्रामपंचायत मधील एकुण १६८ प्रभागातील ४१० उमेदवार निवडूण आले आहेत. बहुतांश ठिकाणी सत्ताधार्‍यांना मतदारांनी डावलले आहे. मात्र विकास काम करणारे काही सत्ताधिकारी मात्र कायम राहिले...
January 18, 2021
माळेगाव ः देशपातळीवर आणि विशेषतः दिल्लीमध्ये आज शेतकऱ्यांचा संघर्ष सुरू आहे. गहू आणि तांदळाचे प्रचंड उत्पादन झाल्याने त्याच्या मार्केटींगचे प्रश्न निर्माण झाले आहेत. हा संघर्ष गहू व तांदळाच्या भावाच्या संबंधीचे प्रश्न यामुळेही झालेला आहे, असे प्रतिपादन माजी केंद्रीय कृषीमंत्री ज्येष्ठ नेते शरद पवार...
January 18, 2021
मालवण (सिंधुदुर्ग) : तालुक्यातील सहा ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत पाच ग्रामपंचायतीवर भाजपने निर्विवाद वर्चस्व राखत शिवसेनेचा धुव्वा उडविला. शिवसेनेला केवळ एकाच ग्रामपंचायतीवर वर्चस्व राखता आले. प्रतिष्ठेच्या बनलेल्या या निवडणुकीत भाजपने शिवसेनेला मात देत घवघवीत यश मिळविले. तालुक्यातील सहा...
January 18, 2021
नवी दिल्ली - ऑस्ट्रेलियाचा माजी फिरकीपटू शेन वॉर्नने ब्रिस्बेन कसोटीच्या चौथ्या दिवशी वादग्रस्त वक्तव्य केल्यामुळे तो सोशल मीडियावर ट्रोल होत आहे. भारतीय खेळाडूवर अप्रत्यक्षपणे स्पॉट फिक्सिंगचा आरोप केल्याचं म्हणत नेटिझन्सनी हल्लाबोल केला आहे. शेन वॉर्ननं भारताचा गोलंदाज टी नटराजनच्या...
January 18, 2021
परभणी ः एरंडेश्वर (ता. पूर्णा) येथील शेत जमिन खरेदी- विक्री प्रकरणी आम्हाला खासदार संजय जाधव यांनी पूर्णपणे अंधारात ठेवून आमचा विश्वासघात केल्याचा आरोप काळे कुटुंबातील सारिका कदम यांनी रविवारी (ता. १७) पत्रकार परिषदेत केला. एवढेच नाही तर लवकरच मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्या मातोश्री निवासस्थानी...
January 18, 2021
जळगाव : राज्याचे माजी मंत्री व राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते एकनाथराव खडसे यांचे गाव असलेल्या कोथळीमधील ग्रामपंचायत निवडणूकीत शिवसेना व ‘खडसे’परिवाराच्या पॅनलची अती-तटीची लढत झाली. या लढतीत खडसे परिवार पॅनलचे ६ उमेदवार विजयी झाले आहेत तर शिवसेना आमदार चंद्रकांत पाटील यांच्या परिवर्तन पॅनलचे पाच...
January 18, 2021
मुंबई -  बिग बॉस भारतीय टेलिव्हिजन वाहिनीवरील एक लोकप्रिय कार्यक्रम आहे. त्यात घडणा-या दैनंदिन घडामोडींविषयी प्रेक्षकांना कमालीची उत्सुकता आहे. आता हा कार्यक्रम शेवटच्या टप्प्यावर येऊन ठेपला आहे. अशावेळी बिग बॉसच्या घरातून जाणा-या स्पर्धकांना परतावे लागत आहे. अशाच आणखी एका स्पर्धकाची...
January 18, 2021
वॉशिंग्टन - अमेरिकेचे नवनियुक्त अध्यक्ष ज्यो बायडेन हे येत्या २० रोजी पदाची शपथ घेणार आहेत. बायडेन यांच्या रूपाने अमेरिकेची सत्ता पुन्हा डेमोक्रॅटिक पक्षाकडे  आली आहे. महत्त्वाची बाब म्हणजे बायडेन यांच्या  मंत्रिमंडळात भारतीय वंशाच्या अमेरिकी नेत्यांची संख्या लक्षवेधक आहे. व्हाइट...
January 18, 2021
नाशिक : राज्यात शैक्षणिक सत्र सुरू झाल्यानंतर आदिवासी विकास विभागांतर्गत राज्यात किती वसतीगृहे सुरू करण्यात आली आहेत, याबाबत आदिवासी आयुक्तालयात माहिती नसल्याची बाब समोर आली आहे. राज्यात ४ जानेवारीपासून नववी ते बारावीचे वर्ग व महाविद्यालये सुरू करण्यात आली आहेत. शालेय तसेच महाविद्यालयीन विद्यार्थी...
