एकूण 91 परिणाम
सप्टेंबर 17, 2019
नवी दिल्ली ः केंद्र सरकारच्या महत्त्वाकांक्षी "आयुष्मान भारत' योजनेतील भ्रष्टाचारामुळे सहा रुग्णालयांविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे. केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. हर्षवर्धन यांनी आज "आयुष्मान भारत' पंधरवड्याच्या प्रारंभावेळी ही माहिती दिली. याअंतर्गत 376 रुग्णालयांची चौकशी सुरू...
सप्टेंबर 05, 2019
नवी दिल्ली - राहण्यालायक असलेल्या जगातील शहरांच्या यादीत भारतीय शहरांची कामगिरी फारशी चांगली नसल्याचे दिसून आले आहे. यात देशाची राजधानी दिल्ली आणि आर्थिक राजधानी मुंबई यांचा क्रमांक घसरला आहे. गेल्या वर्षी ही दोन्ही महानगरे वरच्या स्थानावर होती.  आर्थिक गुप्तचर विभागाची (इकॉनॉमिस्ट इंटेलिजन्स युनिट...
ऑगस्ट 07, 2019
पुणे : संसदेत यावर्षी अनेक मंत्र्यांनी त्यांच्या मातृभाषेत शपथ घेतली. यामुळे नागरिकांशी जवळीक वाढण्यास मदत झाली. लोकांना संसदेतील कामकाजाची कल्पना येऊ लागली. लोकसभेत दोन डझन सदस्यांनी संस्कृत भाषेत शपथ घेतली होती. ही परंपरा प्राचीन संस्कृतीत बदलणारी होती. परंतु संस्कृत ही भाषा अनेकांना माहिती...
जुलै 27, 2019
नवी दिल्ली : 'बहुचर्चित मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेन प्रकल्पासाठी किमान एक लाख कोटी रुपये सरकार खर्च करणार आहे. हा पैसा शिक्षण व आरोग्यावर खर्च करावा अशी भावना लोकांमध्ये आहे,' अशा शब्दांत भाजपचे खासदार डॉ. विकास महात्मे यांनी राज्यसभेत सरकारला घरचा आहेर दिला. पर्यावरणाचे सारे कायदेकानू धाब्यावर...
जुलै 15, 2019
नवी दिल्ली : सव्वाशे कोटी भारतीय नागरिक 24 तासांच्या दिवसात नोकरी-व्यवसायाला किती वेळ देतात, व्यायामाद्वारे आरोग्याची काळजी व योग किंवा अध्यात्माद्वारे चित्ताची व मनाची काळजी कशी व किती वेळ घेता? ते 'फक्त स्वतःसाठी' किती वेळ देतात? अशासारख्या प्रश्‍नांची उकल करण्याचा एक प्रयत्न केंद्र सरकारच्या...
जून 21, 2019
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 2014-15 मध्ये 21 जून हा आंतरराष्ट्रीय योग दिन जाहीर करावा, असा प्रस्ताव युनोमध्ये मांडला आणि संपूर्ण जगाने तो बहुमताने मंजूर केला. योगशास्त्राला राजाश्रय मिळाला आणि पूर्वीपेक्षाही जास्त वेगाने योगप्रचार वाढू लागला. आत्मा आणि शरिर यांचा समन्वय साधायचा असेल तर योगा हा...
जून 14, 2019
नवी दिल्ली ः पश्‍चिम बंगालमधील सरकारी रुग्णालय व वैद्यकीय महाविद्यालयातील डॉक्‍टरांनी चार दिवसांपासून केलेल्या संपावर शुक्रवारीही तोडगा न निघाल्याने राज्यातील आरोग्यसेवा विस्कळित झाली आहे. "एआयआयएमएस' व "भारतीय वैद्यक परिषद' (आयएमए) या डॉक्‍टरांच्या संघटनांनी या संपाला पाठिंबा दिल्याने याचे पडसाद...
जून 10, 2019
नवी दिल्ली : आरोग्य क्षेत्रात पुरेसे मनुष्यबळ उपलब्ध व्हावे, म्हणून आरोग्य मंत्रालयानेच पुढाकार घेतला असून, याअन्वये देशभरातील 75 रुग्णालयांचे रूपांतर वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये केले जाणार आहे. जिल्हा रुग्णालयांमध्ये सोयीसुविधा वाढवून त्यांचे वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये रूपांतर करण्याचा केंद्र...
जून 08, 2019
नवी दिल्ली : केंद्र सरकारची महत्त्वाकांक्षी 'आयुष्यमान भारत' योजना दिल्लीत लागू करण्यास मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी स्पष्ट नकार दिला आहे. आपल्या सरकारची 'दिल्ली आरोग्य योजना' या योजनेपेक्षा दहापटींनी व्यापक व लाभदायक ठरली असल्याचा दावा त्यांनी केंद्रीय आरोग्यमंत्री हर्षवर्धन...
मे 31, 2019
नवी दिल्लीः मोदींच्या केंद्रीय मंत्रिमंडळाने गुरुवारी (ता. 30) दुसऱ्यांदा मंत्रीपदाची आणि गोपनीयतेची शपथ घेतली. त्यात 24 कॅबिनेट मंत्री आणि 9 स्वतंत्र कारभार सांभाळणारे राज्यमंत्री तर 24 राज्यमंत्र्यांचा समावेश होता. आज (शुक्रवार) खातेवाटप जाहीर करण्यात आले आहे. खातेनिहाय जबाबदारी अशीः नरेंद्र मोदी...
