एकूण 20 परिणाम
January 25, 2021
नाशिक : नाशिक मध्ये ९४ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन होत आहे. ही नाशिकरांसाठी अत्यंत आनंदाची बाब आहे. त्यामुळे हे साहित्य संमेलन यशस्वी करणे आणि नाशिकची वेगळी ओळख निर्माण करणे ही आपली सर्वांची सामुहिक जबाबदारी असून हे साहित्य संमेलन उजवं कसं होईल यासाठी प्रयत्न करावे असे आवाहन स्वागताध्यक्ष...
January 17, 2021
माळेगाव : बारामती-शारदानगर, माळेगाव येथील कृषी पंढरीत सोमवार (ता. १८) पासून `कृषीक २०२१०- कृषी तंत्रज्ञान सप्ताह`च्या माध्यमातून भरणाऱ्या यात्रेची उत्सुकता शिगेला पोहचली आहे. आधुनिक अवजारे, पीक प्रात्यक्षिकापासून अनेक शेतकऱ्यांनी जुगाड करून तयार केलेल्या मशनरी पाहण्याची नामी संधी सोमवारपासून मिळणार...
December 26, 2020
नांदगाव (जि.नाशिक) : दिल्ली-मुंबई लोहमार्गावर कोरोना फक्त नांदगाव स्थानकावर मुक्कामाला थांबलाय का? असा प्रश्न नांदगावकरांना आता सतावत आहे. अर्थात, त्याला कारणही तसेच आहे. एरवी वर्दळीचे स्थानक आता एखाद्या चित्रपटाप्रमाणे एखाद्या खेडूत स्थानकासारखे भासू लागले आहे. ब्रिटिशकालीन या स्थानकाची अशी...
December 24, 2020
खडकवासला (पुणे) : पुणे महापालिकेत 23 गावांचा समावेश करण्याचा निर्णय बुधवारी (ता.23) राज्य शासनाने घेतला. याबाबत महाविकास आघाडीने याचे स्वागत केले आहे. पण राज्यातील विरोधी पक्ष व पुणे पालिकेत सत्तेत असलेल्या भारतीय जनता पक्षाच्या वतीने मात्र नाराजी व्यक्त केली आहे. असे असले तरी शहरातील भाजपच्या एका...
December 15, 2020
कोल्हापूर : ब्रिटिशांना सळो की पळो करणारे लढवय्ये स्वातंत्र्यसेनानी आणि गोरगरिबांसाठी अव्याहत झटलेले कोल्हापूरचे माजी खासदार शंकरराव माने यांची आज, १५ डिसेंबरला जयंती. त्यांच्या जन्मशताब्दीनिमित्त... शंकरराव माने यांचा जन्म १५ डिसेंबर १९२० रोजी कोल्हापूर येथे झाला. त्यांचे वडील दत्तात्रेय सगनोजी...
December 14, 2020
चिपळूण (रत्नागिरी) : गुहागरचे आमदार भास्कर जाधव यांची दादागिरी मी एका दिवसात संपवली त्यामुळे प्रमोद जठार यांना अडवण्याची भाषा करू नका. आम्ही ठरवू तेव्हा तुम्हाला अडवू असे आव्हान भाजपचे माजी खासदार निलेश राणे यांनी शिवसेनेला दिले. खासदार विनायक राऊत यांच्यावरही त्यांनी टिका केली.नयेथील ब्राह्ममण...
December 14, 2020
मनमाड (नाशिक) :  जम्मू च्या राजोरी जिल्ह्यातील नौशेरा सेक्टरच्या सीमावर्ती भागात गस्त घालत असताना जवान सुरेश रघुनाथ घुगे यांना वीरमरण आले. त्यांच्यावर आज (ता.१४) दुपारी शोकाकुल वातावरणात नांदगाव तालुक्यातील अस्तगाव येथे लष्करी इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. ‘सुरेश घुगे ..अमर रहे ... अमर रहे !’...
December 07, 2020
दिक्षी (नाशिक) : नाशिक ते कसबे सुकेणे मार्गावर धावणाऱ्या राज्य परिवहन महामंडळाच्या शहर बस, साधी बस, तसेच कृषिमालाच्या वाहतुकीला वसाहतीमधून एचएएलने परवानगी नाकारल्याने सुमारे दहा गावांची वाहतूक ठप्प झाली आहे. त्यामुळे ग्रामस्थ आणि प्रवासी संतप्त झाले असून, ज्या गावांनी भूमिहीन होऊन एचएएल कारखान्याला...
December 01, 2020
सोलापूर : पुणे येथील एल्गार परिषदेत सहभागी झाल्याच्या कारणावरून खोट्या आरोपाखाली ताब्यात घेण्यात आलेले झारखंड येथील आदिवासींच्या प्रश्नांसाठी आयुष्य समर्पित केलेले समाजसेवक स्टॅन स्वामी यांना पाणी पिण्यासाठी पेला व नळीची मागणी करूनही तुरुंग प्रशासन पेला आणि नळी उपलब्ध करून देऊ शकत नाही. इतके आपण...
November 25, 2020
हिंगोली  :  हिंगोली येथे वैद्यकीय महाविद्यालय उभारण्यासाठी खासदार राजीव सातव यांनी सुरू केलेल्या पाठपुराव्यानंतर आणखी एक पुढचे पाऊल पडले आहे. वैद्यकीय शिक्षणमंत्री अमित देशमुख यांनी हिंगोलीला लवकरच पूर्वपाहणी पथक पाठविणार असून सरकार याबाबत सकारात्मक असल्याचे आश्वासन खा. सातव यांना दिले.  मुंबईत...
