एकूण 39 परिणाम
ऑक्टोबर 04, 2019
बुद्धी व स्मरणशक्‍तीच्या संपन्नतेतून साध्य होणाऱ्या विद्येची देवता म्हणजे सरस्वतीदेवी, कर्मशक्‍तीच्या संपन्नतेतून साध्य होणाऱ्या संपत्तीची देवता म्हणजे लक्ष्मीदेवी, शरीरशक्‍तीच्या साहाय्याने दुष्ट व अभद्र गोष्टींचे नामोहरण करणारी दुर्गादेवी, संपूर्ण वैश्विक शक्‍तीवर अधिकार असणारी गायत्रीदेवी अशा...
सप्टेंबर 06, 2019
श्री गणपती ही देवता कलियुगाची आहे असे म्हटले जाते. सध्या मेंदूचे विकार वाढत आहेत, तसेच इंद्रियव्यापारासंबंधित विकार वाढत आहेत, मनाशी संबंधी असलेले विकार वाढत आहेत व प्रसन्नत्व हरवलेले दिसते आहे. म्हणून सध्या श्री गणेश उपासना उपयोगी ठरावी.  `श्री गुरुदत्ता, जय भगवंता, ते मन निष्ठुर न करी आता', हेच...
ऑगस्ट 30, 2019
 "सीदन्ति मम गात्राणि, मुखं च परिशुष्यति' अशी लक्षणे दिसायला लागली की नैराश्‍याचा झटका येतो. अशा वेळी शरीरातील इंद्रियांचा व मेरुदंडाचा संबंध तुटतो. असे झाले की "भ्रमतीव च मे मनः' होणे ओघानेच येते, म्हणजे रोगाकडे वा मृत्यूकडे वाटचाल सुरू होते. तेव्हा सर्वांशी प्रेमाने वागणे, कायम सकारात्मक विचार...
जून 05, 2019
फुलापासून मिळणारा खरा आनंद फुलांच्या सुवासातच लपलेला असतो. आरोग्य देण्याची ताकदही फुलांच्या सुगंधातच दडलेली असते. पाणी तबकात भरून त्यात सुगंधी फुले टाकून ठेवली तर हवेत पाण्याच्या वाफेबरोबर फुलांचा सुगंधही पसरू शकतो. निर्गुडी, गवती चहा, लव्हेंडर अशा विविध प्रकारच्या वनस्पती टाकून मिळविलेल्या...
मार्च 04, 2019
अनेकांना ‘परीक्षा’ या शब्दात जणू ‘शिक्षा’ शब्दाचाच भास होतो. त्यामुळेच परीक्षा म्हणजे जणू अग्निदिव्यच, असा भाव निर्माण होतो. परीक्षा शब्दाबरोबर येणारा भीतीचा भाव काढून टाकला, तर परीक्षा अत्यंत सोपी होते. कोणत्याही परीक्षेला सामोरे जाताना मनात आत्मविश्‍वास असायला हवा. परीक्षा म्हणजे निव्वळ मेंदूची...
जानेवारी 27, 2019
इंद्रियांवर नियंत्रण राहिले नाही व इंद्रिये स्वतःपुरती पाहू लागली तर दुराचार, अनाचार, भ्रष्टाचार माजू शकतो. प्रत्येक इंद्रियाबरोबर मनावरही नैतिकतेचा अंकुश ठेवणे आवश्‍यक असते. शरीराचे व व्यक्‍तिमत्त्वाचे कल्याण हे पंचेंद्रिय व मन यांच्या कार्यपद्धतीवर अवलंबून असते. याच सिद्धांतानुसार आपण असे म्हणू...
जानेवारी 27, 2019
आपल्या तन-मन-मेंदूकडून ज्या क्रिया केल्या जातात, त्यांचा स्थूूल अशा पंचमहाभूतांवर परिणाम होतो. निर्णय योग्य असले तर क्रिया बरोबर होतात, अर्थातच पंचमहाभूतात्मक शरीर निरोगी, सुखी व संतुलित राहते. पण जर यातील एकही तत्त्व भ्रष्ट झाले तर त्याचा दुष्परिणाम इतर सर्वांवर होऊ शकतो, परिणामी अनारोग्य, दुःख,...