मे 06, 2019
नवी दिल्ली : भारतीयांमध्ये रक्तदाबाचे प्रमाण अधिक असून, त्यापैकी केवळ 45 टक्के जणांना याची जाणीव असल्याचे एका सर्वेक्षणाद्वारे निदर्शनास आले आहे. राष्ट्रीय आरोग्य आणि कुटुंब सर्वेक्षण संस्थेतील संशोधकांनी देशातील 29 राज्ये आणि सात केंद्रशासित प्रदेशांमधील 15 ते 49 वयोगटातील 7,31,864 जणांच्या...
जानेवारी 30, 2019
नवी दिल्ली : काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी प्रकृतीची चौकशी केली, आता ते राफेलबाबत खोटं बोलत आहेत, असे गोव्याचे मुख्यमंत्री व माजी संरक्षण मंत्री मनोहर पर्रिकर यांनी राहुल गांधी यांना थेट पत्र लिहीले आहे.  पर्रिकर यांनी पत्रात म्हटले आहे की, 'आपण फक्त 5 मिनिटे भेटलो, त्या भेटीचा वापरही तुम्ही...
जानेवारी 30, 2019
राष्ट्रपिता महात्मा गांधी यांची आज 70 वी पुण्यतिथी आहे. अहिंसावाद जगभर पसरविणाऱ्या या महात्माने स्वातंत्र्याची भीक न मागता ते आत्मसन्मानाने मिळविण्याची शिकवण भारतीय स्वातंत्र्यातून जगाला दिली. गांधी ही केवळ एक व्यक्ती नाही, तर एक काळ आहेत. 30 जानेवारी 1948 ला त्यांचा मृत्यू झाला. राष्ट्राला...
ऑक्टोबर 10, 2018
जयपूर (पीटीआय) : राजस्थानमध्ये 29 जणांना "झिका' या विषाणूची लागण झाल्याचे उघडकीस आले आहे. यात तीन गर्भवती महिलांचा समावेश आहे. हे सर्वजण जयपूर परिसरातील आहेत.  याबाबत माहिती सांगताना आरोग्य खात्याच्या अतिरिक्त मुख्य सचिव वीणा गुप्ता म्हणाल्या, ""झिका व्हायरस पसरू नये यासाठी योग्य ती खबरदारी घेण्यात...
ऑक्टोबर 08, 2018
नवी दिल्ली : "आयुष्मान भारत- प्रधानमंत्री जन आरोग्य योजने'अंतर्गत प्रथमच उपचार घेणाऱ्यांना "आधार'ची आवश्‍यकता नाही; पण दुसऱ्यांदा या अंतर्गत लाभ घेऊ इच्छिणाऱ्यांसाठी मात्र "आधार'चा पुरावा सादर करणे गरजेचे असल्याचे आज सरकारकडून स्पष्ट करण्यात आले. एखाद्या व्यक्तीकडे "आधार' क्रमांक नसेल...
ऑक्टोबर 07, 2018
नवी दिल्ली : शारीरिक आरोग्याची समस्या असलेल्या वृद्धांची संख्या भारतात 10 टक्केच असली तरी, बहुतांश ज्येष्ठ व्यक्तींना त्यांचे सामाजिक आयुष्य सुरळीत ठेवणे व दैनंदिन गरजा भागविण्याची चिंता असते.  'आयव्हीएच सिनीअर केअर'ने वेलनेस हेल्थ अँड यू या संस्थेच्या सहकार्याने पाहणी केली. 66 टक्के ज्येष्ठ...
सप्टेंबर 25, 2018
चेन्नई : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जगातील सर्वांत मोठ्या आरोग्य योजनेचा शुभारंभ केल्याने त्यांची नोबेल शांतता पुरस्कारासाठी शिफारस करण्यात यावी, अशी मागणी तमिळनाडूच्या भाजपच्या प्रदेशाध्यक्ष तमिलीसाई सुंदराजन यांनी केली आहे. भाजपच्या प्रदेश कार्यालयाकडून प्रसिद्ध करण्यात आलेल्या निवेदनात...
सप्टेंबर 25, 2018
जमशेदपूर- पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांची महत्त्वाकांक्षी प्रधानमंत्री जनआरोग्य योजनेचे (आयुष्मान भारत) उद्‌घाटन रविवारी (ता. 23) झारखंडमध्ये झाले. उद्‌घाटनानंत काही मिमिटांनी जन्मलेली बालिका या योजनेची पहिली लाभार्थी ठरली. पूर्व सिंगभूम जिल्ह्यातील सरदार रुग्णालयात महातो (वय 24)...
सप्टेंबर 23, 2018
नवी दिल्ली- दारूमुळे दरवर्षी जवळपास अडीच लाखापेक्षा जास्त भारतीयांचा मृत्यू होत असल्याचे एका सर्वेक्षणातून समोर आले आहे. जागतिक आरोग्य संघटनेने केलेल्या सर्वेक्षणानुसार, देशात वर्षाला दारुमुळे 2.60 लाख जणांचा मृत्यू होतो. या लोकांना यकृताच्या समस्या, कर्करोग असे आजार उद्भवतात. तसेच दारु पिऊन गाडी...
सप्टेंबर 23, 2018
रांची- पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी झारखंडची राजधानी रांची येथे आज (ता.23) दुपारी आयुष्मान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेचा शुभारंभ केला. ही जगातील सर्वात मोठी सरकारी आरोग्य योजना आहे. या योजनेचा फायदा जवळपास 50 कोटी पेक्षा जास्त लोकांना होणार असल्याचे सांगण्यात येत आहे. या...