एकूण 30 परिणाम
सप्टेंबर 05, 2019
डकार (सेनेगल) : पश्‍चिम आफ्रिकन देश सेनेगलची राजधानी दकार येथे दरवर्षीप्रमाणे यंदाही गणेशोत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येत आहे. सात वर्षांपूर्वी स्थापन झालेल्या श्री गणेश मंडळाच्या कार्यकर्त्यांनी "गणपती बाप्पा मोरया'च्या गजरात वाजतगाजत 'श्रीं'ची प्रतिष्ठापना केली. यंदा गणेशोत्सवानिमित्त...
सप्टेंबर 03, 2019
पुणे - मानाच्या पाचही गणपतींची भक्तिमय वातावरणामध्ये प्रतिष्ठापना होत असताना पेठांमधील इतर प्रमुख गणपतींच्या मोठ्या थाटात मिरवणुका निघाल्या. मंडई आणि बाबू गेनू गणपती मंडळाचा मयूररथ, दगडूशेठ मंडळाचा शेषात्मज सुंदर सजवले होते. त्याचसोबत बॅंड पथकावर वाजविली जाणारी भक्तिगीते, ढोल-ताशांच्या तालबद्ध...
सप्टेंबर 02, 2019
पुणे : गणपती बाप्पा मोरयाचा गजर आणि ढोल-ताशा, बँडच्या निनादाने मंडई गणपतीची मयूर रथातून मिरवणूक काढण्यात आली. मिरवणुकीनंतर चैतन्यमयी वातावरणात तीर्थंकर जैन मंदिरात शारदा-गजानन मुर्तीची प्राणप्रतिष्ठापना भारतीय जैन संघटनेचे संस्थापक शांतीलाल मुथा यांच्या हस्ते दुपारी साडे बारा वाजता करण्यात आली. ...
सप्टेंबर 01, 2019
पुणे : वैभवशाली गणेशोत्सवास लवकरच सुरवात होत आहे. बाप्पांच्या स्वागतापूर्वी मंडळांचे मंडपांचे व देखावे उभारणीचे पूर्ण होत आले आहेत. घरगुती गणपतींसाठीही लगबग सुरू आहे. पुण्याच्या गणेशोत्सवाची ओळख असलेल्या मानाच्या गणेशोत्सव मंडळांनी गणपती बाप्पांच्या स्वागताची तयारी पूर्ण केली आहे. भाद्रपद शुद्ध...
ऑगस्ट 28, 2019
पुणे - पुण्यनगरीत गणरायाच्या स्वागतासाठी पावसाच्या हलक्‍या सरी पडण्याची शक्‍यता हवामान खात्याने मंगळवारी वर्तविली. येत्या बुधवार (ता. २८) ते सोमवार (ता. २) या दरम्यान शहर आणि परिसरात हलक्‍या सरी पडण्याची शक्‍यता २५ ते ५० टक्के असल्याचेही खात्यातर्फे स्पष्ट करण्यात आले आहे.  शहरात ढगाळ वातावरण आहे....
सप्टेंबर 19, 2018
ग्रामीण भागात पूर्वी मनोरंजनाची साधने मर्यादित होती. दिवसा शेतीची कामे करून मंडळी सायंकाळी घराकडे परतत. रात्रीच्या जेवणानंतर गावातले वयस्क मारुतीच्या पारावर नाहीतर विठोबाच्या देवळात भजन-कीर्तनासाठी एकत्र येत आणि टाळ-मृदंगाच्या साथीत भजन म्हणून मध्यरात्रीला घरी परतत. तरुण पोरं-बाळं संध्याकाळी तालमीत...
सप्टेंबर 18, 2018
औरंगाबाद - अबूधाबीत १९७७ मध्ये स्थायिक झालेल्या आठ कुटुंबांनी सार्वजनिक गणेशोत्सव सुरू केला. हे इवलेसे रोप आज गगनाला गेल्याची प्रचिती आली. दीड दिवसाच्या गणरायाचा आशीर्वाद घेण्यासाठी यंदा पंधरा हजार भक्तांची गर्दी पाहायला मिळाली.   प्रारंभीला हा उत्सव सभासदांच्या घरी साजरा केला जायचा. कालांतराने...