January 18, 2021
 कुडाळ (सिंधुदुर्ग): कुडाळ तालुक्यातील 9 ग्रामपंचायत निवडणूक मध्ये आज झालेल्या मतमोजणीत 9 जागापैकी 5 जागांवर शिवनेनेने भगवा फडकवला. 4 जागांवर भारतीय जनता पार्टीला समाधान मानावे लागले . भाजपचे माजी सभापती मोहन सावंत यांच्या ताब्यात गेली 20 वर्षे असणारी वसोली ग्रामपंचायत यावेळी संपूर्ण...
January 18, 2021
पाचोड (औरंगाबाद): राज्याचे रोजगार हमी योजना व फलोत्पादन मंत्री संदीपान पा. भुमरे यांचे जन्मगाव असलेली व कायमस्वरूपी त्यांच्याच ताब्यातील मोठे उत्पन्न स्त्रोत असलेली पाचोड (ता. पैठण) येथील ग्रामपंचायतीच्या सतरा जागांसाठी निवडणूक झाली होती. त्यात भुमरे यांनी निर्विवादपणे विजयीश्री मिळवून गावाचे...
January 18, 2021
नांदेड : केंद्राच्या किमान हमी दरानुसार तूर विक्री करण्यासाठी जिल्ह्यातील एक हजार ७४४ शेतकऱ्यांनी ऑनलाइन नोंदणी केल्याची माहिती जिल्हा उपनिबंधक (सहकारी संस्था) कार्यालयातून मिळाली. जिल्ह्यात दि महाराष्ट्र स्टेट को- ऑपरेटिव्ह मार्केटिंग फेडरेशन, विदर्भ को- ऑपरेटिव्ह मार्केटिंग फेडरेशन...
January 18, 2021
इस्लामाबाद : रिपब्लिक टीव्हीचे एडिटर इन चीफ अर्णब गोस्वामी आणि टीव्ही रेटिंग एजन्सी BARC चे माजी CEO पार्थो दासगुप्ता यांच्या दरम्यानचे व्हॉट्सएप चॅटचे स्क्रीनशॉट सोशल मीडियावर व्हायरल झालेले आहेत आणि यानंतर एकच खळबळ माजली आहे. आधीच अडचणीत असलेल्या अर्णब गोस्वामी यांच्या अडचणीत आता आणखी वाढ...
January 18, 2021
राज्यातील वेगवेगळ्या भागात झालेल्या ग्रामपंचायत निवडणुकीचे कल हळूहळू हाती येऊ लागले आहेत. पुणे जिल्ह्यातील सर्व ग्रामंपचायतीचे निकाल दुपारपर्यंत स्पष्ट होतील. हवेली तालुक्यातील कुडजे, डोणजे आणि राहटवडे गावातील ग्रामपंचायतीचे निकाल हातील आले आहेत. कुडजेमध्ये काँग्रेस राष्ट्रवादी 7-3 असा निकाल लागला...
January 18, 2021
परळी वैजनाथ (जि.बीड) : तालुक्यातील टोकवाडी येथील रहिवासी लक्ष्मण मुंडे यांच्या स्टेट बँक ऑफ इंडियाचे गहाळ कारभारामुळे नाहक त्रास सहन करावा लागत आहे. मुंडे यांच्या बँकेच्या खात्यातून कोणताही ओटीपी न येता, आँनलाईन ट्रानजक्शन न करता तब्बल ५४ हजार रुपये कमी झाले आहेत. हे पैसे बिहार राज्य...
January 18, 2021
पुणे : लॉकडाऊनमध्ये संचार मनाई आदेशाचा भंग करणाऱ्या नागरिकांना काही दिवसांपासून पोलिसांकडुन घरोघरी जाऊन समजपत्रे बजावण्यास सुरूवात झाली आहे. एरवी चोरी, जबरी चोरी, घरफोडी, खुन किंवा अन्य गंभीर गुन्हे दाखल करणे किंवा त्यांचा तपास करण्यात जितकी तत्परता दाखविली जात नाही, तितकी तत्परता समजपत्रे...
January 18, 2021
अभियंत्यांना फुल टू स्कोप  टेस्लाची भारतात एंट्री; केमिकल, इलेक्ट्रिकल, मेकॅनिकल शाखांना वाव  नाशिक : जगातील सर्वांत श्रीमंत व्यक्ती आणि टेस्लाचे मुख्य कार्यकारी अधिकारी एलोन मस्क यांनी १३ जानेवारीला अखेर टेस्ला कार भारतात निर्माण करण्याचा निर्णय घेतला. या अमेरिकन इलेक्ट्रिक वाहन कंपनीने...
January 18, 2021
नवी दिल्ली- फेसबुकच्या मालकीचे असणाऱ्या व्हॉट्सऍपने जेव्हा नव्या प्रायव्हसी पॉलिसीची घोषणा केली आहे, तेव्हापासून कंपनीच्या अडचणी वाढताना दिसत आहेत. नव्या प्रायव्हयी पॉलिसीमुळे यूझर्समध्ये संभ्रम आहे आणि कंपनी यूझर्सची शंका दूर करण्यास अजूनतरी यशस्वी ठरलेली नाही. याच पार्श्वभूमीवर येत्या काळात...