नोव्हेंबर 25, 2018
आवळा तुरट, आंबट व गोड असतो; शीतल तसेच पचायला हलका असतो; दाह तसेच पित्तदोष कमी करतो; उलटी, प्रमेह, सूज वगैरे रोगांमध्ये उपयुक्‍त असतो; रसायन म्हणजे रसरक्‍तादी धातूंना संपन्न करणारा असतो तसेच थकवा, मलावष्टंभ, पोटात वायू धरणे वगैरे त्रासांमध्ये हितकर असतोच. या सर्व गुणांमुळे आवळ्याला अमृताची उपमा...
ऑक्टोबर 14, 2018
प्राचीन भारतीय शास्त्रात शक्‍तीला देवतास्वरूप मानले आहे. किंबहुना, शक्‍तीच्या विविध स्वरूपांनाच आपण वेगवेगळ्या देवींची नावे दिलेली आहेत. बुद्धी व स्मरणशक्‍तीच्या संपन्नतेतून साध्य होणाऱ्या विद्येची देवता म्हणजे सरस्वतीदेवी, कर्मशक्‍तीच्या संपन्नतेतून साध्य होणाऱ्या संपत्तीची देवता म्हणजे...
सप्टेंबर 21, 2018
मेंदूत साठविलेल्या माहितीची फेररचना करणे आवश्‍यक असते. आज केस विंचरले, तरी दुसऱ्या दिवसापर्यंत केसांमध्ये पुन्हा गुंता तयार होतो. गुंता झालेले केस विंचरून पुन्हा नीट करून घ्यावे लागतात, तसे मेंदूच्या कार्यपद्धतीचे जाळे योग्य उपाययोजना करून व्यवस्थित ठेवावे लागते. स्मृती थोडी कमी झाली, ज्या गोष्टी...
ऑगस्ट 24, 2018
भारतीय संस्कृतीमध्ये प्रत्येक पौर्णिमेच्या निमित्ताने काही ना काही विशेष उत्सवाची योजना केलेली आढळते. या सर्व पौर्णिमांमध्ये दोन पौर्णिमा अशा आहेत, ज्या वनस्पतींच्या नावे ओळखल्या जातात. एक आहे वटपौर्णिमा व दुसरी आहे नारळीपौर्णिमा. नारळीपौर्णिमेच्या दिवशी सागराची किंवा एकंदरच जलतत्त्वाची नारळ देऊन...
जुलै 06, 2018
मागच्या अंकात आपण अग्नी प्रदीप्त व कार्यक्षम राहण्यासाठी भुकेनुसार अन्न सेवन करणे सर्वश्रेष्ठ असते हे पाहिले. आता पुढची माहिती घेऊ या.  यथासात्म्यं चेष्टाभ्यवहाख्यै सेव्यानाम्‌ । कर्मामध्ये स्वतःला (स्वतःच्या प्रकृतीला) सात्म्य (अनुकूल) आहार आचरण करणे श्रेष्ठ होय.  प्रकृतीला जे मानवते, सवयीचे असते...
जून 25, 2018
वडाचा उपयोग स्त्री-आरोग्यावर, गर्भाशयाच्या कार्यक्षमतेवर होतो असा समज असल्याने स्त्रियांनी वडाच्या झाडाच्या संपर्कात राहावे, वडाच्या झाडाच्या भोवती फिरावे, अशी पद्धत रूढ झाली असावी.  भारतीय संस्कृतीने व्रत-वैकल्ये, उपासना, उत्सवांच्या माध्यमातून निसर्गाची जवळीक साधण्याचा नेहमीच प्रयत्न केलेला आढळतो...
