एकूण 66 परिणाम
जून 12, 2019
सांगली - गेल्या आठ-नऊ महिन्यांपासून सातत्याने कोयना धरणातून पाण्याचा विसर्ग झाल्याने यंदा पाण्याची पातळी अवघी आठ टीएमसीवर आली. ही पाणीपातळी मृतसाठा सोडून आहे. पाऊस लांबला तर कृष्णाकाठी जलसंकट येऊ शकते.  पाच टीएमसी इतके पाणी पिण्यासाठी राखून ठेवण्याचा निर्णय पाटबंधारे विभागाने घेतला. अजून तीन टीएमसी...
एप्रिल 30, 2019
‘आम्ही ज्यांना मत देतो, ते निवडून आल्यानंतर आमच्याकडे फिरकतही नाहीत. पाणी, रस्ते, वीज या मूलभूत सुविधांसाठी आम्हाला वर्षानुवर्षे झगडावे लागते,’ अशी भूमिका मांडत पश्‍चिम महाराष्ट्रातील काही गावांनी लोकसभा निवडणुकीच्या मतदानावर बहिष्कार टाकला. ‘निवडणुकीची धामधूम संपली, आता तरी आम्हाला पाणी द्या’ ही...
एप्रिल 20, 2019
वसंतदादांनी सांगली जिल्हाच नव्हे तर राज्य समोर ठेवून विकासाचा दृष्टिकोन ठेवला. जात-पातीपलीकडे जाऊन संकुचित विचारांना थारा न देता सर्व समाजघटकांचा विचार केला पाहिजे हा माझ्यावरील पिढीजात संस्कार आहे. त्यामुळे कुणावर टीका करण्यात मला काडीचे स्वारस्य नाही. सांगली परिसर जिल्ह्याच्या विकासाचे  इंजिन आहे...
एप्रिल 18, 2019
जत - शंभर वर्षांच्या काँग्रेसची जिल्ह्यात कुठेही शाखा उरलेली नाही. आता त्यांना स्वाभिमान गहाण टाकलेल्यांच्या आश्रयाला जायची वेळ आली आहे, अशी टीका मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली. खासदार राजू शेट्टी आणि स्वाभिमानी आघाडीचे उमेदवार विशाल पाटील यांच्यावर त्यांनी तीव्र शब्दात टीका केली. विशाल...
एप्रिल 17, 2019
गुद्दे आहेत, चिमटे आहेत, आरोप आहेत, प्रत्यारोप आहेत; पण लोकसभेची निवडणूक अजून मुद्द्यावर आलेली नाही. गेल्यावेळी मुद्दा होता जिल्ह्यातील दुष्काळ, विकासाचा बॅकलॉक, उद्योग, रोजगार आणि रेल्वे, महामार्ग असे पायाभूत सुविधांचे विषय होते. पतंगराव कदम आणि आर. आर. पाटील हे नेते गेल्यावेळी प्रचारात असतानाही...
एप्रिल 01, 2019
सांगली लोकसभेच्या आखाड्यात यावेळी वेगळीच रंगत येणार आहे. एकीकडे खासदार संजय पाटील यांच्यासारखा आक्रमक राजकीय नेता, दुसरीकडे वसंतदादांचे नातू विशाल पाटील यांची स्वाभिमानीकडून उमेदवारी आणि गोपीचंद पडळकरांच्या बंडाची शक्‍यता, या स्थितीत बॉयलर पेटणार आणि धूर निघणार हे नक्की! संजयकाका विरुद्ध विशाल हा...
मार्च 15, 2019
सांगली - सन २०१९ हे निवडणूक वर्ष म्हणून चर्चेत असले तरी सोबतीला दुष्काळाचा दाह तितकाच तीव्र आहे. टेंभू, ताकारी, म्हैसाळ, आरफळ या चार उपसा सिंचन योजना सध्या पूर्ण क्षमतेने सुरू करण्यात आल्याने पाणीटंचाईची तीव्रता कमी आहे.  सुदैवाने कोयना आणि चांदोली धरणांतील पाणीसाठा चांगला आहे....
मार्च 06, 2019
सांगली -  जिल्ह्याच्या दुष्काळी भागात दुष्काळाच्या झळांनी लोकांचे जगणे असह्य होत आहे. जिल्ह्यातील टेंभू, ताकारी आणि म्हैसाळ या सिंचन योजना ऐन उन्हाळ्यात सध्या बंद आहेत. योजनांच्या थकबाकीचा मोठा प्रश्‍न निर्माण झाला आहे. दुष्काळी भागासाठी सिंचन योजना वरदान आहेत. राज्य सरकारने...
नोव्हेंबर 27, 2018
मंगळवेढा - तालुक्याच्या दक्षिण भागात प्रशासनाकडून म्हैसाळचे पाणी शिरनांदगी तलावात सोडण्यासाठी अनेक वेळा दिलेल्या तारखा पाळल्या नाहीत. उलट प्रशासकीय अधिकाऱ्यांकडून वेगवेगळ्या लोकप्रतिनिधींची आणि या भागातील शेतकऱ्यांची चेष्टा केल्याचे दिसून येऊ लागल्याने अखेर जि.प.सदस्या शैला गोडसे यांनी शिरनांदगी...
नोव्हेंबर 22, 2018
मंगळवेढा - तालुक्यांमध्ये दुष्काळी तिव्रता जाणवू लागली असुन, शासकीय उपाययोजना अजुन कागदावर आहेत. अशा परिस्थितीत जलसंपदामंत्र्याच्या बैठकीत व पालकमंत्री व लोकप्रतिनिधीच्या दौऱ्यात पाणी लवकरच पाणी येणार असल्याचा दावा करण्यात आला. परंतु, ऐन दुष्काळात पाणी येण्यास विलंब होत. असल्याने जि.प. सदस्या शैला...