November 14, 2020
पिंपळगाव बसवंत( जि.नाशिक) : आहेरगाव (ता. निफाड) येथील रहिवासी व सैन्यदलात पठाणकोट येथे कार्यरत असताना मृत्यू झालेले सुदर्शन दत्तात्रय देशमुख (वय ३२) यांना शुक्रवारी (ता. १३) हजारो नागरिकांच्या उपस्थितीत साश्रुनयनांनी निरोप देण्यात आला. या वेळी ‘वीर जवान अमर रहे’च्या घोषणा देण्यात आल्या. जवानाच्या...
October 31, 2020
अलिबाग : खासदार सुनील तटकरे आणि पालकमंत्री आदिती तटकरे यांना बदनाम करण्याचे भाजपचे कारस्थान सहन केले जाणार नाही, असा इशारा राष्ट्रवादी कॉंग्रेसचे जिल्हाध्यक्ष सुरेश लाड यांनी पेण येथे दिला. मागील काही दिवसांपासून पेण नगरपालिका मुख्याधिकारी विरुद्ध सत्ताधारी असा वाद विकोपाला गेला आहे. यामध्ये भाजपची...
October 22, 2020
नांदेड : जिल्ह्यातील विविध विकास योजना, तसेच विकास कामांबाबत जिल्हा विकास समन्वय व सनियंत्रण समिती (दिशा) बैठकीत सर्वंकष आढावा घेण्यात आला. योजना, उद्दीष्टांच्या अंमलबजावणीसाठी विविध विभागांकडून काटेकोर नियोजन करण्यात यावेत, असे निर्देश बैठकीत देण्यात आले. बैठकीच्या अध्यक्षस्थानी खासदार प्रताप...
October 21, 2020
नांदेड - शेतकऱ्यांशी उद्धटपणे गैरवर्तन करणाऱ्या भारतीय स्टेट बँकेच्या अधिकाऱ्यांना शेतकऱ्यांशी कसे वागायचे हेच अजून माहित नाही. अशा उद्धट अधिकाऱ्यांना संस्काराची गरज असून, यापुढे शेतकऱ्यांशी गैरवर्तन कराल, तर खपवून घेणार नाही. अशा कडक शब्दात खासदार हेमंत पाटील यांनी बुधवारी (ता. २१) इशारा दिला आहे...
October 13, 2020
जळगाव ः राज्यात महिला सुरक्षेचा प्रश्न दिवसेंदिवस गंभीर होत आहे. राज्यातील महाविकास आघाडी सरकारचे या प्रश्नाकडे होणारे दुर्लक्षच याला जबाबदार असल्याचा आरोप करीत भारतीय जनता महिला मोर्चाकडून सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आक्रोश आंदोलन करण्यात आले. भाजपच्या खासदार रक्षा खडसे यांच्या नेतृत्वाखाली...
October 11, 2020
हिंगणा एमआयडीसी(जि.नागपूर): हिंगणा तालुक्यातील तत्कालीन तहसीलदार संतोष खांडरे यांची राज्य शासनाने तडकाफडकी बदली केली होती. या बदलीविरोधात तहसीलदार खांडरे यांनी ‘मॅट’कडे धाव घेतली आहे. त्यामुळे सोमवारी ‘मॅट’चा निकाल कुणाच्या बाजूने लागणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. अधिक वाचाः जनतेला ‘कॅश’...
October 06, 2020
जळगाव  : जिल्ह्यात पावसामुळे महामार्गाची दुरवस्था झाली आहे. यामुळे महामार्गाच्या चौपदरीकरणाच्या कामांची गती वाढवावी. आजही ग्रामीण भागात नागरिक उघड्यावर शौचास जातात. याबाबत सर्वच गावांमध्ये ‘स्वच्छ भारत’ योजनेबाबत जनजागृती करावी, अशा सूचना खासदार रक्षा खडसे यांनी सोमवारी ‘दिशा’...
September 18, 2020
पुणे : पुणे जिल्हा परिषद राजकारणाचा अड्डा बनला आहे, अशी टीका शिवसेनेचे शिरूरचे माजी खासदार आणि सेना उपनेते शिवाजीराव आढळराव पाटील यांनी शुक्रवारी (ता.१८) केली. खेड पंचायत समितीच्या नवीन मुख्यालयाचे काम सुरू होत नसल्याच्या निषेधार्थ शुक्रवारी सेनेच्यावतीने जिल्हा परिषद मुख्यालयासमोर नंदीबैल आणि...
September 15, 2020
कळंब (उस्मानाबाद) : कोरोनाबाधितांवर सक्षम उपचार करून मृत्यूच्या दाढेतून बाहेर काढण्यासाठी आरोग्य प्रशासन रात्रंदिवस झटत आहे. कळंब तालुक्यात कोरोनाचे रुग्ण दिवसेंदिवस वाढत चालले आहेत. गंभीर रुग्णाला व्हेंटिलेटरची आवश्यकता असून शासनाकडून उपजिल्हा रुग्णालयाला देण्यात आलेले व्हेंटिलेटर फिजिशन तज्ञ...
September 15, 2020
सोलापूर : देशात सध्या अस्तित्वात असणाऱ्या केंद्र सरकारने लोकशाहीचा खून पाडून संविधान धोक्‍यात आणले आहे. याचे रक्षण करणे प्रत्येक भारतीय नागरिकाची जबाबदारी आहे. म्हणून देशहित आणि संविधान रक्षणासाठी चाललेल्या या लढाईत माकपचे महासचिव, माजी खासदार सीताराम येचुरी यांच्यावरील दोषारोपपत्र मागे घ्या;...