एकूण 16 परिणाम
ऑगस्ट 09, 2019
सिडको - स्वप्नपूर्तीला इच्छशक्तीची जोड असेल, तर आकाशही ठेंगणे होते. स्वप्न जर आई-वडिलांचे असेल, तर ते पूर्ण करण्यासाठी मग सर्व काही करण्याची तयारीही असते. याचाच प्रत्यय रायगडनगर या आदिवासी वस्तीतील निशा राजू शिद या युवतीकडे पाहून येतो. ती सध्या रशियात वैद्यकीय शिक्षण घेत आहे. यासाठी शेतकरी वडिलांनी...
डिसेंबर 13, 2018
पिंपरी - जगभरातील विविध देशांमधून जलद सायकल प्रवास करण्याच्या उद्देशाने ज्ञानप्रबोधिनी, निगडीची माजी विद्यार्थिनी, युवा सायकलपटू वेदांगी कुलकर्णी हिने सुमारे १३ देशांमधून २७ हजार किलोमीटरचा प्रवास पूर्ण केला आहे. पिंपरी-चिंचवडमध्ये रात्रीचा मुक्काम करून ती वडिलांसमवेत पुढील प्रवासासाठी मार्गस्थ...
ऑगस्ट 26, 2018
वर्धा - प्रबळ इच्छाशक्‍ती, आत्मविश्‍वास व मेहनत करण्याची तयारी असेल तर वंचित घटकातील विद्यार्थी यशाचे शिखर गाठू शकतो. येथील मांग-गारोडी समाजातील नंदनी नाडे हिने हे दाखवून दिले. तिने डॉक्‍टरची पदवी प्राप्त केली आहे. मांग-गारोडी समाजात डॉक्‍टर होणारी ती भारतातील पहिलीच मुलगी आहे. नंदनीने शरद पवार दंत...
जुलै 05, 2018
साकोळ - दहावीमध्ये नापास झाल्यानंतरही या अपयशाला झुगारून साकोळचा धावपटू ओमकार स्वामीने इतिहास रचत स्वित्झर्लंडमध्ये झालेल्या महामॅरेथॉन स्पर्धेत कांस्यपदकावर आपले नाव कोरले आहे. स्वित्झर्लंड येथील झर्मत या शहरांमध्ये तीन जुलैरोजी पार पडलेल्या आंतरराष्ट्रीय महामॅरेथॉन स्पर्धेत ओमकारने तिसरा क्रमांक...
एप्रिल 17, 2018
ढेबेवाडी - छोट्या विमानांची सेवा विस्तारल्याशिवाय त्या क्षेत्राच्या विकासाची भाषाचं आपण करू शकत नाही. शहरांबरोबरच गावे- वाड्यावस्त्या विमानाने जोडायच्या असतील तर छोट्या विमानांना पर्याय नाही. राज्यकर्त्यांकडे त्याबाबत सकारात्मकता आहे. मात्र, सरकारी बाबूंची मानसिकता बदलली पाहिजे, असे मत भारतीय...
जानेवारी 05, 2018
नागपूर - आम्ही अंध आहोत...बालपणापासून प्रत्येक कामासाठी आमचे जीवन दुसऱ्यावर अवलंबून... तरीही आम्ही शिक्षणाची कास धरून स्वतःचा विकास करतोय... उज्ज्वल भविष्याची स्वप्न पाहतोय... तुम्हाला तर दृष्टी आहे... हवं तसं जगू शकता... म्हणूनच या देव देणगीचा सदुपयोग करा... उच्च शिक्षित व्हा... असा प्रेरणादायी...
डिसेंबर 28, 2017
सोमेश्वरनगर (जि. पुणे) - ‘‘जन्म झाला तेव्हा शेकायचीपण सोय नव्हती. फाटकी कपडे घालून खर्डा-भाकरी खात शिकलो. दहावीच्या परीक्षेला शिक्षकांनीच कपडे घेऊन दिली. आईसोबत भांगलायला, ऊस तोडायला जायचो. तरीही जिद्दीनं शिकत होतो; कारण आईला फाटक्‍या लुगड्यात बघू शकत नव्हतो. परिस्थितीच्या बरगड्या लवकरात लवकर...
डिसेंबर 21, 2017
पुणे - एरंडवणा येथील कैलाश करमरकर या तेवीसवर्षीय अभियंत्याची भारतीय हवाई दलात ‘फ्लाइंग ब्रॅंच’साठी निवड झाली आहे.   हैदराबादमधील दुंदीगलच्या एअरफोर्स ॲकॅडमीमध्ये ७४ आठवड्यांचे प्रशिक्षण पूर्ण केल्यानंतर त्याला ‘फ्लाइंग ऑफिसर’ रॅंक मिळेल आणि तो भारतीय हवाई दलात वैमानिक होईल. आई शैलजा करमरकर या...