सप्टेंबर 27, 2018
मिरज - सरकारी आरोग्य यंत्रणेतील डॉक्टर आणि औषध प्रशासनातील आधिका-यांच्या संगनमतानेच ग्रामीण भागात बेकायदा गर्भपात आणि गर्भलिंग तपासणीचे धंदे जोमात असल्याचा आरोप आज पंचायत समिती सदस्यांनी मासिक सभेत करण्यात आला. अध्यक्षस्थानी सभापती जनाबाई पाटील होत्या. सांगली आणि म्हैसाळ मधील भ्रूण...
सप्टेंबर 19, 2018
सांगली - गणेशनगरमधील चौगुले मॅटर्निटी व सर्जिकल हॉस्पिटलमध्ये तब्बल 14 महिलांचा गर्भपात केल्याचे निष्पन्न झाले आहे, अशी माहिती पोलीस उपअधिक्षक अशोक वीरकर यांनी दिली. म्हैसाळ येथील गर्भपात व भ्रूणहत्याकांडाने राज्य हादरून गेले होते. डॉ. बाबासाहेब खिद्रापुरेसह १४ संशयितांना अटक केली होती...
जुलै 20, 2018
सांगली जिल्ह्यात मिरज तालुक्‍याचा पूर्व भाग द्राक्ष, तर काही प्रमाणात उसासाठी प्रसिद्ध आहे. म्हैसाळ उपसा सिंचन योजना सुरू झाल्याने हा परिसर सिंचनाबाबत तसा समृद्ध झाला आहे. म्हैसाळ उपसा सिंचन योजनेचे आर्वतन वेळेवर सुरू न झाल्यास परिसरात पाणीटंचाई सातत्याने भेडसावते. अशा...
जून 14, 2018
भाजपला चार आमदार आणि एक खासदार पक्षाला देऊनसुद्धा सांगलीच्या पदरात काहीच नव्हते. सारी  पदांची लयलूट कोल्हापूरलाच जात होती; पण मुख्यमंत्र्यांनी आपल्या सत्तेच्या अखेरच्या पर्वात का असेना सांगलीच्या पदरात एक मोठे महामंडळ टाकले आहे. ‘कृष्णा खोरे’चे उपाध्यक्षपद खासदार संजय  पाटील यांना देऊन ते...
एप्रिल 20, 2018
मिरज - कोकण आणि गोव्यातून परदेशात माशांची निर्यात वाढल्याने पश्‍चिम महाराष्ट्रातील खवय्यांचे वांदे झाले आहेत. गेल्या महिन्याभरात समुद्रातील माशांच्या किंमती पंचवीस ते चाळीस टक्‍क्‍यांनी वाढल्या आहेत. अस्सल मासळीबहाद्दरांची पहिली पसंती असलेल्या सुरमई आणि पापलेटने तर खिशाला भलताच खार लावला आहे....
मार्च 24, 2018
मिरज - म्हैसाळ उपसा सिंचन योजनेचं घोडं अखेर आज कृष्णेत न्हालं. दुपारी पंधरा कोटी रुपयांचा निधी पाटबंधारे विभागाकडे जमा झाला आणि तो तत्काळ महावितरणकडे वर्ग करण्यात आला. सायंकाळी उशिरा योजनेचा वीजपुरवठा जोडण्यात आला. तांत्रिक तपासणी पूर्ण झाली. आज (ता. २४) सकाळी पंप सुरू करून कालव्यातून...
मार्च 09, 2018
मिरज -  रविवारच्या ( ता. 11 ) दौऱ्यात मुख्यमंत्र्यांची गाडी अडवणारच असा निर्धार कॉंग्रेस आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांनी व्यक्त  केला. म्हैसाळ योजनेतून पाणी उपसा सुरु करावा. यासाठी आठवडाभरापुर्वी जिल्हाधिकार्यांना निवेदन दिले होते, मात्र त्यावर कार्यवाही न झाल्याने या नेत्यांनी आज पुन्हा...
फेब्रुवारी 08, 2018
गरीब, अत्याचारपीडित कुमारी मातांच्या परिस्थितीचा गैरफायदा घेत, त्यांना आर्थिक आमिष दाखून अर्भकांची विक्री करण्याचा कोल्हापूर जिल्ह्यातील इचलकरंजी येथे उघडकीस आलेला प्रकार म्हणजे माणुसकीला काळिमा तर आहेच; परंतु या प्रकारात एका डॉक्‍टरचाही हात असल्याचे उघड झाल्याने तो वैद्यकीय पेशालाही लाजिरवाणा आहे...
डिसेंबर 12, 2017
मिरज - पाटबंधारे कार्यालयात दाखल केलेल्या वार्षिक आकारणी पत्रकावर सही करण्यासाठी २० हजारांची लाच घेताना प्रमोद दुर्गादास अकोलकर (वय ५५) या मिरज पाटबंधारे कार्यालयातील शाखा अभियंत्यास लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहाथ पकडले. याप्रकरणी अकोलकर यांना ताब्यात घेण्यात आले आहे. सांगली पाटबंधारे...
ऑक्टोबर 29, 2017
मिरज - मिरज-सांगली दरम्यानची शहर बससेवा सातत्याने तोट्यात जात आहे. प्रवाशांसाठी तिचे अस्तित्व संपू लागले आहे. दिवाळीत संपामुळे राज्यभर प्रवासी हैराण झाले होते; मिरज-सांगली मार्गावर मात्र रिक्षा संघटनांनी अखंड सेवा सुरू ठेवली. प्रवाशांची गैरसोय झाली नाही. यामुळे शहरी वाहतूक सेवा असली काय आणि नसली...