जून 25, 2018
वटपौर्णिमेनिमित्त वडाच्या झाडाची पूजा करणे हे धार्मिक कर्मकांड झाल्यामुळे भिंतीवर वडाचे चित्र काढून किंवा एखादी छोटी फांदी तोडून आणून त्याची पूजा करण्यासारखी हास्यास्पद रूढी प्रचलित झालेली दिसते. त्यामुळे आरोग्यासाठी वटवृक्षाच्या सान्निध्यात राहण्याचा मूळ हेतू साध्य होत नाही. धत्ते भारं...
जून 15, 2018
आयुर्वेद ही जशी जीवन जगण्याची पद्धत आहे, तसेच योग हे जीवनाचे लक्ष्य साध्य करण्याचे शास्त्र आहे, असे म्हणता येईल. म्हणून ही दोन्ही शास्त्रे एकमेकांना पूरक असतात. आयुर्वेदाच्या मदतीने आरोग्य मिळाले, योगातील अष्टांगाच्या मदतीने पर्यावरण, समाज, नातेसंबंध, मन, इंद्रिये यांच्या आरोग्याची जोड मिळाली तर...
जून 15, 2018
‘जीवेत शरदः शतम्‌’ अशा प्रकारचा आशीर्वाद अथवा शुभेच्छा आपण हमखास वाढदिवसाच्या अभीष्टचिंतनाला देतो. परंतु ती व्यक्ती खरोखरच १०० वर्षे आरोग्यमय जिवंत राहू शकेल, यासाठी आपण अथवा ती व्यक्ती काही करतो का, याचा विचार आपण केला पाहिजे. आरोग्य आणि वाढदिवस याविषयी विचार व्हावा... भारतामध्ये असा प्रघात अथवा...
जून 15, 2018
वाळा, ज्येष्ठमध, कुष्ठ आणि अनंतमूळ हे आपल्या शरीरासाठी खूप उपयुक्त आहेत. सुगंधी वाळा आणि नेहमीचा वाळा यांचा लेप शरीराचा दाह, त्वचारोग आणि घाम करणाऱ्या लेपांमध्ये श्रेष्ठ असतो. ज्येष्ठमधाचा छोटा तुकडा चघळल्याने आवाज सुधारतो, कंठ मोकळा होतो. रक्‍तशुद्धिकर असल्याने ज्येष्ठमधामुळे त्वचा उजळते, तेजस्वी...
मे 11, 2018
विविधतेने नटलेल्या आपल्या देशाचा कुपोषणामध्ये जगात पहिला क्रमांक लागतो, तर स्थूलत्वामध्ये तिसरा. गरिबी आणि आहाराची आबाळ ही कुपोषणाची निमित्ते असतात, तर नवश्रीमंती, बदलत्या जीवनशैलीतील अयोग्य आहार पद्धती आणि व्यायामाचा अभाव, ही वाढत्या वजनाची वाढती कारणे असतात.  स्थूल आणि जाड- कुठल्याही वयाच्या...
मे 11, 2018
कर्करोग हा पूर्वीइतका भयंकर आजार राहिलेला नाही. नवनव्या उपचार पद्धतींमुळे कर्करोगावर नियंत्रण मिळवणे सहज शक्‍य झाले आहे. वाढते शहरीकरण, औद्योगीकरण आणि जगण्याच्या बदलत्या सवयींमुळे भारतातील कर्करोगाच्या रुग्णांची संख्या सध्या वेगाने वाढताना दिसत आहे. एक गोष्ट खरी, की कर्करोगावर जरी उपचार असले, तरी...
मे 04, 2018
आपल्या मुलाची नीट वाढ होत नाही, वजन वाढत नाही, अशी अनेक आयांची तक्रार असते. आपले बाळ कसे गुटगुटीत दिसले पाहिजे, असे प्रत्येक आईला वाटते. पण हा गुटगुटीतपणा आरोग्याला पूरक आहे की त्रासदायक आहे, याचा विचार आई करीत नाही. शेजारचे मूल, मैत्रिणीचे मूल, नातेवाईकाचे मूल यांच्याशी आपल्या मुलाची तुलना करीत आई...