सप्टेंबर 17, 2018
हिंगोली - उच्च शिक्षणानंतर अमेरिकेत गेल्यानंतरही भारतीय संस्कृतीची नाळ कायम ठेवणाऱ्या भारतातून नोकरीच्या निमित्ताने अमेरिकेत गेलेल्या वेस्टलँण्ड मित्र मंडळाने गणेशमुर्तीची विधिवत स्थापना केली आहे. त्यामुळे गणपतीबप्पाचा गजर अमेरिकेतही सुरू आहे.  भारतामधे उच्च शिक्षण घेऊन विविध देशांमधे नोकरीच्या...
सप्टेंबर 17, 2018
ढोल-ताशा आणि गणपती यांचा नक्की संबंध काय?, गणेशोत्सवात ढोल का वाजवला जातो?, असे प्रश्‍न अनेकदा विचारले जातात. साउंड सिस्टिम आणि गणपती यांचा संबंध नक्कीच नाही. पण, गणपती आणि ढोल यांचा संबंध मात्र नक्कीच आहे. श्री गणेश सहस्त्रनामात ४९९ वे नाव आहे ढक्कानिनादमुदितः. याचा अर्थ आहे, ढोलाच्या निनादाने...
सप्टेंबर 16, 2018
औरंगाबाद - इस्लामी राष्ट्र अशी ओळख असलेल्या पाकिस्तानात मराठी आणि अमराठी हिंदू समाजबांधवांनी गणरायाला वंदन करण्याची परंपरा फाळणीपूर्व काळापासून अखंड सुरू ठेवली आहे. एकट्या कराची शहरात बसणाऱ्या दीड दिवसाच्या गणरायाला सुमारे तीस मंडळांनी शुक्रवारी (ता. १४) वाजत-गाजत निरोप दिला.  पाकिस्तान शब्द ऐकताच...
सप्टेंबर 12, 2018
कोल्हापूर - गणेश चतुर्थी दोन दिवसांवर आहे. गणेशमूर्तीचे स्टॉल कुंभार गल्लीत आणि इतर ठिकाणी लागले आहेत. महाराष्ट्रभर तर गणेशोत्सवाची धामधूम आहेच; पण चक्क अमेरिकेतील न्यूजर्सी येथे मूळ कोल्हापूरच्या शीतल प्रसाद बागेवाडी यांनी पर्यावरणपूरक गणेश मूर्तींचा स्टॉल उभा केला आहे. नोकरी-व्यवसायाच्या...
सप्टेंबर 10, 2018
कुडूमुलु (गणेश चतुर्थीसाठी दक्षिण भारतीय प्रसाद) - कमी आचेवर 1 टेबल स्पून तूप टाका. तूप किंचित गरम झाले की त्यात अर्धा 1 टेबल स्पून जिरं टाका. जिरं तडतडायला लागलं की 1 कप पाणी, 1 मोठा चमचा भिजवलेली चना डाळ, चवीपुरतं मीठ टाका. हे मिश्रण मध्यम आचेवर उकडून घ्या. त्यात अर्धा कप तांदळाचा रवा घाला. हे...
सप्टेंबर 10, 2018
चॉकलेट शिरा मोदक - मंद आचेवर पॅन ठेवा. पॅनमध्ये अर्धा चमचा तुप टाका. तुप किंचीत गरम झालं की तीन टेबल स्पून शिऱ्याचा रवा त्यात घालावा. त्यात कोको पावडर मिस्क्स करा. त्यात एक कप गरम पाणी घाला. हे मिश्रण नीट मिक्स करुन मध्यम आचेवर 5 मिनीट झाकुन ठेवा. गॅस कमी आचेवर सुरुच ठेवा. नंतर हे मिश्रण ढवळून...