नोव्हेंबर 24, 2017
ढेबेवाडी - ‘त्याच्या प्रत्येक स्वप्नातील ठाम विश्‍वास आणि जबर आत्मविश्‍वास आम्ही हेरला. ध्येयाकडे झेपावण्यासाठी फडफडणाऱ्या त्याच्या पंखांना प्रोत्साहनाचे बळ देत भक्कमपणे त्याच्या पाठीशी उभे राहिलो. त्याच्या इतकाच आमचाही त्याच्या भरारीवर विश्‍वास होता आणि आज त्याने तो सार्थही ठरविला. अमोलने आमचे,...
सप्टेंबर 14, 2017
‘पाइप नेटवर्क ॲनालिसिस ॲन्ड ऑप्टिमायझेशन’च्या प्रशिक्षणासाठी परदेशवारी नित्याचीच नाशिक - ‘कम वुइथ मी, टाइम टू लेट अवर ड्रीम्स प्लाय फ्री ॲन्ड इट कम सो इजिली दॅट इज अवर वे...’ प्रसिद्ध गायिका मेल्डिना कॅरोल यांच्या ‘वुई चेंज द वर्ल्ड’ (भाग-१) अल्बममधील या काही ओळी आपल्यावरील संकटे, समस्यांवर मात करत...
जुलै 31, 2017
पुणे - माणसांच्या गर्दीने कायम गजबजलेली मातोश्री रमाबाई आंबेडकर वस्ती (ताडीवाला रस्ता)... अवैध धंद्यांपासून ते गुन्हेगारी प्रकाराच्या अनेक गोष्टी इथे घडतात... मात्र याच वस्तीत रेल्वेच्या ‘डिझेल कॉलनी’त राहणारा एक मुलगा प्रतिकूलतेवर मात करत भारतीय प्रशासकीय सेवेची (आयएएस) परीक्षा उत्तीर्ण होतो....
फेब्रुवारी 01, 2017
रियो ऑलिंपिकमध्ये प्रतिनिधित्व; विजेच्या धक्‍क्‍याने गमावले हात सावर्डे - प्रबळ इच्छाशक्ती आणि त्याला आत्मविश्‍वासाची जोड दिल्यास अशक्‍य गोष्ट शक्‍य करता येते. त्यासाठी करावे लागणारे प्रयत्न आणि अपार कष्टाच्या जोरावर यश कसे मिळवता येते, याचे ज्वलंत उदाहरण म्हणजे गेल्या वर्षी रियो येथे झालेल्या...
जानेवारी 12, 2017
नाव सारिका चव्हाण. शिक्षण बीएस्सी, मास कम्युनिकेशन. तंत्रशिक्षणाचा फारसा गंध नाही. तरीही शाळेपासूनच इंजिनिअर होण्याचे स्वप्न. आर्थिक परिस्थितीमुळे विज्ञान शाखेतून पदवी घेतली. मात्र इंजिनिअर होण्याच्या जिद्दीतून पाच वर्षांच्या धडपडीनंतर सर्वसामान्य कामगार ते असिस्टंट जनरल मॅनेजर अशी मारलेली मजल...
डिसेंबर 30, 2016
दापोलीचा सुपुत्र - किशोर वयात घेतलेला ध्यास पूर्णत्वास दापोली - हवाई दलात सामील होण्याचा ध्यास रोहन पवारने घेतला होता. किशोर वयातच रोहनने त्याचे सुभेदार असलेल्या आजोबांच्या छायाचित्रासोबत इंडियन एअरफोर्सच्या विमानाचे पोस्टर लावले होते. हा ध्यास आज त्याने पूर्ण केला. रोहन कोकणातील वायुदलातील पहिला...
नोव्हेंबर 18, 2016
गुगलच्या सर्च इंजिनला "इंडियन वुमन‘ असा एक साधा सर्च दिला तर चुली फुंकणाऱ्या महिला, दवाखान्यात रांगेत उभ्या असलेल्या गरोदर महिला असे काही फोटो दिसू लागतात. अर्थातच या छायाचित्रांमध्ये भारताचे नाव उज्वल करणाऱ्या कर्तुत्ववान महिलादेखील दिसतात; मात्र हे प्रमाण थोडे कमी आहे. थोडेच दिवसांनी गुगलला देखील...
नोव्हेंबर 15, 2016
मराठी, बंजारा भाषेतील गीतांची रचना; चांगल्या संधीची प्रतीक्षा जळगाव - प्रतिकूल स्थितीमुळे लपून राहिलेल्या कलेची साधना केली तर ती केव्हातरी समोर येतेच. आणि त्यातून एखादा उदयोन्मुख कलावंत उदयास येतो, असा सार्वत्रिक अनुभव आहे. पाचशे वस्तीवरच्या तांड्यात जन्मलेल्या बंजारा समाजातील एका तरुणाच्या गीतांची...