सप्टेंबर 09, 2018
गणेशोत्सवात शास्त्रीय संगीत गायकीची घरंदाज परंपरा लाभलेल्या अनेक घराण्यांनी त्यांची गायन सेवा वाहिली आहे. भारतीय शास्त्रीय संगीताला जगात अत्यंत श्रीमंत संगीत म्हणून वाखाणण्यात येते. परंतु गेल्या काही वर्षांत गणेशोत्सवाला ओंगळवाणे स्वरुप आले आहे. ते अश्‍लिल गाणी लावून त्यावर बिभत्सपणे नाचण्यामुळे....
सप्टेंबर 07, 2017
ढोल-ताशांच्या दणदणाटासह ‘बाप्पा’ला निरोप विसर्जन मिरवणुकीची २८ तासांनी सांगता पुणे - ढोल-ताशांचा दणदणाट, सामाजिक संदेश देणाऱ्या रांगोळ्यांच्या पायघड्या, फुलांची चौफेर उधळण,   ‘मोरयाऽऽ मोरयाऽऽ’चा जयघोष करत वादकांना भाविकांकडून मिळणारी उत्स्फूर्त दाद, नानाविध रूपांतील गणरायाचा थाट, उकाडा वाढत...
सप्टेंबर 07, 2017
पिंपरीत साडेअकरा, तर चिंचवडला अकरा तास मिरवणूक पिंपरी - ढोल-ताशांचा खणखणाट, फुलांची आणि भंडाऱ्याची केली जाणारी मुक्त उधळण, झांज पथकाचे रंगलेले खेळ, तरुणाईचा शिगेला पोचलेला उत्साह अशा जल्लोषमय वातावरणात पिंपरी परिसरातील गणेश मंडळांनी मंगळवारी (ता. ५) बाप्पाला निरोप दिला. दुपारी पाऊण वाजता सुरू...
सप्टेंबर 03, 2017
पुणे : ''गणेशजी के मेले में कुछ पैसे मिलेंगे, इसलिए हम हर साल पूना में आते है। ब्रेसलेट, खिलौने बेचते है। उसी पैसों से कुछ महिने खेतीबाडी करते है ।'' अशा शब्दांत देशाच्या कानाकोपऱ्यांतून खास गणेशोत्सवादरम्यान छोट्या-मोठ्या वस्तू विकण्यासाठी येणाऱ्या महिला, पुरुषांनी आपली भावना व्यक्त केली आहे. ...
सप्टेंबर 01, 2017
भारतीय सैन्य दलाच्या कार्याचा गौरव करणारा देखावा; तब्बल एक महिना मेहनत पुणे - टाकाऊ वस्तूंपासून तयार केलेली ‘आयएनएस विराट’ ही युद्धनौका... शस्त्रास्त्रांच्या प्रतिकृतीतून दिलेली सैन्य दलाची माहिती अन्‌ भित्तीपत्रकांतून जवानांच्या कार्याला केलेला सलाम...अशा लहान मुले आणि तरुणांनी एकत्र येऊन तयार...
ऑगस्ट 31, 2017
हडपसर - नवरंग मित्र मंडळाने सामाजिक प्रबोधन करणारा देखावा सादर केला आहे. मोबाईलचे व्यसन, युवकांचे सेल्फीमुळे झालेले मृत्यू, मोबाईल गेमद्वारे होणारे होणारे दुष्परिणाम, फेसबुक, व्हॉट्‌सअपच्या अति वापरामुळे निर्माण झालेले प्रश्‍न आदी विषय हाताळले आहेत, अशी माहिती विजय बणपट्टी यांनी दिली.      मांजरी...
ऑगस्ट 31, 2017
शहरातील शाळांमध्ये विविध कार्यक्रमांचे आयोजन पुणे - ‘ओला-सुका कचरा जिरवा’, ‘शहरातील प्रदूषण नियंत्रणात ठेवा’, ‘वाहतुकीचे नियम पाळा’, ‘इको फ्रेन्डली गणेशोत्सव साजरा करा’,... शाळांमधील विद्यार्थी सध्या मोठ्या उत्साहात आहेत आणि आपल्या शाळेतल्या बाप्पाची पूजा-आरती करण्याबरोबरच अशा संदेशांचाही प्रसार...